मराठा आरक्षणाच्या वैधते संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. गेल्या सुनावणीत कोर्टाने इतर राज्यांना नोटीस इश्यु केल्या होत्या. केरळ, हरियाना, राजस्थान, तामिळनाडू या राज्यांना त्यांचे उत्तर दाखल करण्यास..
वेळ देण्यात आला आहे. आज आरक्षनाला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद केला. त्यांच्यावतीने ज्येष्ठ वकिल अरविंद दातार व श्याम दिवाण यांनी युक्तिवाद केला.
अरविंद दातार यांनी मांडलेले काही ठळक मुद्दे :-
- इंद्रा साहनी केस मधील निर्णयाच्या योग्यतेवर इतर कोणत्याही केस मधे शँका घेण्यात आलेली नाही.
- साहनी केस मधे 27% OBC आरक्षण हे 6:3 अशा निर्णयाने वैध ठरवण्यात आले होते. त्यातील 8/9 न्यायाधीशांनी 50% मर्यादा व क्रिमी लेयरच्या बाजूने मत दिले होते.
- इंद्रा साहनी केसमधे सर्व बाबींचा पूर्ण सविस्तर विचार करून निर्णय देण्यात आला होता. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज नाही.
- 50 टक्के मर्यादा हि केवळ संसदेद्वारेच वाढवली जाऊ शकते. न्यायालयाद्वारे नाही.
- इंद्रा साहनी हा निर्णय केवळ अनु.16(4) मधील आरक्षणबाबत नसून एकूणच आरक्षण या संकल्पनेबद्दल आहे.
- अनु.15(4) [मागासवर्गीयसाठी विशेष तरतुदी] आणि अनु. 16(4) [ नोकरीमधे मागासवर्गीयसाठी आरक्षण] हे दोन्ही Affirmative Actions चा भाग आहेत.
- अनु.16(4) चा अर्थ हा अधिक व्यापक आहे, अनु.15(4) हा 16(4) चा सबसेट म्हणता येईल. त्यामुळे जे अनु.16(4) ला लागू होते ते अनु.15(4) ला सुद्धा लागू होते.
- 50 टक्क्यांची मर्यादा हि जशी अनु.16(4) ला लागू होते तशी ती अनु.15(4) मधे सुद्धा लागू होते.
{** 15(4) व 16(4) चा हा युक्तिवाद यासाठी करण्यात आला आहे कि एका सुनावणीत मुकुल रोहतगी यांनी साहनी केस चा निर्णय हा केवळ 16(4) मधल्या आरक्षणबाबत असल्याने इथे लागू होत नाही असा युक्तिवाद केला होता.)
- दहा केसेस मधे वेगवेगळ्या हायकोर्टाने 50 टक्के मर्यादा मान्य करून कायदे..
रद्द केले आहेत. आतापर्यंत चार संविधान पीठांनी इंद्रा साहनी केसचा निर्णय योग्य ठरवला आहे.
- 2000 साली राष्ट्रीय आयोगाने मराठा समाजाला मागासवर्गीय म्हणुन मान्यता देण्यास नकार दिला होता.
- महाराष्ट्र राज्याला दुर्गम भाग म्हणुन गृहीत धरले जाऊ शकत नाही.
- 50 टक्के मर्यादा हि लक्ष्मणरेखा आहे. साहनी केस मधे 50 लिमिटला मर्यादित सूट दिली आहे जी अपवादात्मक परिस्थिती,दुर्गम भाग यासाठी आहे.
- दुर्गम भागातील लोकांना साहनी केस मधे यासाठी सूट देण्यात आली आहे कारण ते मुख्य प्रवाहापासून दूर असतात. त्यांच्या परिस्थितीचा विचार करून हि सूट...
जाते. अशी सूट देताना खुप काळजीपूर्वक दिली गेली पाहिजे.
- महाराष्ट्र सारखे प्रगत राज्य अशा अपवादात्मक परिस्थिती मधे गणले जाऊ शकत नाही.
- मुंबई हायकोर्टच्या निर्णयावर अपवादात्मक परिस्थिती, दुर्गम भाग यावर काहीही भाष्य केलेलं नाही. तो निर्णय इंद्रा साहनी केस च्या विसंगत आहे.
- 1980 साली मंडल आयोगाने मराठा समाजाला प्रगत म्हंटले होते.
- 2000 सालच्या राष्ट्रीय आयोगाने मराठा समाजाला प्रगत म्हंटले आहे. मराठा व कुणबी हे एकच नाहीत असे म्हणत आयोगाने मराठा समाजाचा सेंट्रल लिस्ट मधे समावेश करण्यास नकार दिला होता.
अरविंद दातार यांच्या युक्तिवादाचा सारांश
- 50 टक्के मर्यादा ओलांडली जाऊ शकत नाही.
- मुंबई उच्च न्यायालयाने अपवादात्मक परिस्थिती या मुद्द्याचा विचार केलेला नाही.
- 2000 सालच्या राष्ट्रीय आयोगाच्या रिपोर्ट नंतर मराठा समाजाचा मागासवर्गामधे समावेश करण्यात कोणतेही मेरीट नाही.
यानंतर ज्येष्ठ वकिल श्याम दिवाण यांनी युक्तिवाद केला. त्यांचे काही मुख्य मुद्दे :-
- राज्यातील बहुतांश मुख्यमंत्री, आमदार, IAS,IFS हे मराठा समाजातून आलेले आहेत.
- शैक्षणिक संस्था,विद्यापीठे, दूध संघ,मेडिकल कॉलेज इ. मधे या समाजाचे वर्चस्व राहिलेले आहे.
- मराठा समाजची आर्थिक व सामाजिक स्थिती अनेकवेळा तपासण्यात आली आहे व त्यात प्रत्येकवेळी मराठा समाज OBC मधे समाविष्ट केला जाऊ शकत नाही किंवा त्यांना आरक्षण दिले जाऊ शकत नाही असे म्हंटले आहे.
- राष्ट्रीय आयोगाने मराठा समाज मागासवर्गीय नाही असे म्हंटले आहे. 2014 पर्यंत सहा आयोगांमधे मराठा समाज मागासवर्गीय नसल्याचे म्हंटले आहे.
- शिक्षण,गव्हर्नमेंट, बँकिंग ई. सर्व क्षेत्रात मराठा समाजाने प्रगती केलेली आहे.
- गायकवाड आयोगाचा रिपोर्ट चुकीचा आहे. आयोगाने मराठा समाज राजकीय दृष्ट्या संघटित व डॉमीनंट असल्याचे लक्षात घेतले नाही. अशा समाजाला मागासवर्ग म्हंटले जाऊ शकत नाही. गायकवाड आयोगाने मागील रिपोर्ट्स चा विचार केलेला नाही.
- 50 टक्क्यांच्या वरचे कोणतेही आरक्षण हे घटनाबाह्य आहे. 50 टक्क्यांच्या वरचे आरक्षण देण्यासाठी कोणतेही अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्यात आलेली नाही. साहनी केस मधे जी अट घालण्यात आली होती ती पूर्ण केलेली नाही.
श्याम दिवाण उद्या पुढील युक्तिवाद करतील..
साभार: LiveLaw + Bar&Bench
( * These are not exact Court proceedings. सगळ्यांना समजावेत या उद्देशाने काही ठळक मुद्दे मराठीत मांडले आहेत. If Any mistake... Regretted !)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका कर्त्यांच्या वतीने काल संविधानपिठासमोर युक्तिवाद करण्यात आला होता. आज त्याच युक्तिवादात अजून काही मुद्दे मांडण्यात आले.
आज मांडलेले काही ठळक मुद्दे थोडक्यात :
ज्येष्ठ वकिल श्याम दिवाण :-
- 102व्या घटनादुरुस्ती नंतर SEBC वर्ग ठरवण्याची विशिष्ट प्रक्रिया देण्यात आलेली आहे.
- गव्हर्नरच्या सल्ल्याने राष्ट्रपती SEBC बाबत नोटिफिकेशन काढू शकतात. 102व्या दुरुस्तीनंतर केवळ राष्ट्रपतीच राज्यपालांच्या सल्ल्याने SEBC वर्ग ठरवू शकतात.
- राज्य अनु.15(4) मधे SEBC वर्गासाठी विशेष तरतूद करू शकते मात्र SEBC वर्ग ठरवण्यासाठी अनु.342A नुसार राष्ट्रपतीच्या नोटिफिकेशनची गरज आहे.
- या प्रकरणात राष्ट्रपतीचे कोणतेही नोटिफिकेशन नाही, राज्यपालांचा सल्ला किंवा राष्ट्रीय आयोगाचा सल्ला घेण्यात आलेला नाही.
सर तुम्ही 'राज्यघटना' आणि 'कायदा' यात गल्लत करत आहात. तुमचे म्हणणे होते कि 'राज्यघटना' तयार करताना मनुस्मृतीचा देखील आधार घेतला होता. आता तुम्ही जी उदाहरणे देत आहात ती हिंदू कोड बिलच्या संदर्भात आहेत. हिंदू कोड बिल एकत्रित 4(+) महत्वाचे कायदे आहेत जे हिंदू(+) धर्मातील लोकांचे +
लग्न,घटस्पोट, वारसाहक्क ई. गोष्टींचे नियमन करतात. असाच मुस्लिम लोकांसाठी मुस्लिम पर्सनल लॉ आहे, शीख लोकांसाठी आनंद मॅरेज ऍक्ट आहे, पारसी लोकांसाठी पारसी मॅरेज & डायवोर्स ऍक्ट आहे. हे सगळे पर्सनल लॉ रेग्युलेट करणारे कायदे त्या त्या धर्माच्या परंपरा, पौराणिक ग्रंथ, धार्मिक ग्रंथ +
रूढी ई. गोष्टींवर आधारित आहेत. सहाजिकच हिंदू कोड बिल चा आधार देखील हिंदू समाजाच्या जुन्या ग्रंथामधे असेल. त्यामुळे हिंदु कोड बिल तयार करताना त्यावर चर्चा होणे, त्याचे संदर्भ येणे देखील सहाजिक गोष्ट आहे. पण हिंदू कोड बिल म्हणजे राज्यघटना नव्हे, तो एक कायदा आहे.
26 जानेवारीला दिल्ली येथे झालेली हिंसा व त्या अनुषंगाने पुढे आलेल्या टूलकीट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट दिशा रवी ला काल दिल्ली येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला. मिडियाने या टूलकीट प्रकरणाचा आणि दिशा रवी हिच्या अटकेचा बराच..
गाजावाजा केला. दिशा ला बेल देण्याच्या निर्णयात न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी अनेक महत्वाची निरिक्षणे नोंदवली आहेत.
दिशा ला दिल्ली पोलिसांनी 13 तारखेला बँगलोर मधुन अटक केली होती. दंगा करण्यास प्रोत्साहन देणे(153), वैमनस्य पसरवणे(153A) आणि सेडिशन म्हणजेच देशद्रोह असे आरोप...
तिच्यावर लावण्यात आले आहेत.
दिशा रवीच्या जामीनाला विरोध करताना अतिरिक्त सॉलिसिटर (ASG) यांनी बाजू मांडली कि सदर केस हि टूलकिट बनवणाऱ्या लोकांविरुद्ध दाखल करण्यात आलेली आहे. सरकारविरुद्ध असंतोष पसरवण्याच्या उद्देशाने सदर टूलकिट बनवले व शेअर केले गेले असून त्याचा संबंध..
केंद्र सरकारने गेल्या अधिवेशनात आणलेल्या नव्या शेती कायद्यावरून सध्या गदारोळ सुरू आहे. अनेक राज्यांमधील शेतकरी करत याविरोधात आंदोलन आहेत विशेषतः पंजाब व हरियाणा ! या थ्रेड मधे कृषी कायदे आणि केंद्र व राज्यसरकार यांचे वेगवेगळ्या विषयावर...
कायदे करण्याचे अधिकार यावर चर्चा केली आहे. हे कायदे चांगले-वाईट, शेतकऱ्यांना फायद्याचे-तोट्याचे यावर इथे लिहिले नाहीये, त्यावर शेतीबद्दल अनुभव-ज्ञान असलेल्या व्यक्तीने बोलणे योग्य असेल.
केंद्र सरकारने प्रामुख्याने तीन कायदे आणले आहेत. खालील फोटोत त्यातील संक्षिप्त तरतुदी आहेत.
यातील पहिल्या कायद्यात शेतकऱ्यांना त्यांचा माल APMCच्या बाहेर देशभरात कुठेही विकण्यासंदर्भात तरतुदी आहेत. दुसऱ्या कायद्यात शेतकऱ्यांना थेट मोठ्या व्यापाऱ्यांसोबत करार करता येण्यासंदर्भत तरतूदी आहेत तर तिसरा कायदा जीवनावश्यक वस्तु याबाबत आहे.
गेल्या वर्षी 22 नोव्हेंबरच्या रात्री व 23च्या पहाटेपर्यंत फडणवीस व अजित दादा यांच्यासोबत राज्यपाल, पंतप्रधान, होम सेक्रेटरी व राष्ट्रपती ई. सगळे उच्चस्थरिय प्रशासन जागे होते.
12 नोव्हेंबर पर्यंत कुणीही सरकार स्थापन करायच्या स्थितीत
नसल्यामुळे राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकार ला केली. असा प्रस्ताव आल्या नंतर कॅबिनेट ची बैठक होऊन त्यावर निर्णय घेतला जातो व राष्ट्रपतींकडे तशी शिफारस केली जाते. मग राष्ट्रपती अनुच्छेद 356 अंतर्गत संबंधीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू..
करण्याचे आदेश काढतात. राष्ट्रपती राजवट काढून घेताना सुद्धा अशाच प्रकारची प्रोसिजर फॉलो केली जाते. फरक इतकाच कि राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा आदेश दोन महिन्यात संसदेत मंजूर करून घ्यावा लागतो, मात्र राष्ट्रपती राजवट काढून घेण्यासाठी संसदेच्या मंजुरीची गरज नसते.
केरळ सरकारने प्रस्तावित केलेल्या पोलीस ऍक्ट अमेंडमेंट अध्यादेशावर राज्यपलांनी स्वाक्षरी केल्याची बातमी आहे.
या नव्या कायद्याद्वारे केरळ पोलीस ऍक्ट मधे 118A हि नवी तरतूद समाविष्ट होईल ज्यात कुठल्याही माध्यमाद्वारे धमकी, Abusive, मानहानी,अपमान करण्याबद्दल 3 वर्षे
तुरूंगवासाची शिक्षा किंवा 10 हजार दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा असेल असे सांगण्यात आले आहे. प्रथमदर्शनी हा कायदा IT ACT 66A आणि पूर्वीच्या केरळ पोलीस ऍक्ट मधील 118D या तरतूदी सारखाच दिसतो आहे. श्रेया सिंघल निर्णयामधे सर्वोच्च न्यायालयाने 66A व 118D या दोन्ही तरतूदिंना +
अस्पष्ट, अती व्यापक व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन करणारे आहेत म्हणुन घटनाबाह्य ठरवले होते.
प्रथमदर्शनी 118A हे काहीशा बदलांसाहित आणलेले 66A चे नवीन व्हर्जन दिसत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अशाप्रकारे स्टेट कंट्रोल आणणे व सोशल मीडियातील कंटेंटला..