मुंबईत येऊन ३/४ वर्ष झाली होती. बऱ्यापैकी स्थिरावलो,सरावलो होतो. पैसे ही गरजेपेक्षा बरे मिळत होते,अगदी आनंदी आनंद!

बरं, आमच्या सुखाच्या व्याख्या मित्रांसोबत विकेंडला नवा सिनेमा पाहणे, नवनवीन हॅाटेलात जेवण करणे यापलीकडे काही नव्हत्या.

#SaturdayThread #समाजसेवा #मराठी #म १/१९
असेच एक दिवस सिनेमा पाहून स्टेशनवरून पायी चालत येत होतो. नेहमीचीच सिग्नलवर असणारी लहान मुले दिसली. उन्हाळ्याचे दिवस, त्यांच्या पायात चप्पल नाही, अंगावर धड कपडे नाहीत, भुकेने व्याकुळ. आमच्याकडे फार आशेने पाहत होती.
आम्ही सर्वच जण तसे गावखेड्यातून आल्याने बऱ्यापैकी संवेदनशील.
२/१९
सर्वांनीच त्यांना जवळ बोलावले आणि एका वडापावच्या गाडीवर त्यांना हवे तेवढे खा म्हणून सांगितले. पोरांचे चेहरे पाहण्यासारखे झाले, पोट भरल्याचा आनंद पोटापेक्षा डोळ्यातून, नाकातून चमकत होता.

पुढच्या रविवारी पुन्हा तोच प्रकार.

नंतर नंतर ती मुले आम्हाला ओळखायला लागली
३/१९
आणि आम्हालाही ती आपली वाटू लागली. अशाच एका शनिवारी संध्याकाळी आम्हा मित्रांच्यात त्या मुलांचा विषय निघाला, एक जण म्हणाला आपण त्या मुलांसाठी काहीतरी करायला हवे, कॉंक्रीट करायला हवे.

तो “कॉंक्रीट” शब्द आमच्या सर्वांच्याच डोक्यात फिट्ट झाला.

खुप विचार केला आणि ठरले त्या
४/१९
मुलांना पोलिसांची मदत घेऊन आजूबाजूच्या निवारा केंद्रात सुपुर्द करून त्यांच्या शिक्षणाचा खर्च आपण सर्वांनी मिळून करायचा.

झाले, ठरले, दुसऱ्याच दिवशी आम्ही पाचसहा जण तिकडे गेलो त्या मुलांना खाऊ घातले आणि त्यांना पुर्ण कल्पना देऊन त्यांना पुस्तक, वह्या पेन आणि नवे कपडे दिले..
५/१९
आम्ही त्यांना लिहायची, वाचायची आवड लावून शाळेत टाकणार या विचाराने सुरूवात केली.

फार दुरचा विचार न करता ही चांगली सुरूवात झाली या विचाराने रात्री शांत झोपलो.

दुसऱ्या दिवशी सकाळच्या शिफ्टसाठी काही मित्र गेले तर आम्ही निघण्याच्या गडबडीत खाली उतरलो होतो,तेवढ्यात पाच-सहा चरसी,
६/१९
गुंड टाईप लोक आमच्या सोसायटीच्या गेटवर आमची वाटच पहात होते....“तूम लोग ही वो गांव के लौंडे हो ना जिसको समाजसेवा करनेका नशा चढा है?” हमारे बच्चों को कैसे लेके जाओगे, देखते हैं!”

आम्हाला काही कळायच्या आत एकाने येऊन माझ्या मित्राची कॅालर पकडली आणि त्याला जोरात धक्का दिला.
७/१९
आम्ही लगेच पुढे होऊन त्याला सावरले आणि धडाधड सूरू झालो. तेवढ्यात इतर लोकही आमच्या मदतीला धावले आणि त्यांनीही तिथे हात धुवून घेतले. पुढे आमची वरात त्या चरसी गुंडांसहीत नजीकच्या पोलिस चौकीत दाखल झाली.

पोलिसांनी आमची तिथे खरच चांगली मदत केली, मराठी, शिकलेली आणि गावाकडून ८/१९
आलेल्या माणसांना तसे पोलिस नेहमीच सहकार्य करतात याचा आम्हाला चांगला अनुभव आला.आमच्या कोणाचीही केसमधे नावं टाकली नाहीत तरी पण त्या गुंडाना लॅाकअपमधे आणि आम्हाला “बाहेर” दिवसभर थांबवून ठेवले.

दिवसभर कामाला दांडी मारावी लागली, दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा पोलिस स्टेशनला बोलावले ९/१९
आता ते गूंड तिथे नव्हते पण एक वेगळे खविस प्रकारातले ५०-५५ वयाचे हवालदारमामा आम्हाला भेटले. त्यांनी त्या गुंडांचा इतिहास, त्यांच्या इतर बऱ्याच गुन्हेगारी कारनाम्यांबद्दल भिती वाटेल असे मुद्दे पटवून सांगितले.

पुढे ते लोक आम्हाला त्रास देणार नाहीत आणि त्या मुलांचे पोलिस आणि
१०/१९
बेगर होमचे लोक काय करायचे ते करतील, तुम्ही तुमच्या कामाचे पहा. या भानगडीत पडू नका म्हणून खडसावले. आम्ही मात्र “हुशार”! “आमची तक्रार घ्या” यावर ठाम होतो...

तेवढ्यात त्या पोलिसाकडे अजून एक दुसरी हाणामारीचीच तक्रार आली आणि पोलिसांनी आम्हाला पुन्हा ऊद्या या म्हणून सांगितले.
११/१९
तिसऱ्या दिवशी पुन्हा ते मोठे साहेब आलेत म्हणून बिझी! आम्हाला पुन्हा दोन दिवसांनी या म्हणाले, या सर्व गोष्टींमुळे आमच्या सर्वांचीच कंपनीत दांडी लागली होती.

बॅास आणि इतर सहकारीही ओरडायला लागले होते.

बरं त्या सिग्नलवरची ती लहान मुलं बदलली होती आणि ते गुंडही गायब झाले होते.
१२/१९
कधी नव्हे ते मला माझ्या कंपनीने “ऊद्या नाही आला तर यापुढे कामावर येऊ नको” असा निरोप पाठवला होता.

मित्रांनाही जवळपास असेच मानसिक धक्के बसले होते. अतिशय निराशा आणि सरकारी व्यवस्थेबद्दल चिड निर्माण झाली होती.

आपले या शहरात तसे “गॅाडफादर” कोणीही नाही आणि आपण एक क्षुल्लक
१३/१९
माणूस आहोत वगैरे वाटून रडायला यायचे.

पण एक गोष्ट सुर्यप्रकाशाइतकी स्वच्छ दिसली होती,आपल्याकडे असलेल्या मानसिक,शारिरीक आणि आर्थिक संपत्तीचा उपयोग फार जबाबदारीने करायला हवा.

एकतर आमच्यापैकी कोणीही गडगंज श्रीमंत नव्हते की एवढा वेळ आणि मानसिक ताण सहन करून या कामाला पुढे घेऊन १४/१९
जाऊ शकेल.

कोणताही पुर्वअभ्यास न करता भावनेच्या भरात असे समाजकार्य आपण तडीस नेऊ शकत नाही याची जाणीव झाली.

४/५ दिवस अशी कामावर दांडी मारली (तेही पोलिस कंप्लेंटसाठी) तर आपले स्वत:चेच खायचे वांदे होऊ शकतात आणि आपण सध्या तरी या “समाजकार्य” योग्यतेचे नाही याची खाडकन जाणीव झाली
१५/१९
या व्यवस्थेशी लढायचे असेल तर कोणत्याही ठोस नियोजन,आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय हे फक्त दिवा स्वप्नच राहते.

आमचे सर्वच प्रश्न आर्थिक नसले तरी त्या सर्व प्रश्नांचा संबंध शेवटी आमच्या भौतिक परिस्थितीशीच होता.

आम्हाला त्यावेळी दारूण अपयश, अपमान, आत्मक्लेश वाट्याला आला
१६/१९
पण शेवटी नोकरीवर गदा आली तर आमचेच आर्थिक प्रश्न अजून गंभीर होणार होते. त्यामुळे आमची परिस्थितीही नक्कीच वाईट होणार आणि त्या वास्तवाकडे पाठ फिरवणे आमच्यापैकी कोणालाच परवडणारे नव्हते.

पुढे बरेच दिवस तो प्रसंग आठवला की मलाच माझी लाज वाटायची...त्या मुलांचे पुढे काय झाले असेल?
१७/१९
कोणत्या नव्या सिग्नलवर ती मुले आता भिक मागत असतील? त्या दिवशी एखादा चाकूचा वार आमच्यापैकी कोणाला बसला असता तर?असे मनात येऊन भितीही वाटायची पुन्हा आपण त्यांच्यासोबत शेवटपर्यंत लढायला हवे होते वगैरे वगैरे.

आज मागे वळून पाहतांना त्या खविस पोलिसांमामाबद्दलही थोडाफार राग नक्की १८/१९
येतो पण त्याचवेळी कळतनकळत त्यांच्यामुळे आम्हाला आमची खरी आर्थिक आणि सामाजिक ताकद, ज्ञान किती अपुरे आणि त्रोटक होते हे ही कळाले होते.

कदाचित तेव्हा तिथे थांबलो म्हणून आज इथे पोहचलो असेन....

शेवटी “नशीबाचा खेळ” 🙏
१९/१९

#SaturdayThread #मराठी #आर्थिकनियोजन #आर्थिकस्वातंत्र्य

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Prafulla Wankhede 🇮🇳

Prafulla Wankhede 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @wankhedeprafull

20 Jan
मागच्या महिन्यात काही कामानिमीत्त पाचगणीला जाणे झाले. मुंबई-बेंगलोर महामार्गावरून वेळे आणि सुरूरच्या दरम्यान ड्रायव्हरने चहा प्यायला गाडी थांबवली.

मी ही सहजच गाडीतून उतरलो तर समोर रंगीबेरंगी कपडे कमरेला लावलेला “पोतराज” मला दिसला. केसांच्या जटा वाढलेल्या, हातात आसूड १/६
गुबूगूबू वाजणारा ढोल, पत्नी, त्याची लहान मुलगी आणि मरीआईचा गाडा.... मी एकदम स्तब्ध झालो.... माझा मोबाईल सूरू होता आणि तो माझ्याकडेच येतोय हे पाहून गाडीच्या हॅंडलकडे आपसूक हात गेला.

परत मलाच माझ्या पांढरपेशा स्वभावाची लाज वाटली, कॅाल एवढाही काही महत्वाचा नव्हता २/६
का कोण जाणे मला अचानक त्या पोतराजाशी संवाद साधायची इच्छा झाली..

तो ही माझ्याकडेच येत होता, त्याच्या डोळ्यातून त्याची गरीबी आरपार पोटापर्यंत दिसत होती..मास्क नव्हताच. कोरोना-बिरोना काही नाही..
मी त्याला बोलावून १०/१५ मिनिटे बोललो.

१२वी विज्ञान शिक्षण झालेला तो पोतराज, सरकारी ३/६
Read 6 tweets
16 Jan
या कोविड संकटात, टाळेबंदीत खुप गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या.

पुर्वी आर्थिक चटके इतके पाहिलेत कि त्याचे काही अप्रुप नव्हते.तरीही काही बाबी अजून ठळक जाणवल्या.

1. Need Vs Wants चा फरक फार स्पष्ट झाला. हा माझा सर्वाधिक मोठा फायदा!अगदी आयुष्यभर..

#SaturdayThread #मराठी #म १/७
2. “Work From Home” आमच्या व्यवसायात धादांत “Timepass” वाटणारी गोष्ट आमची कंपनी आयुष्यात कधीही करू शकणार नाही हा मोठा गैरसमज दूर झाला.

3. आयुष्यात पहिल्यांदा सलग एवढे दिवस कुटूंबासोबत राहिलो, खरे आयुष्य अनुभवले. त्यांनी मला सहन केले याबद्दल त्यांचे कौतुक!
२/७
4. वय, जात, धर्म, देश, भाषा, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, बुद्धीवान असो की भोळा निसर्गासमोर आपण सर्वच सारखेच.सर्वांना एकच न्याय!

5. लॉकडाऊनमधे गरीब,मजूर,कामगार वर्ग अन्नपाण्याविना, सरकारी मदतीविना चालत गेला. आपणही कधीकाळी यांचाच भाग होतो. आज त्यांच्यापेक्षा चांगली परिस्थिती
३/७
Read 7 tweets
9 Jan
साधारणत: सात-आठ वर्षांपूर्वी आम्ही व्यवसाय विस्तार करत असताना मुंबई आणि जवळपासच्या जागांचा शोध घेत होतो.

इकडचे जागेचे दर ऐकून आम्हाला हादरा बसत होता, ROI यायलाही पाच वर्षाचा काळ त्यामुळे तो प्रोजेक्ट रखडतो की काय याची भीती वाटत होती.
#SaturdayThread #BusinessDots #मराठी #म १/१२
फॅक्टरी, मशीनरी, मनुष्यबळ, इतर पायाभूत सुविधा आणि “आपली २४ उपलब्धतता” यासाठी हा प्रकल्प मुंबईजवळ पर्यायाने घराजवळ असणे याला प्राथमिकता देत होतो पण मुंबईत हा प्रकल्प होणे शक्यच नव्हते या निष्कर्षावर आम्ही पोहचलो आणि तो बंद करणार अशात आमच्या डोक्यात एक कल्पना आली की प्रकल्प

२/१२
पुण्यात जर टाकला तर बराच खर्च कमी होईल.

तेंव्हा पुण्याला फॅक्टरी ही तशी परीक्षाच होती. या क्षेत्रात आम्हाला अनुभव असला तरी मॅन्युफॅक्चरींग हे अत्यंत आव्हानात्मक क्षेत्र आहे आणि त्यात जर एखादी जरी चूक घडली तरी तुम्ही सहज संपून जावू शकता.

त्यातही त्यातली गुंतवणूक, दगदग आणि ३/१२
Read 12 tweets
26 Dec 20
वर्ष २००३ क्रिकेट वर्ल्डकपची जोरदार हवा होती,त्यात भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार होते. सर्वांसारखाच मी ही फुरफुरत होतो.

मुंबईत मित्रांसोबत राहत होतो,काम आणि वाचन यामुळे टिव्ही पाहण्यासाठी वेळ तसेच तो खरेदी करण्यासाठी पैसेही नसल्याने
#SaturdayThread #BusinessDots #मराठी #म १/२१
मोठा पेच पडला होता. हल्लीसारखे इंटरनेट, स्मार्टफोन किंवा इतर कोणतीही सुविधा नव्हती.

काय करावे?कसे करावे? अशा विचारात सर्वच होते, आजूबाजूचेही जास्त कोणी ओळखीचे नव्हते त्यात आम्ही बॅचलर!

लोकांची आमच्याकडे पाहण्याची नजरच 😉 विचित्र त्यामुळे कोणीही घरी घेणार नाही याची खात्री!
२/२१
बरं नातेवाईक किंवा इतर कोणाकडे जावे तर आयुष्यभर त्या मॅचचे उपकार आणि टोमणे कोणालाच नको होते मग आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला कि आपण वर्गणी काढून टिव्ही विकत घेऊया आणि आपल्यापैकी ज्याचे लग्न शेवटी होईल त्याला तो लग्नात भेट म्हणून देऊया!

झाले, ठरले, खरेदीची जबाबदारी ३/२१
Read 21 tweets
12 Dec 20
जर तुम्हाला वाटत असेल की भरपूर पैसे आले कि आर्थिक स्वातंत्र्य मिळेल आणि तुम्ही आयुष्यभर सुखी,समाधानी रहाल तर ते पुर्णपणे चूक आहे.

आर्थिक सुरक्षिततेसाठी ज्ञान, अनुभव आणि सतत कष्टाची तयारी याला पर्याय नाही.

हा फोटोतला सुशीलकुमार आठवतोय?
१/६
#आर्थिकसाक्षरता #मराठी #SaturdayThread
2011 साली हा पठ्ठ्या ५ कोटी रूपये जिंकला होता तो ही स्वत:च्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जीवावर!
एका रात्रीत करोडपती तर झालाच पण स्टारही बनला..

एवढे पैसे की आले की मग इतर काहीही करायची गरजच काय? विविध कार्यक्रमांना हजेरी, मार्गदर्शन, सत्कार, समाजोपयोगी कार्यक्रमांसाठी देणगी २/६
अगदी दर महिन्याला.
लोकं काहीही कारण सांगून याच्याकडून पैसे घेऊन जायचे.
पुढे मित्रही स्वार्थीच निघाले, भरपूर दारूचे, सिगारेटचे व्यसन लावून गेले!

त्यात काहीही अनुभव नसल्याने कोणत्याही व्यवसायात तो पैसे गुंतवत गेला. अगदी सिनेमाही, नको ती संगत आणि अचानक आलेला भरपूर पैसा यामुळे ३/६
Read 6 tweets
14 Nov 20
हल्ली बरेच लोक फक्त जुजबी ओळखीवरून,कधी सोशलमिडीयातील एखाद्या मेसेजमुळे किंवा कधीतरी कुठे भेटले म्हणून “अमुकतमुक माझा एकदम खास आहे किंवा चांगला मित्र वगैरे आहे” असे बिनदिक्कत सांगतात.

ओळख असणे वेगळे आणि त्यातून आयुष्यभराचे वैयक्तिक संबंध प्रस्थापित

#SaturdayThread #मराठी १/१२
होणे यात फार मोठी तफावत आहे.

Personal Touch साठी खाजगी वा व्यावसायिक आयुष्यात चांगले संबंध प्रस्थापित करायचे असतील तर मनःपुर्वक प्रयत्न करणे खुप गरजेचे असते.

नोकरीसाठीचा Interview असो, व्यवसायासंबधी काही महत्वाची किंवा अगदी पहिली मिटींग असो वा एखाद्याकडून आपण काही सल्ला
२/१२
मागत असू.

आपले First Impression हे सर्वोत्तमच असावे आणि पुढे प्रत्येक वेळी त्यावर एक एक टप्पा प्रगती होत रहायला हवी.

साधारणत: २००९/१० काळ होता, आम्ही फूड प्रोसेसिंग , बेकरी आणि त्याच्या बेकींग प्रोसेसशी संबंधीत काही चांगल्या, अत्याधुनिक कल्पना प्रत्यक्षात राबवत होतो....
३/१२
Read 12 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!