🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4W2lm

Sep 5, 2020, 11 tweets

सध्या #twitter वर कंगणा आणि संजय राऊत ह्या दोघांमुळं #PoK (pak occupied kashmir) वरून जोरदार टिव टिव चाललीय.तर काय आहे PoK,त्याची निर्मिती कधी झाली ह्याबद्दल खाली थोडीशी माहिती..हा थ्रेड नक्की वाचा आणि आवडल्यास Rt करा.🙏🙏👇 #म #मराठी #धागा #KanganaRanaut #SanjayRaut #आमची_मुंबई

1947 ला भारत स्वतंत्र झाला तेव्हा इंग्रजांनी भारतातले जे राजे महाराजे होते त्यांना सांगितले की,"तुम्ही एकतर भारतात किंवा पाकिस्तानात राहु शकता अथवा स्वतंत्र देश म्हणुन राहु शकता.तो सर्वस्वी तुमचा निर्णय आहे".त्यावेळी जम्मु काश्मीरचे राजा हरिसिंग यांनी आम्ही स्वतंत्र राहु असा

निर्णय घेतला.राजाने जम्मु काश्मिरच्या प्रदेशात शेतकर्यांवर दंडात्मक कर लावला होता ज्यामुळे तिथले शेतकरी राजावर नाराज होते.ह्याची परिनती म्हणजे 'पुंछ'क्षेत्रात राजा विरोधात बंड झाला.पाकिस्तानला काश्मीर हवा होता व हा बंड म्हणजे ती संधी.21ऑक्टोबर 1947 ला 'पश्तुन' आदिवास्यांनी

पाकिस्तानच्या मदतीने राजा विरोधात मोठा बंड केला.राजाच्या सैनिकांनी बंड शमवण्याचा खुप प्रयत्न केला पण पाकिस्तान पुरस्कृत आदिवास्यांकडे आधुनिक हत्यार असल्याने त्यांनी राजाच्या सैन्याला हरवले व 24 ऑक्टो. 1947 ला संपूर्ण 'पुंछ' जिल्हा ताब्यात घेतला.एवढचं नाही तर मुझफ्फराबाद आणि

बारामुल्ला प्रदेशही बळकावला.दुकानं लुटली व अनेक मुली,स्त्रियांवर बलात्कार केले.परिस्थिती हाताबाहेर चाललेली पाहुन राजाने भारताकडे मदत मागितली.भारताने मदत करण्यास संमती दर्शवली परंतु त्याबदल्यात राजाला 'instrument of accession' वर सही करण्यास सांगितले.राजाने 'शेख अब्दुल्ला' यांच्या

सहमतीने #नेहरू जींच्या उपस्थितीत 26 ऑक्टो.1947 रोजी करारावर सही केली आणि संरक्षण,परराष्ट्रीय धोरणं व संचार ह्या तीन विषयांना भारताच्या हवाली केले.सही झाल्यानंतर भारताच्या सैन्याने पाकिस्तानवर लगेच हमला केला.दोघांमध्ये प्रचंड युद्ध झाले व परिस्थिती आणखी बिघडु नये ह्यासाठी दोन्ही

देशांमध्ये समझोता झाला.ह्या समझोत्यात पाकिस्तानने जेव्हढा प्रदेश बळकावला होता तो त्यांनाच देऊन टाकला तो प्रदेश म्हणजेच आजचा 'पाक व्याप्त काश्मिर'.पाकिस्तान ह्या प्रदेशाला 'आझाद काश्मिर' म्हणुन संबोधतो.ह्या प्रदेशाचे एकुण क्षेत्रफळ 13297 चौ.किमी. असुन PoK ची राजधानी 'मुझफ्फराबाद'

आहे.प्रशासनासाठी सोपं पडावं म्हणुन PoK चे रूपांतर 10 जिल्ह्यांमध्ये केले आहे आणि त्यांना स्वताला एक पंतप्रधान,राष्ट्रपती व एक परिषद ही दिली गेली आहे.ते सर्व कागदोपत्रीच असुन PoK चा खरा कंट्रोल पाकिस्तानच्या हातात आहे. Pok ची लोकसंख्या जवळपास 40 लाखाच्या आसपास आहे.1963 ला एका

कराराद्वारे पाकिस्तानने जम्मु काश्मिरचा जवळपास 5000 चौ.किमी चा भाग चीनला दिला.PoK मध्ये शाळा आणि काॅलेज जरी कमी असले तरी ह्या प्रदेशाची साक्षरता जवळपास 72% आहे. PoK हा भारताचा अविभाज्य भाग 1947 पासुन पाकिस्तानने अवैध मार्गाने बळकावुन‌ ठेवला आहे.भारताच्या इतिहासातील ही एक

योग्य म्हणताय तुम्ही..मी म्हणत नाही की आदिवासी चुकीचे होते, जाचक कराला कंटाळून छोटे मोठे बंड होत असताना पाक ला जम्मुच्या राजाला विचलीत करण्यासाठी कोणाची तरी गरज होती🙏 इतिहास साक्षीला आहे की आजपर्यंत अनेक मोठ्या लोकांनी त्यांच्या समाजाचा वापर स्वताचा स्वार्थ साधायला केला आहे(१/२)

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling