26 जानेवारीला दिल्ली येथे झालेली हिंसा व त्या अनुषंगाने पुढे आलेल्या टूलकीट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट दिशा रवी ला काल दिल्ली येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला. मिडियाने या टूलकीट प्रकरणाचा आणि दिशा रवी हिच्या अटकेचा बराच..
गाजावाजा केला. दिशा ला बेल देण्याच्या निर्णयात न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी अनेक महत्वाची निरिक्षणे नोंदवली आहेत.
दिशा ला दिल्ली पोलिसांनी 13 तारखेला बँगलोर मधुन अटक केली होती. दंगा करण्यास प्रोत्साहन देणे(153), वैमनस्य पसरवणे(153A) आणि सेडिशन म्हणजेच देशद्रोह असे आरोप...
तिच्यावर लावण्यात आले आहेत.
दिशा रवीच्या जामीनाला विरोध करताना अतिरिक्त सॉलिसिटर (ASG) यांनी बाजू मांडली कि सदर केस हि टूलकिट बनवणाऱ्या लोकांविरुद्ध दाखल करण्यात आलेली आहे. सरकारविरुद्ध असंतोष पसरवण्याच्या उद्देशाने सदर टूलकिट बनवले व शेअर केले गेले असून त्याचा संबंध..
फुटीरतावादी लोकांसोबत देखील आहे. या टूलकीट मधे समाजात वैमनस्य पसरवले जाईल अश्या स्वरूपाची आक्षेपार्ह माहिती-लिंक्स यामध्ये होत्या. पुढे तपासात असे समजले कि सदर टूलकीट फुटीरतावादी ग्रुप पॉएटिक जस्टीस फाउंडेशन (PJF)ने तयार केले होते. दिशा रविकडे सदर टूलकीट एडिट करण्याचे राईट्स होते
तिने एक वॉट्सप ग्रुप बनवला होता ज्यात तिच्यासोबत इतर काही लोकांचा समावेश होता. 11 जानेवारीला एक झूम मीटिंग केली गेली ज्यात दिशा, सहआरोपी निकिता जेकब,शांतून, धालीवाल & अंकिता लाल (PJF चे संस्थापक) व इतर 60-70 लोक उपस्थित होते. या मीटिंग नंतर पूढे टूलकिट बनवण्यात आले.
पोलिसांच्या चौकशीत दिशाने वॉट्सप ग्रुप डिलीट केल्याचे सांगितले, ज्यात टूलकिट बनवण्याच्या बाबतीत महत्वाची माहिती होती,त्यामुळे हि गंभीर बाब आहे. दिशाकडून वॉटसप ग्रुप रिकव्हर करायचा आहे, तिची निकिता जेकब व शंतनू सोबत एकत्रित चौकशी करायची आहे आणि तिला सोडल्यास ती पुराव्यांसोबत..
छेडछाड करण्याची शक्यता असल्यामुळे तिला जामीन देण्यात येऊ नये अशी मागणी ASG यांनी कोर्टापुढे केली होती.
न्यायाधीशांनी ASG यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांचा सविस्तर विचार केलेला आहे. न्यायाधीशांनी म्हंटले आहे कि यात सगळ्यात मूळ मुद्दा हा आहे कि दिशा हि केवळ कृषी...
कायद्यांविरोधातील शांतीपूर्वक आंदोलनात सहभागी होती कि आंदोलनाच्या अडून देशविघातक कृत्यांमधे सामील होती.
ASG यांच्या म्हणण्याप्रमाणे 26 तारखेला झालेली हिंसा आणि दिशा यांचा थेट संबंध जोडणारा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. ASG यांच्यानुसार दिशा चे कृत्य हा मोठ्या कॉनस्पर्सी चा..
भाग असल्याचे दिसून येते. मुंबई उच्च न्यायालयाने अरुण गवळी प्रकरणात म्हंटले आहे की कॉनस्पर्सी हि केवळ अनुमान च्या आधारे सिद्ध केली जाऊ शकत नाही, त्यासाठी सबळ पुरावे असणे आवश्यक आहे. त्यामुळे कॉनस्पर्सीच्या आरोपांचा विचार करताना पोलिसांनी आतापर्यंत तपासात काय मटेरियल प्राप्त केले..
याचा विचार करावा लागेल. या आरोपाची न्यायाधीशांनी सविस्तर चिकित्सा केली आहे. फुटीरतावादी लोकांसोबत संबंध याबाबत न्यायाधीशांनी म्हटले आहे कि दिशाच्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे PJF हि बंदी घातलेली संस्था नाही व त्यांच्या संस्थापकविरुद्ध कुठली फौजदारी कारवाई प्रलंबित नाही.
दिशा व धालीवल-अंकिता लाल (PJF) यांचे थेट संबंध प्रस्थापित करणारे पुरावे नाहीत. दिशा किंवा PJF यांच्यातर्फे 26 तारखेला हिंसेचे आवाहन-प्रोत्साहन देण्यात आले होते असे काही दर्षवणारे मटेरियल देखील नाही.
संशयास्पद लोकांसोबत केवळ संबंध असणे यापेक्षा त्यांचा हेतू हा जास्त महत्वाचा...
फॅक्टर आहे. संशयास्पद पार्श्वभूमी असलेल्या लोकांचा अनेकांशी संवाद असू शकतो. जोपर्यंत असे संबंध कायद्याच्या चौकटीत आहेत तोपर्यंत अश्या व्यक्तींशी जाणते-अजाणतेपणाने संवाद साधणाऱ्या लोकांना दोषी मानले जाऊ शकत नाही. दिशा चा PJF सोबत मिळून 26 तारखेला हिंसा करण्याचा हेतू होता याबाबत..
कोणताही सबळ पुरावा नसताना केवळ तीने त्यांच्यासोबत zoom मीटिंग केली याच्या आधारे तीचा PJF ला पाठिंबा आहे असे गृहीत धरले जाऊ शकत नाही. 26 तारखेला हिंसा करणाऱ्या लोकांचा आणि दिशा किंवा PJF यांचा काही संबध जोडणारा कसलाच पुरावा कोर्टासमोर सादर करण्यात आलेला नाही.
पुढे टूलकिट बाबत न्यायाधीशांनी म्हंटले आहे कि त्या मधे कुठल्याही हिंसेबाबत आवाहन करण्यात आलेले नव्हते. लोकशाही मधे नागरिक हे सरकारचे Conscience keepers असतात. केवळ सरकारच्या पॉलिसीज बाबत असहमती दर्शवली म्हणून त्यांना तुरुंगात टाकले जाऊ शकत नाही.
असहमती,विरोधीमत, डिसेंट, मतांतरे हि सरकारच्या पॉलिसीज् मधे वस्तुनिष्ठता आणण्याची साधने आहेत. उदासीन व विनम्र नागरीकांपेक्षा जागरूक व खंबीर नागरिक असणे हे निःसंशयपणे हेल्दी व वायब्रंट लोकशाहीचे लक्षण आहे.
आपल्या देशाच्या संस्थापकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क...
स्विकारत मतमतांतरे असण्याबद्दल आदर व्यक्त केलेला आहे. राईट टू डिसेंट हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा भाग आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यमधे ग्लोबल प्रेक्षकांचा देखील समावेश होतो. संवादासाठी कोणत्याही भौगोलिक मर्यादा नसतात. कायद्याच्या चौकटीत राहून संवादाची सर्वोत्तम साधने वापरण्याचा..
हक्क आहे ज्यात ग्लोबल ऑडियन्स चा देखील समावेश होतो.
दिशाने वॉट्सप ग्रुप बनवला व नंतर डिलीट केला ज्याद्वारे तिचा टूलकीट व PJF सोबत असलेले संबंध याबाबतचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. यावर कोर्टाने म्हंटले आहे कि वॉट्सप ग्रुप बनवणे किंवा निरुपद्रवी..
टूलकिटची एडिटर असणे हा गुन्हा नाही. तसेच दिशाचे टूलकिट किंवा PJF सोबत असलेले लिंक यात काही आक्षेपार्ह नसल्याने टूलकिट-PJF या अनुषंगाने पुरावे नष्ट करण्यासाठी वॉट्सप चॅट डिलीट करणे हे सुद्धा अर्थहीन ठरते.
दिशा रवी व इतरांनी मिळून आंदोलनाच्या अडून भारतीय दूतावासांची तोडफोड..
करण्याचे निश्चित केल्याचा आरोप करण्यात आला मात्र कुठल्याही भारतीय दूतावास समोर अशी कोणती हिंसा झाल्याची माहिती-पुरावा नाही. हे खरे आहे कि तपास सुरुवातीच्या टप्प्यात आहे, पोलिसांनी त्यांच्याकडे उपलब्ध माहितीच्या आधारे तिला अटक केली, मात्र केवळ अनुकूल शक्यतांच्या( propitious
Anticipation) आधारे अधिक काळ लिबर्टीवर बंधने घातली जाऊ शकत नाहीत.
कोर्टासमोर आलेले अपुरे व अर्धवट (Scanty & Scketchy) पुरावे लक्षात घेता, कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या दिशा रवी ला जामीन नाकारण्याचे कोणतेही कारण नाही.
त्यामुळे १-१ लाख रुपयांचे दोन पर्सनल बॉण्ड व..
तपासात सहकार्य करण्याच्या तसेच विनापरवानगी देश न सोडण्याच्या अटीवर दिशा रवीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे !
सेडिशन सारख्या कायद्यांचा अवाजवी वापर आणि नागरिकांचा डिसेंट ओपिनियनचा अधिकार या अनुषंगाने हा एक महत्वाचा निर्णय आहे !
सर तुम्ही 'राज्यघटना' आणि 'कायदा' यात गल्लत करत आहात. तुमचे म्हणणे होते कि 'राज्यघटना' तयार करताना मनुस्मृतीचा देखील आधार घेतला होता. आता तुम्ही जी उदाहरणे देत आहात ती हिंदू कोड बिलच्या संदर्भात आहेत. हिंदू कोड बिल एकत्रित 4(+) महत्वाचे कायदे आहेत जे हिंदू(+) धर्मातील लोकांचे +
लग्न,घटस्पोट, वारसाहक्क ई. गोष्टींचे नियमन करतात. असाच मुस्लिम लोकांसाठी मुस्लिम पर्सनल लॉ आहे, शीख लोकांसाठी आनंद मॅरेज ऍक्ट आहे, पारसी लोकांसाठी पारसी मॅरेज & डायवोर्स ऍक्ट आहे. हे सगळे पर्सनल लॉ रेग्युलेट करणारे कायदे त्या त्या धर्माच्या परंपरा, पौराणिक ग्रंथ, धार्मिक ग्रंथ +
रूढी ई. गोष्टींवर आधारित आहेत. सहाजिकच हिंदू कोड बिल चा आधार देखील हिंदू समाजाच्या जुन्या ग्रंथामधे असेल. त्यामुळे हिंदु कोड बिल तयार करताना त्यावर चर्चा होणे, त्याचे संदर्भ येणे देखील सहाजिक गोष्ट आहे. पण हिंदू कोड बिल म्हणजे राज्यघटना नव्हे, तो एक कायदा आहे.
केंद्र सरकारने गेल्या अधिवेशनात आणलेल्या नव्या शेती कायद्यावरून सध्या गदारोळ सुरू आहे. अनेक राज्यांमधील शेतकरी करत याविरोधात आंदोलन आहेत विशेषतः पंजाब व हरियाणा ! या थ्रेड मधे कृषी कायदे आणि केंद्र व राज्यसरकार यांचे वेगवेगळ्या विषयावर...
कायदे करण्याचे अधिकार यावर चर्चा केली आहे. हे कायदे चांगले-वाईट, शेतकऱ्यांना फायद्याचे-तोट्याचे यावर इथे लिहिले नाहीये, त्यावर शेतीबद्दल अनुभव-ज्ञान असलेल्या व्यक्तीने बोलणे योग्य असेल.
केंद्र सरकारने प्रामुख्याने तीन कायदे आणले आहेत. खालील फोटोत त्यातील संक्षिप्त तरतुदी आहेत.
यातील पहिल्या कायद्यात शेतकऱ्यांना त्यांचा माल APMCच्या बाहेर देशभरात कुठेही विकण्यासंदर्भात तरतुदी आहेत. दुसऱ्या कायद्यात शेतकऱ्यांना थेट मोठ्या व्यापाऱ्यांसोबत करार करता येण्यासंदर्भत तरतूदी आहेत तर तिसरा कायदा जीवनावश्यक वस्तु याबाबत आहे.
गेल्या वर्षी 22 नोव्हेंबरच्या रात्री व 23च्या पहाटेपर्यंत फडणवीस व अजित दादा यांच्यासोबत राज्यपाल, पंतप्रधान, होम सेक्रेटरी व राष्ट्रपती ई. सगळे उच्चस्थरिय प्रशासन जागे होते.
12 नोव्हेंबर पर्यंत कुणीही सरकार स्थापन करायच्या स्थितीत
नसल्यामुळे राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकार ला केली. असा प्रस्ताव आल्या नंतर कॅबिनेट ची बैठक होऊन त्यावर निर्णय घेतला जातो व राष्ट्रपतींकडे तशी शिफारस केली जाते. मग राष्ट्रपती अनुच्छेद 356 अंतर्गत संबंधीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू..
करण्याचे आदेश काढतात. राष्ट्रपती राजवट काढून घेताना सुद्धा अशाच प्रकारची प्रोसिजर फॉलो केली जाते. फरक इतकाच कि राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा आदेश दोन महिन्यात संसदेत मंजूर करून घ्यावा लागतो, मात्र राष्ट्रपती राजवट काढून घेण्यासाठी संसदेच्या मंजुरीची गरज नसते.
केरळ सरकारने प्रस्तावित केलेल्या पोलीस ऍक्ट अमेंडमेंट अध्यादेशावर राज्यपलांनी स्वाक्षरी केल्याची बातमी आहे.
या नव्या कायद्याद्वारे केरळ पोलीस ऍक्ट मधे 118A हि नवी तरतूद समाविष्ट होईल ज्यात कुठल्याही माध्यमाद्वारे धमकी, Abusive, मानहानी,अपमान करण्याबद्दल 3 वर्षे
तुरूंगवासाची शिक्षा किंवा 10 हजार दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा असेल असे सांगण्यात आले आहे. प्रथमदर्शनी हा कायदा IT ACT 66A आणि पूर्वीच्या केरळ पोलीस ऍक्ट मधील 118D या तरतूदी सारखाच दिसतो आहे. श्रेया सिंघल निर्णयामधे सर्वोच्च न्यायालयाने 66A व 118D या दोन्ही तरतूदिंना +
अस्पष्ट, अती व्यापक व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन करणारे आहेत म्हणुन घटनाबाह्य ठरवले होते.
प्रथमदर्शनी 118A हे काहीशा बदलांसाहित आणलेले 66A चे नवीन व्हर्जन दिसत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अशाप्रकारे स्टेट कंट्रोल आणणे व सोशल मीडियातील कंटेंटला..
काल मीरा-भाईंदर येथील 'अपक्ष' आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीत त्या अपक्ष उमेदवार म्हणुन निवडून आलेल्या आहेत. पुढे त्या भाजपच्या सहयोगी सदस्या झाल्या.
इथे अपक्ष सदस्य आणि पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदी..
याबद्दल सविस्तर माहिती बघूया.
पाहिली गोष्ट म्हणजे सहयोगी सदस्य अशी कुठली गोष्ट घटनेत किंवा कुठल्या कायद्यात नाहीये. काही सदस्य अपक्ष म्हणुन निवडणूक लढवतात, निवडून येतात आणि संख्याबळ व धोरण ई. बाबींच्या आधारे कुठल्यातरी प्रस्थापित पक्षाला वेळोवेळी समर्थन देत असतात..
अश्या सदस्यांना त्या पक्षाचे सहयोगी सदस्य म्हंटले जाते.
मुळात निवडून आल्यानंतरचे कुठलेही पक्षांतर हे त्या उमेदवाराला पक्ष बघून किंवा अपक्ष म्हणून मत देणाऱ्या मतदारांची फसवणूक असते आणि कुठलेही पक्षांतर हे राजकिय लोकशाहीसाठी चुकीचा पायंडा पाडत असते !
CBI चा उगम बघायचा झाला तर तो स्पेशल पोलीस एस्टेब्लिशमेंट जी 1941 मधे स्थापन झाली त्यात सापडतो. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार आणि लाचखोरीची अनेक प्रकरणे समोर आली होती त्यांचा तपास करण्यासाठी वॉर डिपार्टमेंट अंतर्गत हा विभाग तयार करण्यात आला
होता. युद्ध संपल्यानंतरही या विभागाची गरज भासू लागली म्हणून 1946 दिल्ली स्पेशल पोलीस एस्टेब्लिशमेंट ऍक्ट पारित करण्यात आला. या ऍक्ट मुळे हा विभाग गृहखात्याकडे आला आणि केंद्र सरकारचे इतर सर्व खाते, विभाग यांच्या कार्यक्षेत्रात आले. राज्यांमधेही त्यांच्या संमतीने काम करण्याची..
परवानगी होती. 1963 साली या विभागाला सेंट्रल इन्वेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच CBI हे नाव मिळाले. सुरुवातीला CBI चे कार्यक्षेत्र हे केंद्र सरकारचे अधिकारी कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्या केसेस पुरतचं मर्यादित होतं. पुढे त्यात केंद्र सरकारच्या कंपन्याना समाविष्ट करण्यात आले. बँकांच्या