#मराठी

अपक्षांचे पक्ष प्रवेश !

काल मीरा-भाईंदर येथील 'अपक्ष' आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीत त्या अपक्ष उमेदवार म्हणुन निवडून आलेल्या आहेत. पुढे त्या भाजपच्या सहयोगी सदस्या झाल्या.
इथे अपक्ष सदस्य आणि पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदी..
याबद्दल सविस्तर माहिती बघूया.
पाहिली गोष्ट म्हणजे सहयोगी सदस्य अशी कुठली गोष्ट घटनेत किंवा कुठल्या कायद्यात नाहीये. काही सदस्य अपक्ष म्हणुन निवडणूक लढवतात, निवडून येतात आणि संख्याबळ व धोरण ई. बाबींच्या आधारे कुठल्यातरी प्रस्थापित पक्षाला वेळोवेळी समर्थन देत असतात..
अश्या सदस्यांना त्या पक्षाचे सहयोगी सदस्य म्हंटले जाते.
मुळात निवडून आल्यानंतरचे कुठलेही पक्षांतर हे त्या उमेदवाराला पक्ष बघून किंवा अपक्ष म्हणून मत देणाऱ्या मतदारांची फसवणूक असते आणि कुठलेही पक्षांतर हे राजकिय लोकशाहीसाठी चुकीचा पायंडा पाडत असते !
1970च्या दशकात देशात अनेक राज्यात प्रचंड पक्षांतर बघायला मिळाले. 1967 साली हरियाणातील अपक्ष आमदार असलेल्या गया लाल यांनी 15 दिवसांत तीन वेळा वेगवेगळे पक्ष बदलले. यातूनच "आया राम,गया राम" हि म्हण प्रचलित झाली. पक्षांतराच्या या घोडेबाजारावर लगाम लावण्यासाठी 1985 साली..
घटनेत 10व्या सुचिचा समावेश करण्यात आला ज्याला पक्षांतर बंदी कायदा म्हंटले जाते.
यात पक्षांतर करणाऱ्या सदस्यांना स्पीकरद्वारे अपात्र करण्याची तरतूद करण्यात आली अपवाद कि एकाचवेळी दोन तृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केल्यास ते अपात्र होत नाहीत.
या पक्षांतर बंदी कायद्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या परिच्छेदात अपक्ष आणि नॉमीनेटेड सदस्य यांच्याबद्दल तरतुदी आहेत.
- अपक्ष सदस्याने निवडून आल्यानंतर एखाद्या पक्षात प्रवेश केला तर तो पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र होतो.
- नॉमीनेटड सदस्याने(राज्यसभा, विधानपरिषद ई.) शपथ..
घेतल्यापासून सहा महिन्यांनंतर एखाद्या पक्षात प्रवेश केला तर तो अपात्र होतो. म्हणजे नॉमीनेटेड सदस्यास एखाद्या पक्षाचे सदस्यत्व घेण्यास सहा महिन्यांचा कालावधी दिलेला आहे.

इमकोंग इमचेंन वि. युनियन ऑफ इंडिया या केस मधे अपक्ष आणि नॉमीनेटेड सदस्यां मधला या फरकाला आव्हान देण्यात आले..
होते कि दोघे पक्षविरहीत सदस्य म्हणूज शपथ घेतात आणि एकाला पक्ष जॉईन करण्याची तरतूद आणि दुसऱ्याला नाही अशी तरतूद समानतेच्या अधिकाराविरोधात आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाने हा आक्षेप फेटाळून लावताना म्हंटले आहे कि दोन्ही प्रकरच्या सदस्यत्वामधे बुध्दिगम्य फरक आहे ज्याला समानतेच्या..
अधिकाराचे उल्लंघन म्हणता येणार नाही. अपक्ष उमेदवाराला निवडणुकीपूर्वी इतर पक्षांचे धोरण वैग्रे माहिती असतात, त्याच्याकडे पक्ष सदस्य होण्याची संधी असते, ती नाकरूनच तो अपक्ष म्हणून लोकांपुढे जातो आणि निवडून येतो. याउलट नॉमीनेटेड मेंबरला अशी कुठली संधी नसते, सहा महिने सभागृहात सर्व..
पक्षांचे कामकाज बघितल्यानंतर तो कुठे सदस्य व्हायचे का याबद्दल निर्णय घेऊ शकतो त्यामुळे हि तरतूद करण्यात आलेली आहे. अपक्ष आणि नॉमीनेटेड मधले हे रिझनेबल क्लासिफीकेशन आहे, त्यामुळे या दोन्ही तरतूद घटनात्मक आहेत असा निर्णय न्यायालयाने दिला.
अपक्ष सदस्यांच्या बाबतीत विचार केल्यास पक्षप्रवेश म्हणजे काय हा कळीचा मुद्दा आहे. प्रत्येक पक्षाच्या संविधानात त्यांच्या पक्षाचे सदस्य घेण्याची प्रक्रिया नमूद आहे. सदस्यत्वाचा फॉर्म व फिस भरून सदस्यत्व घेता येते. बदल्यात पक्षाकडून सदस्य आयडी किंवा सदस्य क्रमांक दिला जातो.
पण समजा एखाद्याने फक्त हातावर शिवबंधन बांधून घेतले किंवा घड्याळ बांधून घेतले किंवा मिसकॉल दिला तर त्याला पक्षांतर कायद्याच्या दृष्टीने पक्षप्रवेश म्हणता येईल का ?
जगजीत सिंग वि. स्टेट ऑफ हरियाणा या केस मधे सुप्रीम कोर्टाने हा प्रश्न डिल केलेला आहे. या प्रकरणात अपक्ष म्हणून..
निवडून आलेल्या सहा आमदारांना काँग्रेस मधे प्रवेश केला म्हणुन स्पिकर ने पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र केले होते. स्पिकरने त्यांच्यासमोर सादर केलेले पुरावे, छापून आलेल्या बातम्या, सदस्यांनी टीव्हीवर दिलेल्या मुलाखती ई. आधारे हा निर्णय दिलेला होता. तत्कालीन चीफ जस्टीस सभरवाल..
यांनी लिहिलेल्या निर्णयात न्यायालयाने म्हंटले आहे कि पक्षांतर बंदी कायद्यात अपक्ष सदस्यांच्या इतर पक्ष जॉईन करण्यावर बंदी आहे ती यासाठी की ते पक्षविरहीत-अपक्ष म्हणुन मतदारांसमोर गेलेले असतात, त्यांना मत देणाऱ्यांनी ते कोणत्याही पक्षासोबत नाहीत म्हणून मत दिलेले असते व त्यांनी..
अपक्ष म्हणूनच काम करणे अपेक्षित असते. अश्या सदस्यांना इतर पक्षासोबत जोडण्याची सूट देणे म्हणजे त्यांच्या मतदारांची व मँडेटची फसवणूक असेल जी की लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नाही. पूढे कोर्टाने म्हंटले आहे की एखाद्या अपक्षाने पक्षप्रवेश केला कि नाही यासाठी अधिकृत फॉर्म व फिस भरून पक्ष..
प्रवेश घेणे हि कसोटी असू शकत नाही..त्यासाठी खरी टेस्ट हि असेल कि अपक्षाने त्याच्या पदाचे "इंडीपेडन्ट कॅरॅकटर" सोडले आहे का? फक्त बाहेरून पक्षाला पाठिंबा देणे याला पक्ष सदस्यत्व घेणे म्हणता येणार नाही पण त्याचवेळी पक्षांतर बंदी कायदा लागू नये म्हणून फॉर्म भरण्याची औपचारिकता न करणे
हे सुध्दा चालवून घेतले जाऊ शकत नाही. त्यामुळे अपक्षाने पक्षाचे सदस्यत्व घेतले कि नाही हा प्रश्न औपचारिक प्रक्रियेच्या दृष्टीकोनातून न बघता समोर आलेल्या पुराव्याच्या व मटेरियल च्या आधारे यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे. त्यमुळे स्पिकरने सहा अपक्ष आमदारांना अपात्र करण्याचा..
निर्णय अयोग्य आहे असे म्हणता येणार नाही असे न्यायालयाने या प्रकरणात म्हंटले आहे.

डि.सुधाकर वि. येदियुरप्पा या केसमधे सुप्रिम कोर्टाने म्हंटले आहे कि अपक्ष सत्तेतल्या पक्षाला पाठिंबा देऊन मंत्री होऊ शकतात, या पाठिंब्याला त्यांच्या त्या पक्षात प्रवेश असे म्हणता येणार नाही.
अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे स्पिकर वि. उत्कल केशरी या केस मधे सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे कि पक्षांतर बद्दल फक्त सभागृहातील इतर सदस्यच तक्रार करू शकतात असे नव्हे तर कोणीही पक्षांतराबद्दल स्पिकरकडे याचिका दाखल करू शकतो.

स्पीकरचा पक्षांतराच्या निर्णयावर अनेकदा वाद झाले आहेत..
गेल्या काही वर्षात एक पॅटर्न दिसून आलेला की स्पिकर पक्षांतरवर निर्णय न देता बसून राहतात. यावर्षी केशाम सिंग केस मधे सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे सामन्य परिस्थितीत स्पिकरने तीन महिन्यात पक्षांतर प्रकरणावर निर्णय देणे अपेक्षित आहे.
पक्षांतर हे स्पीकरचे ओरिजनल ज्यूरिडिक्शन...
आहे, त्यामुळे भविष्यात गीता जैन यांच्या पक्षप्रवेशला कुणी आव्हान दिले तर आपले स्पिकर काय निर्णय घेतील हे बघणे औत्सुक्याचे असेल ! अर्थात किहितो होलान या केसनुसार स्पीकरच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची तरतूद आहेच !
यातला राजकीय मुद्दा असा कि गव्हर्नर, स्पीकर यांनी कसे "निष्पक्ष" निर्णय घ्यायचे असतात याचा वस्तुपाठ भाजपने गेल्या काही वर्षात सादर केला आहे...त्यामुळे भाजप किंवा त्यांचे समर्थक यांच्याकडून जर स्पिकर कडे याचिका दाखल करण्यात आली तर आपल्या विधानसभेचे स्पिकर देखील भाजपकडून..
प्रेरणा घेऊन त्यांच्यासारखाच "निष्पक्ष" निर्णय देऊ शकतात 🙂

TEST OF OWN MEDICINE 😎

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Gajanan Gaikwad !

Gajanan Gaikwad ! Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Gaju3112

22 Oct
#मराठी

CBI ची संमती !

CBI चा उगम बघायचा झाला तर तो स्पेशल पोलीस एस्टेब्लिशमेंट जी 1941 मधे स्थापन झाली त्यात सापडतो. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार आणि लाचखोरीची अनेक प्रकरणे समोर आली होती त्यांचा तपास करण्यासाठी वॉर डिपार्टमेंट अंतर्गत हा विभाग तयार करण्यात आला
होता. युद्ध संपल्यानंतरही या विभागाची गरज भासू लागली म्हणून 1946 दिल्ली स्पेशल पोलीस एस्टेब्लिशमेंट ऍक्ट पारित करण्यात आला. या ऍक्ट मुळे हा विभाग गृहखात्याकडे आला आणि केंद्र सरकारचे इतर सर्व खाते, विभाग यांच्या कार्यक्षेत्रात आले. राज्यांमधेही त्यांच्या संमतीने काम करण्याची..
परवानगी होती. 1963 साली या विभागाला सेंट्रल इन्वेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच CBI हे नाव मिळाले. सुरुवातीला CBI चे कार्यक्षेत्र हे केंद्र सरकारचे अधिकारी कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्या केसेस पुरतचं मर्यादित होतं. पुढे त्यात केंद्र सरकारच्या कंपन्याना समाविष्ट करण्यात आले. बँकांच्या
Read 28 tweets
21 Oct
मुंबई हायकोर्ट आणि रिपब्लिक टिव्ही !

सुशांत प्रकरणात होत असलेल्या मिडिया ट्रायल संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपासून त्यावर सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणी हायकोर्टाने रिपब्लिक टीव्हीला काही प्रश्न विचारत ताशेरे ओढले आहेत.
"तुम्हीच तपास करणारे, फिर्यादी आणि न्यायाधीश होणार असाल तर आमचा काय उपयोग आहे ? आम्ही इथे कशासाठी आहोत" असा प्रश्न चीफ जस्टीस दिपांकर दत्ता व जस्टीस जी एस कुलकर्णी यांच्या बेंच ने रिपब्लिक टीव्हीला केला.
"जर तुम्हाला सत्य शोधण्यात इतका इंटरेस्ट असेल तर आधी तुम्ही क्रिमीनल प्रोसिजर कोड च्या तरतूदी बघायला हव्यात. कायद्याकडे दुर्लक्ष करणे हे निमित्त असु शकत नाही" असेही न्यायालयाने म्हंटले आहे.
Read 11 tweets
8 Oct
#मराठी

रिया चक्रवर्ती आणि ड्रग्ज !

सुशांत राजपूत व त्याअनुषंगाने पूढे आलेल्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती व इतर काही लोकांना NCB ने अटक केलेली. याप्रकरणी NDPS कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्चन्यायालयात आले होते. यावर जस्टीस कोतवाल यांनी काल निकाल..
देताना रिया चक्रवर्तीला जामीन दिला आहे. निकालपत्रात जस्टीस कोतवाल यांनी प्रकरणाचा पूर्ण आढावा घेतला आहे.
28 ऑगस्ट ला NCB ने अब्बास लखाणी नामक व्यक्तीला अटक केलेली. त्याच्याकडे 56 ग्राम गांजा आढळुन आलेला. त्याने करन अरोरा कडून खरेदी केला होता. त्याच्याकडे 13 ग्राम गांजा सापडला.
दोघांना ncb ने अटक केली.
या दोंघांच्या चौकशीत झैद विलात्राचे नाव पुढे आले. त्याच्याकडे सर्च केले असता साडे नऊ लाख रुपये, सुमारे दोन हजार अमेरिकेत डॉलर, 180 युके पाउंड,15 अरबी दिरम सापडून आले. हे पैसे त्याला ड्रगच्या सेल मधून मिळालेले होते असे त्याने सांगितले.
Read 19 tweets
1 Oct
#मराठी

कामगार आणि सुप्रीम कोर्ट !

कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित केलेला. त्यामुळे सर्व व्यवहार,इंडस्ट्री सगळं ठप्प झालं होतं. यामुळे अनेक आर्थिक प्रश्न निर्माण झाले होते. उद्योगांना या आर्थिक संकटांतून बाहेर काढण्यासाठी राज्य
सरकारांनी काही कामगार तसेच फॅक्टरी कायद्यांमधे सूट दिली होती. वेगवेगळ्या राज्यसरकारांनी तसे नोटिफिकेशन काढले होते ज्यात कामाचे तास, वर्किंग कंडिशन, ओव्हरटाईम ई. संदर्भातल्या नियमांमधे बदल करण्यात आले होते.
गुजरात राज्यसरकरने देखील असेच नोटिफिकेशन काढले होते ज्यात फॅक्टरी ऍक्ट...
नुसार कंपन्यांना कामाचे तास, वर्किंग कंडिशन यामधे सूट देण्यात आलेली तसेच कामगारांना ओव्हरटाईम देण्याच्या नियमात सुद्धा बदल करण्यात आलेला होता.

या नोटिफिकेशन विरोधात गुजरात मजदूर सभा या कामगार संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
Read 18 tweets
24 Sep
#मराठी

हक्कभंग आणि ज्यूडीशिअल रिव्ह्यू !

आपल्या राज्यघटनेमधे कायदेमंडळांना म्हणजे संसदेला आणि राज्यांच्या विधिमंडळांना काही विशेषाधिकार देण्यात आलेले आहेत. हे विशेषाधिकार सदस्य व सभागृह दोघांनाहि आहेत. सभागृहाच्या कामकाज ठरवणे व त्याचे नियम बनवणे, सभागृहात बोलण्याचे..
स्वातंत्र्य, सभागृहातील कृतीसाठी संरक्षण , अधिवेशन काळात अटकेपासून सरंक्षण ई. स्वरूपाचे विशेषाधिकार आहेत. यात महत्वाचे म्हणजे अनुच्छेद 105(3) & 194(3) मधे सभागृहाला विशेषाधिकारांचे हनन व सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी शिक्षा देण्याचे अधिकार आहेत. याला पार्लमेंट्री प्रिव्हिलेज..
म्हणतात. हि संकल्पना ब्रिटिश संसदेपासून घेण्यात आलेली आहे. कुठल्याही अडथल्याशिवाय व प्रभावाशिवाय संसदेला आपले कामकाज करता यावे म्हणून हे विशेषाधिकार देण्यात आलेले आहेत. सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणणारे किंवा लोकांचा सभागृहावरील विश्वास कमी होईल असे कृत्य करणे..
Read 29 tweets
21 Sep
Justice Gautam Patel from Bombay High Court 👇

"In any case, I am making it abundantly clear that at least in my Court there is no question—and there will never be a question—of anything being done ‘in sealed cover.'"
"Anything that I can see, all parties before me are entitled to see. That is all there is to it. This is the only method that I know of to ensure an open and transparent decision-making process. Those details will, therefore, need to be set on Affidavit.
I am also making it clear that it is not possible for any party to unilaterally decide to put material into a sealed cover."

"I could not care less. That is not my concern. The fourth estate will do its job and I will do mine. I decide matters before me on the basis of the..
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!