सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका कर्त्यांच्या वतीने काल संविधानपिठासमोर युक्तिवाद करण्यात आला होता. आज त्याच युक्तिवादात अजून काही मुद्दे मांडण्यात आले.
आज मांडलेले काही ठळक मुद्दे थोडक्यात :
ज्येष्ठ वकिल श्याम दिवाण :-
- 102व्या घटनादुरुस्ती नंतर SEBC वर्ग ठरवण्याची विशिष्ट प्रक्रिया देण्यात आलेली आहे.
- गव्हर्नरच्या सल्ल्याने राष्ट्रपती SEBC बाबत नोटिफिकेशन काढू शकतात. 102व्या दुरुस्तीनंतर केवळ राष्ट्रपतीच राज्यपालांच्या सल्ल्याने SEBC वर्ग ठरवू शकतात.
- राज्य अनु.15(4) मधे SEBC वर्गासाठी विशेष तरतूद करू शकते मात्र SEBC वर्ग ठरवण्यासाठी अनु.342A नुसार राष्ट्रपतीच्या नोटिफिकेशनची गरज आहे.
- या प्रकरणात राष्ट्रपतीचे कोणतेही नोटिफिकेशन नाही, राज्यपालांचा सल्ला किंवा राष्ट्रीय आयोगाचा सल्ला घेण्यात आलेला नाही.
कोर्टाने दिवाण यांना विचारणा केली कि NCBC ऍक्ट मधे "सेंट्रल लिस्ट" हा शब्द आहे त्याचे इंटरप्रिटेशन कसे करणार ?
यावर दिवाण यांनी उत्तर दिले कि सेंट्रल असो वा स्टेट लिस्ट 102व्या दुरुस्ती नंतर SEBC वर्ग ठरवण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आलेली आहे. यामुळे आतापर्यंत जे चालू आहे..
त्यात बदल होईल असे म्हणता येणार नाही पण 102व्या दुरुस्ती नंतर SEBC वर्ग ठरवण्याची प्रक्रिया सेन्ट्रालाईज करण्यात आलेली आहे.
102व्या दुरुस्ती नंतर राज्य आयोगाचे अधिकार अबाधित राहतात का असा प्रश्न कोर्टाने केला. त्यावर दिवाण यांनी उत्तर दिले कि SEBC वर्ग ओळखने हे दोन गोष्टी साठी..
आहे. SEBC लिस्ट मधे एखादा वर्ग समाविष्ट करण्यासाठी 342A च्या प्रक्रियेचा आधार घ्यावा लागेल, दुसरी गोष्ट म्हणजे लिस्ट रिव्ह्यू करणे किंवा त्यातून एखादा वर्ग वगळणे हे काम राज्य आयोग करू शकतो. SEBC लिस्ट मधे समावेश हा मात्र अनु.342A द्वारेच होऊ शकतो.
यानंतर गोपाल शँकरनारायण यांनी काही मुद्दे मांडले :
- 342A मधे SEBC वर्ग ओळखण्यासाठी सविस्तर प्रक्रिया दिलेली आहे. राज्यांचा सहभाग वगळण्यात आलेला नाही, राज्यपालांचा सल्ला म्हणजेच राज्यांचा सल्ला.
- 102व्या दुरुस्ती यापुढे नंतर एकच लिस्ट असणे अपेक्षित आहे. साहनी केस मधे राज्यांना..
आयोग तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते, त्यातून मार्ग काढण्यासाठी सेंट्रल शब्दाचा वापर करण्यात आला आहे.
- अनु.338B नुसार SEBCबद्दल च्या कोणत्याही पॉलिसी डिसीजन साठी राष्ट्रीय आयोगाचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. याठिकाणी असा सल्ला घेण्यात आला होता का ?
- 342A मुळे राज्यांच्या अधिकारांवर काही परिणाम होतो का...नाही. 342A फक्त SEBC वर्गाच्या आयडेंटिफिकेशन बद्दल आहे, राज्याचे इतर अधिकार तसेच राहतात.
- 342A द्वारे फेडरल प्रणालीबाबत विचार करताना यामुळे राज्यांवर काय परिणाम होतो ते बघायला हवे. 342A द्वारे फक्त ती गोष्ट काढण्यात आली
आहे जी कोर्टाने राज्यांना दिली होती ( साहनी केस मधे राज्य आयोग स्थापन करण्यास सांगितले होते) आणि ती राष्ट्रपती व संसद यांच्याकडे दिली आहे.
- राज्यांच्या फेडरल अधिकारांचे हनन होत आहे असे म्हणले जाऊ शकत नाही कारण मुळात याबाबतीत त्यांना कोणतेही फेडरल अधिकार नव्हते.
- 102वी दुरुस्ती ही मागासवर्गीयांच्या आरक्षण बाबत एकसंधपणा यावा यासाठी आहे. SC, ST बाबत एकच लिस्ट आणि OBC बाबत दोन लिस्ट हे विसंगती दूर करण्यासाठी ही दुरुस्ती करण्यत आली आहे.
- अनु.338B नुसार राष्ट्रीय आयोगाचे कार्य व सोबत अनु.342A, 366 व 341,342 यांचा एकत्रित विचार केला तर असे
लक्षात येते कि SEBC वर्ग ठरण्याचे अधिकर हे केवळ राष्ट्रपती व संसद यांनाच आहेत.
- इंद्रा साहनी केसचा पुनर्विचार करण्याची गरज नाही. त्या निर्णयात कोणतीही चूक असल्याचे कुठेही दाखवण्यात आलेली नाही. EWS चे बघितल्यास 103व्या दुरुस्तीद्वारे त्याचे अधिकार अनु.15(6) & 16(6) मधून येतात.
यानंतर एडव्होकेट प्रदीप संचेती यांनी गायकवाड आयोगाबद्दल मुद्दे मांडले :
- गायकवाड आयोगावर तीन मूलभूत बाबींमध्ये आक्षेप आहेत. डेटा सॅम्पल साईज, Analysis of Data आणि Methodology of Data collection.
- आयोगाने मुंबईतील एकाही व्यक्तीची मुलाखत घेतलेली नाही जिथे शिक्षण,कॉलेज व जॉब सर्वाधिक आहेत. राज्याची राजधानी पूर्णपणे वगळण्यात आलेली आहे. फक्त राज्याचा अतिमागास भागातूनच डेटा गोळा केला जाईल असे म्हणू शकतो का ?
- एका दुसऱ्या समितीने हि मराठा समाज मागास असल्याचा निष्कर्ष काढला..
होता. मात्र मुंबई हायकोर्टाने हा निष्कर्ष फेटाळून लावला कारण रिपोर्टचा सॅम्पल साईल कमी होता. (राणे कमिटी)
- हिच गोष्ट गायकवाड आयोगाला सुद्धा लागू होते. इथेहि सॅम्पल साईज अतिशय कमी आहे. त्यामुळे यातून मराठा समाजची खरी परिस्थिती दर्शवण्यात आली आहे असे म्हणता येणार नाही.
To be continued...
उद्या पुन्हा याचिकाकर्त्यांतर्फे उर्वरित युक्तिवाद केला जाईल....
साभार : LiveLaw + Bar&Bench
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मराठा आरक्षणाच्या वैधते संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. गेल्या सुनावणीत कोर्टाने इतर राज्यांना नोटीस इश्यु केल्या होत्या. केरळ, हरियाना, राजस्थान, तामिळनाडू या राज्यांना त्यांचे उत्तर दाखल करण्यास..
वेळ देण्यात आला आहे. आज आरक्षनाला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद केला. त्यांच्यावतीने ज्येष्ठ वकिल अरविंद दातार व श्याम दिवाण यांनी युक्तिवाद केला.
अरविंद दातार यांनी मांडलेले काही ठळक मुद्दे :-
- इंद्रा साहनी केस मधील निर्णयाच्या योग्यतेवर इतर कोणत्याही केस मधे शँका घेण्यात आलेली नाही.
- साहनी केस मधे 27% OBC आरक्षण हे 6:3 अशा निर्णयाने वैध ठरवण्यात आले होते. त्यातील 8/9 न्यायाधीशांनी 50% मर्यादा व क्रिमी लेयरच्या बाजूने मत दिले होते.
सर तुम्ही 'राज्यघटना' आणि 'कायदा' यात गल्लत करत आहात. तुमचे म्हणणे होते कि 'राज्यघटना' तयार करताना मनुस्मृतीचा देखील आधार घेतला होता. आता तुम्ही जी उदाहरणे देत आहात ती हिंदू कोड बिलच्या संदर्भात आहेत. हिंदू कोड बिल एकत्रित 4(+) महत्वाचे कायदे आहेत जे हिंदू(+) धर्मातील लोकांचे +
लग्न,घटस्पोट, वारसाहक्क ई. गोष्टींचे नियमन करतात. असाच मुस्लिम लोकांसाठी मुस्लिम पर्सनल लॉ आहे, शीख लोकांसाठी आनंद मॅरेज ऍक्ट आहे, पारसी लोकांसाठी पारसी मॅरेज & डायवोर्स ऍक्ट आहे. हे सगळे पर्सनल लॉ रेग्युलेट करणारे कायदे त्या त्या धर्माच्या परंपरा, पौराणिक ग्रंथ, धार्मिक ग्रंथ +
रूढी ई. गोष्टींवर आधारित आहेत. सहाजिकच हिंदू कोड बिल चा आधार देखील हिंदू समाजाच्या जुन्या ग्रंथामधे असेल. त्यामुळे हिंदु कोड बिल तयार करताना त्यावर चर्चा होणे, त्याचे संदर्भ येणे देखील सहाजिक गोष्ट आहे. पण हिंदू कोड बिल म्हणजे राज्यघटना नव्हे, तो एक कायदा आहे.
26 जानेवारीला दिल्ली येथे झालेली हिंसा व त्या अनुषंगाने पुढे आलेल्या टूलकीट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट दिशा रवी ला काल दिल्ली येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला. मिडियाने या टूलकीट प्रकरणाचा आणि दिशा रवी हिच्या अटकेचा बराच..
गाजावाजा केला. दिशा ला बेल देण्याच्या निर्णयात न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी अनेक महत्वाची निरिक्षणे नोंदवली आहेत.
दिशा ला दिल्ली पोलिसांनी 13 तारखेला बँगलोर मधुन अटक केली होती. दंगा करण्यास प्रोत्साहन देणे(153), वैमनस्य पसरवणे(153A) आणि सेडिशन म्हणजेच देशद्रोह असे आरोप...
तिच्यावर लावण्यात आले आहेत.
दिशा रवीच्या जामीनाला विरोध करताना अतिरिक्त सॉलिसिटर (ASG) यांनी बाजू मांडली कि सदर केस हि टूलकिट बनवणाऱ्या लोकांविरुद्ध दाखल करण्यात आलेली आहे. सरकारविरुद्ध असंतोष पसरवण्याच्या उद्देशाने सदर टूलकिट बनवले व शेअर केले गेले असून त्याचा संबंध..
केंद्र सरकारने गेल्या अधिवेशनात आणलेल्या नव्या शेती कायद्यावरून सध्या गदारोळ सुरू आहे. अनेक राज्यांमधील शेतकरी करत याविरोधात आंदोलन आहेत विशेषतः पंजाब व हरियाणा ! या थ्रेड मधे कृषी कायदे आणि केंद्र व राज्यसरकार यांचे वेगवेगळ्या विषयावर...
कायदे करण्याचे अधिकार यावर चर्चा केली आहे. हे कायदे चांगले-वाईट, शेतकऱ्यांना फायद्याचे-तोट्याचे यावर इथे लिहिले नाहीये, त्यावर शेतीबद्दल अनुभव-ज्ञान असलेल्या व्यक्तीने बोलणे योग्य असेल.
केंद्र सरकारने प्रामुख्याने तीन कायदे आणले आहेत. खालील फोटोत त्यातील संक्षिप्त तरतुदी आहेत.
यातील पहिल्या कायद्यात शेतकऱ्यांना त्यांचा माल APMCच्या बाहेर देशभरात कुठेही विकण्यासंदर्भात तरतुदी आहेत. दुसऱ्या कायद्यात शेतकऱ्यांना थेट मोठ्या व्यापाऱ्यांसोबत करार करता येण्यासंदर्भत तरतूदी आहेत तर तिसरा कायदा जीवनावश्यक वस्तु याबाबत आहे.
गेल्या वर्षी 22 नोव्हेंबरच्या रात्री व 23च्या पहाटेपर्यंत फडणवीस व अजित दादा यांच्यासोबत राज्यपाल, पंतप्रधान, होम सेक्रेटरी व राष्ट्रपती ई. सगळे उच्चस्थरिय प्रशासन जागे होते.
12 नोव्हेंबर पर्यंत कुणीही सरकार स्थापन करायच्या स्थितीत
नसल्यामुळे राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकार ला केली. असा प्रस्ताव आल्या नंतर कॅबिनेट ची बैठक होऊन त्यावर निर्णय घेतला जातो व राष्ट्रपतींकडे तशी शिफारस केली जाते. मग राष्ट्रपती अनुच्छेद 356 अंतर्गत संबंधीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू..
करण्याचे आदेश काढतात. राष्ट्रपती राजवट काढून घेताना सुद्धा अशाच प्रकारची प्रोसिजर फॉलो केली जाते. फरक इतकाच कि राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा आदेश दोन महिन्यात संसदेत मंजूर करून घ्यावा लागतो, मात्र राष्ट्रपती राजवट काढून घेण्यासाठी संसदेच्या मंजुरीची गरज नसते.
केरळ सरकारने प्रस्तावित केलेल्या पोलीस ऍक्ट अमेंडमेंट अध्यादेशावर राज्यपलांनी स्वाक्षरी केल्याची बातमी आहे.
या नव्या कायद्याद्वारे केरळ पोलीस ऍक्ट मधे 118A हि नवी तरतूद समाविष्ट होईल ज्यात कुठल्याही माध्यमाद्वारे धमकी, Abusive, मानहानी,अपमान करण्याबद्दल 3 वर्षे
तुरूंगवासाची शिक्षा किंवा 10 हजार दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा असेल असे सांगण्यात आले आहे. प्रथमदर्शनी हा कायदा IT ACT 66A आणि पूर्वीच्या केरळ पोलीस ऍक्ट मधील 118D या तरतूदी सारखाच दिसतो आहे. श्रेया सिंघल निर्णयामधे सर्वोच्च न्यायालयाने 66A व 118D या दोन्ही तरतूदिंना +
अस्पष्ट, अती व्यापक व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन करणारे आहेत म्हणुन घटनाबाह्य ठरवले होते.
प्रथमदर्शनी 118A हे काहीशा बदलांसाहित आणलेले 66A चे नवीन व्हर्जन दिसत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अशाप्रकारे स्टेट कंट्रोल आणणे व सोशल मीडियातील कंटेंटला..