नोकर्‍या देणारा वांगी बोळ....
कोल्हापुरातल्या महाद्वार रोडला लागून असलेल्या वांगी बोळात गुळवणी यांचा एक जुना वाडा. या वाड्यात जिन्याखाली चिंचोळ्या जागेत एक टेबल खुर्ची. टायपिंगचे मशीन. जागा मिळेल तिथे चिकटवलेल्या नोकरीच्या जाहिराती. त्यात चक्क देवानंदचाही एक फोटो. 1/11 #कोल्हापुर
या नोकरीच्या जाहिराती म्हणजे अनेकांना आशेचा किरण होत्या. पोस्टात क्लार्क... तहसीलदार फौजदार... रेल्वेत टीसी होण्याची संधी... अशा असंख्य जाहिराती तेथे चिकटवलेल्या असायच्या. नोकरीची स्वप्ने पाहणारे अनेक तरुण तरुणी, त्यांचे पालक येथे यायचे. 2/11
हातात प्लास्टिकची पिशवी यात सर्टिफिकेटची भेंडोळी आणि चेहऱ्यावर नोकरीच्या आशेची एक केविलवाणी किनार दिसायची.
वांगी बोळातले हे एक छोटेसे नोकरी मार्गदर्शन केंद्र दिलीप गुळवणी यांचे. या केंद्रात दिलीप गुळवणी बसलेले असायचे. 3/11
टायपिंगच्या मशीनचा खडखडाट आणि त्यांच्या तोंडाची बडबड सतत चालू असायची.नोकरी कोठे उपलब्ध आहे, त्याची पात्रता काय, अर्ज करण्‍याची मुदत किती हे ते पटापट सांगायचे. दहा रुपये घ्यायचे सायकलोस्टाइल चा फॉर्म द्यायचे व तो फॉर्म भरूनही द्यायचे. 4/11
एवढेच नव्हे तर संबंधित कार्यालयात तो फॉर्म पोहोचवण्याची जबाबदारी घ्यायचे. त्याचे वेगळे 10 रुपये आकारायचे. नोकरीचे महत्त्व नोकरी नसलेल्यांनाच कळते. त्यामुळे बेरोजगार तरुण-तरुणी खूप आशेने दिलीप गुळवणीशी संपर्क साधायचे. अनेक जण त्यांच्या त्यांच्या गुणवत्तेवर नोकरीत चिकटले. 5/11
पण त्यासाठी पहिल्या टप्प्यात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून देऊन गुळवणींनी त्यांना बळ दिले. ज्यावेळी मोबाईल नव्हता इंटरनेट नव्हते त्या काळातले वांगी बोळातले छोटेसे हे नोकरी मार्गदर्शन केंद्र अनेकांना आधार ठरले. अनेकांच्या स्वप्नांना तेथे जिवंत ठेवले गेले. 6/11
आणि दिलीप गुळवणी हे नाव एका पिढीच्या मनात घर करून राहिले.
हे गुळवणी फावल्या वेळेत कायम रेडिओ ऐकत बसायचे. घरातल्या समारंभात स्पिकरवर देव आनंदची गाणी लावायचे. रात्री वाड्या समोरच्या कट्ट्यावर ट्रांझिस्टर घेऊनच असायचे. कोल्हापुरात किशोर कुमार नाईट हा कार्यकम झाला होता. 7/11
त्यावेळी झुम झुम झुमरूचे गाणे सुरु होताच ह गुळवणी चक्क स्टेजवर चढून नाचले होते.त्यांची एक खोडही होती. येणार जाणाऱ्यांची ते उगीचच कळ काढायचे. जनसंघ वाल्या समोर काँग्रेस आणि काँग्रेस वाल्या समोर जनसंघाचे कौतुक करायचे. निष्कारण ठराविक लोकांना चिडवत ठेवायचे. 8/11
नोकरीला लागलेले अनेक जण त्यांना पेढ्याचा बॉक्स घेऊन यायचे. "अरे मला कशाला पेढे देता? ते त्या आईसमोर ठेवा "असे अंबाबाईच्या मंदिराकडे हात करून म्हणायचे . नोकरीसाठी जरा वशिला लावा की ,असे कोण म्हटले तर " मग मी कशाला येथे फॉर्म विकत बसलो असतो" असे उत्तर दयायचे. 9/11
काळाच्या ओघात इंटरनेट आले. नोकरीच्या वेगवेगळ्या संधी निर्माण झाल्या. ऑनलाइन फॉर्म भरून घेतले जाऊ लागले आणि वांगी बोळातले हे नोकरी मार्गदर्शन केंद्र रिकामे रिकामे जाणवू लागले .पण दिलीप गुळवण्याच्या बडबड्या स्वभावामुळे ते जागते राहिले. काल त्यांचे निधन झाले. 10/11
आणि त्या काळात इंटरनेट नसताना नेहमी ऑनलाईन असणारे दिलीप गुळवणी आता मात्र कायमचे रेंजच्या बाहेर गेले .कोल्हापुरात अशी वेगवेगळी माणसे होती आणि ती त्यांच्या परीने समाजासाठी धडपडत होती .यापैकी दिलीप गुळवणी यांची नव्या पिढीला ओळख करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. 11/11
लेख- साभार

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with किरण...

किरण... Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Coolkiranj

12 May
त्रास तर होणार ना‌ साहेब, त्रास तर होणार..

अवैधरित्या तुम्ही मुंबई मध्ये आलात
अवैधरित्या तुम्ही झोपड्या वसवल्या
अवैधरित्या तुम्ही व्यवसाय केले
अवैध गोष्टी करत भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं..
१/८
#आवडलेली #कविता #मराठी
त्रास तर होणार ना‌ साहेब, त्रास तर होणार..

एकाच झोपडीत २०/२० जणं तुम्ही राहता
तुमच्या शहरात नसलेला आसरा इथे शोधता
गावच्या कुटुंबाचं पालन‌पोषण करता
माणूस म्हणून जगणं इथे उपभोगता
आणि हे सगळं अवैध मार्गाने करता
२/८
त्रास तर होणार ना‌ साहेब, त्रास तर होणार..

खूनी गून्हेगारांचा अड्डा म्हणजे मुंबई
अवैध कामांचं ठिकाण म्हणजे मुंबई
स्वप्नांची चंदेरी दुनिया म्हणजे मुंबई
यशाची सहज सोपी शिडी म्हणजे मुंबई
आणि हे सगळं करताना बदनाम होते मुंबई
३/८
Read 8 tweets
3 May
लायकी दाखवण्याचे दिवस

बुधवार, 29 एप्रिल 2020

गवार वीस रुपये...
कलिंगडं शंभरला तीन!

सूर्यही नीट उगवला नव्हता. रस्त्यावरून असा खणखणीत आवाज आला आणि डोळे चोळत उठलो. गॅलरीतून खाली पाहिलं. सोसायटीच्या खालीच तेरा चौदा वर्षाचा पोरगा येऊन थांबला होता. १/१३

#साभार #शेतकरी
कपाळाचा घाम पुसत उभा. सोसायटीचा वॉचमन त्याला लांब थांबायला सांगत होता. तसा तो पोऱ्या वॉचमनला हात जोडत थांबू देण्याची विनंती करत होता. मी आवाज दिला आणि त्या पोऱ्याला थांबायला सांगितलं. पोऱ्यानं मान डुलवली. तोंडाला रुमाल बांधून खाली गेलो. २/१३
दोन चार बाया आणि काही पुरुषही त्याच्याभोवती येऊन थांबले होते. सोशल डिस्टन्सिंग पाळत आम्ही सगळे गवार, कलिंगड घेऊ लागलो. इतक्‍यात तो पोऱ्या एकाला म्हणाला,

दादा, तांब्याभर पाणी मिळंल का?’ दादानं तोंड वाकडं करत, ‘समोरच्या चौकात पाण्याची टाकीये. तिथं पे.’ असा सल्ला दिला. ‘ ३/१३
Read 13 tweets
29 Apr
साधारण 15 वर्षांपुर्वी सकाळ वर्तमानपत्रात असताना इरफान खानची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. एका नामांकित पबमध्ये भेट झाली आणि खूप वेळ गप्पा झाल्या. बाजुला वाजत असलेल्या मोठ्या संगीताच्या आवाजातही इरफानचा खणखणीत आवाज कानावर येत होता. १/७
- प्रभा कुडके, Indian Express #RIPIrrfanKhan
इरफानच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली होती हे जाणून घेण्यासाठी मी त्याला भेटले होते. मुलाखतीच्या दरम्यान इरफानने त्याच्या लहानपणीची एक गोष्ट सांगितली. इरफानच्या आजीच्या अंगणात एक चमेलीचा वेल होता. चमेलीच्या फुलांचा सुगंध हा त्यांच्या अंगणात दरवळत असायचा. २/७
इरफान त्यावेळी बोलताना मला म्हणाला, त्या चमेलीच्या फुलांनी मला वेड लागायचं. ती फुलं सकाळी कधी उमलतात हे पाहण्यासाठी मी लवकर उठायचो. तो सुगंध मनात साठवुन ठेवायचो आणि माझ्या दिवसाची सुरुवात व्हायची. त्या चमेलीच्या वेलासोबत माझं एक नातं तयार झालं होतं असं त्याने सांगितलं. ३/७
Read 7 tweets
13 Apr
मी सातवीच्या वर्गात असताना माझ्या वर्गात गेल्या सहा वर्षांपासून नापास होणारा एकजण होता.आम्ही त्याला सगळेजण नाना म्हणायचो.आमच्याच गल्लीत राहायला होता.आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा.मिशासुद्धा चांगल्याच वर आलेल्या होत्या.आणि हा नाना अंगाने धिप्पाडच्या धिप्पाड होता. (1)
#आवडलेली #कथा
म्हणजे आमचं मास्तर त्याच्या खांद्याला लागायचं.अंगाने पैलवान असणारा गडी.पण अभ्यासात पार दरिंद्री.नानाला काहीच येत नव्हतं.आणि दरवर्षी नाना नापास व्हायचा. त्यात आमच्या मास्तरने एक नियम असा केला होता, वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल.. (2)
त्याने वर्गातल्या सगळ्या पोरांच्या मुस्काडीत मारायची. त्यावेळचे मास्तर असा नियम करायचे.आणि यात काय व्हायचं त्या भितीने सगळी पोरं मन लावून अभ्यास करायची. पण नानाच्या डोक्यात काहीच राहत नव्हतं. आणि त्याचा परिणाम म्हणजे नाना दररोज न चुकता वर्गातल्या प्रत्येकाचा मार खायचा. (3)
Read 21 tweets
5 Dec 19
#किल्ले_रामसेज वरील अल्पपरिचित चोर दरवाजा :
रामचंद्रपंत अमात्यांनी लिहून ठेवलं आहे -"किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब (दोष) आहे, याकरितां गड पाहून, १,२,३ दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यांमध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्यात." १/११
सतत तब्बल साडेपाच वर्षं मुघलांच्या मोठमोठ्या सरदारांना झुंजवणाऱ्या, मराठ्यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या छोटेखानी पण लढाऊ अशा रामसेज किल्ल्यालाही दोन दरवाजे आणि चोरदिंडी आहे. पैकी किल्ल्यावर जेथून प्रवेश होतो तिथले प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे. २/११
त्याच्या दोन्ही बाजूचे भग्न बुरुज दरवाजाचे अस्तित्व दर्शवतात. वर आल्यावर उजवीकडे काहीसा आडबाजूला असलेला संपूर्णपणे कातळात खोदलेला मोठा दरवाजा आपली भव्यता दर्शवत उभा आहे. रामसेजवर याशिवाय आणखी एक चोर दरवाजा-चोरदिंडी आहे हे कित्येकांना ठाऊकच नाही. ३/११
Read 11 tweets
13 Dec 18
१३-डिसेंबर- १९४२ #हुतात्मा_दिन #गारगोटी..
देशभर स्वातंत्र्याचा वणवा पेटलेला असताना गारगोटी याला अपवाद नव्हती. स्वातंत्र्याचा लढण्यासाठी आर्थिक मदत कमी पडत असलेने गारगोटीतील सरकारी तिजोरी लुटायची योजना अतिशय गुप्तपणे तयार करणेत आली.
त्यासाठी तरुण क्रांतिकारक करविरय्या स्वामी, शंकरराव इंगळे (दोघे कापशी), तुकाराम भारमल (मुरगुड), हरीबा बेनाडे आणी मल्लाप्पा चौगले (चिखली),बळवंत जबडे (जत्राट),परशुराम कृष्णा साळोखे (खडकलाट), नारायण दाजी वारके (कलनाकवाडी) या क्रांतीकारकांची फौज तयार झाली.
कापशी - गारगोटी रस्त्यावर असणाऱ्या मांगनुर घाटावरील पाल या गावातील आमराई पासुन पुढे गेल्यावर दुर्गम डोंगरामध्ये काही गुहा आहेत त्या गुहेत या सगळ्यांच्या मिटींग होऊ लागल्या. गारगोटीला जाणाऱ्या सगळ्या वाटांचे नकाशे बनवले गेले ....
Read 18 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!