मानवतेचा कलंक - लैंगिक हिंसाचार :-
जुनको फुरुटा (Junko Furuta) सोबत घडलेली काळीज पिळवटून टाकणारी वास्तविक घटना.
विश्वभरात अपराध हे दररोज घडत असतात. पण जर लैंगिक हिंसाचाराबाबत बोलायचं झालंच, तर या संदर्भात भयंकर अपराध घडल्याची साक्ष इतिहास देतो. +👇🏻
हृदयाला चरे पडतील अशीच एक घटना आधुनिक फॉरेंसिक जपान मध्ये १९८८ साली "जुनको फुरुटा" या अवघ्या १६ वर्षाच्या शाळकरी मुलीसोबत घडली.
जपान मध्ये अपराध्यांसाठी कडक कायदेकानुन तर आहेत, पण असे बरेच अपराध पोलिसांच्या अथवा कायद्याचा दृष्टीस पडत नाहीत. +👇🏻
जपान मध्ये घडलेल्या अश्याच एक सामुहिक बलात्कार किंवा लैंगिक हिंसाचाराबाबत लिहीतानाच डोकं ठणठणतंय.
२५ नोव्हेंबर १८८८ साली सुरु झालेली हि घटना आहे. जपान मधील सायतामा (Saitama) प्रांतातील मिसाटो (Misato) शहरात जुनको फुरुटा या शाळकरी मुलीसमोर +👇🏻
मियानो हिरोशी या मुलाने प्रेमप्रस्ताव ठेवला होता. पण जुनकोने तो प्रस्ताव नाकारला. हाच राग त्या मुलाने डोक्यात धरून आपला एक मित्र शिंजी मिनाटो नोबुहारो याच्या सोबत तिच्या अपहरणाची योजना आखली.
जुनको हि शाळा सुटल्यावर फावल्या वेळेत प्लास्टिक मोलडींग फॅक्टरी मध्ये काम करायची. +👇🏻
२५ नोव्हेंबर १९८८ रोजी नोकरीहुन दुचाकीवरून घरी येत असताना मिनाटोने तिला दुचाकीवरून खाली पाडले व तेथून पळ काढला. तिच्यावर झालेल्या हल्ल्याचा बहाणा करून हिरोशी मियानोने तिला सुखरुप घरी सोडतो म्हणुन स्वतः सोबत येण्याचा आग्रह केला असता ती त्याचासोबत जायला तयार झाली. +👇🏻
हिरोशी मियानो आणि शिंजी मिनाटो या दोन १७ वर्षाच्या मुलांनी तिचे अपहरण करून हिरोशी मियानोच्या घरी कैदी बनवले होते. जुनकोला धमकी देत तिच्या घरच्यांना फोनवर हे सांगण्यास भाग पाडलं की "मी तुम्हाला (आई-वडीलांना) स्वेच्छेने सोडलं आहे आणि मी माझ्या मित्रांसोबत सुरक्षित ठिकाणी आहे."+👇🏻
मियानो आणि मिनाटो सोबत आणखीन दोन मित्र देखील सामील होते; जो ओगुरा, यासुशी वतनाबे अशी त्यांची नावे आहेत. ही सर्व मुलं १७ वर्षे वयोगटातील आहेत. मियानोने स्वतःच्याच आईवडीलांना देखील दमकी दिली की तो "याकुझा" नामक गुन्हेगारी दलाचा सदस्य असुन कधीही तुम्हाला संपवू शकतो. +👇🏻
तेव्हापासून जुनको फुरुटा हिचं जीवन नरक बनलं. मियनो सोबत तिघांनी तिला मारहान व आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. इतकंच नव्हे, तर रोज याकुझा दलातील आपल्या मित्रांना घरी बोलावून तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला. +👇🏻
२५ नोव्हेंबर १९८८ ते ४ जानेवारी १९८९ पर्यंत असे ४४ दिवस हे घटनासत्र चालू राहीलं. या घटनासत्रात त्या चौघांनी तिच्यावर ४०० पेक्षाही जास्त वेळा बलात्कार केला. हे फक्त बलात्कारापुरतंच मर्यादित नव्हते, तर तिला लोखंडी साखळीने बांधुन मारझोड व नग्न शरीरावर ओरबाडलं गेलं. +👇🏻
खाणंपिणं न देता तिला स्वतःचंच मुत्र प्यायला दिले जात होते. सोबत जिवंत झुरळं तिला जबरदस्तीने खायला लावत होते. एवढंच नव्हे तर सर्वांसमोर तिला हस्तमैथुन करण्यासाठी बळजबरी केली गेली. तिच्या संपूर्ण शरीराला लाईटर किंवा माचिसने चटके दिले गेले.
+👇🏻
मियानो आणि तीन साथीदारांनी तिला साखळीने हात बांधुन खोलीत लटकावलं होतं. चौघेही तिच्या शरीराला पंचींग बॅग प्रमाणे हाताने मुक्के बुक्के घालत होते. त्यामुळे जुनको पूर्णतः निर्बल आणि असह्य पिडेने त्रस्त झाली होती. तिला पाणी पिण्यासाठी दिलं जायचं तेव्हा ती उलटी करून टाकायची. +👇🏻
जुनको जेव्हा पळून जाण्याचा प्रयत्न करायची तेव्हा तिला सिगरेटचे चटके देण्यात येत. एवढंच नव्हे तर तिच्या पायांवर रॉकेल ओतून पेट देण्यात येई. दारूची फुटलेली काचेची बाटली तिच्या गुप्तांगात घुसवली. परिणामी तिला जखमा झाल्याच पण चालणं किंवा उभं राहणं देखील कठीन झालं. +👇🏻
तिच्यावर होणार्या अत्याचारांचं सत्र सुरूच होते. तिला बांबुने, लोखंडी सळईने मारण्यात आले. तिच्या दोन्ही गुप्तांगांत फटाके घालण्यात आले होते. तापत्या लोखंडी सळ्या तिच्या योनीमार्ग आणि गुदामार्गात घुसवल्या जात होत्या. तिच्या शरीराला राक्षसाप्रमाने कुरतडत होते. +👇🏻
तिचं संपूर्ण शरीर त्या नराधमांनी रक्तबंबाळ करून सोडले होते. हे नराधम तिच्या चेहर्यावर जळती मेनबत्ती वितळवत इतकंच नव्हे तर तिच्या डोळ्यांत देखील गरम मेण घातले जात होते. तिच्या पापण्यांना लाईटरने जाळलं जात होतं. तिच्या स्तनांमध्ये सुया घुसवण्यात येत होत्या. +👇🏻
स्तनांना चिमट्याने चिरडलं जात होते. योनीमार्गात पेटलेला विजेचा बल्ब तर कधी काचांचे तुकडे घालण्यात येई, कधी कधी तर कात्री देखील घातली जात होती.
हे सर्व लिहीताना आणि वाचतानाच इतकं महाभयंकर वाटतंय तर विचार करा वास्तवात काय गंभीर घडलं असेल. जुनकोला शौचालय अथवा लघवीला +👇🏻
जाण्यास देखील रेंगाळत जावं लागत होते. ह्या गोष्टींसाठी तिला किमान तास-दोन तासांचा वेळ लागायचा. डोक्यावर लोखंडी दांडयांनी मारल्यामुळे तिच्या मेंदूला गंभीर स्वरूपात मार लागला होता. गुप्तांगांना गँगरीन झालं होतं. ४० व्या दिवशी जूनकोने त्यांना विनंती केली की मला मारून टाका पण +👇🏻
मियानो आणि त्याच्या साथीदारांनी तिला तशाच जखमी अवस्थेत ठेवलं.
दिवस ४४वा म्हणजेच ४ जानेवारी १९८९ च्या दिवशी तिने "मला सोडा" अशी विनवणी केली असता त्या मियानो आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांनी तिच्या समोर जपान मधील प्रसिद्ध खेळ माहजाँग (Mahjong) खेळण्याचा प्रस्ताव ठेवला. +👇🏻
जर ती या खेळात जिंकली तर तिला सोडण्यात येईल असं सांगण्यात आले होते. दैव बलत्वर ती त्या खेळात जिंकली खरी, पण त्याचाच राग व्यक्त करत त्या चौघा नराधमांनी तिला अंगावर दारू ओतून पेटवले. त्यातच तडफडत दोन तासांच्या सत्रात तिथेच तिचा मृत्यू झाला. मृत्यूंनतर त्या चौघांनी तिचं मृत शरीर +👇🏻
एका मोठ्या पिंपात घालून त्यात सिमेंटचे मिश्रण भरून एका निर्जन स्थळी ठेवले.
२३ जानेवारी १९८९ रोजी, जो आणि मियानोला दुसर्या १९ वर्षीय महिलेच्या अपहरण आणि सामूहिक बलात्कारच्या आरोपाखाली अटक झाली. "जुनकोचे प्रेत कुठे सापडले?" असे मियानोने पोलीस अधिकाऱ्याला विचारले. +👇🏻
पोलीसही चक्रावले. परिणामस्वरूप, चौकशीनंतर त्या चौघांना जुनको फुरुटाची अपरिमित हानी व हत्या केल्याच्या गुन्ह्यात अटक केली गेली. चौघांनी पूर्व निर्धारित हत्या केल्याच्या ओरोपाला नकार दिला. जुलै १९९० साली चौघा नराधमांना अल्पवयीन असल्याने ४ ते १७ वर्षाचा तुरूंगवास +👇🏻
भोगण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.
जुनको फुरुटा हिचे आई-वडील न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे नाखुश होते. चौघांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण पुराव्यांअभावी ते अयशस्वी ठरले. +👇🏻
अशी ही काळजाचं पाणी पाणी करणारी गंभीर घटना आधुनिक जपानच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण जपान हादरून गेलं होतं. लैंगिक हिंसाचार इतक्या निचतम पातळीला जाऊ शकतो हे संपूर्ण जगानेच पहिल्यांदाच पाहीलं. +👇🏻
१९९५ मध्ये जपानी चित्रपट निर्माता "काट्सुय्या मात्सुमुरा" यांनी एक "काँक्रिट - हाईडेड हायस्कूल गर्ल मर्डर केस" नावाचा चित्रपटाची निर्मिती केली.
२००४ साली "हिरोमु नाकामुरा" यांनी याच घटनेवर दिग्दर्शित केलेला "स्कूलगर्ल इन सिमेंट" हा चित्रपट प्रदर्शित देखील करण्यात आला होता. +👇🏻
जुनकोची हृदय पिळवटून टाकणारी वास्तविक घटना आम्ही इथे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला अजून माहिती जाणून घ्यायची असेल सोबत एक लिंक जोडत आहोत. filmdaily.co/obsessions/tru…
आजकाल काही जणांचे मराठी भाषेशी वैर आहे, असंच दिसतं. #मराठी भाषा ही फक्त राजकारणापुरती मर्यादित आहे, असंच त्यांना वाटतं. असेच काही तथाकथित स्वयंघोषित पत्रकार आणि इतर काही #मराठीभैय्ये आहेत ज्यांना वाटतं सारखं सारखं मराठी भाषेबद्दल बोलल्याने रोजगार मिळत नाही. 👇🏻 #म#रिम#मायबोली
रोजगार म्हणजे फक्त ८-९ तासांची नोकरी नव्हे. मराठीतील साहित्य संपदा, ज्यावर कितीतरी जणांचा रोजगार अवलंबून आहे. मग लेखक असो, कवी असो, प्रकाशक असो की पुस्तक विक्रेता या सर्वांचेच मराठी साहित्य संपदेवर पोट भरतं. हा रोजगार नाही का? शिवाय त्याच लेखकांच्या कादंबर्यांमधून, 👇🏻
कथांमधून चित्रपट निर्मिती होते. बर्याच चित्रपटांमध्ये कवींच्या कवितांचे गाण्यात रूपांतर होते.
मराठी भाषेची गोडी निर्माण होणे, ही गोष्टच कुठेतरी दुरावत चालली आहे. पुढच्या पिढीला मराठी भाषेतील साहित्य संपदा ही कळायलाच हवी. कारण भाषा ही फक्त व्यवहारापुरती मर्यादित नसते.
तुम्ही विचार करत असाल की या शब्दाचा नक्की अर्थ काय होतो? तर या शब्दाचा अर्थ आहे 'स्तन कर/Breast Tax'. आता तुम्ही म्हणाल या विषयावर कोणी का करवसुली करेल?? तर तसंच आहे!
दक्षिण भारतातील त्रावणकोर राज्यातील ही घटना. जे सध्याच्या केरळ राज्यात आहे.
सुमारे १५० वर्षापूर्वी केरळ मधला मोठा क्षेत्रफळाचा भाग असणार्या त्रावणकोर (जे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होते) राज्याच्या राजाने हा कर लागु केला.
त्याकाळी नाडर, थिया आणि एडवा अश्या क्षुद्र जातीतील स्त्रियांना स्तन झाकून ठेवण्यास बंदी होती.
त्यात जे गुलाम शेतमजूर होते त्यांना हा कर देणं अशक्य होते. पण एडवा आणि नाडर समुदायातील स्त्रिया बेळकाम (बांबू आणि नारळाच्या झावळ्यां पासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू) आणि शेतमजूरी करून कर भरायचा प्रयत्न तर करायच्या, पण नेहमी कर देणं शक्यच नव्हतं.
दोन दिवसांपूर्वी काही फेक हँडलस् वरून कोकणात धार्मिक द्वेष कसा पसरवता येईल व कशा प्रकारे हिंदू मुसलमान करून भावना भडकवण्याचा प्रयत्न केला गेला. पण आमच्यातीलच काहींनी हा प्रयत्न उधळून लावला.
कोकणात, तळकोकणापासून, राजापूर-रत्नागिरी भागात अनेक धर्मियांची धार्मिक स्थळं आहेत पण केव्हाच लोकांनी अंतर ठेवलं नाही एवढंच काय स्वातंत्र्य काळापासून कोकणातील शांतता कधीच भंग पावली नाही. काही तुटपुंज्या फेक हँडलस् ने द्वेष पसरवून काही घंटा फरक पडणार नाही,
खेडपासून सिंधुदुर्गातील सावंतवाडी पर्यंत हिंदू आणि मुस्लिम धर्मियांची प्रार्थना स्थळं आहेत पण पण तिथं पण लोक हौशीने सण साजरे करतात. एवढच काय सुफी संतांचे दर्गे आहेत लोकं तिथे देखील लोक श्रद्धेने भेट देतात.
दादर म्हटलं की खरेदी ही आलीच. तिथे पदपथावर बरेच विक्रेते असतात. पण त्यातला कोणता #विक्रेता#मराठी आहे कोणता परप्रांतीय कसं कळणार?
आजच आलेला #अनुभव
स्थळ: स्टार मॉलच्या समोरील पदपथ
➡️ एका विक्रेत्याकडे खरेदी करत असताना नेहमीप्रमाणे मराठीत बोलायला सुरुवात केली. 👇🏻
तो विक्रेताही माझ्याशी मराठीत बोलत होता. बाजूचा दुसरा विक्रेता आला आणि ते दोघेही गुजरातीत संवाद करू लागले. त्या दोघांना गुजरातीत संवाद करताना पाहून तिसर्या विक्रेता त्यांना म्हणाला, "तुम्ही दोघे काय बोलताय? आम्हाला समजेल असे हिंदीत बोला." (हे तो त्यांच्याशी हिंदीत बोलला)👇🏻
दुसर्या विक्रेता त्याला हिंदीत म्हणाला "काही नाही आम्ही आमच्या गावच्या वार्ता करतोय." पुन्हा तो ३रा विक्रेता त्यांना म्हणाला "हिंदीत बोला म्हणजे आम्हाला पण समजेल तुमच्या गावच्या वार्ता." गुजराती विक्रेता त्याला म्हणाला "आम्ही दोघे गुजराती मग आम्ही हिंदीत का बोलू? मला नाही येत"👇🏻