रांगडा, इरसाल आणि जगण्यात मोकळेपणा असलेला... 'कोल्हापूरी माणूस.’

त्याचे हे दोन किस्से..

१) १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युध्दात अमेरिकेने पाकिस्तानला 'पॅट्रिअॅट' रणगाडे पुरवले आणि संपूर्ण भारतात अमेरिकेविरुद्ध जनक्षोभ उसळला. तसा तो कोल्हापूरातही उसळला. 1️⃣ #कोल्हापूर
अमेरिकेला धडा शिकवायचं कोल्हापूरात ठरलं. अमेरिका कुठं आणि कोल्हापूर कुठं? कसा धडा शिकवणार? पण कोल्हापूरी माणसाच्या मनानं एकदा ठरवलं की त्या गोष्टीचा थांग, छडा, पिच्छा,नाद, शब्द,प्रयत्न, हेका, हट्ट, जिद्द,चिकाटी सोडायची नाही म्हणजे नाही. 2️⃣
कोल्हापूरकर हे अमेरिकेच्या विरूध्द व भारतीय जवानांच्या पाठीशी आहेत हे दाखवण्यासाठी कोल्हापूरकरांतर्फे एक मोर्चा काढण्यात आला. मोर्चा शहरातील प्रमुख रस्त्यावरून जाऊ लागला.
अमेरिकेविरोधात वेदकाळापासून अस्तित्वात असलेल्या शिव्यांची आवर्तन खास कोल्हापूरी भाषेत मोर्चात सुरू होती. 3️⃣
मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी आला. तेथे जवळंच महानगरपालिकेची इमारत आहे व त्या इमारतीत काही दुकानगाळे आहेत. त्यापैकी एक दुकान होतं "अमेरिकन होजीअरी" नावाचं.पुरूषांच्या अंडरवेअर-बनियन विक्रीचं. 4️⃣
परदेशी म्हणजे भारी ही कल्पना जनमाणसांत रूजलेली असल्यानं दुकानदारानं 'अमेरिका' हे नावं ठेवलं होतं व त्यामूळे त्याचा धंदाही उत्तम चालला होता. मोर्चेकर्‍यांच्या द्दष्टीस तो बोर्ड पडला.

'अमेरिका' नाव वाचून मोर्चेकर्‍यांची डोकी भडकली. रागाच्या भरात बोर्ड खाली उतरवण्यात आला. 5️⃣
पत्र्याचा बोर्ड तो. रस्त्यावर त्यास जोरात आपटून अमेरिकेचे पेकाट मोडण्यात आलं. लाथा-बुक्क्यांनी अमेरिकेच्या चिंधड्या उडाल्या. सोबत शिव्यांची आवर्तनं. पत्र्याचे तुकडेतुकडे झाले. आता मोर्चेकर्‍यांच मन हलकं झालं. जनक्षोभ थोडा शांत झाला. 6️⃣
पण शत्रूवर विजय मिळवायचा असेल, तर कुठेतरी नैतिकता हवी आणि आंदोलनाला चांगुलपणाची चाड हवी.म्हणून त्या दुकानदाराची नुकसानभरपाई देण्याचा विचार पुढे आला. देशप्रेमाच्या जाज्वल्य अभिमानाचा आदर्श समाजापुढे ठेवण्यासाठी, कुठून तरी एक नवीन बोर्ड पैदा करण्यात आला. 7️⃣
भारतानं अमेरिकेवर विजय मिळवल्याची खूण म्हणून, त्या बोर्डवर 'अमेरिके'ला पदच्युत करून 'भारत' असं लिहिण्यात आलं. "भारत होजिअरी" असं त्या दुकानाचे नामांतर करून मोर्चा विजयोन्मादात घरी परतला.

हे दुकान 'भारत होजिअरी' म्हणून आजही तेथे अस्तित्वात आहे.😀 8️⃣
२) कोल्हापूरी भाषेतला विनोद हा उगाचं हलका, जाता-जाता, नाजूक, हळूवार, छद्मी....अशा सालस प्रकृतीत मोडत नाही. तो अत्यंत थेट, रांगडा, मर्मावर बोट ठेवणारा, अतिशय उघड उघड आणि इथल्या अन्नधान्यासारखा धष्टपुष्ट.
एकदा शिवाजी पेठेत कोणाच्या तरी घरी वयस्कर व्यक्ती मरण पावली. 9️⃣
रस्त्यावर अंत्यविधीसाठी तिरडीची बांधाबांध चालली होती. कोल्हापूरात अशा क्षणी हाक न मारता, हातातील सगळी कामं सोडून, आसपासचे लोक कर्तव्यभावनेने लगेच धावून येतात. तसा बराच घोळका जमला होता. एक म्हातारे गृहस्थ सायकलने चालले होते. त्यांनाही कुतूहल कोणं गेलं बघण्याचं. 🔟
म्हणून घोळक्याच्या डोक्यावरून पाहण्यासाठी त्यांनी सायकलचा स्टँड लावला आणि मागच्या कॅरिअरवर उभं राहण्याचा प्रयत्न ते करू लागले. तिरडी बांधणार्‍याचं लक्ष त्या गृहस्थाच्या धडपडीकडे गेलं. तिरडीकडे हात दाखवून तिरडी बांधणारा तो तरूण त्यांना म्हणाला,
"काय आजोबा, जाताय काय डबलशीट?" 1️⃣1️⃣
हे असे प्रसंग पावलोपावली, क्षणोक्षणी कोल्हापूरात तुम्हांला अनुभवायला मिळतील.
तांबड्या-पांढर्‍या रश्श्याबरोबरंच इरसालपणा कोल्हापूरकरांच्या रक्तात पिढीजात भिनलेला आहे.

(म.टा.दिवाळी अंकातील 'रांगडा आणि इरसाल' या ह्रषीकेश जोशीलिखित लेखातून साभार) 🙏🏻🙏🏻 1️⃣2️⃣

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with किरण...

किरण... Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Coolkiranj

10 Sep 20
नोकर्‍या देणारा वांगी बोळ....
कोल्हापुरातल्या महाद्वार रोडला लागून असलेल्या वांगी बोळात गुळवणी यांचा एक जुना वाडा. या वाड्यात जिन्याखाली चिंचोळ्या जागेत एक टेबल खुर्ची. टायपिंगचे मशीन. जागा मिळेल तिथे चिकटवलेल्या नोकरीच्या जाहिराती. त्यात चक्क देवानंदचाही एक फोटो. 1/11 #कोल्हापुर
या नोकरीच्या जाहिराती म्हणजे अनेकांना आशेचा किरण होत्या. पोस्टात क्लार्क... तहसीलदार फौजदार... रेल्वेत टीसी होण्याची संधी... अशा असंख्य जाहिराती तेथे चिकटवलेल्या असायच्या. नोकरीची स्वप्ने पाहणारे अनेक तरुण तरुणी, त्यांचे पालक येथे यायचे. 2/11
हातात प्लास्टिकची पिशवी यात सर्टिफिकेटची भेंडोळी आणि चेहऱ्यावर नोकरीच्या आशेची एक केविलवाणी किनार दिसायची.
वांगी बोळातले हे एक छोटेसे नोकरी मार्गदर्शन केंद्र दिलीप गुळवणी यांचे. या केंद्रात दिलीप गुळवणी बसलेले असायचे. 3/11
Read 11 tweets
12 May 20
त्रास तर होणार ना‌ साहेब, त्रास तर होणार..

अवैधरित्या तुम्ही मुंबई मध्ये आलात
अवैधरित्या तुम्ही झोपड्या वसवल्या
अवैधरित्या तुम्ही व्यवसाय केले
अवैध गोष्टी करत भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं..
१/८
#आवडलेली #कविता #मराठी
त्रास तर होणार ना‌ साहेब, त्रास तर होणार..

एकाच झोपडीत २०/२० जणं तुम्ही राहता
तुमच्या शहरात नसलेला आसरा इथे शोधता
गावच्या कुटुंबाचं पालन‌पोषण करता
माणूस म्हणून जगणं इथे उपभोगता
आणि हे सगळं अवैध मार्गाने करता
२/८
त्रास तर होणार ना‌ साहेब, त्रास तर होणार..

खूनी गून्हेगारांचा अड्डा म्हणजे मुंबई
अवैध कामांचं ठिकाण म्हणजे मुंबई
स्वप्नांची चंदेरी दुनिया म्हणजे मुंबई
यशाची सहज सोपी शिडी म्हणजे मुंबई
आणि हे सगळं करताना बदनाम होते मुंबई
३/८
Read 8 tweets
3 May 20
लायकी दाखवण्याचे दिवस

बुधवार, 29 एप्रिल 2020

गवार वीस रुपये...
कलिंगडं शंभरला तीन!

सूर्यही नीट उगवला नव्हता. रस्त्यावरून असा खणखणीत आवाज आला आणि डोळे चोळत उठलो. गॅलरीतून खाली पाहिलं. सोसायटीच्या खालीच तेरा चौदा वर्षाचा पोरगा येऊन थांबला होता. १/१३

#साभार #शेतकरी
कपाळाचा घाम पुसत उभा. सोसायटीचा वॉचमन त्याला लांब थांबायला सांगत होता. तसा तो पोऱ्या वॉचमनला हात जोडत थांबू देण्याची विनंती करत होता. मी आवाज दिला आणि त्या पोऱ्याला थांबायला सांगितलं. पोऱ्यानं मान डुलवली. तोंडाला रुमाल बांधून खाली गेलो. २/१३
दोन चार बाया आणि काही पुरुषही त्याच्याभोवती येऊन थांबले होते. सोशल डिस्टन्सिंग पाळत आम्ही सगळे गवार, कलिंगड घेऊ लागलो. इतक्‍यात तो पोऱ्या एकाला म्हणाला,

दादा, तांब्याभर पाणी मिळंल का?’ दादानं तोंड वाकडं करत, ‘समोरच्या चौकात पाण्याची टाकीये. तिथं पे.’ असा सल्ला दिला. ‘ ३/१३
Read 13 tweets
29 Apr 20
साधारण 15 वर्षांपुर्वी सकाळ वर्तमानपत्रात असताना इरफान खानची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. एका नामांकित पबमध्ये भेट झाली आणि खूप वेळ गप्पा झाल्या. बाजुला वाजत असलेल्या मोठ्या संगीताच्या आवाजातही इरफानचा खणखणीत आवाज कानावर येत होता. १/७
- प्रभा कुडके, Indian Express #RIPIrrfanKhan
इरफानच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली होती हे जाणून घेण्यासाठी मी त्याला भेटले होते. मुलाखतीच्या दरम्यान इरफानने त्याच्या लहानपणीची एक गोष्ट सांगितली. इरफानच्या आजीच्या अंगणात एक चमेलीचा वेल होता. चमेलीच्या फुलांचा सुगंध हा त्यांच्या अंगणात दरवळत असायचा. २/७
इरफान त्यावेळी बोलताना मला म्हणाला, त्या चमेलीच्या फुलांनी मला वेड लागायचं. ती फुलं सकाळी कधी उमलतात हे पाहण्यासाठी मी लवकर उठायचो. तो सुगंध मनात साठवुन ठेवायचो आणि माझ्या दिवसाची सुरुवात व्हायची. त्या चमेलीच्या वेलासोबत माझं एक नातं तयार झालं होतं असं त्याने सांगितलं. ३/७
Read 7 tweets
13 Apr 20
मी सातवीच्या वर्गात असताना माझ्या वर्गात गेल्या सहा वर्षांपासून नापास होणारा एकजण होता.आम्ही त्याला सगळेजण नाना म्हणायचो.आमच्याच गल्लीत राहायला होता.आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा.मिशासुद्धा चांगल्याच वर आलेल्या होत्या.आणि हा नाना अंगाने धिप्पाडच्या धिप्पाड होता. (1)
#आवडलेली #कथा
म्हणजे आमचं मास्तर त्याच्या खांद्याला लागायचं.अंगाने पैलवान असणारा गडी.पण अभ्यासात पार दरिंद्री.नानाला काहीच येत नव्हतं.आणि दरवर्षी नाना नापास व्हायचा. त्यात आमच्या मास्तरने एक नियम असा केला होता, वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल.. (2)
त्याने वर्गातल्या सगळ्या पोरांच्या मुस्काडीत मारायची. त्यावेळचे मास्तर असा नियम करायचे.आणि यात काय व्हायचं त्या भितीने सगळी पोरं मन लावून अभ्यास करायची. पण नानाच्या डोक्यात काहीच राहत नव्हतं. आणि त्याचा परिणाम म्हणजे नाना दररोज न चुकता वर्गातल्या प्रत्येकाचा मार खायचा. (3)
Read 21 tweets
5 Dec 19
#किल्ले_रामसेज वरील अल्पपरिचित चोर दरवाजा :
रामचंद्रपंत अमात्यांनी लिहून ठेवलं आहे -"किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब (दोष) आहे, याकरितां गड पाहून, १,२,३ दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यांमध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्यात." १/११
सतत तब्बल साडेपाच वर्षं मुघलांच्या मोठमोठ्या सरदारांना झुंजवणाऱ्या, मराठ्यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या छोटेखानी पण लढाऊ अशा रामसेज किल्ल्यालाही दोन दरवाजे आणि चोरदिंडी आहे. पैकी किल्ल्यावर जेथून प्रवेश होतो तिथले प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे. २/११
त्याच्या दोन्ही बाजूचे भग्न बुरुज दरवाजाचे अस्तित्व दर्शवतात. वर आल्यावर उजवीकडे काहीसा आडबाजूला असलेला संपूर्णपणे कातळात खोदलेला मोठा दरवाजा आपली भव्यता दर्शवत उभा आहे. रामसेजवर याशिवाय आणखी एक चोर दरवाजा-चोरदिंडी आहे हे कित्येकांना ठाऊकच नाही. ३/११
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!