या लॅाकडाऊनमधे सर्वाधिक विचित्र परिस्थितीला कोण सामोरे गेले असेल तर ती लहान मुले अन शालेय विद्यार्थी!
Change आणि Disruption यातील फरक जाणून घ्यायचा असेल तर कोरोनाआधीची आणि नंतरची शिक्षण पद्धती यापेक्षा ऊत्तम उदाहरण दुसरे कोणतेही नसेल. #आर्थिकसाक्षरता#मराठी#SaturdayThread १/१५
न भूतो ना भविष्यती असे अचानक घरीच राहून ॲानलाईन पद्धतीने शिक्षण घ्यायचे! तरीही बऱ्याच विद्यार्थ्यानी त्याच्याशी जुळवून घेतले आणि अगदी ॲानलाईन परिक्षाही दिल्या.....
माझी मुलगीही गेले सहा महिने तशीच शिकतेय... सुरूवातीला झुम ॲप आणि नंतर ते इतर प्लॅटफॅार्मवर शिफ्ट झाले. २/१५ #म
या सर्व प्रकारात आम्ही नेहमी ऐकायचो कोणी मुलांमुलींसाठी नवा ipad घेतला, मोबाईल अगदी लॅपटॅापही घेतला.एका परिचितांनी तर ७वीच्या मुलासाठी लेटेस्ट iphone घेऊन दिला.
हे सर्व सूरू असताना सुदैवाने माझ्या मुलीने कधीही तो हट्ट केला नाही,ती माझ्या पत्नीच्या मोबाईलवरून हे सर्व करायची. ३/१५
आता मात्र परिक्षेच्या काळात तिच्या बऱ्याच Assignment आणि इतर अनेक गोष्टी शाळा Apps द्वारे पाठवत असल्याने तीला दुसरा मोबाईल द्यावाच लागणार असे मला जाणवले.काही अटी, शर्ती आणि त्याबदल्यात बरेच बदल ती स्वत:मधे करेल अशा आश्वासनाने विचार पुर्वक माझाच एक जूना मोबाईल जो बिघडला होता
४/१५
तो तीला दुरूस्त करून आणुन दिला. स्वारी भलतीच खुष झाली...तिला तो नवा कि जूना यापेक्षा मोबाईल मिळालाय याचाच जास्त आनंद.
आपल्या लहानपणीही असाच भारी आनंद असायचा, मोठ्या भावाचे कपडे, पुस्तके लहान भावाला... मोठ्या बहिणभावाची खेळणी छोट्यांसाठी... अगदी आमच्या घरी तर पाळणाही आम्हा
५/१५
आम्हा चार भांवंडाना एकच, आमच्या मुलांनीही तो वापरलाय.
माझी जडणघडण ही अगदी सर्वसामान्य मराठी निम्नमध्यमवर्गीय कुटूंबात झालीये, त्यात ८० ते ९५ चे दिड-दशक म्हणजे आयुष्यातला सुवर्णकाळच. त्यावेळी आईवडीलांनी, शिक्षकांनी, आजूबाजूच्या समाजाने आणि निसर्गाने जे धडे दिले त्याचे
६/१५
फायदे मला आजही होताहेत.
वर्षातून शाळेव्यतिरिक्त दोन वेळाच नवे कपडे घ्यायचे, दिवाळीत आणि ऊन्हाळ्याच्या सुट्टीत. त्यादरम्यान कोणतेही कपडे थोडे ऊसवले किंवा फाटले तर लगेच आई, बहिण किंवा बाबा त्याला शिवून द्यायचे किंवा रफू करून द्यायचे ( हल्ली बऱ्याच मुलांना रफू या शब्दाचा अर्थ
७/१५
कदाचीत माहितीही नसेल). माझ्या भावाची पॅंट कापून माझी बर्मुडा आणि वडीलांची पॅंट भावाची बर्मुंडा... बरं त्यातही स्टाईल-आनंद दोन्ही....
एक जीन्स पॅंट तर किती वर्षे वापरली असेल तेही आठवत नाही.... आणि सर्वात शेवटी त्याच कपड्यांची गोधडी.... पुढे कित्येक वर्षे मग ती वापरायची.
८/१५
चपलांचेही तसेच... तुटली की नीट करायची, सोल गेले की नवे सोल टाकायचे... पायाची साईझ वाढली की चप्पल लहान भावाला द्यायची पण अगदी कोणत्याही वस्तूचा शेवटपर्यंत वापर करत रहायचे, दुरूस्त करायचे पुन्हा वापरायचे...ही त्यावेळीची खरी संस्कृती....
९/१५
अगदी निरूपयोगी झालेले सामानही शेवटी भंगारवाला, प्लॅस्टिकवाला, रद्दीवाला, भांडी मोडवाल्याला द्यायचे त्यातही आई इतकी घासाघीस करायची की तो समोरचा रडकुंडीला यायचा.... तो गेला की आमची हसून हसून मुरकुंडी ऊडायची...
पै पै चा हिशेब ठेवणे काय हे या परिस्थितीने आम्हाला खरच शिकवले
१०/१५
आणि हेच ते #आर्थिकसाक्षरता,
याचे महत्वाचे तत्व-
“Dont Replace-Repaire it”
माझे आई-बाबा म्हणजे खुप साधी माणसं, एकदम नाकासमोर चालणारे, आमचे शिक्षण आणि संसाराचा गाडा नेटाने करायचा एवढेच काय ते त्यांचे ध्येय.
त्यांचा काही अर्थसाक्षरतेचा गाढा अभ्यास नव्हता कि त्यावर काही वाचन
११/१५
किंवा तसे ऊच्च शिक्षणही नव्हते, पण ते ज्या पद्धतीने जगत होते ते म्हणजेच आजची आधूनिक आर्थिकसाक्षरता. माझ्यातल्या अर्थसाक्षरतेचा पाया रचला तो माझ्या आईवडीलांनीच, तो ही या अशा संस्कारातून आणि रोजच्या व्यवहारज्ञानातून.
या अशा संस्कारातून आणि रोजच्या व्यवहारज्ञानातून.
१२/१५
आम्ही पैशाने खुप श्रीमंत नव्हतो पण आम्ही आनंदी आणि सुखी मात्र नक्की होतो. आजही आम्ही कोणतीही वस्तू कधीच लगेच टाकून देत नाही... ती दुरूस्त करून पुन्हा वापरायलाच हवी या मतावर ठाम असतो.
आपल्या आजूबाजूस तुम्हाला बरेच जण असे दिसतील जे सांगतात,आम्ही बालपणी खुप हाल सोसले #मराठी
१३/१५
बऱ्याच गोष्टी नाही मिळु शकल्या म्हणुन मुलांना जे हवे ते आम्ही देतो, हौसमौज पुर्ण करतो असे म्हणणाऱ्या पालकांची मला दया येते.
स्मार्टफोन्स, ब्रॅंडेड कपडे,घड्याळे सर्व गॅझेट्स कालबाह्य होतील पण चांगले शिक्षण-संस्कार आणि व्यवहारज्ञान पुरेसे आहे तेच आयुष्यभर त्यांची साथ देतील.
१४/१५
लहान मुले,विद्यार्थी, तरूणांना #आर्थिकसाक्षरता आणि व्यवहारज्ञानाची खुप गरज आहे. या कोरोना महामारीत या गोष्टी अजून प्रकर्षाने जाणवत आहेत.
पैसे कमविणे एकवेळ जमेल पण तो हाताळणे, जपणे, वाढविणे आणि त्यासोबत जमिनीवर रहायला शिकलो नाही तर त्याला कमाईला काही अर्थ नाही.
धन्यवाद 🙏
१५/१५
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
माझा एक वर्गमित्र जगप्रसिद्ध जनरेटर बनविणाऱ्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट आहे,आम्ही दोघे काॅलेजपासूनचे चांगले मित्र.
मुंबईत काही वर्ष रुममेट म्हणून एकत्र राहिलो,तो सुरूवातीपासून एकाच कंपनीत,प्रचंड मेहनती,अत्यंत हुशार अन प्रामाणिक त्यामुळे कंपनीने त्याला
व्यवसायाच्या सुरूवातीला आमचे ठराविक असे एक दोन खुप मोठे आणि महत्वाचे ग्राहक होते...(आजही ते तेवढेच महत्वाचे आहेत) एकदा त्यापैकी एका कंपनीत नवीन बाॅस बदलून आले. एक महिनाभर होऊनही ते मला टाळत होते.
मी तासन् तास त्यांच्या ॲाफिसच्या बाहेर वाट पहात बसायचो,त्यांना ते दिसायचेही पण ते वेळ द्यायचे नाहीत.
आमच्या क्षेत्रात तेव्हा आमची कंपनी नवखी असली तरी जे तंत्रज्ञान आणि त्यातला अनुभव जो आमच्याकडे होता तो अगदी भारतातल्या सर्वात मोठ्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांकडेही नव्हता. 2/18
व्यावसायिक दृष्ट्याही आम्ही कुठेही कमी नव्हतो पण काही केल्या नवे साहेब वेळच द्यायला तयार नव्हते..
नजरानजर झाली तरी ते इतक्या खालच्या पातळीने पहायचे की माझीच मला लाज वाटायची..आणि मी ओशाळून जायचो, तिथले ॲाफीसबाॅय,रिसेप्शनचे लोक ही मला हसायचे,हळूहळू मला काय कळायचे ते कळाले होते.3/18
काही दिवसांपूर्वी पुण्याला निघालो होतो तेव्हाची ही गोष्ट....
काॅफी घेण्यासाठी पेट्रोल पंपावर ब्रेक घेतला,गाडीतून उतरताच एक मित्र समोरच कॉफीशॉपवर भेटला आणि मग काय, लगेच मस्त गप्पा सुरू झाल्या.काॅफी संपतच आली होती तेवढ्यात अचानक माझा ड्रायव्हर (तो नुकताच
हा लेख मी आमच्या #WeeklyNewsletter साठी लिहायला घेतलाय पण नंतर वाटले कि ट्विटरवरील अनेक #मराठी तरूणांनांही तो ऊपयोगी पडू शकतो म्हणुन तो इथे #Thread स्वरूपातही मांडतोय.
हल्ली मोबाईल,टिव्ही,युट्यूब,सोशल मिडीया, गुगलबाबा या सर्वांच्या गराड्यात आपण तोच विचार करतो. #म 1/9
तेच योग्य वाटते जे तिथे दाखवले जाते. मी नेहमीच म्हणतो गुगल किंवा इंटरनेट आपल्याला माहिती देते पण ज्ञान हवे असेल तर सखोल वाचन,मनन,चिंतन आणि कृती हवीच.
बऱ्याचदा आपल्याला टिव्हीवरील चर्चा पाहून किंवा सोशल मिडीयावरिल ट्रेंड पाहून तेच अंतिम सत्य वाटायला लागते पण खरे पाहता 2/9 #मराठी
आपण सारासार विचार करणेच बंद केलेले असते.
ऊदाहरणादाखल अर्णबचा विचार करा तो खरच पत्रकार आहे?आता तो जो काही मुंबई पोलिसांविरूद्ध बोलतोय ते खरे मानायचे का? किंवा FMCG च्या जाहिराती सांगतात त्यात सर्वसत्य आहे का?
महाराष्ट्र किंवा इतर राज्यातील सत्तास्थापनेवेळी वेगवेगळे राजकारणी 3/9