२/१७
३/१७
४/१७
दारात येताच ५ सुवासिनींनी राजांना ओवाळले आणि महाराजांचे जासलोड गडावर चरणस्पर्श झाले.
मानपान, न्याहारी झाली आणि खासा मंडळींना घेऊन राजे गडाची पाहणी करायला निघाले.
५/१७
६/१७
बाजी म्हणाले, " राजं त्यो वेताळ बुरुज, त्याची जागा बाधित आहे. दिवसा बी त्याच्या जवळपास कुणी फिरकत न्हाई "
७/१७
८/१७
हे ओळखताच महाराजांनी नेतोजी काकांना संगितले की " आपले मावळे बोलवा आणि येताना खणतीचे औझार घेऊन यायला सांगा "
त्या बुरुजाखाली धन आहे असे देवीने दृष्टांत दिला मला!
९/१७
१०/१७
बुरुजाची दगडं ढासळत होती. मोठे मोठे दगडं बाहेर पडत होते. पहार, कुदळ, आणि दगडांच्या आवाजाशिवाय दुसऱ्या कशाचाच आवाज येत न्हवता.
११/१७
१२/१७
राजे स्मितहास्य देत म्हणाले, " काय विठोजी आमचा दृष्टांत खरा ठरला ना? "
विठोजी म्हणाले, " व्हय राजे, देवी प्रसन्न हाय तुमच्यावर "
१३/१७
दृष्टांत वगैरे काही नाही, ही दृष्टी आम्हाला दादोजींनी दिली. खूप आधीपासूनची ही गोष्ट आहे की गडाचा खजिना सुरक्षित ठेवायचा असेल तर हीच पद्धत वापरली जाते " महाराज म्हणाले.
१४/१७
महाराज म्हणाले, " गडावर अशीच सुरक्षित जागा निवडली जाते आणि मोजक्या माणसांनी रात्रीच्या वेळी ते धन पुरले जाते. ती माणसं २ पेक्षा जास्त नसतात.
नंतर त्यांनी काय केलंय हे माहीत नसणाऱ्या माणसांकडून त्यांचा वध केला जातो.
१५/१७
१६/१७
वरील माहितीतून आपण इतकेच लक्षात घ्यावे की श्रद्धा नक्कीच असावी पण ती अंध नसावी.
अंधश्रेद्धेला जितके दूर ठेवता येईल तितके ठेवा.
१७/१७
#जय_शिवराय