My Authors
Read all threads
Story of hidden side of an Entrepreneur
उद्योजकाच्या अनोळखी विश्वात.
काहीतरी करून दाखवायचं हा विचार ज्या दिवशी येतो त्या दिवसा पासून सुरु होतो एक खडतर, काटेरी प्रवास, जो बाहेरून खूप रंगीबेरंगी दिसतो. सगळं सुरळीत चालू असतं, ३० तारखेला बँकेत पगार जमा व्हायचा, (1/n)
सुट्ट्या मिळायच्या, नवरा बायको मुलं असं सगळं सुरळीत चालू असताना काहीतरी करून दाखवायचा विचार त्याला बसू देत नाही. भला मोठ्ठा पगार सोडून काहीतरी करू नको पासून ते आपण करू इथपर्यंत चा प्रवास म्हणजे आपल्या जोडीदाराला समजावून सांगणे.
(2/n)
एकदा आपण करू हा शब्द ऐकला की गड्याला इतका हुरूप येतो की काय करू काय नाही होऊन जातं. घरी छान गोड धोड जेवण एकमेकांना भरून प्रत्येक क्षणात सोबती असल्याचा अप्रत्यक्ष पुरावा देत असतात. काल्पनिक सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या, सुंदर दिसतात.( 3/n)
त्यात उद्योजक झाला म्हणजे मी माझा बॉस (व्यवसाय सुरू करण्याआधी नकळतपणे अहंकार आपल्या अंगी शिरतो). मी केव्हाही काहीही केलं तरी चालेल, कितीही सुट्ट्या घेता येतील, फिरायला जाता येईल. मोठी गाडी, मोठा बंगला , परदेश दौरे, समाजात चार लोक विचारतील, (4/n)
असे एक ना अनेक रंगीबेरंगी दिवा स्वप्न पडू लागतात. त्याच दीवास्वप्नांना बळी पडून मॅनेजर च्या टेबल वर आपला राजीनामा ठेवतो. त्याचं मन एक वेगळ्या विश्वात रमलेले असते. कोणाचाही काहीही ऐकण्यास असमर्थ असतो. सगळ्या गोष्टी ठरल्यासारख्या होतात. (5/n)
नोकरी ते व्यावसायिक ते उद्योजक ह्या प्रवासाला सुरू होते. जितकं उद्योजक होण्याचं काल्पनिक स्वप्न पाहिलं होतं त्यापेक्षा किती तरी अधिक पटीने खडतर प्रवासाला सुरुवात होते. यशस्वी उद्योजक डोळ्यासमोर ठेवून कामाला सुरुवात होते. (6/n)
आपण ठरवलेल्या ध्येयाला गाठण्यासाठी चा प्रवास कधीच सरळ नसतो. यश हेच माझं नाव, आडनाव असेल , मी एक entrepreneur आहे. हा आविर्भाव येतो.
व्यवसायाला सुरुवात होते, एक जोश असतो, तो टिकवायचा, आणि आपणाला हे करून दाखवायचं आहे हे पक्क मनाला घेरलं असतं. (7/n)
दररोज नियमाप्रमाणे व्यवसायाच्या ठिकाणी जाणे, सगळ्या अपडेट घेणं, काम ठरवून देणं.. ह्यात पूर्ण दिवस कसा जायचा हे सुध्दा कळत नसल्याने रात्री उशिरा घरी येणं, सकाळी लवकर निघून जाणे असं रूटीन लागते. काही दिवसांनी कळत नाही नेमकं काय चालू आहे.(8/n)
आपण काय करत असतो हे कळत नाही, घरी सर्वसमोर सगळं ठीक चालू आहे असं दाखवलं जातं.इथून सुरूवात होते एकटेपणाची, मनातून विखरण्याची, काळजी वाढते, पैशाची चिंता भासायला सुरू होते. कोणाला सांगण्याची हिम्मत होत नाही.मित्राकडून बाहेर जाण्यासाठी आग्रह धरला जातो, परंतु मानसिक तयारी होत नाही.9/n
व्यवसाय विषयी चिंता वाढत जात असतात. तुमचे सोशल मीडिया वर लाखो followers
आहेत, खूप मित्र आहे, परंतु सांगायचं कोणाला हा प्रश्न नेहमी येतो. जेव्हा मित्र, कुटुंबातील कोणी विचारत व्यवसाय कसा चालू आहे? नाईलाजाने हसत हसत छान चालू आहे असं सांगावं लागतं. 10/n
उद्योजकाचा प्रवास हा खडतर असतोच , त्याला एकट्याला त्या वाटेवरून चालयच असतं. कोणाला सांगायचं तर मनात अपराधीपणाची भावना जागृत होते. बोटावर मोजण्या इतपत यशस्वी होतात त्याची कारण मीमांसा इथे करणे योग्य नाही. परंतु ज्यांनी प्रयत्न केला त्यांनी ह्याच मार्गाने प्रयत्न केला असणार.11/n
कधी कधी आपली नौकरी च बरी असाही विचार मनात येतो. हे सगळं सांगण्याची हिंमत त्यामध्ये नसते, ह्याचं कारण जर सांगितलं तर आपल्याला एक अयशस्वी उद्योजक म्हणून शिक्का मारतील आणि तोच शिक्का घेऊन आयुष्यभर अपराधीपणाची भावना घेऊन पुढील आयुष्य जगावं लागेल. 12/n
आपण एखाद्याला बोलताना त्याच्या ठिकाणी उभा राहून कधी बोलत नाही, फक्त बोलायचं म्हणून बोलतो आणि त्याचा परिणाम इतका खोलवर जातो की तो माणूस परत आयुष्यातून कदाचित उठत नाही. त्यामुळे एक मित्र म्हणून, एक समाज म्हणून, एक नागरिक म्हणून उद्योजकाला हिनवू नये कारण तो आतून खचलेला असतो.13/n
त्याचे निर्णय चुकले असतील, त्याची व्यवसाय करण्याची पद्धत चुकीची असेल म्हणून तो गुन्हेगार ठरत नाही. त्याने हिंमत दाखविली, प्रयत्न केला त्यातून तो खूप काही शिकलेला असतो. एवढं सगळं होत असताना त्याला साथ देते ती त्याची अर्धांगिनी, त्याला चहूबाजूंनी आधार तिचाच असतो. 14/n
त्याच विश्वासावर तो परत एकदा गरुड भरारी घेण्यासाठी सज्ज असतो, परंतु काही कालांतराने.
तुमच्या अश्या आसपासच्या उद्योजकांना शाब्दिक आधार नक्की द्या. जेव्हा झाड पडायला लागत तेव्हा मुळासकट पडतं, ते उद्योजकाच्या बाबतीत होऊ नये एवढीच प्रामाणिक अपेक्षा. 15/n
उद्योग म्हणजे एक चक्रव्यूह आहे त्यात एकदा गुंतला तर यशस्वी तोच होतो ज्याला चक्रव्यूह तोडता येतं. जी लोकं ह्यात सापडलेली असतात त्यांना आधाराची खूप गरज असते तो आधार त्यांना मिळत नाही हेच दुर्दैव त्या उद्योजकाच.
#म #मराठी_उद्योजक
#मराठी
धन्यवाद.
सचिन सुरवसे
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Sachin Survase

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!