2/ भारताचे सकल दरडोई उत्पन्न हे बांगलादेशच्या खाली घसरेल असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा होरा आल्यानंतर त्याबाबत खळबळ माजणे साहजिकच होते. मात्र केंद्र सरकारकडून आणि भारताचे भूतपूर्व आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्याकडून मात्र परचेसिंग पॉवर पॅरिटीचा दाखला देत...
3/ ...भारतच कसा पुढे आहे हे ठासून सांगण्यात आले. त्यामुळे यातलं राजकारणापल्याडचं आर्थिक गणित हे आपण समजून घेणे आवश्यक आहे.
4/ सुरुवातीलाच हे लक्षात हे घ्यायला हवं की बांगलादेश हे आपल्यासमोर लिंबूटिंबू प्रकरण आहे. किमान तसं दिसायला हवं! कारण त्यांना स्वातंत्र्य मिळायला आपल्यानंतर अडीच-तीन दशके अधिकची गेलीत. त्याचबरोबर त्यांची लोकसंख्या, लष्करी ताकद, आंतरराष्ट्रीय दबदबा हा आपल्या तुलनेत...
5/ ...नगण्य आहे. तरीही त्यांनी अशी प्रगती केली हे त्यांच्या दृष्टीने खरंच कौतुकास्पद आहे. तितकंच आपल्या दृष्टीने लाजिरवाणे आहे.
6/ इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की दरडोई उत्पन्न हा एक सर्वमान्य आर्थिक प्रगतीचा मानक आहे. आणि भारताचं दरडोई उत्पन्न चांगल्या गतीने वाढणे हा भारतासमोरचे बरेचसे प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत निकडीचा विषय आहे. त्यामुळे हा मुद्दा चर्चेत राहणे भारताच्या हिताचे आहे.
7/ आता आकड्यांचा विचार करू. नाणेनिधीनुसार भारताचे दरडोई उत्पन्न 2020मध्ये साडेदहा टक्क्यांनी घसरून 1,877 डॉलर्सच्या घरात जाईल. तर याच कालावधीत बांगलादेशचे दरडोई उत्पन्न हे चार टक्क्यांनी वाढून 1,888 डॉलर्सवर पोचेल. जास्त गंभीर बाब ही की हा फक्त या वर्षात घडलेला...
8/ ...चमत्कार नाही. याचाच दाखला म्हणून नाणेनिधी म्हणते की पाच वर्षांपूर्वी भारताचे दरडोई उत्पन्न हे बांगलादेशच्या 40%अधिकचे होते. यालाच पुष्टी देण्यासाठी कॅपिटल असेट गिअरिंग रेशोच्या भाषेत सांगायचे तर बांगलादेशचे दरडोई उत्पन्न हे गेल्या पाच वर्षांत वार्षिक 9.
9/ 1 टक्क्यांनी वाढले आहे. तर भारताचे उत्पन्न हे 3.2 टक्क्यांच्या वार्षिक दराने वाढले आहे.
10/ मोदी राजवटीच्या काळातील हा लक्षणीय फरक हे बांगलादेशने आपल्याला इतका फरक असतानाही गाठले याचे कारण आहे! हे अगदीच आयपीएलच्या भाषेत सांगायचे तर गेल्या पाच ओव्हर्समध्ये बॅट्समन मोदींनी ओव्हरला 3.2 रनरेट ठेवला आहे. तर बॅट्समन हसीना यांनी मात्र ओव्हरला 9.
11/ 1 रन्स चोपल्या आहेत! यामुळेच पाच वर्षांपूर्वी असलेला लक्षणीय फरक भरून काढत सरतेशेवटी 2020 मधल्या भारताच्या ऐतिहासिक घसरणीचा हातभार लागल्याने बांगलादेश आपल्या पुढे गेला आहे. त्यामुळे हा फक्त कोरोनाचा दोष आहे असे समजण्याचे मुळीच कारण नाही! नोटबंदी, जीएसटीसारख्या...
12/ ...सातत्यपूर्ण प्रयत्नांनी "थाला" मोदी यांनी हा कूर्मगती रनरेट आपल्या टीमला मिळवून दिला आहे!!
13/ आता परचेसिंग पॉवर पॅरिटीकडे वळू. नक्कीच परचेसिंग पॉवर पॅरिटीच्या निकषावर आपण बांगलादेशच्या पुढे आहोत. पण हे सांगून वेळ मारून न्यायला सरकारी बाजूच्या लोकांना शरम वाटत नाही ही फारच चिंतेची बाब आहे! जीडीपी पर कॅपिटा अमेरिकन डॉलर बेसिस हा एक प्रचलित निकष आहे.
14/ तो आता आपली वाढ कमी दाखवतोय म्हणून ती फुटपट्टीच बदलून टाकणे हा हास्यास्पद प्रकार झाला. तेही बांगलादेश हा स्पर्धक असताना! जर परचेसिंग पॉवर पॅरिटीचीच तुलना करायची असेल तर आपण आपल्या जोडीचा भिडू निवडायला हवा. चीनवर मोदींच्या समर्थक मंडळीचे विशेष प्रेम आहे, त्यामुळे...
15/ ...आपण चीन नाणेनिधीच्याच होऱ्यानुसार आपण चीनच्या निम्मेही अंतर गाठत नाही.
16/ मोदींची बाजू घेणाऱ्यांच्या फुटपट्टीनेच मोजायचे तर - इंटरनॅशनल डॉलर्सच्या भाषेत कोरोनापूर्व वर्षांतील परचेसिंग पॉवर पॅरिटीच्या निकषावर दरडोई उत्पन्नाचे, आपले आणि चीनचे आकडे हे असे आहेत-
17/ 2018: भारत 7762, चीन 18120
18/ 2019: भारत 8484, चीन 19520
19/ इथे एक लक्षात घ्यायला हवं की दरडोई उत्पन्न अगदी परचेसिंग पॉवर पॅरिटीने मोजूनही पहिल्या शंभर देशांमध्ये मध्ये येत नाही. चीन येतो! तेही कोरोना, लॉकडाऊन वगैरे यायच्या आधीचे आकडे धरून!! आपली आणि चीनची लोकसंख्या आता जवळपास सारखी होत आलेली असताना हे वास्तव अत्यंत गंभीर...
20/ ...आहे.
21/ त्यामुळे बांगलादेशने आपल्याला एका निकषावर पाठी टाकल्यावर ती फुटपट्टीच बदलून बघा आम्ही कसे पुढे आहोत म्हणणारे सत्ताधारी किती निर्लज्जपणे आपले भीषण आर्थिक वास्तव नाकारत आहेत हे आपल्याला वरील आकडेवारी बघून समजून घेता येईल. मोदी सरकारला आता सत्तेत येऊन चांगली सहा...
22/ ...वर्षे उलटून गेली आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी जे विकासाचे"अच्छे दिन" दाखवायला हवे होते ते कुठेतरी गायब असून, बाकी भलत्याच गोष्टी बोकाळल्या आहेत!आर्थिक विकास, गरिबी निर्मूलन, रोजगार निर्मिती वगैरे खुंटीला टांगल्या आहेत प्रांतीय राष्ट्रवादाचा उन्माद,...
23/ ...धार्मिक द्वेष, पब्जी बॅन, नोटबंदीसारख्या नव्यानव्या शेखचिल्ली क्लृप्त्या, जीएसटीसारखे फसलेले रिफॉर्म्स, घिसडघाईचे लॉकडाऊन, तरीही वाढणाऱ्या कोरोना केसेस आणि मोदींच्या भक्तांच्या हलकटपणाचे नवनवे विश्वविक्रम मात्र सध्या आपल्याकडे दणक्यात गाजत आहेत!
24/ हे आकडे फक्त नुसते राजकीय पॉईंट स्कोअरकरण्यासाठी दिलेले नाहीत! हे आकडे भारतातील गरिबीत अडकलेल्या करोडो लोकांच्या आयुष्यासाठी महत्त्वाचे आहेत. हे आकडे भारतातील युवा वर्गाची स्वप्ने, आकांक्षा यांना आरसा दाखवणारे आहेत. हे आकडे देशातील प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचे...
25/ ...प्रश्न आणि समस्या यांच्याशी निगडित असलेले आहेत. त्यामुळे या आकड्यांच्या बाबतीत सरकारी बाजूने चालवणारी सारवासारव उघडी पाडण्यासाठी हे आकडे मांडत राहणे हे सुशिक्षित, विचारी भारतीयांचे कर्तव्य आहे हे आम्हाला पक्के माहीत असल्यानेच प्रस्तुत लेखप्रपंच केला आहे!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
थ्रेड: मोदींची #FarmBills आणि त्यांना आमचा उजव्या भूमिकेतून असलेला विरोध
१. शेतकऱ्यांना मार्केटमध्ये फेयर प्लेग्राउंड मिळावं यात वाद नाही. खाउजा-मध्ये उरलेल्या दोन सेक्टर्सना खुली सूट आणि शेतकऱ्याला मात्र जुनी, अपग्रेड न होणारी व्यवस्था देणं हा प्रायमरी सेक्टरवर होणारा 1/15
अन्याय आहे त्याचे परिणाम आपण प्रायमरी सेक्टरच्या गेल्या काही दशकांतील जीडीपीमधील घसरत्या शेअरच्या रूपाने बघत आहोत. त्यामुळे शेतीसाठी आर्थिक सुधारणांची द्वारे खुली करणे, शेतकऱ्याला संधी देणे, प्रायमरी सेक्टरसाठी फेयर प्लेग्राउंड तयार करणे याला आमचा आधीही पाठिंबा होता, 2/15
पुढेही राहील.
२. पण इथे फक्त तात्त्विक पातळीवर आमची अशी उजवी भूमिका आहे म्हणून भाजप करतंय ते सगळं चालवून घ्यायला आम्ही मूर्ख नाही. मोदींच्या राजवटीचं ट्रॅक रेकॉर्ड हे रिफॉर्म्सबाबतीत अत्यंत सुमार आणि देशाचं नुकसान करणारं राहिलं आहे. एखादा चांगला रिफॉर्मसुद्धा देशाला 3/15
आठवण असावी म्हणून-
पीएम केअर्स ना कॅगच्या ऑडिटखाली येतोय, ना आरटीआयखाली आपल्याला माहिती देतोय. भारताचे पंतप्रधान जनतेला अमुक एका ठिकाणी मदत द्या म्हणतात, आणि त्या फंडाचं ना सरकारी ऑडिट होतं ना आरटीआयखाली माहिती मिळते.
राफालेचे कॅग ऑडिट दस्तऐवज हे पब्लिक स्क्रुटिनीपासून 1/5
लपवण्यात आलेत. न्यायालयात याच ऑडिटचा भरवसा ठेवा म्हणत सरकारी पक्षाने बचाव केला होता. त्या खटल्यात सरकारने बंद लिफाफ्यातून गोगोईंना नक्की काय पुरावे किंवा कागद दाखवले याची आपल्याला जनता म्हणून जराही माहिती नाही. राफाले ही तुमच्या-आमच्या पैशाने घेतलेली सरकारी मालमत्ता आहे हे 2/5
लक्षात ठेवा.
त्या पुढची बाब इलेक्टोरल बॉण्ड्सची. इलेक्टोरल बॉण्ड्सवर दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने गेली काही वर्षे लटकवून ठेवल्या आहेत. हा विषय भारतीय लोकशाहीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या मार्गाने भाजप सर्वात जास्त पैसे जमवते, इतर सर्व पक्षांचे 3/5
एका सामाजिक कार्यकर्त्याची, सुधारकाची खुलेआम रस्त्यावर हत्या होते आणि सात वर्षं लोटूनही महाराष्ट्र त्याचा मारेकरी पकडू शकत नाही, त्याच्या रक्ताला न्याय मिळवून देऊ शकत नाही याची आम्हाला आज शरम वाटते! #दाभोलकर
माणूस मारून विचार संपत नाही वगैरे फालतू गोष्टी...
आम्ही मानत नाही. पुरेशी माणसं मारली तर विचारही संपतात याची उदाहरणं मध्यपूर्वेच्या, रशियाच्या, चीनच्या आणि भारताच्याही इतिहासात मुबलक आहेत याची आम्हाला जाणीव आहे.
खरं सांगायचं तर तुम्हाला गोळ्या घातल्या गेल्या तेव्हा मी लहान होतो. तेव्हा हिंदू जनजागृती समिती, सनातन प्रभातमधली
तुमची चित्रे आणि व्यंगचित्रे पाहून मला तुम्ही म्हणजे अंनिस नांवाचा एक मुसलमान दिसणारा, शिंग असलेला राक्षस आहात वगैरे पक्कं पटलेलं होतं! तुम्ही मेलात तेव्हा धर्मांधांनी पेढे वाटले होते तसा मलाही आनंद झालाच होता! अशा शिंगवाल्या अंनिस नांवाच्या राक्षसाचा जर वध झाला
गेली सहा वर्षं तुम्ही सत्तेत आहात, नोटबंदी करून झाली, लोकांवर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप करून झाले, वाट्टेल तसे टॅक्समध्ये बदल करून झाले, जीडीपी उणेमध्ये गेलाय, कोरोना आकडा आभाळाला टेकतोय, नोकरदार लोकांना बेरोजगारी आणि धंदेवाईक लोकांना दिवाळखोरी दिसू लागली आहे, जीएसटीचे 1/5
तर तुम्ही भूतो न भविष्यति घोडे लावले आहात, निर्मला बाईंनी गेल्या वर्षात इतकी पॅकेज दिलीत की तुम्हाला फिस्कल डेफिसिटबद्दल विचारायची आम्हाला भीती वाटते आहे, बरं त्या पॅकेजचा जमिनीवर दिसणारा परिणाम शून्यवत आहे.
अकुशल कामगारांचा विषय बाजूला राहिला इथे कुशल कामगारांना नोकरी 2/5
टिकेना दिसतंय. जे विद्यार्थी आहेत, जे पुढच्या काही वर्षांत जॉब मार्केट मध्ये येतील त्यांनी तर शब्दशः राम भरोसे आशा टिकवून ठेवायची आहे. हे सगळं सुरू असताना भारतात लोक इनकम टॅक्स कसे कमी भरतात हे तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला आता तुघलक म्हणायचं आम्ही बंद करणार आहोत. कारण तोही 3/5
शाकाहारी लोकांची असहिष्णु वृत्ती याबद्दल चर्चा चालू असल्याचं दिसतंय. मी स्वतः शाकाहारी आहे. शक्यतो प्युअर व्हेज हॉटेल सोडून अन्यत्र खात नाही. इथे शक्यतो हा फार महत्त्वाचा शब्द आहे. आता शाकाहार हा एक फूड चॉईस आहे. म्हणजे जितका मी कोबी खात 1/6
नाही, भोपळा खातो यात फरक आहे तितकाच बकरी खात नाही, भोपळा खातो यात आहे. बाकी शाकाहारी असण्याला चिकटणारे अहिंसा, पावित्र्य वगैरे मुद्दे बकवास आहेत.
पण बऱ्याच विशेषतः जैनबहुल वर्कस्पेसेसमध्ये शाकाहारी लोक मांसाहारी लोकांना तुच्छतेने वागवतात, घृणा बाळगतात हे खरं आहे. यात दोन 2/6
घटक महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे धार्मिक, जो मांसाहाराला काहीतरी अपवित्र,पाप, अपराध मानतो. दुसरा आहे लहानपणापासून झालेली सामाजिक जडणघडण.
आमच्या शाळेत अपवाद वगळता सगळे मांसाहारी होते. कोणी डबा खाताना एखाद्याला "तू लांब बस" वगैरे म्हटल्याचं स्मरत नाही. ग्रामीण भागात 3/6
"लोकमान्य" हा Legitimacy चा दावा आहे. सुधारकी वृत्तीचा नाही. "लोकमान्य"बद्दल बरेच आक्षेप परवापासून वाचतो आहे. ते निरर्थक आहेत. एकेकाळी हिटलर लोकमान्य होता. शब्दशः लोकमान्य होता! दोनदा दणक्यात बहुमत घेऊन जर्मनीत सत्तेत आलेला. एकेकाळी माओ चीनमध्ये लोकमान्य होता आणि 1/8
मंगोल टोळ्यांमध्ये चंगेजसुद्धा!!
टिळक त्याकाळी राजकारणात नेता म्हणून बऱ्यापैकी "Political Legitimacy" मिरवत होतेच. इथे Legitimacy ही संज्ञा कायद्याच्या संदर्भात नसून, राजकीय नेत्यांच्या पॉप्युलर पॉवर, पर्सनल चॅरिझ्मा याबद्दल वापरली आहे. गांधींच्या आधीचे नेते आणि त्यांची 2/8
भारतातील लोकप्रियता आणि दबदबा बघितला तर लोकमान्य निःसंशय "लोकमान्य" होते! तुम्हाला एखादा माणूस आवडत नाही, म्हणून ऐतिहासिक तथ्ये नाकारायची नसतात.
सत्य हे आहे की गांधी, टिळक हे त्यांच्या काळातील लोकप्रिय भारतीय नेते होते. म्हणजे त्यांची भारतातील राजकीय उंची कदाचितच इतर कोणी 3/8