#ThanksDrAmbedkar

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कामगारांच्या अधिकारांचे, त्यांच्या हिताचे खंदे पुरस्कर्ते होते. कामगारांचे हिताचे जतन व्हावे आणि त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी त्यांनी 1936 मधे स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. कामगार पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांनी कामगारांच्या..
वेल्फेअरसाठी अनेक मुद्दे मांडले होते.

1938 साली मुंबई असेंम्बली मधे डॉ. आंबेडकरांनी इंडस्ट्रीयल डिसप्युट विधेयकाला विरोध केला ज्यात संप पुकारने बेकायदेशीर असेल अशी तरतूद होती. त्यावेळी असेंम्बली मधे बोलताना आंबेडकर म्हणाले होते कि 'संप पुकारने हा काही क्रिमिनल ओफेन्स नाही..
यासाठी कामगारांना शिक्षा देणे म्हणजे त्यांना गुलाम बनवण्यासारखे आहे". या कायद्याच्या विरोधात स्वतंत्र पक्षाने मुंबईत संप केला होता.
1942-46 या काळात डॉ.आंबेडकर हे व्हाइसरॉयच्या कौन्सिल मधे कामगार मंत्री होते. 1943 साली डॉ.आंबेडकरांनी ट्रेड युनियन सुधारणा विधेयक सभागृहात मांडले.
या विधेयकात तरतूद होती कि कामगार युनियन ला मान्यता देणे हे कंपन्यांना अनिवार्य असेल. अटी पूर्ण करणाऱ्या युनियन ला मान्यता न देणे हा ओफेन्स समजला जाईल अशी तरतूद या विधेयकात होती.

1944 साली डॉ.आंबेडकरांच्या पुढाकाराने माईन्स ऍक्ट अंतर्गत लेबल वेल्फेअर फंड ची स्थापणा झाली.
या फंडचा वापर कामगारांना पाण्याची सुविधा,ट्रान्सपोर्ट,शिक्षण ई. मार्गाने वेल्फेअर प्रमोट करण्यासाठी होऊ लागला.

डॉ.आंबेडकरांनी वर्कमन कंपंसेशन ऍक्ट मधे सुधारणा करून कामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणाऱ्या रकमेत वाढ केली.
1946 साली डॉ.आंबेडकरांनी फॅक्टरीज् अमेंडमेंड बिल सभागृहात मांडले. यात कामाचे तास 8 इतके निश्चित करण्यात आले. तसेच ओव्हरटाईमचा मोबदला, पगारी सुट्टी यांच्या तरतूदी देखील या कायद्यात होत्या.

1948 ला आंबेडकरांनी किमान वेतन कायदा सभागृहात मांडला ज्याद्वारे कामगारांना किमान वेतन..
देण्याची तरतूद करण्यात आली.

डॉ.आंबेडकरांनी पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट मध्ये अनेक सुधारनांची शिफारस केली होती. या कायद्याद्वारे निश्चित कालावधीत कामगारांना कामाचा मोबदला देणे अनिवार्य करण्यात आले.
1948 साली आलेल्या कोल माईन्स प्रॉव्हिडंट फंड अँड बोनस ऍक्ट या कायद्यात आंबेडकरांचा मोलाचा वाटा होता. या कायद्यामुळे कोल माईन्स च्या कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंड आणि बोनस चा लाभ मिळण्यास सुरुवात झाली.
महिलां कामगारांच्या कल्याणासाठी डॉ.आंबेडकरांनी माईन्स मॅटर्नीटी बेनिफिट ऍक्ट, वुमन & चाईल्ड लेबर प्रोटेक्शन ऍक्ट, मॅटर्निटी बेनिफिट फॉर वुमन लेबर्स आणि वुमन लेबर वेल्फेअर फंड यासारखे महत्वाचे कायदे केले, त्यात सुधारणा केल्या.
देशाचे संविधान तयार करताना मसुदा समितीचे अध्यक्ष असलेल्या डॉ.आंबेडकरांनी आणि संविधान सभेने कामगारांच्या हक्कांसाठी व त्यांच्या कल्याणासाठी काही तरतुदी संविधानात केलेल्या आहेत.

संविधानात अनुच्छेद 23 हा शोषणाविरुद्धचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. विनामोबदला जबरदस्तीने काम करून घेणे..
हा शोषणाचा भाग आहे. या अनुच्छेदा अंतर्गत वेठबिगार पद्धत निर्मूलन अधिनियम कायदा 1976 साली केला गेला.

संविधानात राज्याचे मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत जे कि धोरण ठरवताना आधार म्हणुन बघितली जातात. ज्यात अनु.39A मधे स्टेट ने सर्वांसाठी उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे तसेच..
समान काम समान वेतन यासाठी प्रयत्न करणे याबाबत तरतुदी आहेत.

अनुच्छेद 42 मधे कामाच्या ठिकाणी न्याय व मानवी परिस्थिती आणि प्रसूती सहाय्य यासाठी तरतूद आहे.

अनुच्छेद 43 मधे कामगारांना योग्य वेतन, चांगले जीवनमान व सामाजिक-सांस्कृतिक संधी याबद्दलची तरतूद आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जसा संघर्ष मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्यासाठी केला तसेच प्रयत्न त्यांनी कामगारांना हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेले आहेत.

#ThanksDrAmbedkar

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Gajanan Gaikwad !

Gajanan Gaikwad ! Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Gaju3112

3 Apr
#ThanksDrAmbedkar

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे 1942-46 या काळात व्हॉईसरॉयच्या कौन्सिल मधे श्रम, सिंचन व ऊर्जा विभागाचे मंत्री होते. या काळात त्यांनी देशातील जल संसाधनांच्या वापराबाबत, त्यांच्या विकासाबाबत नवीन जलनिती तयार केली होती. देशाच्या एका भागात दुष्काळ तर दूसरीकडे...
नद्यांना येणारे पूर, ऊर्जेची कमतरता, सिंचनाच्या अपुऱ्या सोयी ई. समस्यांवर मल्टीपर्पज प्रकल्प उभारणे हाच उपाय असल्याचे डॉ. आंबेडकरांनी ओळखले होते. अनेक प्रांतातून वाहणाऱ्या नद्यांवर बहुउपयोगी प्रकल्प उभे करणे जेणेकरून पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन होईल, सिंचनाची सोय होईल...
जलविद्युत निर्मिती करता येईल,दुष्काळी भागात पाणी पोहचवता येईल असे डॉ. आंबेडकरांचे व्हिजन होते. याच प्रयत्नांतुन पुढे दामोदर नदी प्रकल्प, सोन नदी प्रकल्प, हिरकुड प्रकल्प यासारखे बहुउपयोगी प्रकल्पांची निर्मिती झाली.

या बहुउपयोगी प्रकल्प उभारण्यात एक मोठी अडचण होती ती म्हणजे...
Read 18 tweets
1 Apr
#ThanksDrAmbedkar

अनुच्छेद 32 !

9 डिसेंबर 1948 रोजी संविधान सभेत मूलभूत हक्कांवरील चर्चेदरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते कि
"जर मला असे विचारले कि या संविधानातील सर्वात महत्वाचा, ज्याच्याशिवाय हे संविधान निरर्थक आहे, असा अनुच्छेद कोणता तर माझे उत्तर असेल..
अनुच्छेद 32. अनुच्छेद 32 हा संविधानाचा आत्मा आहे, संविधानाचे ह्रदय आहे"

डॉ.आंबेडकरांनी अनुच्छेद 32 ला एवढे महत्वाचे का म्हंटले असावे याचे कारण म्हणजे अनुच्छेद 32 चा संबंध हा संविधानाने दिलेल्या सगळ्या मूलभूत मानवी हक्कांशी आहे, त्यांच्या अस्तित्वाशी आहे.
आपल्या माहिती आहे त्याप्रमाणे संविधानाच्या तिसऱ्या भागात अनुच्छेद 14 ते 32 मधे नागरिकांसाठी मूलभूत हक्क दिलेले आहेत. त्यात समानतेचा हक्क, स्वातंत्र्यचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक-शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपायांचा हक्क यांचा समावेश होतो
Read 14 tweets
16 Mar
#मराठाआरक्षण

DAY 02

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका कर्त्यांच्या वतीने काल संविधानपिठासमोर युक्तिवाद करण्यात आला होता. आज त्याच युक्तिवादात अजून काही मुद्दे मांडण्यात आले.
आज मांडलेले काही ठळक मुद्दे थोडक्यात :
ज्येष्ठ वकिल श्याम दिवाण :-

- 102व्या घटनादुरुस्ती नंतर SEBC वर्ग ठरवण्याची विशिष्ट प्रक्रिया देण्यात आलेली आहे.

- गव्हर्नरच्या सल्ल्याने राष्ट्रपती SEBC बाबत नोटिफिकेशन काढू शकतात. 102व्या दुरुस्तीनंतर केवळ राष्ट्रपतीच राज्यपालांच्या सल्ल्याने SEBC वर्ग ठरवू शकतात.
- राज्य अनु.15(4) मधे SEBC वर्गासाठी विशेष तरतूद करू शकते मात्र SEBC वर्ग ठरवण्यासाठी अनु.342A नुसार राष्ट्रपतीच्या नोटिफिकेशनची गरज आहे.

- या प्रकरणात राष्ट्रपतीचे कोणतेही नोटिफिकेशन नाही, राज्यपालांचा सल्ला किंवा राष्ट्रीय आयोगाचा सल्ला घेण्यात आलेला नाही.
Read 16 tweets
15 Mar
#मराठाआरक्षण

DAY - 01

मराठा आरक्षणाच्या वैधते संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. गेल्या सुनावणीत कोर्टाने इतर राज्यांना नोटीस इश्यु केल्या होत्या. केरळ, हरियाना, राजस्थान, तामिळनाडू या राज्यांना त्यांचे उत्तर दाखल करण्यास..
वेळ देण्यात आला आहे. आज आरक्षनाला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद केला. त्यांच्यावतीने ज्येष्ठ वकिल अरविंद दातार व श्याम दिवाण यांनी युक्तिवाद केला.

अरविंद दातार यांनी मांडलेले काही ठळक मुद्दे :-
- इंद्रा साहनी केस मधील निर्णयाच्या योग्यतेवर इतर कोणत्याही केस मधे शँका घेण्यात आलेली नाही.

- साहनी केस मधे 27% OBC आरक्षण हे 6:3 अशा निर्णयाने वैध ठरवण्यात आले होते. त्यातील 8/9 न्यायाधीशांनी 50% मर्यादा व क्रिमी लेयरच्या बाजूने मत दिले होते.
Read 18 tweets
25 Feb
सर तुम्ही 'राज्यघटना' आणि 'कायदा' यात गल्लत करत आहात. तुमचे म्हणणे होते कि 'राज्यघटना' तयार करताना मनुस्मृतीचा देखील आधार घेतला होता. आता तुम्ही जी उदाहरणे देत आहात ती हिंदू कोड बिलच्या संदर्भात आहेत. हिंदू कोड बिल एकत्रित 4(+) महत्वाचे कायदे आहेत जे हिंदू(+) धर्मातील लोकांचे +
लग्न,घटस्पोट, वारसाहक्क ई. गोष्टींचे नियमन करतात. असाच मुस्लिम लोकांसाठी मुस्लिम पर्सनल लॉ आहे, शीख लोकांसाठी आनंद मॅरेज ऍक्ट आहे, पारसी लोकांसाठी पारसी मॅरेज & डायवोर्स ऍक्ट आहे. हे सगळे पर्सनल लॉ रेग्युलेट करणारे कायदे त्या त्या धर्माच्या परंपरा, पौराणिक ग्रंथ, धार्मिक ग्रंथ +
रूढी ई. गोष्टींवर आधारित आहेत. सहाजिकच हिंदू कोड बिल चा आधार देखील हिंदू समाजाच्या जुन्या ग्रंथामधे असेल. त्यामुळे हिंदु कोड बिल तयार करताना त्यावर चर्चा होणे, त्याचे संदर्भ येणे देखील सहाजिक गोष्ट आहे. पण हिंदू कोड बिल म्हणजे राज्यघटना नव्हे, तो एक कायदा आहे.
Read 5 tweets
24 Feb
#मराठी

दिशा रवी ला जामीन...!

26 जानेवारीला दिल्ली येथे झालेली हिंसा व त्या अनुषंगाने पुढे आलेल्या टूलकीट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट दिशा रवी ला काल दिल्ली येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला. मिडियाने या टूलकीट प्रकरणाचा आणि दिशा रवी हिच्या अटकेचा बराच.. Image
गाजावाजा केला. दिशा ला बेल देण्याच्या निर्णयात न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी अनेक महत्वाची निरिक्षणे नोंदवली आहेत.

दिशा ला दिल्ली पोलिसांनी 13 तारखेला बँगलोर मधुन अटक केली होती. दंगा करण्यास प्रोत्साहन देणे(153), वैमनस्य पसरवणे(153A) आणि सेडिशन म्हणजेच देशद्रोह असे आरोप...
तिच्यावर लावण्यात आले आहेत.

दिशा रवीच्या जामीनाला विरोध करताना अतिरिक्त सॉलिसिटर (ASG) यांनी बाजू मांडली कि सदर केस हि टूलकिट बनवणाऱ्या लोकांविरुद्ध दाखल करण्यात आलेली आहे. सरकारविरुद्ध असंतोष पसरवण्याच्या उद्देशाने सदर टूलकिट बनवले व शेअर केले गेले असून त्याचा संबंध..
Read 23 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!