सुशांत प्रकरणात होत असलेल्या मिडिया ट्रायल संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपासून त्यावर सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणी हायकोर्टाने रिपब्लिक टीव्हीला काही प्रश्न विचारत ताशेरे ओढले आहेत.
"तुम्हीच तपास करणारे, फिर्यादी आणि न्यायाधीश होणार असाल तर आमचा काय उपयोग आहे ? आम्ही इथे कशासाठी आहोत" असा प्रश्न चीफ जस्टीस दिपांकर दत्ता व जस्टीस जी एस कुलकर्णी यांच्या बेंच ने रिपब्लिक टीव्हीला केला.
"जर तुम्हाला सत्य शोधण्यात इतका इंटरेस्ट असेल तर आधी तुम्ही क्रिमीनल प्रोसिजर कोड च्या तरतूदी बघायला हव्यात. कायद्याकडे दुर्लक्ष करणे हे निमित्त असु शकत नाही" असेही न्यायालयाने म्हंटले आहे.
यावर रिपब्लिकच्या वकिलांनी सांगितले कि ते शोधपत्रकारिता करत होते आणि तपासातील त्रुटी दाखवत होते. कोर्ट असे म्हणू शकत नाही मिडियाने तपासातील त्रुटी दाखवू नयेत आणि खरे लोकांसमोर मांडू नये..असे मत त्यांच्या वकीलांनी मांडले.
यावर बेंच ने उत्तर दिले कि त्यांचं असं म्हणणं नाहीये कि मिडियावर बंधने आणायला हवीत, मुद्दा फक्त प्रोग्राम कोडचे पालन करण्याविषयीचा आहे. 'आमचा मुद्दा एवढाच आहे कि प्रोग्राम कोडचे उल्लंघण झाले आहे किंवा नाही आणि तुमच्या रिपोर्टिंग मधे ठरवून दिलेल्या नियमांचे पालन झाले आहे की नाही'
"आमचे एवढेच म्हणणे आहे कि तुम्हाला तुमच्या मर्यादा माहिती असायला हव्यात आणि त्या मर्यादांमधे काम करण्याची तुम्हाला मोकळीक आहे. मात्र मर्यादांचे उल्लंघन होऊ नये" असेही न्यायालयाने यावेळी म्हंटले आहे.
#ArrestRhea या हॅशटॅग वरून न्यायालयाने रिपब्लिक कडे विचारणा केली कि कुणाला अटक झाली पाहिजे हे यावर लोकांचे मत घेणे लोकांना विचारणे हा शोधरपत्रकरितेचा भाग आहे का ?
"जेव्हा केस चा तपास सुरु आहे आणि प्रश्न हा आत्महत्या कि सदोष मनुष्यवध (Homicide) हा आहे तेव्हा चॅनेल खून असल्याचे सांगत आहे, हा शोधपत्रकारितेचा भाग आहे का?" असा प्रश्न न्यायालयाने विचारला.
पूढे कोर्टने असेही म्हंटले आहे की "क्रिमीनल प्रोसिजर कोड मधे तपासाचे अधिकार हे..
पोलीसांना दिलेले आहेत."
सुशांत राजपूतच्या मृत्यूबद्दल ज्या प्रकारे रिपोर्टिंग करण्यात आले त्यावरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
" आत्महत्या रिपोर्टिंग संदर्भात काही गाईडलाईन्स आहेत. त्यात सेन्शेशनल हेडलाईन नसणे अपेक्षित आहे. तुम्हाला मृत व्यक्तीबद्दल रीस्पेक्ट नाही का?..
हे दुर्दैवी आहे" असे हायकोर्टाने म्हणत हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली.
न्यायालयाने टाइम्स नाऊ, आजतक, झी न्यूज यांचीही बाजू ऐकून घेतली. याप्रकरणी पुढील सुनावणी 23 तारखेला आहे.
CBI चा उगम बघायचा झाला तर तो स्पेशल पोलीस एस्टेब्लिशमेंट जी 1941 मधे स्थापन झाली त्यात सापडतो. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार आणि लाचखोरीची अनेक प्रकरणे समोर आली होती त्यांचा तपास करण्यासाठी वॉर डिपार्टमेंट अंतर्गत हा विभाग तयार करण्यात आला
होता. युद्ध संपल्यानंतरही या विभागाची गरज भासू लागली म्हणून 1946 दिल्ली स्पेशल पोलीस एस्टेब्लिशमेंट ऍक्ट पारित करण्यात आला. या ऍक्ट मुळे हा विभाग गृहखात्याकडे आला आणि केंद्र सरकारचे इतर सर्व खाते, विभाग यांच्या कार्यक्षेत्रात आले. राज्यांमधेही त्यांच्या संमतीने काम करण्याची..
परवानगी होती. 1963 साली या विभागाला सेंट्रल इन्वेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच CBI हे नाव मिळाले. सुरुवातीला CBI चे कार्यक्षेत्र हे केंद्र सरकारचे अधिकारी कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्या केसेस पुरतचं मर्यादित होतं. पुढे त्यात केंद्र सरकारच्या कंपन्याना समाविष्ट करण्यात आले. बँकांच्या
सुशांत राजपूत व त्याअनुषंगाने पूढे आलेल्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती व इतर काही लोकांना NCB ने अटक केलेली. याप्रकरणी NDPS कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्चन्यायालयात आले होते. यावर जस्टीस कोतवाल यांनी काल निकाल..
देताना रिया चक्रवर्तीला जामीन दिला आहे. निकालपत्रात जस्टीस कोतवाल यांनी प्रकरणाचा पूर्ण आढावा घेतला आहे.
28 ऑगस्ट ला NCB ने अब्बास लखाणी नामक व्यक्तीला अटक केलेली. त्याच्याकडे 56 ग्राम गांजा आढळुन आलेला. त्याने करन अरोरा कडून खरेदी केला होता. त्याच्याकडे 13 ग्राम गांजा सापडला.
दोघांना ncb ने अटक केली.
या दोंघांच्या चौकशीत झैद विलात्राचे नाव पुढे आले. त्याच्याकडे सर्च केले असता साडे नऊ लाख रुपये, सुमारे दोन हजार अमेरिकेत डॉलर, 180 युके पाउंड,15 अरबी दिरम सापडून आले. हे पैसे त्याला ड्रगच्या सेल मधून मिळालेले होते असे त्याने सांगितले.
कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित केलेला. त्यामुळे सर्व व्यवहार,इंडस्ट्री सगळं ठप्प झालं होतं. यामुळे अनेक आर्थिक प्रश्न निर्माण झाले होते. उद्योगांना या आर्थिक संकटांतून बाहेर काढण्यासाठी राज्य
सरकारांनी काही कामगार तसेच फॅक्टरी कायद्यांमधे सूट दिली होती. वेगवेगळ्या राज्यसरकारांनी तसे नोटिफिकेशन काढले होते ज्यात कामाचे तास, वर्किंग कंडिशन, ओव्हरटाईम ई. संदर्भातल्या नियमांमधे बदल करण्यात आले होते.
गुजरात राज्यसरकरने देखील असेच नोटिफिकेशन काढले होते ज्यात फॅक्टरी ऍक्ट...
नुसार कंपन्यांना कामाचे तास, वर्किंग कंडिशन यामधे सूट देण्यात आलेली तसेच कामगारांना ओव्हरटाईम देण्याच्या नियमात सुद्धा बदल करण्यात आलेला होता.
या नोटिफिकेशन विरोधात गुजरात मजदूर सभा या कामगार संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
आपल्या राज्यघटनेमधे कायदेमंडळांना म्हणजे संसदेला आणि राज्यांच्या विधिमंडळांना काही विशेषाधिकार देण्यात आलेले आहेत. हे विशेषाधिकार सदस्य व सभागृह दोघांनाहि आहेत. सभागृहाच्या कामकाज ठरवणे व त्याचे नियम बनवणे, सभागृहात बोलण्याचे..
स्वातंत्र्य, सभागृहातील कृतीसाठी संरक्षण , अधिवेशन काळात अटकेपासून सरंक्षण ई. स्वरूपाचे विशेषाधिकार आहेत. यात महत्वाचे म्हणजे अनुच्छेद 105(3) & 194(3) मधे सभागृहाला विशेषाधिकारांचे हनन व सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी शिक्षा देण्याचे अधिकार आहेत. याला पार्लमेंट्री प्रिव्हिलेज..
म्हणतात. हि संकल्पना ब्रिटिश संसदेपासून घेण्यात आलेली आहे. कुठल्याही अडथल्याशिवाय व प्रभावाशिवाय संसदेला आपले कामकाज करता यावे म्हणून हे विशेषाधिकार देण्यात आलेले आहेत. सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणणारे किंवा लोकांचा सभागृहावरील विश्वास कमी होईल असे कृत्य करणे..
"In any case, I am making it abundantly clear that at least in my Court there is no question—and there will never be a question—of anything being done ‘in sealed cover.'"
"Anything that I can see, all parties before me are entitled to see. That is all there is to it. This is the only method that I know of to ensure an open and transparent decision-making process. Those details will, therefore, need to be set on Affidavit.
I am also making it clear that it is not possible for any party to unilaterally decide to put material into a sealed cover."
"I could not care less. That is not my concern. The fourth estate will do its job and I will do mine. I decide matters before me on the basis of the..
सुदर्शन वृत्तवाहिनीच्या UPSC परिक्षा व मुस्लिम समाज यावरील कार्यक्रमासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात जस्टिस चंद्रचूड, जस्टीस जोसेफ आणि जस्टीस इंदू मल्होत्रा यांच्या बेंचसमोर सुनावणी झाली.
सुदर्शन न्यूजतर्फे वकिल श्याम दिवाण यांनी जोरदारपणे बाजू मांडली. त्यांचे मुख्य मुद्दे होते कि सदर कार्यक्रम हा शोधपत्रकारितेचा भाग आहे. त्यांच्या संपादकांना जकात फाउंडेशनच्या फंडिंग बद्दल आक्षेप आहेत. यासंदर्भात त्यांच्या कडे काही तथ्ये काही माहिती उपलब्ध आहे..
जी जनतेपुढे मांडण्याचा त्यांना हक्क आहे.
प्रेक्षक चॅनेल बदलू शकतात. ज्यांना आक्षेप आहे ते त्यांची मांडणी करू शकतात. कार्यक्रमात जे दाखवलं त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे प्रेक्षक ठरवतील. त्यात काही आक्षेपार्ह असल्यास त्याबद्दल कारवाई करण्यासाठी आपल्याकडे व्यवस्था आहे..