हा माझा सर्वस्वी स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे ज्या कोणाला ही गोष्ट पटणार नाही त्याने मला मूर्ख समजावे व गोष्ट सोडून द्यावी, माझ्या मूर्खपणाला क्षमा करावी परंतु चुकीच्या गोष्टी बोलू नयेत ही विनंती.
मयूर माझ्यासमोर मृतावस्थेत होता. दुःख म्हणजे ते जास्त प्रचंड होते की मी विचारच करू शकत नव्हतो की माझा सगळ्यात जवळचा मित्र माझ्यासमोर मृतावस्थेत आहे. असे कसे झाले? हा प्रश्न इतका जाचत होता. वेदना आणि दुःख कदाचित अनावर झाल्या होत्या.
आणि मयुर चे शब्द कानावर पडले "उठ उठ नुसता झोपून राहिला आहे."
खाडकन माझे डोळे उघडले काही सेकंदांसाठी मला हे समजत नव्हते की आत्ता थोड्यावेळापूर्वी याला मृतावस्थेत बघितला होता. आणि हा समोर कसा काय? तेवढ्यात भानावर आलो आणि लक्षात आले की ते स्वप्न होतं
"स्त्री"
कोणतीही वाईट गोष्ट किंवा अन्याय हा हजारो वर्ष चालत आला की अक्षरशः रक्तात, पेशिपेशित आणि मानसिकतेत घुसतो. मग ती एक नैसर्गिक प्रक्रिया होत जाते. मग ते अन्याय आणि चुकीच्या गोष्टी देखील गोड आणि चांगल्या वाटत जातात.
ज्या स्त्रिया अजून स्वतःच्या पायावर उभ्या नाहीत किंवा शिकलेल्या नाहीत त्यांची गोष्ट सोडा पण आज ज्या करोडो स्त्रिया नोकरी करतात स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्यांचेच उदाहरण देतो.
1. अगदी सुरवातीच्या काळात कोणत्या मुलीला हे आवडले असेल की आपले नाव लग्नानंतर बदलले जावे? आपले आडनाव बदलले जावे? ज्या बाळाला आपण 9 महिने पोटात ठेवले त्याला फक्त बापाचे नाव लावले जावे?
हजारो वर्षांपूर्वी जेव्हा या गोष्टी सुरू झाल्या तेव्हा किती
मॅट्रिक्स सिनेमा कोणी कोणी बघितलेला आहे? आधुनिक काळामध्ये अत्यंत अवघड विषयाला हात घातलेला हा अत्यंत गुंतागुंतीचा सिनेमा. या सिनेमामध्ये व्हर्च्युअल जगामध्ये सामान्य लोक जगत असतात. त्यांना माहित नसते की आपण प्रत्यक्षामध्ये एका ठिकाणी झोपून आहोत
व आपण जगत आहोत ते स्वप्नामधील जग आहे. काही लोकांना मात्र या झोपलेल्या अवस्थेत मधून जाग येते व सत्य काय आहे ते लक्षात यायला सुरुवात होते. हा माझा प्रचंड आवडता सिनेमा आहे कारण भारतामधील अद्वैत वेदांत किंवा तशा पद्धतीचेच तत्त्वज्ञान यामध्ये दाखविण्यात आलेले आहे.
जास्त खोला मध्ये जात नाही परंतु सरळ आता मुद्द्याला हात घालतो.
काही माणसांचे चरित्र वाचले असता किंवा त्यांना समजावून घ्यायचा प्रयत्न केला असता असा प्रश्न पडतो की ही माणसे नक्की कोणत्या दुनियेमध्ये जगत होती??
समजा आजच्या काळामध्ये एखाद्या माणसाने दुसऱ्या माणसाला ई-मेल लिहिले की मी तुला ठार मारणार आहे. त्यानंतर समजा खरोखर त्या माणसाचा खून झाला. त्यामध्ये पहिल्या माणसाचा काहीच संबंध नसेल. तरीदेखील पाचशे वर्षांनंतर महान इतिहासकारांना जर
का हे ई-मेल सापडले व त्या या माणसाचा खून झाला आहे ही माहिती देखील सापडली. तर ते महान इतिहासकार त्या पिढीला हे सांगून मोकळे होतील की त्या माणसाचा खून करण्यात ई-मेल करणाऱ्या माणसाचा हात आहे.
इतिहास असाच सांगितला जातो नाही का??
म्हणून इतिहासात जास्त अडकू नका. इतिहास म्हणजे भूतकाळ. त्याच्यामध्ये भुतावळ च जास्त असते. ढोबळ संदर्भा शिवाय शिवाय इतिहासाला काहीही महत्त्व नाही.
सत्तर वर्षांपूर्वी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे काय झाले हेदेखील माहित नसलेले आपण चारशे वर्षांपूर्वी कोणाची हत्या कोणी केली यावरून
ज्योतिष हे शास्त्र नक्की आहे. त्याचा आदर देखील आहे. परंतु हे स्वामी विवेकानंद म्हणतात ते पूर्ण follow केले आहे मी.
मुळात भविष्य जाण्याची जरुरत काय?
जे होणार आहे ते होणार आहे.
आणि सगळ्यात मोठे नवल वाटते ते स्वतःला स्पिरिच्युअल म्हणून घेणारे लोक यात असतात.
खरे तर अध्यात्मिक व्यक्ती ही फक्त वर्तमानात जगत असते त्या व्यक्तीला ना भूतकाळात इंटरेस्ट असतो भविष्यकाळात. जे काही होईल ते माझ्या परमेश्वराच्या इच्छेने या भावनेने तो बसलेला असतो. किती वाईट संकट येणार असले तरी देखील त्यात बदल करण्याची त्याची किंचितही इच्छा नसते.
त्यामुळे वरती स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे ग्रह किंवा तारे आपल्या आयुष्यात इतका मोठा impact करत आहेत असे जर कोणाला वाटत असेल तर त्याला चांगल्या अन्नाची गरज आहे जेणेकरून मेंदू नीट चालेल. किंवा मानसोपचाराची गरज आहे