डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे 1942-46 या काळात व्हॉईसरॉयच्या कौन्सिल मधे श्रम, सिंचन व ऊर्जा विभागाचे मंत्री होते. या काळात त्यांनी देशातील जल संसाधनांच्या वापराबाबत, त्यांच्या विकासाबाबत नवीन जलनिती तयार केली होती. देशाच्या एका भागात दुष्काळ तर दूसरीकडे...
नद्यांना येणारे पूर, ऊर्जेची कमतरता, सिंचनाच्या अपुऱ्या सोयी ई. समस्यांवर मल्टीपर्पज प्रकल्प उभारणे हाच उपाय असल्याचे डॉ. आंबेडकरांनी ओळखले होते. अनेक प्रांतातून वाहणाऱ्या नद्यांवर बहुउपयोगी प्रकल्प उभे करणे जेणेकरून पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन होईल, सिंचनाची सोय होईल...
जलविद्युत निर्मिती करता येईल,दुष्काळी भागात पाणी पोहचवता येईल असे डॉ. आंबेडकरांचे व्हिजन होते. याच प्रयत्नांतुन पुढे दामोदर नदी प्रकल्प, सोन नदी प्रकल्प, हिरकुड प्रकल्प यासारखे बहुउपयोगी प्रकल्पांची निर्मिती झाली.
या बहुउपयोगी प्रकल्प उभारण्यात एक मोठी अडचण होती ती म्हणजे...
नद्यांच्या पाण्यावर असलेल्या प्रशासकीय-संविधानिक अधिकारांची.
1921 पर्यंत भारत सरकरकडे सिंचन व जलविद्युत प्रकल्पाचे अधिकार होते. प्रांतीय सरकार प्रकल्पाची अंमलबजावणी करत असे मात्र ते भारत सरकार आणि लंडन मधल्या सेक्रेटरी ऑफ द स्टेट च्या अधिपत्याखाली काम करत असत.
पूढे मोंटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायद्या अंतर्गत 'कालवा सिंचन,ड्रेनेज,जलसाठे,शेती,जंगल' यांना प्रांतीय विषय (सब्जेक्ट टू सेंट्रल गव्हर्नमेंट) म्हणून वर्गीकृत करण्यात आले. जलविद्युत निर्मिती हा विषय पूर्णपणे प्रांतीय सरकारकडे ठेवण्यात आला होता.
1935च्या भारत सरकार कायद्याद्वारे प्रांतीय सरकारांना अधिक स्वायत्तता देण्यात आली. या अंतर्गत 'जल, जलपूरवठा, सिंचन, कालवे, ड्रेनेज, जलसाठे' हे विषय पूर्णपणे प्रांतीय सरकरकडे देण्यात आले तर 'शिपिंग अँड नेव्हीगेशन ऑफ टायडल वाटर्स' आणि 'शिपिंग अन नेव्हीगेशन ऑन इनलँड वाटर्स'
'पॅसेंजर अँड गुडस् ट्रान्सपोर्ट ऑन इनलँड वाटर्स' हे विषय केंद्र सरकारकडे ठेवण्यात आले. 1935च्या कायद्याने प्रांतीय सरकारांना नद्यांच्या पाण्याचे आणि सिंचनाचे पूर्ण अधिकार दिले होते, केंद्र सरकारला याबाबत फार काही करता येत नसे.
डॉ.आंबेडकरांनी मांडलेल्या वॉटर पॉलिसी मधे..
केंद्र सरकारची देशातील जलव्यवस्थापनात मोठ्या सहभागीची भूमिका होती. पॉलिसी स्टेटमेंट मधे हे स्पष्ट करण्यात आलेले की प्रांतीय सरकारच्या स्वायत्ततेत हस्तक्षेप करण्याचा उद्देश नाही, एकापेक्षा अधिक राज्यांमधून जाणाऱ्या नद्यांवरील सिंचन व विद्युत प्रकल्प उभारणी मधे केन्द्र सरकारच्या..
सहभागाचा विचार त्यामागे आहे.
1935च्या कायद्याच्या अनुषंगाने डॉ. आंबेडकर म्हणाले होते कि 'अनेक प्रातांमधून प्रवास करत जाणाऱ्या रेल्वे आणि नद्यां यामधे फरक नाहीये. उलट 1935च्या कायद्याने त्यामधे फरक केला आहे. त्यामुळे रेल्वे या केंद्रीय म्हणून तर नद्या या प्रांतिय म्हणून..
बघितल्या जातात'
1945 साली दामोदर व्हॅली कॉन्फरन्स मधे बोलताना डॉ.आंबेडकर म्हणतात 'एखाद्या प्रांतला ऊर्जेची गरज आहे आणि त्यासाठी तो त्यांच्याकडे असलेले जलसंसाधन वापरू इच्छितो पण त्याला तसे करता येत नाही कारण त्यासाठी जिथे प्रकल्प उभारला पाहिजे ती जागा दुसऱ्या प्रांतात आहे..
ज्याला या प्रकल्पात रुची नाही किंवा त्याकडे निधी नाही. प्रांतीय स्वायत्ततेच्या नावाखाली अशा प्रकल्पाना असहकार्य करण्याचे प्रकार देखील होऊ शकतात" असे ते म्हणाले होते.
यासाठी कायद्यांमधे बदल करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ.आंबेडकरांनी सुचवले होते.
संविधान तयार करताना डॉ.आंबेडकर संविधान सभेत मसुदा समितीचे अध्यक्ष होते. देशाच्या वॉटर पॉलिसी बाबत चे त्यांचे अनुभव, विचार, प्रशासकीय-प्रांतीय समस्यांवर त्यांच्या भूमिका या देशाच्या संविधानात परावर्तित होणे अपेक्षितच होते.
संविधानाचे अनुच्छेद 262 हे आंतरराज्यीय नद्यांच्या पाण्यासंबंधी तंट्याबाबत आहे ज्यानुसार संसद कायद्याद्वारे आंतरराज्यीय नदीच्या किंवा नदीखोऱ्यातील पाण्याच्या वापर, वाटप, नियंत्रण याबाबत असल्याने तक्रारीकरिता अभिनिर्णय करू शकते.
सातव्या अनुसूचित केंद्र-राज्य यांमध्ये विषय विभागून दिलेलं आहेत. डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या द्राफ्ट कॉन्स्टिट्युशन मधे युनियन लिस्ट मधे 74 क्रमांकचा विषय होता "डेव्हलपमेंट ऑफ इंटर-स्टेट वॉटरवेज् फॉर फ्लड कंट्रोल, इरिगेशन & हायड्रो पॉवर"
चर्चेच्या वेळी यात डॉ.आंबेडकरांनी सुधारणा मांडली आणि जी स्वीकारली गेली व संविधानाचा भाग आहे ती म्हणजे केंद्रीय सूची एन्ट्री क्र. 56 म्हणजे 'जनहितार्थ, कायद्याद्वारे संसदेने केलेल्या कायद्याच्या अधीन, अंतरराज्यीय नदीचे व नदीखोऱ्याचे रेग्युलेशन आणि डेव्हलपमेंट".
राज्यसूची मधे एंट्री 17 आहे 'जल,जलपूरवठा,ड्रेनेज, जलसाठे,कालवे,सिंचन'. ही एन्ट्री केंद्र सुचीच्या एन्ट्री 56 शी सब्जेक्टिव्ह आहे. इलेक्ट्रिसिटी हा विषय समवर्ती सूची मधे आहे. या संविधानिक तरतुदीच्या आधारे संसदेने इंटर स्टेट वॉटर डिस्प्युट ऍक्ट 1956 व रिव्हर बोर्ड ऍक्ट 1956..
हे दोन महत्वाचे कायदे केले. पहिला कायदा आंतरराज्यातील नद्यांच्या पाण्याचे वाद सोडवण्यासाठी तर दुसरा आंतरराज्यातील नद्यांचे रेग्युलेशन व डेव्हलपमेंट साठी बोर्ड स्थापन करण्याबाबत आहे.
जलव्यवस्थापनात डॉ.आंबेडकरांचे अजून एक महत्त्वाचे योगदान म्हणजे केंद्रीय जल आयोग.
1945 साली स्थापन झालेला हा आयोग जलशक्ती मंत्रालय अंतर्गत येतो. याची संकल्पना डॉ.आंबेडकरांनी व्हाईसरॉय कौन्सिल मधे मांडली होती. हा आयोग पाण्याशी संबधीत जलव्यवस्थापन, पूरनियंत्रण, सिंचन अशा विविध गोष्टींवर राज्यांना सहकार्य करतो.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कामगारांच्या अधिकारांचे, त्यांच्या हिताचे खंदे पुरस्कर्ते होते. कामगारांचे हिताचे जतन व्हावे आणि त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी त्यांनी 1936 मधे स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. कामगार पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांनी कामगारांच्या..
वेल्फेअरसाठी अनेक मुद्दे मांडले होते.
1938 साली मुंबई असेंम्बली मधे डॉ. आंबेडकरांनी इंडस्ट्रीयल डिसप्युट विधेयकाला विरोध केला ज्यात संप पुकारने बेकायदेशीर असेल अशी तरतूद होती. त्यावेळी असेंम्बली मधे बोलताना आंबेडकर म्हणाले होते कि 'संप पुकारने हा काही क्रिमिनल ओफेन्स नाही..
यासाठी कामगारांना शिक्षा देणे म्हणजे त्यांना गुलाम बनवण्यासारखे आहे". या कायद्याच्या विरोधात स्वतंत्र पक्षाने मुंबईत संप केला होता.
1942-46 या काळात डॉ.आंबेडकर हे व्हाइसरॉयच्या कौन्सिल मधे कामगार मंत्री होते. 1943 साली डॉ.आंबेडकरांनी ट्रेड युनियन सुधारणा विधेयक सभागृहात मांडले.
9 डिसेंबर 1948 रोजी संविधान सभेत मूलभूत हक्कांवरील चर्चेदरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते कि
"जर मला असे विचारले कि या संविधानातील सर्वात महत्वाचा, ज्याच्याशिवाय हे संविधान निरर्थक आहे, असा अनुच्छेद कोणता तर माझे उत्तर असेल..
अनुच्छेद 32. अनुच्छेद 32 हा संविधानाचा आत्मा आहे, संविधानाचे ह्रदय आहे"
डॉ.आंबेडकरांनी अनुच्छेद 32 ला एवढे महत्वाचे का म्हंटले असावे याचे कारण म्हणजे अनुच्छेद 32 चा संबंध हा संविधानाने दिलेल्या सगळ्या मूलभूत मानवी हक्कांशी आहे, त्यांच्या अस्तित्वाशी आहे.
आपल्या माहिती आहे त्याप्रमाणे संविधानाच्या तिसऱ्या भागात अनुच्छेद 14 ते 32 मधे नागरिकांसाठी मूलभूत हक्क दिलेले आहेत. त्यात समानतेचा हक्क, स्वातंत्र्यचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक-शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपायांचा हक्क यांचा समावेश होतो
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका कर्त्यांच्या वतीने काल संविधानपिठासमोर युक्तिवाद करण्यात आला होता. आज त्याच युक्तिवादात अजून काही मुद्दे मांडण्यात आले.
आज मांडलेले काही ठळक मुद्दे थोडक्यात :
ज्येष्ठ वकिल श्याम दिवाण :-
- 102व्या घटनादुरुस्ती नंतर SEBC वर्ग ठरवण्याची विशिष्ट प्रक्रिया देण्यात आलेली आहे.
- गव्हर्नरच्या सल्ल्याने राष्ट्रपती SEBC बाबत नोटिफिकेशन काढू शकतात. 102व्या दुरुस्तीनंतर केवळ राष्ट्रपतीच राज्यपालांच्या सल्ल्याने SEBC वर्ग ठरवू शकतात.
- राज्य अनु.15(4) मधे SEBC वर्गासाठी विशेष तरतूद करू शकते मात्र SEBC वर्ग ठरवण्यासाठी अनु.342A नुसार राष्ट्रपतीच्या नोटिफिकेशनची गरज आहे.
- या प्रकरणात राष्ट्रपतीचे कोणतेही नोटिफिकेशन नाही, राज्यपालांचा सल्ला किंवा राष्ट्रीय आयोगाचा सल्ला घेण्यात आलेला नाही.
मराठा आरक्षणाच्या वैधते संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. गेल्या सुनावणीत कोर्टाने इतर राज्यांना नोटीस इश्यु केल्या होत्या. केरळ, हरियाना, राजस्थान, तामिळनाडू या राज्यांना त्यांचे उत्तर दाखल करण्यास..
वेळ देण्यात आला आहे. आज आरक्षनाला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद केला. त्यांच्यावतीने ज्येष्ठ वकिल अरविंद दातार व श्याम दिवाण यांनी युक्तिवाद केला.
अरविंद दातार यांनी मांडलेले काही ठळक मुद्दे :-
- इंद्रा साहनी केस मधील निर्णयाच्या योग्यतेवर इतर कोणत्याही केस मधे शँका घेण्यात आलेली नाही.
- साहनी केस मधे 27% OBC आरक्षण हे 6:3 अशा निर्णयाने वैध ठरवण्यात आले होते. त्यातील 8/9 न्यायाधीशांनी 50% मर्यादा व क्रिमी लेयरच्या बाजूने मत दिले होते.
सर तुम्ही 'राज्यघटना' आणि 'कायदा' यात गल्लत करत आहात. तुमचे म्हणणे होते कि 'राज्यघटना' तयार करताना मनुस्मृतीचा देखील आधार घेतला होता. आता तुम्ही जी उदाहरणे देत आहात ती हिंदू कोड बिलच्या संदर्भात आहेत. हिंदू कोड बिल एकत्रित 4(+) महत्वाचे कायदे आहेत जे हिंदू(+) धर्मातील लोकांचे +
लग्न,घटस्पोट, वारसाहक्क ई. गोष्टींचे नियमन करतात. असाच मुस्लिम लोकांसाठी मुस्लिम पर्सनल लॉ आहे, शीख लोकांसाठी आनंद मॅरेज ऍक्ट आहे, पारसी लोकांसाठी पारसी मॅरेज & डायवोर्स ऍक्ट आहे. हे सगळे पर्सनल लॉ रेग्युलेट करणारे कायदे त्या त्या धर्माच्या परंपरा, पौराणिक ग्रंथ, धार्मिक ग्रंथ +
रूढी ई. गोष्टींवर आधारित आहेत. सहाजिकच हिंदू कोड बिल चा आधार देखील हिंदू समाजाच्या जुन्या ग्रंथामधे असेल. त्यामुळे हिंदु कोड बिल तयार करताना त्यावर चर्चा होणे, त्याचे संदर्भ येणे देखील सहाजिक गोष्ट आहे. पण हिंदू कोड बिल म्हणजे राज्यघटना नव्हे, तो एक कायदा आहे.
26 जानेवारीला दिल्ली येथे झालेली हिंसा व त्या अनुषंगाने पुढे आलेल्या टूलकीट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट दिशा रवी ला काल दिल्ली येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला. मिडियाने या टूलकीट प्रकरणाचा आणि दिशा रवी हिच्या अटकेचा बराच..
गाजावाजा केला. दिशा ला बेल देण्याच्या निर्णयात न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी अनेक महत्वाची निरिक्षणे नोंदवली आहेत.
दिशा ला दिल्ली पोलिसांनी 13 तारखेला बँगलोर मधुन अटक केली होती. दंगा करण्यास प्रोत्साहन देणे(153), वैमनस्य पसरवणे(153A) आणि सेडिशन म्हणजेच देशद्रोह असे आरोप...
तिच्यावर लावण्यात आले आहेत.
दिशा रवीच्या जामीनाला विरोध करताना अतिरिक्त सॉलिसिटर (ASG) यांनी बाजू मांडली कि सदर केस हि टूलकिट बनवणाऱ्या लोकांविरुद्ध दाखल करण्यात आलेली आहे. सरकारविरुद्ध असंतोष पसरवण्याच्या उद्देशाने सदर टूलकिट बनवले व शेअर केले गेले असून त्याचा संबंध..