सावधान #सुवर्ण_संधी
दिवसातले फक्त दोन तीन तास काम करुन दरमहा पंचवीस ते पन्नास हजार रुपये कमवा..
कोणत्याही डिग्रीची गरज नाही. कंप्युटर, लॅपटॉप, मोबाईल वापरुन डाटा एंट्रीचे काम करा आणि महिना पन्नास हजार रुपयांपर्यंत कमाई करा...
अशा जाहिराती बघितल्याच असतील...?
नसतील तर बघा...
गुगलवर Data entry job असं काही तरी search केलं की तुम्हाला message येईलच. त्या link वर क्लिक केले की एक वेबसाइट open होईल.तिथे ज्या कंपनीची जॉब vacancy आहे ती link दिसेल.तिथे कामाचे स्वरुप दिसेल. Printed pages वरील मजकूर फक्त आहे तसा type करायचा असतो. असंच काहीतरी सोपं काम असतं.
जर तुम्हाला काम आवडले तर तुम्ही form भरुन द्यायचा. कामाचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी तुमच्या बॅंक खात्याचा तपशील द्यावा लागतो. तुमचा postal address तर हवाच. शिवाय तुमचा एक फोटो अपलोड करावा लागतो. एका कागदावर तुमची सही करुन त्या सहीचा
फोटो काढून png formate मध्ये upload करावा लागतो. फॉर्म submit करुन तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं की, काम झालं.
मग तुम्हाला एक काम दिले जाते. ८-१० पाने आठ दिवसात टाईप करुन द्यायची असतात. तुम्ही ती तीन दिवसातच टाईप करून पूर्ण करुन देता. मग तुमचं work त्याची accuracy तपासली जाते.
90% accuracy नसेल तर ते reject केलं जातं. तुम्ही पुन्हा ते 100 % accurate करुन सबमिट करता. पुन्हा ते reject होते. तुम्ही multiple devices use केले आहेत असे कारण दिलेले असते. तुम्ही submit केलेलं काम प्रत्येकवेळी reject होत राहतं.
शेवटी वैतागून तुम्ही ते काम सोडून देता, किंवा मला तुमचे काम नको आहे असे त्या कंपनीला कळवता....
इथून पुढे खरा खेळ सुरू होतो. एके दिवशी तुम्हाला कंपनीच्या लॉयरचा फोन येतो. तुम्ही कंपनीशी केलेलं contract breach केलेले आहे म्हणून तो तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देतो.
तुम्हाला दिलेलं कंपनीचं काम तुम्ही वेळेत आणि accurate करुन न दिल्याने कंपनीचे नुकसान झालेले आहे त्याची नुकसान भरपाई रक्कम तो मागतो. एक तर काम पूर्ण करुन द्या, किंवा कंपनीचे झालेले नुकसान तरी भरुन द्या अशी त्या लॉयरची मागणी असते.
तुम्ही एकतर कायदेशीर कारवाईला घाबरुन तीस चाळीस हजार भरुन टाकता किंवा मग सपशेल दुर्लक्ष तरी करता. पैसे भरले तरी हे इथेच थांबत नाही. कंपनीसोबत तुम्ही केलेले agreement तुम्हाला पाठवले जाते. त्यात अनेक अटी व शर्ती असतात.
तुम्ही जर मध्येच काम सोडून दिले तर ११ महिन्याचे पैसे तुम्हाला कंपनीला द्यावे लागतील अशी एक अट तुम्ही मान्य केलेली असते. कंपनी तुमच्याकडे ५-१० लाखाची मागणी करते. तुम्ही अॅग्रीमेंट लिहून दिलेले नसते पण तुमच्या सहीचा व फोटोचा वापर करून हे अॅग्रीमेंट अस्तित्वात आणलेले असते.
कायदेशीर कारवाईच्या भितीने तुम्हाला पैसे भरावे लागतात किंवा मग तुम्ही दुर्लक्ष करता. मग आता तुमच्या नावे दाखल केलेल्या FIR ची कॉपी तुम्हाला पाठवली जाते. 420 सह IPC मधली Breach of contract ची कलमे लावून कुठल्यातरी शहरात तुमचे विरुद्ध FIR दाखल केलेला आहे असे तुम्हाला दाखवले जाते.
कंपनीचा लॅायर तुम्हाला सतत तडजोड करुन लम सम अमाऊंट भरा मी प्रकरण मिटवून टाकतो असा तगादा लावत असतो. तुम्ही वैतागून निम्मी आर्धी रक्कम भरुन प्रकरण मिटवून टाकता. चार पैसे मिळवण्याच्या नादात तुम्ही कंपनीलाच पैसे देऊन मोकळे होता.
हे प्रकरण संपता संपत नाही, कारण तुम्ही दिलेल्या इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचा ते कुठेही कसाही गैरवापर करुन ते तुम्हाला लुबाडू शकतात.
Easy Mony च्या मोहापोटी तुम्ही या असल्या जाळ्यात अडकलात तर सरळ सायबर सेलकडे तक्रार करा किंवा एखाद्या जाणकार वकिलाकडे जा. त्याला चार पैसे द्या.
तो कंपनीला सविस्तर कायदेशीर भाषेत नोटीस देईल व तुमची मान या फासातून मोकळी करेल...
कशी...?
ते इथे सांगण्यात अर्थ नाही. कायद्यात तरतुदी असतात. फ्रॉडर्सनी loop holes ठेवलेली असतात. त्याचा वापर करून आपले वकील त्या कंपनीला कचाट्यात पकडू शकतात.
पण त्यासाठी वकिलाला अभ्यास करावा लागतो, कायद्याची पुस्तके वाचावी लागतात. म्हणून तर वकील त्यासाठी कायदेशीर फी घेत असतो.
पण ही वेळ येवू द्यायची नसेल तर एक मोफत सल्ला..
Easy Money च्या नादी लागू नका. सोप्या कामाचे कुणीही एवढे पैसे देत नाही.
तुम्हाला महिना पन्नास हजार देण्यापेक्षा दहा पंधरा हजारात ते एखादा टायपीस्ट कामाला ठेवू शकत नाही का...?
फ्रॉड्स चे स्वरूप प्रत्येक वेळी नवीन असेल. पण सगळ्यात एकच समान असते ते म्हणजे अमिष. या अमिषाला बळी पडायचे की नाही..?
हे तुमच्याच हातात असते.....
तेव्हा सावध रहा...
रांगडा, इरसाल आणि जगण्यात मोकळेपणा असलेला... 'कोल्हापूरी माणूस.’
त्याचे हे दोन किस्से..
१) १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युध्दात अमेरिकेने पाकिस्तानला 'पॅट्रिअॅट' रणगाडे पुरवले आणि संपूर्ण भारतात अमेरिकेविरुद्ध जनक्षोभ उसळला. तसा तो कोल्हापूरातही उसळला. 1️⃣ #कोल्हापूर
अमेरिकेला धडा शिकवायचं कोल्हापूरात ठरलं. अमेरिका कुठं आणि कोल्हापूर कुठं? कसा धडा शिकवणार? पण कोल्हापूरी माणसाच्या मनानं एकदा ठरवलं की त्या गोष्टीचा थांग, छडा, पिच्छा,नाद, शब्द,प्रयत्न, हेका, हट्ट, जिद्द,चिकाटी सोडायची नाही म्हणजे नाही. 2️⃣
कोल्हापूरकर हे अमेरिकेच्या विरूध्द व भारतीय जवानांच्या पाठीशी आहेत हे दाखवण्यासाठी कोल्हापूरकरांतर्फे एक मोर्चा काढण्यात आला. मोर्चा शहरातील प्रमुख रस्त्यावरून जाऊ लागला.
अमेरिकेविरोधात वेदकाळापासून अस्तित्वात असलेल्या शिव्यांची आवर्तन खास कोल्हापूरी भाषेत मोर्चात सुरू होती. 3️⃣
नोकर्या देणारा वांगी बोळ....
कोल्हापुरातल्या महाद्वार रोडला लागून असलेल्या वांगी बोळात गुळवणी यांचा एक जुना वाडा. या वाड्यात जिन्याखाली चिंचोळ्या जागेत एक टेबल खुर्ची. टायपिंगचे मशीन. जागा मिळेल तिथे चिकटवलेल्या नोकरीच्या जाहिराती. त्यात चक्क देवानंदचाही एक फोटो. 1/11 #कोल्हापुर
या नोकरीच्या जाहिराती म्हणजे अनेकांना आशेचा किरण होत्या. पोस्टात क्लार्क... तहसीलदार फौजदार... रेल्वेत टीसी होण्याची संधी... अशा असंख्य जाहिराती तेथे चिकटवलेल्या असायच्या. नोकरीची स्वप्ने पाहणारे अनेक तरुण तरुणी, त्यांचे पालक येथे यायचे. 2/11
हातात प्लास्टिकची पिशवी यात सर्टिफिकेटची भेंडोळी आणि चेहऱ्यावर नोकरीच्या आशेची एक केविलवाणी किनार दिसायची.
वांगी बोळातले हे एक छोटेसे नोकरी मार्गदर्शन केंद्र दिलीप गुळवणी यांचे. या केंद्रात दिलीप गुळवणी बसलेले असायचे. 3/11
अवैधरित्या तुम्ही मुंबई मध्ये आलात
अवैधरित्या तुम्ही झोपड्या वसवल्या
अवैधरित्या तुम्ही व्यवसाय केले
अवैध गोष्टी करत भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं..
१/८ #आवडलेली#कविता#मराठी
त्रास तर होणार ना साहेब, त्रास तर होणार..
एकाच झोपडीत २०/२० जणं तुम्ही राहता
तुमच्या शहरात नसलेला आसरा इथे शोधता
गावच्या कुटुंबाचं पालनपोषण करता
माणूस म्हणून जगणं इथे उपभोगता
आणि हे सगळं अवैध मार्गाने करता
२/८
त्रास तर होणार ना साहेब, त्रास तर होणार..
खूनी गून्हेगारांचा अड्डा म्हणजे मुंबई
अवैध कामांचं ठिकाण म्हणजे मुंबई
स्वप्नांची चंदेरी दुनिया म्हणजे मुंबई
यशाची सहज सोपी शिडी म्हणजे मुंबई
आणि हे सगळं करताना बदनाम होते मुंबई
३/८
सूर्यही नीट उगवला नव्हता. रस्त्यावरून असा खणखणीत आवाज आला आणि डोळे चोळत उठलो. गॅलरीतून खाली पाहिलं. सोसायटीच्या खालीच तेरा चौदा वर्षाचा पोरगा येऊन थांबला होता. १/१३
कपाळाचा घाम पुसत उभा. सोसायटीचा वॉचमन त्याला लांब थांबायला सांगत होता. तसा तो पोऱ्या वॉचमनला हात जोडत थांबू देण्याची विनंती करत होता. मी आवाज दिला आणि त्या पोऱ्याला थांबायला सांगितलं. पोऱ्यानं मान डुलवली. तोंडाला रुमाल बांधून खाली गेलो. २/१३
दोन चार बाया आणि काही पुरुषही त्याच्याभोवती येऊन थांबले होते. सोशल डिस्टन्सिंग पाळत आम्ही सगळे गवार, कलिंगड घेऊ लागलो. इतक्यात तो पोऱ्या एकाला म्हणाला,
दादा, तांब्याभर पाणी मिळंल का?’ दादानं तोंड वाकडं करत, ‘समोरच्या चौकात पाण्याची टाकीये. तिथं पे.’ असा सल्ला दिला. ‘ ३/१३
साधारण 15 वर्षांपुर्वी सकाळ वर्तमानपत्रात असताना इरफान खानची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. एका नामांकित पबमध्ये भेट झाली आणि खूप वेळ गप्पा झाल्या. बाजुला वाजत असलेल्या मोठ्या संगीताच्या आवाजातही इरफानचा खणखणीत आवाज कानावर येत होता. १/७
- प्रभा कुडके, Indian Express #RIPIrrfanKhan
इरफानच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली होती हे जाणून घेण्यासाठी मी त्याला भेटले होते. मुलाखतीच्या दरम्यान इरफानने त्याच्या लहानपणीची एक गोष्ट सांगितली. इरफानच्या आजीच्या अंगणात एक चमेलीचा वेल होता. चमेलीच्या फुलांचा सुगंध हा त्यांच्या अंगणात दरवळत असायचा. २/७
इरफान त्यावेळी बोलताना मला म्हणाला, त्या चमेलीच्या फुलांनी मला वेड लागायचं. ती फुलं सकाळी कधी उमलतात हे पाहण्यासाठी मी लवकर उठायचो. तो सुगंध मनात साठवुन ठेवायचो आणि माझ्या दिवसाची सुरुवात व्हायची. त्या चमेलीच्या वेलासोबत माझं एक नातं तयार झालं होतं असं त्याने सांगितलं. ३/७
मी सातवीच्या वर्गात असताना माझ्या वर्गात गेल्या सहा वर्षांपासून नापास होणारा एकजण होता.आम्ही त्याला सगळेजण नाना म्हणायचो.आमच्याच गल्लीत राहायला होता.आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा.मिशासुद्धा चांगल्याच वर आलेल्या होत्या.आणि हा नाना अंगाने धिप्पाडच्या धिप्पाड होता. (1) #आवडलेली#कथा
म्हणजे आमचं मास्तर त्याच्या खांद्याला लागायचं.अंगाने पैलवान असणारा गडी.पण अभ्यासात पार दरिंद्री.नानाला काहीच येत नव्हतं.आणि दरवर्षी नाना नापास व्हायचा. त्यात आमच्या मास्तरने एक नियम असा केला होता, वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल.. (2)
त्याने वर्गातल्या सगळ्या पोरांच्या मुस्काडीत मारायची. त्यावेळचे मास्तर असा नियम करायचे.आणि यात काय व्हायचं त्या भितीने सगळी पोरं मन लावून अभ्यास करायची. पण नानाच्या डोक्यात काहीच राहत नव्हतं. आणि त्याचा परिणाम म्हणजे नाना दररोज न चुकता वर्गातल्या प्रत्येकाचा मार खायचा. (3)