आपण जर आज आपल्या घटनेची उद्देशिका वाचली तर सहज लक्षात येईल की ज्या देशाला विचार, व्यक्तीस्वातंत्र्य, जातीव्यवस्था, विद्वेष, जन्मजात विषमता, शिक्षणाचा अभाव, बहुतांश ग्रामीण भाग याचा शेकडो वर्षांचा पाया होता, प्रभाव होता त्या देशाने ही राज्यघटना त्या काळी कशी स्वाकारली असेल. १/६
मला निःसंशय तेंव्हाची आपली भारतीय पिढी आजपेक्षा वैचारीक दृष्ट्या अधिक प्रगल्भ वाटते.
आजच्या दिवशी आपण भारतीयांनी “स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्याय यांच्या मुलभूत पायावर उभ्या असलेल्या महान राज्यघटनेचा स्वीकार केला.
खरे पाहता आपली भारतीय स्वातंत्र्य लढ्याची चळवळ ही २/६
ब्रिटीशांविरूद्ध तसेच एकाचवेळी इथल्याच सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बाबींवर सुरू होती.
ज्या धर्मरूढींनी, राजेशाहीने आणि वर्णवर्चस्ववादी परंपरेने विषमतावाद जोपासला होता त्या विरूद्ध ती चळवळ कडालली आणि जिंकलीही.
आजही आपण आपल्या देशाच्या राज्यघटनेतील या मुल्यांचा अंगीकार केला ३/६
तर आपला देश नक्कीच सामर्थ्यशाली, बलशाली आणि जागतिक महासत्ता होऊ शकतो.
खरी गरज आहे ती समाजमन एकत्र आणण्याची. राजकीय, सामाजिक स्थळावर पोषक वातावरण तयार करण्याची.
कर्तव्यशुन्यतेचा आळस झटकून शिक्षण आणि आर्थिक स्तरावर सुसुत्रता आणण्याची.
४/६
आजचा भारत आपल्या बाहेरील शत्रूंशीही पक्ष, जात, धर्म, भाषा वगळून एकसंधपणे लढताना दिसत नाही परंतु आपआपसात जाती, धर्म, कर्मकांड, मंदीर, मशिद आणि पुतळे यावर भांडणच काय प्रसंगी एकमेकांचा जीव घेण्यासही एकरूप, एकसंध होताना दिसतो आणि हीच मोठी शोकांतिका आहे.
५/६
तरूणांनो, प्रजासत्ताक भारत हा आपला श्वास आहे तो श्वास राहील याची आपण सर्वांनीच काळजी घ्यायला हवी..... मरेपर्यंत!
त्या प्रजासत्ताक भारताचे संवर्धन आणि जतन हे आपले आद्यकर्तव्य आहे.
६/६
असेच एक दिवस सिनेमा पाहून स्टेशनवरून पायी चालत येत होतो. नेहमीचीच सिग्नलवर असणारी लहान मुले दिसली. उन्हाळ्याचे दिवस, त्यांच्या पायात चप्पल नाही, अंगावर धड कपडे नाहीत, भुकेने व्याकुळ. आमच्याकडे फार आशेने पाहत होती.
आम्ही सर्वच जण तसे गावखेड्यातून आल्याने बऱ्यापैकी संवेदनशील.
२/१९
सर्वांनीच त्यांना जवळ बोलावले आणि एका वडापावच्या गाडीवर त्यांना हवे तेवढे खा म्हणून सांगितले. पोरांचे चेहरे पाहण्यासारखे झाले, पोट भरल्याचा आनंद पोटापेक्षा डोळ्यातून, नाकातून चमकत होता.
मागच्या महिन्यात काही कामानिमीत्त पाचगणीला जाणे झाले. मुंबई-बेंगलोर महामार्गावरून वेळे आणि सुरूरच्या दरम्यान ड्रायव्हरने चहा प्यायला गाडी थांबवली.
मी ही सहजच गाडीतून उतरलो तर समोर रंगीबेरंगी कपडे कमरेला लावलेला “पोतराज” मला दिसला. केसांच्या जटा वाढलेल्या, हातात आसूड १/६
गुबूगूबू वाजणारा ढोल, पत्नी, त्याची लहान मुलगी आणि मरीआईचा गाडा.... मी एकदम स्तब्ध झालो.... माझा मोबाईल सूरू होता आणि तो माझ्याकडेच येतोय हे पाहून गाडीच्या हॅंडलकडे आपसूक हात गेला.
परत मलाच माझ्या पांढरपेशा स्वभावाची लाज वाटली, कॅाल एवढाही काही महत्वाचा नव्हता २/६
का कोण जाणे मला अचानक त्या पोतराजाशी संवाद साधायची इच्छा झाली..
तो ही माझ्याकडेच येत होता, त्याच्या डोळ्यातून त्याची गरीबी आरपार पोटापर्यंत दिसत होती..मास्क नव्हताच. कोरोना-बिरोना काही नाही..
मी त्याला बोलावून १०/१५ मिनिटे बोललो.
साधारणत: सात-आठ वर्षांपूर्वी आम्ही व्यवसाय विस्तार करत असताना मुंबई आणि जवळपासच्या जागांचा शोध घेत होतो.
इकडचे जागेचे दर ऐकून आम्हाला हादरा बसत होता, ROI यायलाही पाच वर्षाचा काळ त्यामुळे तो प्रोजेक्ट रखडतो की काय याची भीती वाटत होती. #SaturdayThread#BusinessDots#मराठी#म १/१२
फॅक्टरी, मशीनरी, मनुष्यबळ, इतर पायाभूत सुविधा आणि “आपली २४ उपलब्धतता” यासाठी हा प्रकल्प मुंबईजवळ पर्यायाने घराजवळ असणे याला प्राथमिकता देत होतो पण मुंबईत हा प्रकल्प होणे शक्यच नव्हते या निष्कर्षावर आम्ही पोहचलो आणि तो बंद करणार अशात आमच्या डोक्यात एक कल्पना आली की प्रकल्प
२/१२
पुण्यात जर टाकला तर बराच खर्च कमी होईल.
तेंव्हा पुण्याला फॅक्टरी ही तशी परीक्षाच होती. या क्षेत्रात आम्हाला अनुभव असला तरी मॅन्युफॅक्चरींग हे अत्यंत आव्हानात्मक क्षेत्र आहे आणि त्यात जर एखादी जरी चूक घडली तरी तुम्ही सहज संपून जावू शकता.
वर्ष २००३ क्रिकेट वर्ल्डकपची जोरदार हवा होती,त्यात भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार होते. सर्वांसारखाच मी ही फुरफुरत होतो.
मुंबईत मित्रांसोबत राहत होतो,काम आणि वाचन यामुळे टिव्ही पाहण्यासाठी वेळ तसेच तो खरेदी करण्यासाठी पैसेही नसल्याने #SaturdayThread#BusinessDots#मराठी#म १/२१
मोठा पेच पडला होता. हल्लीसारखे इंटरनेट, स्मार्टफोन किंवा इतर कोणतीही सुविधा नव्हती.
काय करावे?कसे करावे? अशा विचारात सर्वच होते, आजूबाजूचेही जास्त कोणी ओळखीचे नव्हते त्यात आम्ही बॅचलर!
लोकांची आमच्याकडे पाहण्याची नजरच 😉 विचित्र त्यामुळे कोणीही घरी घेणार नाही याची खात्री!
२/२१
बरं नातेवाईक किंवा इतर कोणाकडे जावे तर आयुष्यभर त्या मॅचचे उपकार आणि टोमणे कोणालाच नको होते मग आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला कि आपण वर्गणी काढून टिव्ही विकत घेऊया आणि आपल्यापैकी ज्याचे लग्न शेवटी होईल त्याला तो लग्नात भेट म्हणून देऊया!