आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा बराच काळ हा पैसा कमवायला नक्की सुरूवात कशी करायची आणि कमवायला लागलो की अजून जास्त कसा कमवता येईल हे शिकण्यातच जातो.

पैशांचे शास्त्रीय व्यवस्थापन शिकण्यापुर्वीच पैसा खर्च होण्याचे हजारो मार्ग जणू आ वासुन

#SaturdayThread #आर्थिकसाक्षरता #मराठी
१/२४
आपली वाटच पाहत असतात.

यात मग घर, संसारोपयोगी वस्तू, दागदागिने,गाडी, सणसुद,कपडालत्ता, वेगवेगळी गॅजेट्स, गावाकडचे घर दुरूस्ती किंवा नवी बांधणी, शेतीतले काही प्रयोग, (बऱ्याचदा फसलेले-कारण आपण स्वत: पुर्ण लक्ष देत नाही) बहिणभावाचे शिक्षण किंवा लग्न नंतर मुलाबाळाचे शिक्षण, करियर
२/२४
आईवडीलांची, पतीपत्नींची स्वप्न, अचानक आलेली आजारपणे, थोडेफार पर्यटन आणि मग रिटायर्मेंटचे प्लानिंग, एक ना अनेक प्रत्येक ठिकाणी हा पैसाच लागतो.

कोणीम्हणतो की “पैसा हे सर्वस्व नाही” पण कटूसत्य असे आहे की “पैशाशिवाय कोणालाच वरीलपैकी काहीच करता येत नाही”आणि हे काहीच केलेच नाही
३/२४
तर त्या माणसाला कोणीही एका पै चीही किंमत देत नाही.

जोपर्यंत हे सर्व आपल्या नियोजनाप्रमाणे चालू असते तोपर्यंत आपण फार जास्त विचार करत नाही.

अधूनमधून काही लहानसहान संकट आली तरी त्यांना तोंड देत जगत असतो पण खरी समस्या तयार होते जेंव्हा अचानक खुप मोठे संकट ज्याचा आपण
४/२४
स्वप्नांतही विचार केलेला नसतो ते आपल्या समोर उभे राहते आणि आयुष्याचा अगदी पालापाचोळा होऊन जातो...
’उध्वस्त होणे’ या शब्दाचा खरा अर्थ समजतो मग आपण कधी नशीबाला दोष देतो, कधी आपल्याला इतरांनी कसे फसविले हे सांगत राहतो, कधी आपल्याला पैसे कमी मिळत होते हे रडगाणे गातो तर कधी कोणी
५/२४
आयुष्याचाच शेवट करून टाकतो.

आता या अचानक आलेल्या कोविड संकटाचेच घ्या ना, कित्येक संसार उध्वस्त झाले, कित्येक उद्योग देशोधडीला लागले, गरीबाची तर दैना झालीच पण मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय आणि अगदी बांधकाम आणि कित्येक क्षेत्रातले अतिश्रीमंत वाटणारी मंडळाही रस्त्यावर आली.... ६/२४
बरं मग हे फक्त कोविडमुळेच झाले का? तर माझ्या मते अजिबात नाही ( काही अपवाद) याआधी ही हजारो उद्योगधंदे अचानक बंद पडलेत, लाखो नोकऱ्या जात राहतात, लोक कर्जबाजारी होतात, आत्महत्या करतात, किंवा अचानक तंत्रज्ञान बदलल्याने कित्येक क्षेत्र शुन्य होऊन जातात, जसे, २००० ते २००३ मधे PCO ७/२४
बुथ बंद पडले, तारयंत्र बंद पडली. टाईपराइटर्स बंद झाले कॅसेट इंडस्ट्री संपली तेव्हा काळासोबत न बदलल्यामुळेही अनेक लोक रस्त्यावर आली आणि यापुढेही येत राहतील... आणि हो, यापुढेही हे कायम होतंच राहिल कारण याच्या मुळ कारणाकडे आपण सर्वच दुर्लक्ष करतो आणि ते म्हणजे आपल्याकडे ८/२४
#आर्थिकसाक्षरता या विषयावरील असलेले अज्ञान आणि त्याहूनही भयंकर आजार म्हणजे आपल्याला सर्व कळते असा अतिआत्मविश्वास!

आपण जर बारकाईने पाहिले तर लक्षात येईल की यातील ९९% लोक हे फक्त आणि फक्त आर्थिक व्यवहार चुकीच्या पद्धतीने (Financial Mismanagement) केल्यामुळेच संकटात येतात ९/२४
मग तो गरीब असो की श्रीमंत!
त्यांची कारणे वेगवेगळी असतात,माझ्या मागच्या काही लेखांमधे ती सामाविष्ट आहेत आणि पुढेही येतीलच.

यातील सर्वात महत्वाचे कारण असते ते म्हणजे या लोकांनी असे काही संकट येईल याचा विचारच केलेला नसतो त्यामुळे अशा संकटातून बाहेर पडण्यासाठी काही आपात्कालीन १०/२४
व्यवस्थाही तयार केलेली नसते.

खरे पाहता अर्थशास्रात या गोष्टीला खुप महत्व आहे.
उत्पन्न,जमा,खर्च,बचत अन गुंतवणुक या सोबत ही आपत्ती व्यवस्थाही (Crisis Management)आपल्याकडे असलीच पाहिजे.

अगदी आपले रोजचे आयुष्य जगताना याचे अनन्यसाधारण महत्व आहे. फक्त आपण त्याकडे अर्थशास्त्रीय ११/२४
दृष्टिकोनातून पहायला हवे. प्रत्येकाकडेच Safety Margins किंवा आपात्कालिन सुरक्षा व्यवस्था नसेल तर हमखास नुकसान ठरलेलेच.

आज आपण या विषयीच समजून घेऊ.

माझ्या ऊमेदीच्या काळात मी मोठमोठ्या औष्णिक प्रकल्पांच्या डिझाईनचे काम पहायचो. त्यात बॅायलर, बऱ्याच महत्त्वाच्या प्रोसेस १२/२४
मशीन्सचे कॅलक्युलेशन्स, त्याच्या Accesorries चे डिझाईनन्सची आकडेमोड पहायचो.

ऊदाहरणादाखल सर्वांनीच पाहिलेली औद्योगिक चिमणी घ्या, याचे डिझाईन करताना बऱ्याच गोष्टी ध्यानात घ्यायला लागतात, जसे की वादळ,वारा,पाऊस, आतून अतिउष्ण वायू,प्रचंड प्रदूषण आणि अजून बऱ्याच संकटांशी झुंजत १३/२४
ती चिमणी कोणत्याही आधाराविना वर्षानूवर्ष उभी ठेवायची असते.

बर तीची उंची आणि आकार इतका आवाढव्य असतो की कोणत्याही परिस्थितीत ती कोसळणार नाही याची पुर्ण हमी घेणे फार महत्वाचे असते.

या चिमणीतून अत्यंत उष्ण-घातक वायू जात असतात तसेच काही केमिकल रिॲक्शनमुळे त्यात सल्फ्युरीक ॲसिड १४/२४
तयार होण्याचाही धोका असतो त्यामुळे ती चिमणी गंजू शकते, तसेच ती लोखंडाची असल्याने तिची झिजही होत असते, या परिस्थितीत तिची जाडी (Thickness) तसेच सपोर्ट डिझाईन करायचो तेंव्हा वरील सर्व घटक गृहीत धरून जो काही आकडा येईल त्यात पन्नास टक्याहून अधिक किंवा कधीकधी त्याहीपेक्षा जास्त १५/२४
सेफ्टी मार्जिन ठेऊन ती बनवायला द्यायचो. एवढे करूनही चिमणीच्या तळाला एक Drain विंडो तसेच ही घातक द्र्व्य काढायला एक Safety विंडो द्यायलाच लागते. (जरी चिमणीचे मुख्य कार्य तो घातक वायू वरच्या दिशेला सोडायचे असले तरीही तळाला अजून एक!)

आपली सर्वांची लाडकी लालपरी एसटी असो कि १६/२४
आरामदायी बस त्याला पुढे, मागे, ड्रायव्हरसाठी दरवाजे असले तरी शेवटी Emergency Exit असतेच.

चांगले फाईव्ह स्टार हॉटेल असेल, भरपूर मोकळी जागा आणि सुसज्ज अशी अग्निरोधक यंत्रणा असेल, सुरक्षेची जगातील सर्वाधिक आधूनिक साधने असूद्या, तरीही तिथेही Emergency Exit Door आणि सुरक्षित १७/२४
बाहेर पडण्याचा मार्ग दिलेलाच असतो.

हल्ली जवळपास सर्वच गाड्यांमधे एअरबॅग्जची सुविधा तसेच अजून बऱ्याच अत्याधुनिक गोष्टी दिलेल्या असतात तरीही आपण गाडीचा विमा काढतोच, सोबत थ्रर्ड पार्टी विमाही असतोच आणि सर्वात महत्वाचे आपला स्वत:चाही विमा असतो..... मग हेच सुत्र आपण आर्थिक १८/२४
व्यवहारांबाबतीत वापरायला नको का?

आयुष्यात अचानक कितीही मोठे संकट आले तर आपल्याकडे त्यासाठी बऱ्यापैकी शिल्लक (Savings) असावीच.

प्रत्येक गोष्ट आपण ठरविल्याप्रमाणेच होईल असे मानणे म्हणजे चुकीचेच!

कितीही काटेकोर पालन केले तरी आपण माणूस आहोत आणि आपण चूक करू शकतो पण त्या वेळी १९/२४
जर आपल्याकडे सेफ्टी मार्जीन आणि Emergency Exit असेल तर आपल्यावर कधीही संकटासमोर हात टेकण्याची वेळ येत नाही.

ही आपात्कालिन बचत एका वेगळ्याच प्रकारे काढून ठेवायची आपल्या एकूण उत्पन्नाच्या १० ते ३० % रक्कम ही या कामी तर वयाच्या पंचविशीपासूनच साठवायला सुरूवात केली तर पुढे २०/२४
आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी आपण कधीही डळमळून जात नाही. कमविणे आणि खर्च करणे म्हणजे #आर्थिकसाक्षरता नव्हेच.

आपण बचत कशी करायची, वाढवायची यासाठी माझे याआधीचे ब्लॅाग वाचा.

माझे स्पष्ट मत आहे कि आर्थिकसाक्षरतेचे शिक्षण प्रत्येक माध्यमिकशाळेत, महाविद्यालयात आणि प्रत्येक २१/२४
क्षेत्रात व्हायलाच हवे.

हे असे संस्कार झाले आणि यावर खरच कृती झाली तर हाच खरा श्रीमंतीचा मंत्र ठरेल.
माझ्या मते वय वर्ष २२ ते ३५ पर्यंत तर प्रत्येकाने कटाक्षाने बचत, गुंतवणूक आणि कमाईतून काही हिस्सा या अशा संकटसमयी वापरायला बाजुला काढून ठेवावाच.... २२/२४
या वयोगटातील तरूणांनी सोशल मिडीया, डिजीटल स्क्रिन वेळ कमी करून वाचन वाढवावे आणि आपल्या कामातून, कृतीतून जास्तीत जास्त आर्थिक प्रगती करावी....

आपण जर आर्थिक दृष्ट्या साक्षर झालो तरच या जगात टिकाव लागतो नाहीतर आयुष्यभर या पैशांच्या मोहात गाढवासारख्या फेऱ्या मारत राहतो. २३/२४
तेंव्हा आर्थिक साक्षरतेचे महत्व जाणून घ्या आणि आजपासूनच आपली वाटचाल सुरू करा.

आणि नेहमी लक्षात ठेवायचे -

SAVING must be top most PRIORITY, not just a THOUGHT!!

धन्यवाद 🙏२४/२४

#SaturdayThread #आर्थिकसाक्षरता #मराठी #म

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Prafulla Wankhede 🇮🇳

Prafulla Wankhede 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @wankhedeprafull

31 Oct
काही दिवसांपूर्वी एका तरूण मित्राचा फोन आला, काम झाल्यानंतर त्यांनी मला एक प्रश्न विचारला कि तुम्ही इंटरव्युव्ह घेताना काय प्रश्न विचारता? त्या उमेदवारकडून काय अपेक्षा असतात?

त्यावर मी म्हणालो की “मी फार प्रश्न न विचारता...
#SaturdayThread #सत्यकथा #BusinessDots #मराठी #म
१/१६
माझ्या इतर सहकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तो उमेदवार कशी उत्तर देतो हेच ऐकत असतो... अगदी क्वचित मी काही प्रश्न विचारतो.”

तरूण फ्रेशर इंजिनियर्सच्या बाबतीत मात्र हल्ली फार आशादायी चित्र दिसत नाही, एकतर भरमसाठ “होलसेल” अभियांत्रिकी कॅालेजांमुळे दर्जा खुपच घसरलाय आणि २/१६
त्यांना इंजिनियरींग किंवा तंत्रज्ञानविषयक प्रश्न फार आवडत नाहीत असे माझे निरिक्षण आहे त्याऐवजी ते Extra-curricular Activities बद्दल भरभरून बोलतात त्यामुळे सहसा मी ते टाळतो.

पण काही महत्त्वाच्या जागांसाठी मात्र मी कटाक्षाने इंटरव्युव्हज ऐकतो,पाहतो,घेतो, यातीलच हा एक किस्सा ३/१६
Read 16 tweets
24 Oct
पैसा, पद आणि प्रसिद्धीची - हाव वाईटच!
कुठे थांबायचे हे नाही कळले की अंत ठरलेला.

हे काही फक्त अध्यात्मिक वाक्य नाही तर आजमितीस सर्वात मोठे कटू सत्य आहे.

या कोरोना तर काळात कित्येक मोठे उद्योजक, बॅंकर्स, राजकारणी, बिल्डर्स, कलाकार अन
#आर्थिकसाक्षरता #मराठी #SaturdayThread १/१४
पिढीजात संपत्ती असलेले गर्भश्रीमंतही कंगाल झालेत.
गेल्या काही दिवसात अभिनेते, ऊद्योजक तसेच अनेक श्रीमंत लोकही पैसे असूनही आत्महत्या करताहेत.

कुठे थांबायचे हे खरतर प्रत्येकालाच कळायला हवे, बऱ्याच जणांना ते कळायला फार उशीर होतो तोपर्यंत त्यांचे सर्वस्व उध्वस्त झालेले असते. २/१४
आज आपल्यासमोर इतकी उदाहरणे आहेत तरी माणूस जागाच होत नाही.

पैशाची, प्रसिद्धीची,संपत्तीची हाव स्वस्थ बसू देत नाही, हे सर्व अजून हवे,या अजूनच्या नादात विजय मल्ल्या,ललित मोदी,निरव मोदी आणि अगदी अंबानीपुत्र अनिलही सुटले नाहीत.

गरीबाची पोटासाठी चूक एकवेळ माफ होईल पण यांचे काय?
३/१४
Read 14 tweets
10 Oct
या लॅाकडाऊनमधे सर्वाधिक विचित्र परिस्थितीला कोण सामोरे गेले असेल तर ती लहान मुले अन शालेय विद्यार्थी!

Change आणि Disruption यातील फरक जाणून घ्यायचा असेल तर कोरोनाआधीची आणि नंतरची शिक्षण पद्धती यापेक्षा ऊत्तम उदाहरण दुसरे कोणतेही नसेल.
#आर्थिकसाक्षरता #मराठी #SaturdayThread १/१५
न भूतो ना भविष्यती असे अचानक घरीच राहून ॲानलाईन पद्धतीने शिक्षण घ्यायचे! तरीही बऱ्याच विद्यार्थ्यानी त्याच्याशी जुळवून घेतले आणि अगदी ॲानलाईन परिक्षाही दिल्या.....

माझी मुलगीही गेले सहा महिने तशीच शिकतेय... सुरूवातीला झुम ॲप आणि नंतर ते इतर प्लॅटफॅार्मवर शिफ्ट झाले. २/१५ #म
या सर्व प्रकारात आम्ही नेहमी ऐकायचो कोणी मुलांमुलींसाठी नवा ipad घेतला, मोबाईल अगदी लॅपटॅापही घेतला.एका परिचितांनी तर ७वीच्या मुलासाठी लेटेस्ट iphone घेऊन दिला.
हे सर्व सूरू असताना सुदैवाने माझ्या मुलीने कधीही तो हट्ट केला नाही,ती माझ्या पत्नीच्या मोबाईलवरून हे सर्व करायची. ३/१५
Read 15 tweets
26 Sep
- माणुस Keyच्या जादूचे प्रयोग -

“बोल साहेबा,काय सेवा करू तुझी?
काय घेणार चहा, कॉफी कि ग्रीन टी?”

हा प्रश्न मला एका मोठ्या कंपनीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने अतिशय आपुलकीने विचारला होता.
मी त्यांच्या ॲाफीसमधे बहुतेक वर्ष-दिड वर्षानंतर 1/15

#MyStory #BusinessDots #सत्यकथा #मराठी #म
काही महत्त्वाच्या Technical Discussion साठी गेलो होतो. आमचे ऋणानुबंधही तसे चांगले आहेत.

त्यांनी लगेच बेल वाजवली आणि दरवाज्यातून त्यांचा ॲाफीसबाॅय आत आला, मी त्या ॲाफीसबाॅकडे पाहिले आणि म्हणालो - “सतिशला माहित आहे”

आणि त्यानेही हलकेच हसून मान डोलावली... 2/15 #SaturdayVibes
साहेबांकडे पाहून सतिशने “तुम्ही, काय घेणार सर? असे विचारले, साहेबांनी त्याला त्यांच्यासाठी काॅफी आणायला सांगितले. तो ही लगेच केबिनमधून बाहेर गेला.

जाताजाता मला एका हाताने नमस्कार केला आणि मी ही त्याला तसाच प्रतिसाद दिला.

“तु या सतिशला कसा काय ओळखतोस? आणि तो ही तुला कसा?”3/15
Read 15 tweets
19 Sep
माझा एक वर्गमित्र जगप्रसिद्ध जनरेटर बनविणाऱ्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट आहे,आम्ही दोघे काॅलेजपासूनचे चांगले मित्र.
मुंबईत काही वर्ष रुममेट म्हणून एकत्र राहिलो,तो सुरूवातीपासून एकाच कंपनीत,प्रचंड मेहनती,अत्यंत हुशार अन प्रामाणिक त्यामुळे कंपनीने त्याला

#आर्थिकसाक्षरता #मराठी 1/14 Image
भरभरून दिलेय, तो मुंबई,दिल्ली,बंगलोर करत पुन्हा मुंबईतच स्थायिक झाला.
आज तो त्याच्या क्षेत्रात कमी वयातही उत्तम काम करतोय आणि बक्कळ पैसेही कमावतोय.

त्याचे त्रिकोनी कुटूंब, मुलगी, बायको आणि तो, बायको एका बॅंकेत चांगल्या ऊच्च पदावर, दोघांचे मिळून वर्षाला आठ आकडी ऊत्पन्न..2/14 #म
दहा-बारा वर्षांपूर्वीच त्याने मुंबईत तीन बेडरूमचा फ्लॅट विकत घेतला होता, तो ही सुखवस्तू भागात आणि आता परत आल्यावर तो तिथेच राहत आहे.

दोन वर्षांपूर्वी तो मुंबईत आला तेंव्हा त्याला कंपनीतील सर्व सहकारी, मित्र, शेजारी नातेवाईक SUV किंवा जर्मन सेडान कार घ्यायचा हट्ट करत होते 3/14
Read 14 tweets
12 Sep
व्यवसायाच्या सुरूवातीला आमचे ठराविक असे एक दोन खुप मोठे आणि महत्वाचे ग्राहक होते...(आजही ते तेवढेच महत्वाचे आहेत) एकदा त्यापैकी एका कंपनीत नवीन बाॅस बदलून आले. एक महिनाभर होऊनही ते मला टाळत होते.

मला ते अगदी स्पष्ट जाणवतही होते..
1/18

#MyStory #BusinessDots #सत्यकथा #मराठी #म
मी तासन् तास त्यांच्या ॲाफिसच्या बाहेर वाट पहात बसायचो,त्यांना ते दिसायचेही पण ते वेळ द्यायचे नाहीत.

आमच्या क्षेत्रात तेव्हा आमची कंपनी नवखी असली तरी जे तंत्रज्ञान आणि त्यातला अनुभव जो आमच्याकडे होता तो अगदी भारतातल्या सर्वात मोठ्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांकडेही नव्हता. 2/18
व्यावसायिक दृष्ट्याही आम्ही कुठेही कमी नव्हतो पण काही केल्या नवे साहेब वेळच द्यायला तयार नव्हते..
नजरानजर झाली तरी ते इतक्या खालच्या पातळीने पहायचे की माझीच मला लाज वाटायची..आणि मी ओशाळून जायचो, तिथले ॲाफीसबाॅय,रिसेप्शनचे लोक ही मला हसायचे,हळूहळू मला काय कळायचे ते कळाले होते.3/18
Read 18 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!