वर्ष २००३ क्रिकेट वर्ल्डकपची जोरदार हवा होती,त्यात भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार होते. सर्वांसारखाच मी ही फुरफुरत होतो.
मुंबईत मित्रांसोबत राहत होतो,काम आणि वाचन यामुळे टिव्ही पाहण्यासाठी वेळ तसेच तो खरेदी करण्यासाठी पैसेही नसल्याने #SaturdayThread#BusinessDots#मराठी#म १/२१
मोठा पेच पडला होता. हल्लीसारखे इंटरनेट, स्मार्टफोन किंवा इतर कोणतीही सुविधा नव्हती.
काय करावे?कसे करावे? अशा विचारात सर्वच होते, आजूबाजूचेही जास्त कोणी ओळखीचे नव्हते त्यात आम्ही बॅचलर!
लोकांची आमच्याकडे पाहण्याची नजरच 😉 विचित्र त्यामुळे कोणीही घरी घेणार नाही याची खात्री!
२/२१
बरं नातेवाईक किंवा इतर कोणाकडे जावे तर आयुष्यभर त्या मॅचचे उपकार आणि टोमणे कोणालाच नको होते मग आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला कि आपण वर्गणी काढून टिव्ही विकत घेऊया आणि आपल्यापैकी ज्याचे लग्न शेवटी होईल त्याला तो लग्नात भेट म्हणून देऊया!
झाले, ठरले, खरेदीची जबाबदारी ३/२१
नेहमीप्रमाणे माझ्यावर आली.
मग मी पण अगदी पृथ्वीच्या उत्पत्तीचाच शोध लावायचा अशा आविर्भावात भरपूर दुकाने पाहिली, घासाघिस करून करून अगदी दुकानदाराला रडकुंडी आणून शेवटी दोन दिवस आधी टिव्ही केबलसहीत घरी विराजमान केला!
दोन दिवस चर्चा फक्त एकच भारत-पाकिस्तान मॅच, सचिन, शोएब,
४/२१
दुसऱ्यादिवशी मॅच होती, उद्या काय करायचे हा प्लॅन साग्रसंगीत तयार होता. लहानपणीसारखे परिक्षेचा अभ्यास कर, हे काम कर, ते काम कर हे सांगायला आईबाबा किंवा भाऊ-बहिण येणार नव्हते!
हा विचार सुरू असतानाच साधारणत: रात्री १०.३०
५/२१
वाजता माझा मोबाईल वाजला, बघतो तर मी मागच्याच आठवड्यात ज्यांचा पावडर कोटींगचा प्लांट चालू करून दिला होता त्याचे मालक स्वत:...
मी क्षणाचीही विलंब न करता फोन उचलला, काय झाले म्हणून विचारले तर ते म्हणाले कि संपुर्ण प्लान्ट बंद पडलाय आणि कोणालाच समजत नाही नक्की काय झालेय
६/२१
उद्या जर माल डिलीव्हर झाला नाही तर सिमेन्स त्यांची संपुर्ण ॲार्डर रद्द करू शकते त्यामुळे आत्ताच्या आता वसईला जाऊन रात्रीत तो चालू करून दे.
माझ्या तर तोंडातच घास अडकला, काय करावे काहीच समजत नव्हते, मित्र ओरडायला लागले - तू फोनच का घेतला? काहीही कारण सांग पण आता जाऊ नकोस,
७/२१
मलाही तसेच वाटले, म्हटले मध्यममार्ग काढू त्यांच्या फॅक्टरीचा नंबर होताच मी फोन लावला आणि त्यांच्या मॅनेजरसोबत बोललो तर तो ही अत्यंत तणावाखाली असल्याचे जाणवले.
बरं दुसऱ्या कोणाला काही समजत नव्हते आणि भितीही होती कारण तो त्यांच्यासाठी गॅस वर चालणारा पहिलाच प्रकल्प होता. ८/२१
मी तिथेच राहणाऱ्या एका सहकाऱ्याला विचारले पण त्यानेही मॅचमुळे साईटवर जाण्यास स्पष्ट नकार दिला,इतर सर्व्हिस इंजिनियर्चेही फोन स्विच ॲाफ येत होते, मला काय कळायचे ते कळाले.
मी रात्री ११ ला साईटवर जायचा निर्णय घेतला मित्रांना सांगितले सकाळी मॅच सुरू होईपर्यंत मी परत आलेला असेन
९/२१
त्या कस्टमरला फोन केला, तुम्ही काळजी करू नका मी स्वत: निघालोय आणि सकाळपर्यंत प्रोडक्शन काढून देतो.
ट्रेन पकडली आणि पुढे रात्री रिक्षाने त्यांच्या फॅक्टरीत पोहचलो. सर्व लोक माझ्याकडे रागाने पाहत होते (जणू हाच तो ज्याने आमच्या मालकाला आणि आम्हाला गंडवलेय) बर त्यात
१०/२१
त्या कामगारांच्या मनात गॅसची भिती वेगळीच!
मी रात्री २ वाजता काय नक्की झालेय याचा शोध घ्यायला ओव्हनवर चढलो, बर्नर, ब्लोअर, पॅनेल गॅसबॅंक सर्व पाहिले काही गोष्टींच्या सेटींग कामगारांनीच बिघडवलेल्या लगेच लक्षात आल्या, त्याचे कारणही लक्षात आलेच ( उद्याची मॅच - दुसरे काय) ११/२१
सर्व सुरळीत करतच होतो तेवढ्यात त्या कंपनीचे मालक स्वत: फॅक्टरीत दाखल झाले होते. मला तर आश्चर्याचा धक्काच बसला, मग पटापट सर्व सेटींग चेंज करून साधारणत: पहाटे ४ वाजता प्लांट सुरू केला.
स्वत: त्या कंपनीचे मालकच फॅक्टरीत आल्याने कोणताही कामगार आता गडबड करण्याचा प्रश्नच नव्हता १२/२१
मॅनेजरनेही खाजगीत कबूल केले की काही नाठाळ लोकांनीच हा प्रकार मुद्दाम केला होता.
प्रोडक्शन सुरू झाल्यामुळे मी निघणार एवढ्यात पुन्हा एकदा सायरन वाजला आणि ओव्हन बंद झाली, मी शांतपणे पुन्हा कामाला लागलो पण यावेळी मला काही समजतच नव्हते, ते मालक माझे अगदी बारीक निरिक्षण करत
१३/२१
मलाही ते कळत होते. ते खुप रागावलेले दिसत होते, त्यात काही कामगार त्यांना आमच्या डिझाईनविषयी आणि कौशल्याबद्दल मुद्दाम शंका उत्पन्न होईल असे टोमणे मारत होते.
मी मग इरेला पेटलो, काहीही झाले तरी आता माघार नाही, चवताळून गेलो...पुन्हा दोन तासात सर्व व्यवस्थित करून प्लांट अगदी १४/२१
व्यवस्थित चालू केला आणि ओव्हनवरच अशी जागा शोधली जिथून मला सर्व फॅक्टरी दिसेल आणि तिथेच खुर्ची टाकून बसलो. जे कामगार किडे करत होते त्यांना काय कळायचे ते कळाले! मी अगदी डोळ्यात तेल घालून निरीक्षण आणि सूचना करत होतो.
मालक नाष्टा आणि दुपारच्या जेवणाला स्वत: बोलवायला येऊनही मी
१५/२१
वरच थांबलो रात्री सर्व पुर्ण झाल्यावरच खाली उतरलो!
डोळे लाल झालेले, हात संपुर्ण काळेकुट्ट, कपडे तर विचारता सोय नाही.
तेवढ्यात मालक सामोरे आले अशा अवस्थेत त्यांनी मला कडकडून मिठी मारली, डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले-
“शेर निकला तू तो, बहोत खूब”
ते कामगारही ओशाळले होते.१६/२१
पण त्यांनाही पश्चाताप झाल्याचे स्पष्ट दिसत होते.
मी कोणतीही तक्रार न करता सर्वांचे आभार मानले,त्यांनीही डिझाईन उत्तम असल्याचे मान्य केले.
मालक स्वत: त्यांच्या कारमधून मला सोडवायला कांदिवलीला आले. उतरतानाही त्यांनी भरभरून आशिर्वाद दिले.
रात्री उशीरा घरात पाऊल टाकले.
१७/२१
सर्व मित्र भारत पाकिस्तान विजयाचा आनंद साजरा करत होते.
ते सचिन आणि मॅचचा इतिवृत्त सांगत होते आणि मी मात्र क्रिकेट विसरलो होतो.
दिवसभरात एकदाही मला त्याची आठवण झाली नव्हती, माझ्यापुढचे संकट त्यापेक्षा कैकपट मोठे होते,त्यामुळे मला त्या मॅचबद्दल,टिव्हीबद्दल काहीच वाटत नव्हते
१८/२१
अगदी काही म्हणजे काहीच!
त्या दिवशी आयुष्याचे नवे गणित सुटल्याचा धडा घेतला होता, आमची पण भारत-पाकिस्तान सारखीच मॅच होती जी आम्ही त्या दिवशी जिंकली होतो!
मला माझे ध्येय स्पष्ट दिसत होते, जर त्या क्रिकेट मॅचच्या नादात मी ही गेलो नसतो तर
१. नाव कायमस्वरूपी खराब झाले असते.
१९/२१
२. ती कंपनी ब्लॅकलिस्ट झाली असती ते सर्व कामगार नक्कीच तिथून बेरोजगार झाले असते.
३. एवढे पैसे, संपत्ती असतानाही ते मालक रात्री स्वत: येतात, यात खुप काही आले.
४. क्रिकेटमुळे मला कदाचित काही तासांचा आनंद (जिंकलो तरच) मिळाला असता पण इथे मला आयुष्यभराचा मोठा धडा भेटला!
२०/२१
५. आयुष्याच्या प्रवासात कितीही आमिषं, संकट, अडथळे आले तरी अंतिम ध्येय जे असेल त्याच दिशेने आपली पावले आणि कर्म असायला हवे.
टिप- पुढे ते उद्योजक माझे आयुष्यभराचे मित्र झाले ते आजतागायत! अगदी कौटूंबिक मित्र!
२१/२१
हल्ली बरेच लोक फक्त जुजबी ओळखीवरून,कधी सोशलमिडीयातील एखाद्या मेसेजमुळे किंवा कधीतरी कुठे भेटले म्हणून “अमुकतमुक माझा एकदम खास आहे किंवा चांगला मित्र वगैरे आहे” असे बिनदिक्कत सांगतात.
ओळख असणे वेगळे आणि त्यातून आयुष्यभराचे वैयक्तिक संबंध प्रस्थापित
Personal Touch साठी खाजगी वा व्यावसायिक आयुष्यात चांगले संबंध प्रस्थापित करायचे असतील तर मनःपुर्वक प्रयत्न करणे खुप गरजेचे असते.
नोकरीसाठीचा Interview असो, व्यवसायासंबधी काही महत्वाची किंवा अगदी पहिली मिटींग असो वा एखाद्याकडून आपण काही सल्ला
२/१२
मागत असू.
आपले First Impression हे सर्वोत्तमच असावे आणि पुढे प्रत्येक वेळी त्यावर एक एक टप्पा प्रगती होत रहायला हवी.
साधारणत: २००९/१० काळ होता, आम्ही फूड प्रोसेसिंग , बेकरी आणि त्याच्या बेकींग प्रोसेसशी संबंधीत काही चांगल्या, अत्याधुनिक कल्पना प्रत्यक्षात राबवत होतो....
३/१२
यात मग घर, संसारोपयोगी वस्तू, दागदागिने,गाडी, सणसुद,कपडालत्ता, वेगवेगळी गॅजेट्स, गावाकडचे घर दुरूस्ती किंवा नवी बांधणी, शेतीतले काही प्रयोग, (बऱ्याचदा फसलेले-कारण आपण स्वत: पुर्ण लक्ष देत नाही) बहिणभावाचे शिक्षण किंवा लग्न नंतर मुलाबाळाचे शिक्षण, करियर
२/२४
आईवडीलांची, पतीपत्नींची स्वप्न, अचानक आलेली आजारपणे, थोडेफार पर्यटन आणि मग रिटायर्मेंटचे प्लानिंग, एक ना अनेक प्रत्येक ठिकाणी हा पैसाच लागतो.
कोणीम्हणतो की “पैसा हे सर्वस्व नाही” पण कटूसत्य असे आहे की “पैशाशिवाय कोणालाच वरीलपैकी काहीच करता येत नाही”आणि हे काहीच केलेच नाही
३/२४
काही दिवसांपूर्वी एका तरूण मित्राचा फोन आला, काम झाल्यानंतर त्यांनी मला एक प्रश्न विचारला कि तुम्ही इंटरव्युव्ह घेताना काय प्रश्न विचारता? त्या उमेदवारकडून काय अपेक्षा असतात?
माझ्या इतर सहकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तो उमेदवार कशी उत्तर देतो हेच ऐकत असतो... अगदी क्वचित मी काही प्रश्न विचारतो.”
तरूण फ्रेशर इंजिनियर्सच्या बाबतीत मात्र हल्ली फार आशादायी चित्र दिसत नाही, एकतर भरमसाठ “होलसेल” अभियांत्रिकी कॅालेजांमुळे दर्जा खुपच घसरलाय आणि २/१६
त्यांना इंजिनियरींग किंवा तंत्रज्ञानविषयक प्रश्न फार आवडत नाहीत असे माझे निरिक्षण आहे त्याऐवजी ते Extra-curricular Activities बद्दल भरभरून बोलतात त्यामुळे सहसा मी ते टाळतो.
पण काही महत्त्वाच्या जागांसाठी मात्र मी कटाक्षाने इंटरव्युव्हज ऐकतो,पाहतो,घेतो, यातीलच हा एक किस्सा ३/१६
पिढीजात संपत्ती असलेले गर्भश्रीमंतही कंगाल झालेत.
गेल्या काही दिवसात अभिनेते, ऊद्योजक तसेच अनेक श्रीमंत लोकही पैसे असूनही आत्महत्या करताहेत.
कुठे थांबायचे हे खरतर प्रत्येकालाच कळायला हवे, बऱ्याच जणांना ते कळायला फार उशीर होतो तोपर्यंत त्यांचे सर्वस्व उध्वस्त झालेले असते. २/१४
आज आपल्यासमोर इतकी उदाहरणे आहेत तरी माणूस जागाच होत नाही.
पैशाची, प्रसिद्धीची,संपत्तीची हाव स्वस्थ बसू देत नाही, हे सर्व अजून हवे,या अजूनच्या नादात विजय मल्ल्या,ललित मोदी,निरव मोदी आणि अगदी अंबानीपुत्र अनिलही सुटले नाहीत.
गरीबाची पोटासाठी चूक एकवेळ माफ होईल पण यांचे काय?
३/१४
या लॅाकडाऊनमधे सर्वाधिक विचित्र परिस्थितीला कोण सामोरे गेले असेल तर ती लहान मुले अन शालेय विद्यार्थी!
Change आणि Disruption यातील फरक जाणून घ्यायचा असेल तर कोरोनाआधीची आणि नंतरची शिक्षण पद्धती यापेक्षा ऊत्तम उदाहरण दुसरे कोणतेही नसेल. #आर्थिकसाक्षरता#मराठी#SaturdayThread १/१५
न भूतो ना भविष्यती असे अचानक घरीच राहून ॲानलाईन पद्धतीने शिक्षण घ्यायचे! तरीही बऱ्याच विद्यार्थ्यानी त्याच्याशी जुळवून घेतले आणि अगदी ॲानलाईन परिक्षाही दिल्या.....
माझी मुलगीही गेले सहा महिने तशीच शिकतेय... सुरूवातीला झुम ॲप आणि नंतर ते इतर प्लॅटफॅार्मवर शिफ्ट झाले. २/१५ #म
या सर्व प्रकारात आम्ही नेहमी ऐकायचो कोणी मुलांमुलींसाठी नवा ipad घेतला, मोबाईल अगदी लॅपटॅापही घेतला.एका परिचितांनी तर ७वीच्या मुलासाठी लेटेस्ट iphone घेऊन दिला.
हे सर्व सूरू असताना सुदैवाने माझ्या मुलीने कधीही तो हट्ट केला नाही,ती माझ्या पत्नीच्या मोबाईलवरून हे सर्व करायची. ३/१५