एक मोठी थ्रेड आवर्जून इकडे टाकतोय..

कालपासून काही भाजपसमर्थकांच्या काही पोस्ट्स वाचतोय. कि आम्ही काय एवढं बोटचेपं शासन हवं म्हणून ह्या शासनाला निवडून दिलं का? केंद्रानं कडक पावलं का उचलली नाहीत $!आधीच? एवढे खासदार, आमदार वगैरे वगैरे असताना शेतकरी आंदोलनच वरचढ ठरलं.. वगैरे वगैरे+
ह्या सर्वांच्या भावनेबद्दल शंका नाहीच.. पण ह्या अनुषंगाने काही गोष्टींचा विचार आपल्यासमोर मांडतोय..

केंद्राने कडक पावलं उचलायची गरज होती म्हणजे नेमकं काय करणं गरजेचं होतं?

नाकेबंदी? लाठीचार्ज? रसद तोडणे? जर केंद्रानं हे सगळं केलं असतं तर तो घटनाद्रोह झाला असता.. +
कारण "राईट टू डिसेंट" हा सुद्धा मूलभूत अधिकारच आहे. भलेही त्या डिसेंटला काडीचाही अर्थ नसला तरी.

त्या पार्श्वभूमीवर ह्या दलालांचे दिल्लीतील आंदोलन हे घटनाबाह्य नाही. त्यामुळे जर केंद्रानं कडक भूमिका घेतली असती तर प्रकरण भयंकर चिघळलं असतं. आणि सुप्रीम कोर्टाने ह्याची गंभीर दखल +
घेतली असती. मूलभूत अधिकाराचे उल्लंघन तेही शासनाकडून? भयंकर परिणाम झाले असते. जगानेसुद्धा दखल घेतली असती..

दुसरा मुद्दा असा होता की ज्या खलिस्तानी, उग्रवाद्यांसंदर्भातली माहिती सोशल मिडीयामध्ये पसरवली जात होती ती केंद्राला कशी कळाली नाही. कळाली असेल तर काही कारवाई का केली गेली +
नाही?

कारवाईचे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम असतात. तात्कालिक अटक वा तत्सम कारवाईमुळे असामाजिक तत्वं जास्त प्रखर होतात. त्यावरसुद्धा नियंत्रण ठेवणे शक्य आहे पण ह्या अश्या कारवाया जिथे संबंधितांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तिथली कारवाई कायद्याच्या कसोटीवर उतरत नाही. +
प्रिव्हेंटिव डिटेन्शन सामान्य माणसाला लागू होत नाही. ह्या अश्या कारावायांचे दुरगामी परिणाम असतात. आणीबाणीचे दूरगामी परिणाम काँग्रेसला आजन्म भोगावे लागणार आहेत. लागत आहेत.

शाहीनबागच्यावेळेससुद्धा अशीच परिस्थिती होती. घटनेने शासनाचे हात बांधलेले होते. कोरोनामुळे प्रकरण थांबलं. +
नाहीतर त्याचं पुढं काय झालं असतं? कल्पनाच नं केलेली बरी.

वैयक्तिक मला एक प्रश्न पडलाय कि आंदोलकांच्या मूलभूत अधिकाराबद्दल सर्वोच्च न्यायालय जागरूक असतं. पण त्या आंदोलनामुळे संबंधित प्रदेशातल्या इतर लोकांच्या मूलभूत अधिकाराचा न्यायालयाने का स्वतःहोऊन विचार केला नाही? +
अर्थात एक केस चालू आहेच ह्या संदर्भात. पाहुयात काय निर्णय होतो ते. कदाचित थोडीच जनभावना, जिला मजबूत प्रसिद्धी मिळते तीच न्यायालायाला दिसत असावी. कायद्याच्या तत्वज्ञानात 'अमेरिकन लीगल रियालीझम' म्हणून एक विचारप्रवाह आहे तो म्हणतो, बर्याचदा निर्णय हे न्यायाधिशाच्या मानसिकतेवरच +
अवलंबून असतात. कदाचित सध्या तेच घडत असेल. ह्यादृष्टीने जर काही निरीक्षणे आढळली तर बघेन.

आंदोलनात देशविरोधी लोकं घुसल्याचे सोशल मीडियावरून बोलणे खूप सोपे आहे पण अश्या माणसांचे देशविरोधी तत्व सिद्ध करणे खूप अवघड. एक उदाहरण देतो. क्ष व्यक्ती जर पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असेल तर +
आपल्या दृष्टीने ती देशद्रोही असते. पण कायद्याच्या दृष्टीने त्याला स्पष्ट कृतीची जोड असणे गरजेचे असते. दहशत माजवणारा प्रत्येकजण दहशतवादी नसतो. त्यामुळे देशद्रोही लोकं आंदोलनात सहभागी होत असताना शासन काय करत होतं? तर कायद्यानं काहीच करू शकत नव्हतं. जेंव्हा कृती झाली लगेच +
कारवाईसुद्धा झालीच कि. आपल्यादृष्टीने जे पुरावे असतात ते कायद्याच्या दृष्टीने बर्याचदा नसतात.. व्हाट्सऍप चॅट सारखं..

ज्या काही लोकांचा ह्या आंदोलनामध्ये मृत्यू झालाय त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित आंदोलनाच्या नेत्यांची आहे. कारण अगदी वातानुकूलित तंबू ते ड्राय फ्रुट्सचे डोंगर +
आणणाऱ्यांना प्राथमिक आरोग्यासंबंधीची व्यवस्था करणे अशक्य अजिबात नव्हते. दिल्लीची थंडी देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे संबंधितांनी योग्य त्या तयारीने येणे अभिप्रेत असते. जगण्याच्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहेच, ह्याचा अर्थ जर स्वतःच्या हलगर्जीपणामुळे
मृत्यू ओढवला तर शासनाला जबाबदार धरले जाऊ शकत नाही.

त्यामुळे धडधडीत बहुमत असतानासुद्धा कायद्याचा मान ठेवून आंदोलन कसे हाताळायचे? ह्याचा हा अजून एक पाठ आहे. कायद्याच्या राज्यात काही गोष्टी इच्छा असून करता येत नाहीत. काही गोष्टी बिनधास्त करता येतात. ह्यालाच खऱ्या अर्थाने +
#TooMuchDemocracy म्हणतात.

हे आंदोलन थंड होतंय.. मोदी शहांच्या ह्या स्ट्रॅटेजीला बरेच जणं, "ठंडा करके खाना" म्हणतात.. ह्याला ठंडा करून खाणे नाही तर "ठंडा करून सडवणे" म्हणतात. काही नं करता दलालांचे हे आंदोलन सडण्याच्या मार्गावर चाललंय. देशातून त्यांच्यावर छीथू सुरु आहे. +
आंदोलन गुंडाळले जाईलच.. त्या दृष्टीने पावले पडत आहेत, रस्ते मोकळे होत आहेत, तंबू उठवले जात आहेत, संबंधित राज्य सरकारे अल्टीमेटम देत आहेत. बऱ्याचजणांवर गुन्हे दाखल होत आहेत.

कायद्याचं असंच असतं.. तीन तासाच्या चित्रपटात पावणेतीन तास नायक मार खातो आणि शेवटच्या पंधरा मिनिटात +
खलनायक मार खातो. खलनायकाची जिरवली ह्याच समाधान घेऊन प्रेक्षक बाहेर पडतो.. हे पण तसंच..

मोदी शहा आहेत म्हणून कायद्याचं भान शासनाला आहे. नाहीतर आंदोलन केलं म्हणून सरसकट हत्या करणारं, गोळीबार करणारं हे शासन नाही, हे सामान्य माणसाला पटतंय. हा सामान्य माणूस मूक आहे. बोलत नाही. +
बोलतो ते मतातूनच.. २०२४ ची निवडणूक आधीचे सर्व रेकॉर्ड पुन्हा एकदा तोडेल ह्यात शंका नाहीच

असो... अजून एक निरर्थक आंदोलन अयशस्वी होतंय. कदाचित हीच असामाजिक तत्त्वं परत एकदा नव्या अर्थ नसलेल्या आंदोलनाच्या तयारीला सुद्धा लागू शकतील, घटनेच्या आडून..

पाहुयात

- चेतन दीक्षित

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Chetan Dixit

Chetan Dixit Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @mechetandixit

25 Jan
शरद पवार आणि सत्य परिस्थिती ह्यात नेहमीच ३६चा आकडा असतो.. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं..

साहेब बच्चनस्टाईलमध्ये म्हणाले की, राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे पण शेतकरी नेत्यांना भेटायला वेळ नाही, ते गोव्याला निघून गेले.

वस्तुस्थिती अशी की +
ह्या सर्व (तथाकथित) नेत्यांना आधीच राज्यभवनाकडून कळवलं गेलं होतं की राज्यपाल गोव्याला जाणार आहेत म्हणून. आता गोव्याला जाणार म्हटलं की मजा मारायला हेच ह्यांना माहित कदाचित ह्यांचे आदर्श तिकडे जाऊन तेच करत असतील. असो तर कोशियारी हे गोव्याचेसुद्धा राज्यपाल आहेत.+
त्यामुळे जेंव्हा एखादी व्यक्ती नाही हे माहित असतं तेंव्हा उगाच नखरे करायचे धंदे सोशल मिडीयाच्या काळात चालत नसतात, पवारसाहेब.

आता हे साडे तीन जिल्ह्यावाल्या पवारांना माहित नसेल का? नक्कीच माहित असेल पण पूर्ण आयुष्य ज्यांनी दिशाभूल करण्यात घालवलं असता +
Read 4 tweets
24 Jan
स्त्रीसुरक्षेच्या दृष्टिकोनातून योगी सरकार एक अभिनव असा अद्भुत प्रकल्प राबवणार आहे..

उत्तप्रदेशातील गुन्ह्यांचा विचार करून २०० हॉटस्पॉट्स ठरवण्यात आले आहेत. तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड असे कॅमेरे लावण्यात येणार. जिथे रस्त्यावर छेडछाडीचे प्रकार चालतील +
तिथून लगेच संबंधित कंट्रोल रूमला संदेश जाईल आणि कारवाई केली जाईल. बर्याचदा असंही होऊ शकेल कि काही प्रकार कॅमेरातून सुटू शकतील, अश्या वेळेस महिलांच्या चेहऱ्याच्या भावावरून तो कॅमेरा कॅट्रोल रूमला संदेश पाठवेल आणि घटनेची शहानिशा केली जाईल.

अर्थात ह्यात काही अडचणी निर्माण होतील.+
पण ट्रायल-एरर पद्धतीने ह्याची अंमलबजावणी होईल. नंतर ते एक आदर्श-मॉडेल म्हणून नक्कीच विकसित होईल.

योगी जेंव्हापासून उत्तरप्रदेश एका नवीन आणि आशादायी असे राज्य होण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. ह्याची मुख्य धारेतील प्रसार माध्यमे किती दखल घेतात माहीत नाही पण +
Read 5 tweets
5 Dec 20
आवर्जून वाचा #थ्रेड 👇👇👇

महाराष्ट्रातल्या तमाम हिंदूंनो, जी गोष्ट अगदी कट्टर काँग्रेसी राज्यात नव्हे तर अगदी हैद्राबादेत घडली नसेल, अशी गोष्ट महाराष्ट्रात घडतीये. हिंदूंची ओळख पुसून टाकण्याचा डाव हे लादलेले शासन आखत आहे. टाइम्स नाऊची बातमी आहे. +

timesnownews.com/education/arti…
आता १० वी, १२ वीच्या परीक्षा अर्जात हिंदूच्या ऐवजी "नॉन-मायनॉरीटी" हा शब्द असणार आहे. ह्याचा अर्थ "अ-अल्पसंख्यांक". म्हणजे आता आपली ओळख ह्या राज्यात हिंदू म्हणून नाही तर "अ-अल्पसंख्यांक" अशी असणार आहे.. उद्या हिच ओळख आपल्या जन्मतारखेच्या दाखल्यावर, लग्न प्रमाणपत्रावर येणार नाही?+
चाय-बिस्कुट वाले सरसकट संपादक सहा पैकी पाच ठिकाणी विजय मिळाला म्हणून ह्या अपघाती घरकोंबड्याचं कौतुक थोबाड फाटेपर्यंत करण्यात माध्यमं स्पर्धा करत असताना हिंदूंच्या अस्तित्वावर फुली मारण्याचे हे षडयंत्र, पर्याय नाही म्हणून हिंदुत्व स्वीकारलेली, सोनियासेना करत आहे. आता त्यांनाही +
Read 6 tweets
2 Dec 20
#थ्रेड 👇👇👇

ज्या ज्या मराठी कलाकारांना बॉलिवूडचा पुळका येतो त्यांनी बॉलिवूडमध्ये त्यांची किती ठेवली जाते ह्याचा विचार करावा..

मराठीतले सुपरस्टार हे हिंदीत जाऊन धुणी-भांडी करण्यात धन्यता मानतात.. (अर्थात नाना पाटेकर, विक्रम गोखलेंसारखे सन्माननीय अपवाद वगळता)

ह्याबाबतीत +
जर खरी मराठी अस्मिता दाखवायची असेल तर दक्षिणेकडच्या खर्याखुर्या सुपरस्टार्सची उदाहरणे अभ्यासावीत. अगदी "मराठी" गायकवाड "बंगळुरातून" "तमिळनाडूत" जाऊन "सुपरस्टार रजनीकांत" बनतो, ह्यापेक्षा मोठं उदाहरण, तेही आदर्श म्हणावं असं, दुसरं नाही..

आणि हे असे कलाकार बॉलीवूडला अक्षरशः +
कोलतात. इकडे त्यांचे चित्रपट लागोत वा ना लागोत. दक्षिणेत त्यांचा चित्रपट मजबूत व्यवसाय करतो. दक्षिणेने अजून चित्रपट संस्कृती कशी जोपासलीये, हे पाहायचं असेल तर एकदा दक्षिणेत येऊन, भलेही भाषा ना का समजेना, चित्रपटगृहात धडकून पहा. मग कळेल काय असते अस्मिता आणि ती कशाशी कशी खातात ते.+
Read 10 tweets
30 Nov 20
हैद्राबादच्या निमित्ताने #थ्रेड

भाजप ज्या पद्धतीने ग्रेटर हैद्राबादच्या महापालिकेच्या निवडणुकीत जोर लावतीये ते पाहता भाजपा हे निवडणूक जिंकेलच असं काही भाकीत मी करणार नाही.अर्थात जिंकलं तर भाजपासमर्थकांना आनंद वाटेलच ह्यात शंका नाही. जेथे जेडी-बीजेपी केवळ पाचच जागांवर निवडून आली+
तिथे पाच वर्षात भाजपाचा झेंडा सत्तास्थानी रोवेल हे शक्यता कमीच वाटते.

दक्षिणेत कर्नाटक सोडलं तर भाजपा भक्कम फारशी नाही. कोणत्याही गुंतवणुकीचे शॉर्ट टर्म नाही तर लॉंग टर्म फायदा पाहणारा पक्ष म्हणजे भाजपा. पुर्वांचलात यश मिळण्यामागे दशकांची मेहनत आहे. पश्चिम बंगालातील गेल्या +
निवडणुकीत, ज्या पद्धतीने भाजपचे एकंदरीत मतदानातील टक्केवारीत झेप घेतली, ती ममताच्या उरात धडकी भरवणारी होती. येत्या निवडणुकीत कितीजरी "किशोर" त्यांच्या बाजूला उभे राहिले तरी त्यांचे स्थान धोक्यातच आहे ह्याची ग्वाही कोणताही राजनीतीतज्ञ देऊ शकेल.

हैद्राबादेत गेल्या लोकसभेत दोन +
Read 12 tweets
28 Nov 20
#थ्रेड 🙏
आई आज भयंकर संतापून बोलत होती..

आज सकाळी घर वगैरे आवरून जरा टीव्हीसमोर बातम्या पहात बसलो होतो. आई आली. बातमी सुरु होती की कांजूरमार्गवरून राज्यशासनाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी एक आठवडा दिलाय. कांजूरमार्ग मध्ये मेट्रो कार शेड हलवण्याचा परस्पर निर्णय कसा घेतला+
ह्यावर मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झालीये..

मेट्रो प्रकरणात होत असलेला अनाठायी विलंब आणि त्यामुळे होत असलेले हजारो कोटींचे नुकसान ह्याची कल्पना आईला आहे.

तळपायाची आग मस्तकात गेली होती आईच्या. तसं आई राजकारणावर फारसं बोलत नाही. त्यात बाबांच्या आजारपणात किती गोष्टींनी त्रास +
करून घ्यायचा? म्हणून ताणाचे विषयसुद्धा नसतात गप्पा मारताना..

पण आज आई भडकली होती..

"ह्यांचं काय जातंय एवढे मोठे प्रकल्प भिजत ठेवायला? ह्यांच्या मालमत्ता सुरक्षित आहेत. हे उद्योजक होतात. सामान्य माणूस काय करतो? ह्या असल्या मूर्खासारख्या निर्णयामुळे एवढं नुकसान होतं, ते आम्ही +
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!