आधुनिक भारतीय मध्यम वर्गीय स्त्रीवाद हा स्वैराचाराला डोक्यावर घेऊन नाचतो. यात दहा-बारा लफडी करणे, घरी कधीही येणे, व्यसनं करणे (कारण पुरुष करतात), कुणाचंही नियंत्रण नको असा काहीसा अर्थ आजच्या पिढीत दिसत आहे. #Feminism#Culture#Values#Bharat#Hindu#Hinditva#Samskar#Sanskriti
पुरुषांच्या पिढ्यांपिढ्या लढाया करून, पैसे कमवून दमल्या, खपल्या खरं आजवर कुठल्याही पुरुषानं स्वतःला मी आत्मनिर्भर, स्वतंत्र म्हणजेच आजच्या भाषेत इंडिपेनडंट मॅन असल्याचं म्हटलेलं कुठं पाहिलं नाही. स्त्रियांच्या बाबतीत हे मला बऱ्याचवेळा आढळलं.
पुरुष धुतल्या तांदळाइतके स्वच्छ असतात असा माझा दावा नाही. तरी मी माझं वैयक्तिक इतकंच सांगू शकतो की मी स्वतःला धुतलं तर मी तांदळासारखा स्वच्छ होईन इतकी माझी पातळी नक्कीच आहे.🤣असो तो मुद्दा नाही आहे. पण मला कुणी विचारलं तर भारतीय स्त्रीवादाला सुधा मूर्ती सारख्या स्त्रीचा आदर्श
घ्यायला हवा असं वाटतं.
पुरुषांनीही त्यांच्याकडून घेण्यासारखंच आहे. पण आज फक्त स्त्रीवाद म्हणजेच भारतीय फेमिनिझम वर बोलायचं आहे म्हणून.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे आपण फक्त म्हणतो, पण सुधा मूर्तींच्या आचरणात ते दिसतं. इतक्या पैश्याची मालकीण असूनही कुठंही बडेजाव नाही.
आपली संस्कृती टिकवून, पैसे कमवून, आपल्या बुद्धीचं दर्शन पूर्ण जगाला दाखवून स्त्रीला पुरुषाहून अधिक यशस्वी होता येतं याचं त्या उदाहरण आहेत.
नारायण मूर्तीचं भाषण वगैरे तितकं कधी पाहण्यात आलं नाही पण सुधा मूर्ती जेव्हा बोलतात त्यावेळी ऐकत राहावंसं वाटतंय. आपल्या घरातली आजी जेव्हा
काही सांगत असते तेव्हा नातवंडं कशी गोळा होऊन ऐकतात, तसं काहीसं त्या बोलतात तेव्हा वाटतं.
स्वामी विवेकानंदांच्या बद्दल एक कथा आहे त्यांना कुणीतरी त्यांच्या कपड्यांवरून काहीतरी बोललं, त्यावेळी ते म्हणाले होते की "तुमच्या देशात (पश्चिमेत) कपड्यांवरून चारित्र्य ठरते, आमच्या देशात
विचारांवरून (अर्थातच कृती अपेक्षित आहे) !"
ही कथा खरी आहे काय माहिती नाही, कारण मी स्वामीजींचं चरित्र वाचलं त्यात असं वाचलं नाही. पण हे इतर कुणी बोललं असेल तरी हीच आपली ओळख आहे. म्हणूनच आज मोदी इतके लोकप्रिय आहेत.
कंगणा, रिया, सुशांत इत्यादी लोकांची थोबाडं, कपडे कितीही
आकर्षक असले तरी आजचा स्त्रीवाद आणि एकूणच तरुण पिढीचे ते आदर्श असू नयेत.
"माझं आयुष्य माझे नियम." हे भारतीय संस्कृतीस धरून नाही. कुटुंबव्यवस्था हा भारतीय संस्कृतीचा एक सशक्त पाया आहे. स्त्रीनं घरात राहावं असा आजचा काळ नाही, तरी स्त्रीनं बाहेर आल्यावर कुणाच्या पावलावर पाऊल टाकावं
हा आजच्या कायद्यानुसार वैयक्तिक मुद्दा असला तरी सुधा मूर्ती आणि त्यांच्यासारख्या स्त्रियांना पहा असा माझा सल्ला (सक्ती नाही) आहे. किमान पालकांनी तसं बाळकडू पाजायला हवं. (मुलगा, मुलगी दोघांना)
रिया, कंगणा, इत्यादी मध्ये झगमगाट आहे, खरं अंत काय आहे हे मी सांगायला नको.
सुधा मूर्ती आणि इत्यादी मध्ये यश आहे, नेतृत्वक्षमता आहे, इतरांकडून मिळणारा आदर आहे, मांगल्य आहे.
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर!
(पुरुष कसे वाईट आहेत स्त्रियांना कशी बंदी असते वगैरे मुद्द्यांवर वाद घातल्यास दुर्लक्ष केले जाईल. पुरूष चुकीचं वागत नाहीत असा आमचा दावा नाही.
त्यांनी कुणाचा आदर्श घ्यावा वगैरे काही दुरुस्ती किंवा आंग्ल भाषेत कन्स्ट्रक्टीव क्रिटीसिझम करणार असाल तर स्वागत आहे.)
काही महिने पुण्यात राहण्याचा योग आला. खरंच पदरी थोडंतरी 'पुण्य' असल्याशिवाय 'पुण्यनगरीत' प्रवेश मिळत नाही. हे वाक्य म्हणजे पुणेकरांबद्दल पुढं जे काही बोलणार आहे त्याआधी त्यांना खुश करण्याचा 'असफल' प्रयत्न आहे.
असफल एवढ्यासाठीच की पुणेकरांना तुमच्या स्तुती किंवा टीकेनं फरक पडत नाही. म्हणजे शुद्ध मराठीत चाटु लोकांना पुणेकर भाव देत नाहीत. उर्वरीत महाराष्ट्रातल्या लोकांनी पुणेकरांवर कितीही विनोद करावेत पण पुणेकरांना राग येत नाही. कारण ते बाजारातून जाणाऱ्या त्या निर्विकार हत्तीप्रमाणे आहेत
ज्याला भुंकणाऱ्या कुत्र्यांकडं लक्ष देण्यात रस नाही. याचा अर्थ त्यांना अजिबात राग येत नाही असं नाही. कारण एकदा एका पुणेकरानं 'तुम्ही सांगली, सातारा, कोल्हापूरचे लोक! तुम्हाला जर एवढाच प्रॉब्लेम आहे पुण्याचा तर इथं नोकरीसाठी का येता?' असा चारचौघात माझा उद्धार केला होता.
काही दिवसांपूर्वी मी "मांड्या आणि गल्ल्या दाखवत फिरणाऱ्या" असा उल्लेख "अतिप्रगत" हिंदू महिलांबद्दल केला. त्यावर मला "तू ठरवणार काय, मुलींनी कुठले कपडे घालायचे?" असा प्रश्न "प्रगत" हिंदुत्ववादी लोकांनी केला. त्यांना स्कर्ट किंवा फ्रॉक मध्ये भारतमाता चालेल काय?
एम. एफ. हुसेन च चित्र सुद्धा अश्याना मान्य आहे काय? भारतमाता म्हणजे आपल्या देशातलं स्त्री तत्व आहे. त्याची अब्रू वेशीला टांगल्यासारखं प्रदर्शन तुम्हाला मान्य नसेल तर भारतीय स्त्रिया दोन पोरांच्या आया झाल्या तरी लहानपणीचेच कपडे घालून फिरणार असतील तर माझी काहीही हरकत नाही.
मुळात आजचा पाश्चात्य स्त्री पोशाख हा जास्तीत जास्त पुरुषांना आकर्षित करेल असाच बनवला जातो आणि तोच त्यांचा मानस आहे. स्त्रीला वस्तू समजू नका म्हणणारे सुद्धा यालाच बळी पडत आहेत.
अरब लोक याहून मोठ्या डायनिंग टेबल एवढ्या थाळीत बिर्याणी भात पसरून मध्ये उंट किंवा आणखी कुठल्यातरी अभक्ष्य प्रकारच्या तंगड्या ठेऊन धा-बारा जण त्यावर तुटून पडतात म्हणे. नशीब त्या ताटात स्वतः च्या तंगड्या घालत नाहीत.
काय एक एक संस्कृती (?). जपान मध्ये सार्वजनिक ठिकाणी गरम पाण्याच्या हौदात नैसर्गिक कपड्यात धा बारा जण पुरुष बायका जाऊन बसायची पद्धत आहे म्हणे.
असो.
तर अशी पनीर-काजू ची मंदी खाल्ल्यावर मेंदू मध्ये मंदी आलेली आहे.
#विधवा_प्रथा_बंदी
काही ठिकाणी #विधवा_प्रथा बंद करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव केले. ते पाहून #महाराष्ट्र शासनानं परिपत्रक काढलंय. शासकीय परिपत्रकात वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे सांगितलं आहे, पण सध्या "नाव बदलायला कशाला पाहिजे #संभाजीनगर च आहे ते, मी सांगतोय ना!"
असा शासनाचा #वैज्ञानिक#दृष्टिकोन आहे. हे सगळं पाहून मला काही प्रश्न पडले. आपल्या परिचित लोकांमध्ये कुणीही विधवा स्त्रीचा #विधवा म्हणून अपमान केला आहे काय किंवा ऐकिवात आहे काय? माझ्यातरी माहितीत असं प्रकरण अजूनतरी नाही. उलट वयस्कर विधवा स्त्रियांकडं आपला समाज आदरानंच पाहतो.
आता तरुण वयात विधवा होणाऱ्या स्त्रियांबद्दल. मुळात आजकाल लग्न करणाऱ्या किती मुली #मंगळसूत्र घालतात, #कुंकू लावतात, #बांगड्या घालतात? अश्या घटनांमुळं विवाहित स्त्रियांनी कुंकू लावावे की नको हा वैचारिक #गोंधळ जन्माला घातला आहे. म्हणजे एकीकडे न घालणे म्हणजे पुरोगामीत्व