My Authors
Read all threads
'गोरी गोरी पान ,फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आन!'
लहानपणापासून या गाण्याचा ठेका धरलेला समाज. वहिनी ही गोरीपानच असायला हवी. फुलासारखी छानच असायला हवी.आणि मुख्य म्हणजे वहिनीला आणावे लागते..मग तिची इच्छा असो की नसो.

गहन विषय आहे.जमेल तसा जमेल त्या विचारात मांडलाय. #म #धागा 👇 Image
या मानसिकतेचा झाल्यास.सध्याच्या समाजाचे स्त्रीविचार साहजिकच म्हणायला हवेत.जिथं कुठं स्त्री वर्णनं आली सरसकट 'ती' चे वर्णन हे असेच केले गेले.दुसरीकडे पुरुष हा दनकट आणि राकटच असावा हे समाजाने परस्पर ठरवूनही टाकले.त्यातून पूर्वीपासून चालत आलेल्या पुरुषसत्ताक परंपरांना बळ मिळालं.👇
हे समाजाच्या लक्षात ही आलं नाही. 'मेन विल बी मेन' च्या लस्ट जाहिराती या भारतीय समाजाच्या मानसिकतेचा उत्कृष्ट नमुना आहेत.

या मानसिकतेचा परमोच्च बिंदू म्हणजे बलात्काराच्या घटना..
बलात्काराच्या गुन्ह्यात बालगुन्हेगार सापडू लागले..त्यास आता कितीतरी दशके लोटली.. 👇
मागे काही महिन्यांपूर्वी 'बॉईज लॉकर रूम' या समाजमाध्यमातील समूहात जी चर्चा चालली होती.. त्या चर्चेने आपल्याला आपण एक समाज म्हणून कोणत्या पातळीवर आहोत हे सिद्ध केलं.बलात्काराचा संबंध पुरुषत्वाशी जोडला गेला आहे.ज्यात समोरच्याच्या मान्यतेशिवाय अत्याचार करण्याला मान्यता दिली जाते.👇
ही सत्य वस्तुस्थिती आहे.
एखाद्या स्त्री बद्दल आपल्याला 'जे' वाटते ते फक्त 'देहाबद्दलच' का? वरुन आसपास 'आपल्यासारख्यांच्या' भावनाही सारख्याच आहेत का?हे ही तपासून पाहिले जाते. सध्या या असल्या वर्तनाचा दोष हा इंटरनेट, पॉर्न साईट्स, चित्रपट, मालिका, वेबसिरीज यांना दिला जाईल, पालक,👇
शिक्षण यांनाही दोषी धरले जाईल.पण,यातून या समस्येवर रामबाण उपाय मात्र सापडणार नाही.
आपल्यातच काय,जगभरात सगळीकडेच बलात्कारांचे प्रमाण कमी होताना दिसत नाहीय.त्यामागचं मुख्य कारण आहे पुरुषत्वाचा लैंगिकतेशी जोडलेला संबंध, पुरुषसत्ताक संस्कृती आणि त्यातून आलेला पुरुषी अहंकार.👇 #मराठी
वर म्हणलं त्याप्रमाणे प्रत्येक स्त्री ही कमनीयच असायला हवी..प्रत्येक पुरुष हा राकटच,दनकटच असायला हवा..ही मानसिकता पाहिल्यास त्याकडे केवळ 'भावना' म्हणून डोळेझाक करताच येणार नाही..

भारतीय समाजात 'लैंगिकता' या शब्दाभोवती जे विकृत वलय निर्माण झालं तिथेच आपला घात झाला.#मराठी 👇 Image
त्याविषयी स्पष्टपणे बोलण्याची हिंमत कोणीच करत नाही. 'कशात लक्ष लागत नाही, वेगळं काहीतरी करावं वाटतं, समाज आपल्याकडे संशयाने पाहतोय' ही जी आपली हालत आहे तीच हालत आपल्या समवयस्कात असेल का? याची उत्कंठा आणि कुतुहलता भारतीय संस्कृतीने पिढ्यानपिढ्या अनुभवली.👇 #म
. ही भारतीय संस्कृतीतील दमन म्हणजे भावना दाबून टाकण्याची प्रवृत्तीने लैंगिकते विषयी जाहीर काही बोलण्यास अप्रत्यक्ष प्रतिबंधच केलेला.. तो प्रतिबंध अलीकडच्या समाजमाध्यमीय मुक्ततेने उधळून लावला गेला.
नेमक्या याच वळणावर 'बलात्कार केल्याने पौरुषत्व सिद्ध होते.' 👇 #मराठी
ही संकल्पनाच चुकीची असल्याचे कोणी सांगितले नाही ही आमची शोकांतिका आहे. 'बलात्काऱ्यांना फाशी द्या.' ही मागणी मात्र आपण एकमुखाने करतो. अनेकदा आरोपींना पश्चाताप व्हायच्या आतच संपवलं ही गेलं.पण बलात्काराच्या घटना मात्र कमी झाल्या नाहीत..तरीही या घटना घडूच नयेत म्हणून आपण काय केलं?👇
असल्या भावना कोणाच्या मनात येऊच नयेत म्हणून एक समाज म्हणून आपण काय प्रयत्न केले?

जगभरात नजर टाकल्यास सहज लक्षात येणारी बाब म्हणजे पौगंडावस्थेत येण्याच्या वयाचा बदल.. अगदी 13-14 व्या वर्षी मुली आणि मुलांच्यात बदल घडत आहेत..'सोळाव्व वरीस धोक्याचं..' चा जमाना लोटून आता जमाना 👇 #म
होत आला.. हा समाज हे वास्तव आतातरी स्वीकारणार आहे का? हा प्रश्न आहे. शालेय जीवनापासून मुलामुलींच्यात शारीरिक-मानसिक बदल घडत असतात..त्यायोगेच त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असतो.. पण हे लक्षात घ्यायची सवड ना पालकांना असते. ना समाजास असते. 👇
नेमक्या या टप्प्यावर आपण त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? त्याचा उपभोग म्हणजे काय? या गोष्टी शिकवायला हव्यात.

व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एकाच व्यक्तीला अनिर्बंधपणे जगण्याचे स्वातंत्र्य असा होऊच शकत नाही..हे या समाजाच्या वागण्यात कधीच दिसून आले नाही.👇
प्रत्येकाने एकमेकांचे स्वातंत्र्य अबाधित राखायला हवे..माझे कोणावर अतिक्रमण होणार नाही याची काळजी मी स्वतः घ्यायला हवी.. ही झाली सामाजिक प्रगल्भता. आपल्या भारतीय संस्कृतीत हल्ली नेमका याचाच अभाव दिसतो आहे. मला अपेक्षित स्वातंत्र्य हे मी शरीरबळावर मिळविण आणि त्या आड येणाऱ्याचे 👇 Image
स्वातंत्र्यही त्या आधारेच हिरावून घेईन..अशी भावना हल्ली सगळीकडे पहायला मिळते.
मला एखाद्या मुलीबद्दल काही बोलायचे असल्यास 'ती' चे स्वातंत्र्य, आदर आणि सन्मान याचा विचार मला करावाच लागेल....ही भावना समाजात रुजवायला हवी.. ही समाजविकासासाठी अति गरजेची गोष्ट आहे.👇 Image
कोणत्याही व्यक्तीबद्दल बोलताना तिचा आत्मसन्मान आणि मूलभूत स्वातंत्र्य याचा विचार कितीजण करताना दिसतात? समोरच्या व्यक्तीचा मान राखणे, तिच्याबद्दलची कोणतीही कृती तिच्या मान्यतेशिवाय न करणे.. ही मूल्ये आज कितीजण पाळतात? ती किती पातळीवर शिकवली जातात? 👇
आज समाजमाध्यमातून तर दरक्षणी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन कमेंट्स केल्या जातात.. लैंगिकदृष्ट्या बीभत्सतेचे वर्तन ताळतंत्र सोडून केले जाते.. खरंतर ही आपण सांस्कृतिक दृष्ट्या किती मागासलेले आहोत याचीच उदाहरण आहेत.👇
सभ्यता आणि व्यक्त होण्यातील अभिजातता यांचा थेट संबंध असतो हे समाजास कळले नसल्यास. एकमेकांच्या स्वातंत्र्याचा मान राखणे आणि अस्तित्वास मान्यता देणे हे तरी कळायलाच हवे.

जाताना काही महत्वाचे.
वर उल्लेखलेल्या #Boyslockerroom सारखे असंख्य लॉकर रूम्स तुमच्या माझ्या पाहण्यात होते, 👇
आहेत आणि यापुढेही असतील.. कोणत्याही वयाच्या, कोणत्याही प्रकारच्या काम करणाऱ्या पुरुषांचे असले ग्रुप असतील. मग, ते कट्ट्यावर गप्पा मारणारे ग्रुप का असेनात... 'बॉईज टॉक' या विकृत टॅगखाली 'तसल्या' गप्पांचे समर्थन ही हल्ली काहीजण करत असतात. 👇 Image
काहीजण 'Not All Men' असं म्हणत स्वतःला निर्दोष सिद्ध करायचा प्रयत्नही करत असतात. हे पुरुष थेट बलात्काराचे नियोजन नसतील करत..स्वतः ओळखीच्या मुलींचे फोटो वापरून बॉडी शेमिंगही करत नसतील.. पण, अनोळखी फोटोज पाहून त्यांच्या लैंगिक भावना चाळवत असतीलच.. आणि आपला थेट या गोष्टीशी संबंध 👇
नाही म्हणून लंगड समर्थन ही करतील.. पण, या असल्या छोट्या मोठ्या मानसिकतेतुन मोठे गुन्हे घडतात.. आणि या गुन्ह्यांचा विरोध न करणे म्हणजे गुन्ह्यास मूक संमतीच ठरते. अशी मूक संमती देणारा ही गुन्हेगारच असतो.

इथे मुख्य मुद्दा आपण कोणत्या ग्रुपचे सदस्य आहोत किंवा हा नाही..👇 #मराठी
तर पुरुषत्व, लैंगिकता, पितृसत्ताक अहंसत्ता, त्या सत्तेतून स्वतःला सिद्ध करण्याचं येणार दडपण आणि त्यातून जन्माला येणारी बाईच्या शरीरावरील मालकी. त्या मालकीतून 'ती' चं केलं जाणार वस्तुकरण हा महत्वाचा मुद्दा आहे.

लहानपणापासून पुरुषांनी रडायचं नसतं. स्त्रीने पदराखालीच रहायचं.. #म 👇 Image
हेच मनावर बिंबवलं जातं..पितृसत्ताक परंपरेत पुरुषांना हाती सत्ता घेताना मर्दानगी सिद्ध करण्याची पूर्वअटच घातलेली असते.. त्यातून जस जसं पुढं जाईल तसं स्वतःची मर्दानगी सिद्ध करण्यासाठी स्त्रीवर मालकी हक्क सांगण्यासाठी धडपड.. त्यातून 'ती' च्यावर अश्लील कमेंट्स..👇
तिचे नको तेवढं मनोबल खच्ची करून तिला अबला घोषित करण्यासाठी आटापिटा केला जातो.. हे सर्व जो पुरुष करण्यात कसूर करेल त्याला समाज नपुंसक, बायल्या अशा अनेक विशेषणांनी घायाळ करतो..

परवा ट्विटरवर झालेल्या #MeToo चळवळीत अनेक स्त्रियांनी त्यांच्यावरील अत्याचारांना वाचा फोडली.. 👇
त्यातून हाती काय लागलं? तर पुरुषांना मिम्ससाठी आणि आपली विकृती दाखवण्यासाठी नवीन साधन. असच म्हणावं लागेल.

या असल्या चर्चेतील गोष्टींना cool, casual म्हणत पुरुष मंडळी बगल देतात.. वरून या एवढ्याश्या गोष्टींचा बाऊ करणे म्हणजे 'सुतावरून स्वर्ग' गाठणे म्हणतील.. 👇
पण, बलात्कार ही एक कृती नसते..ती या cool आणि casual म्हणत काणाडोळा केलेल्या गोष्टींना वेळीच थांबवलं नसल्याने त्यांचा झालेला उद्रेक असतो हे लक्षात घ्यायला हवं.

संदर्भ- माहितीजाल, लोकसत्ता, BBC Image
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with डेडपूल...

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!