9 डिसेंबर 1948 रोजी संविधान सभेत मूलभूत हक्कांवरील चर्चेदरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते कि
"जर मला असे विचारले कि या संविधानातील सर्वात महत्वाचा, ज्याच्याशिवाय हे संविधान निरर्थक आहे, असा अनुच्छेद कोणता तर माझे उत्तर असेल..
अनुच्छेद 32. अनुच्छेद 32 हा संविधानाचा आत्मा आहे, संविधानाचे ह्रदय आहे"
डॉ.आंबेडकरांनी अनुच्छेद 32 ला एवढे महत्वाचे का म्हंटले असावे याचे कारण म्हणजे अनुच्छेद 32 चा संबंध हा संविधानाने दिलेल्या सगळ्या मूलभूत मानवी हक्कांशी आहे, त्यांच्या अस्तित्वाशी आहे.
आपल्या माहिती आहे त्याप्रमाणे संविधानाच्या तिसऱ्या भागात अनुच्छेद 14 ते 32 मधे नागरिकांसाठी मूलभूत हक्क दिलेले आहेत. त्यात समानतेचा हक्क, स्वातंत्र्यचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक-शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपायांचा हक्क यांचा समावेश होतो
अनुच्छेद 32 हे घटनात्मक उपायाबाबत आहे.
अनु. 32(1) हे संविधानाच्या तिसऱ्या भागात दिलेल्या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याबाबत आहे.
अनु. 32(2) मधे सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणी साठी निर्देश देण्याचा, आदेश देण्याचा
किंवा Writ इश्यू करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.
प्रत्येक नागरिकाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि माणुस म्हणून अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी संविधानात मूलभूत हक्क दिले गेले आहेत. या हक्कांवर बाधा येत असल्यास सर्वोच्च न्यायालयात ( आणि अनु.226 मधे उच्च न्यायालयात) दाद मागण्याचा..
हक्क नागरिकांना दिलेला आहे जो स्वतःमधे एक मूलभूत हक्क आहे.
अनुच्छेद 32 हे "Ubi jus, ibi remedium" या लॅटिन न्याय तत्वावर आधारित आहे ज्याचा अर्थ होतो "जिथे हक्क आहेत, तिथे उपाय असतात". सोप्या शब्दात म्हणजे जर अंमलबजावणीसाठी, उल्लंघनाविरुद्ध उपाय नसतील तर त्या अधिकारांना काहीही..
अर्थ राहत नाही, ते केवळ कागदोपत्री राहतात.
प्रा.एम.व्ही.पैली यांच्या मते "मूलभूत हक्कांचे डिक्लेरेशन हे निरर्थक आहे जर त्यांच्या अंमलबजावणी साठी योग्य उपाययोजना नसतील." पैली यांच्या मते अनु.32 मुळे मूलभूत हक्कांना 'जिवंत' स्वरूप प्राप्त होते.
जस्टीस पतंजली शास्त्री यांच्या मते "अनु. 32 हि मूलभूत हक्कांसाठीची 'संविधानिक गॅरंटी' आहे".
डॉ.बी.सी.रौट यांच्या मते "अनु. 32 हे सुप्रीम कोर्टाला मूलभूत हक्कांचा प्रोटेक्टर आणि ग्रँरंटर बनवते"
प्रेमचंद गर्ग या केस मधे जस्टीस गजेंद्रगडकर यानी म्हंटले आहे कि...
"न्यायालयात दाद मागण्याचा मुलभूत हक्क हा संविधानाने उभे केलेल्या लोकशाहीच्या इमारतीचा पाया आहे"
रोमेश थापर या केस मधे सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे कि " हे कोर्ट, मूलभूत हक्कांचा संरक्षणकर्ता म्हणुन असलेल्या जबाबदारीने, मूलभूत हक्कांच्या उल्लंघनविरुद्ध आलेल्या याचिकेची...
दखल घेण्यास नकार देऊ शकत नाही"
दारयो विरुद्ध उ.प्र. या केस मधे सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे कि "मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले आहे हे स्थापित झाल्यानंतर, त्याबाबत उपाययोजना करणे हे सर्वोच्च न्यायालयाचे कर्तव्य आहे"
चंद्र कुमार केस मधे सुप्रीम कोर्टाने अनु. 32 हे संविधानाचे..
अंगभूत व ईसेनशिअल फिचर असल्याचे म्हंटले आहे.
संपत कुमार केस मधे सुप्रीम कोर्टाने अनु. 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार हे संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरचा भाग असल्याचे म्हंटले आहे.
अनुच्छेद 32 हे ते महत्वाचे संविधानिक साधन आहे ज्याद्वारे नागरिक त्यांचे हक्क अबाधित ठेऊ शकतात. (*आणीबाणीची अपवादात्मक परिस्थिती सोडुन)
इतर कोणत्याही देशाच्या संविधानात मूलभूत हक्कांच्या विरुद्ध दाद मागण्याची तरतूद हि स्वतःच एक मूलभूत हक्क नाही.
हि डॉ.आंबेडकरांची आणि संविधान सभेची दूरदृष्टी आहे कि त्यांनी मूलभूत हक्कांसाठीच्या घटनात्मक उपायांच्या तरतूदीचे महत्व ओळखून ती एक मूलभूत हक्क म्हणून दिली आहे जेणेकरून कुणीही व्यक्ती संविधानाने दिलेल्या मूलभूत मानवी हक्कांपासून वंचित राहणार नाही !!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कामगारांच्या अधिकारांचे, त्यांच्या हिताचे खंदे पुरस्कर्ते होते. कामगारांचे हिताचे जतन व्हावे आणि त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी त्यांनी 1936 मधे स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. कामगार पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांनी कामगारांच्या..
वेल्फेअरसाठी अनेक मुद्दे मांडले होते.
1938 साली मुंबई असेंम्बली मधे डॉ. आंबेडकरांनी इंडस्ट्रीयल डिसप्युट विधेयकाला विरोध केला ज्यात संप पुकारने बेकायदेशीर असेल अशी तरतूद होती. त्यावेळी असेंम्बली मधे बोलताना आंबेडकर म्हणाले होते कि 'संप पुकारने हा काही क्रिमिनल ओफेन्स नाही..
यासाठी कामगारांना शिक्षा देणे म्हणजे त्यांना गुलाम बनवण्यासारखे आहे". या कायद्याच्या विरोधात स्वतंत्र पक्षाने मुंबईत संप केला होता.
1942-46 या काळात डॉ.आंबेडकर हे व्हाइसरॉयच्या कौन्सिल मधे कामगार मंत्री होते. 1943 साली डॉ.आंबेडकरांनी ट्रेड युनियन सुधारणा विधेयक सभागृहात मांडले.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका कर्त्यांच्या वतीने काल संविधानपिठासमोर युक्तिवाद करण्यात आला होता. आज त्याच युक्तिवादात अजून काही मुद्दे मांडण्यात आले.
आज मांडलेले काही ठळक मुद्दे थोडक्यात :
ज्येष्ठ वकिल श्याम दिवाण :-
- 102व्या घटनादुरुस्ती नंतर SEBC वर्ग ठरवण्याची विशिष्ट प्रक्रिया देण्यात आलेली आहे.
- गव्हर्नरच्या सल्ल्याने राष्ट्रपती SEBC बाबत नोटिफिकेशन काढू शकतात. 102व्या दुरुस्तीनंतर केवळ राष्ट्रपतीच राज्यपालांच्या सल्ल्याने SEBC वर्ग ठरवू शकतात.
- राज्य अनु.15(4) मधे SEBC वर्गासाठी विशेष तरतूद करू शकते मात्र SEBC वर्ग ठरवण्यासाठी अनु.342A नुसार राष्ट्रपतीच्या नोटिफिकेशनची गरज आहे.
- या प्रकरणात राष्ट्रपतीचे कोणतेही नोटिफिकेशन नाही, राज्यपालांचा सल्ला किंवा राष्ट्रीय आयोगाचा सल्ला घेण्यात आलेला नाही.
मराठा आरक्षणाच्या वैधते संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. गेल्या सुनावणीत कोर्टाने इतर राज्यांना नोटीस इश्यु केल्या होत्या. केरळ, हरियाना, राजस्थान, तामिळनाडू या राज्यांना त्यांचे उत्तर दाखल करण्यास..
वेळ देण्यात आला आहे. आज आरक्षनाला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद केला. त्यांच्यावतीने ज्येष्ठ वकिल अरविंद दातार व श्याम दिवाण यांनी युक्तिवाद केला.
अरविंद दातार यांनी मांडलेले काही ठळक मुद्दे :-
- इंद्रा साहनी केस मधील निर्णयाच्या योग्यतेवर इतर कोणत्याही केस मधे शँका घेण्यात आलेली नाही.
- साहनी केस मधे 27% OBC आरक्षण हे 6:3 अशा निर्णयाने वैध ठरवण्यात आले होते. त्यातील 8/9 न्यायाधीशांनी 50% मर्यादा व क्रिमी लेयरच्या बाजूने मत दिले होते.
सर तुम्ही 'राज्यघटना' आणि 'कायदा' यात गल्लत करत आहात. तुमचे म्हणणे होते कि 'राज्यघटना' तयार करताना मनुस्मृतीचा देखील आधार घेतला होता. आता तुम्ही जी उदाहरणे देत आहात ती हिंदू कोड बिलच्या संदर्भात आहेत. हिंदू कोड बिल एकत्रित 4(+) महत्वाचे कायदे आहेत जे हिंदू(+) धर्मातील लोकांचे +
लग्न,घटस्पोट, वारसाहक्क ई. गोष्टींचे नियमन करतात. असाच मुस्लिम लोकांसाठी मुस्लिम पर्सनल लॉ आहे, शीख लोकांसाठी आनंद मॅरेज ऍक्ट आहे, पारसी लोकांसाठी पारसी मॅरेज & डायवोर्स ऍक्ट आहे. हे सगळे पर्सनल लॉ रेग्युलेट करणारे कायदे त्या त्या धर्माच्या परंपरा, पौराणिक ग्रंथ, धार्मिक ग्रंथ +
रूढी ई. गोष्टींवर आधारित आहेत. सहाजिकच हिंदू कोड बिल चा आधार देखील हिंदू समाजाच्या जुन्या ग्रंथामधे असेल. त्यामुळे हिंदु कोड बिल तयार करताना त्यावर चर्चा होणे, त्याचे संदर्भ येणे देखील सहाजिक गोष्ट आहे. पण हिंदू कोड बिल म्हणजे राज्यघटना नव्हे, तो एक कायदा आहे.
26 जानेवारीला दिल्ली येथे झालेली हिंसा व त्या अनुषंगाने पुढे आलेल्या टूलकीट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट दिशा रवी ला काल दिल्ली येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला. मिडियाने या टूलकीट प्रकरणाचा आणि दिशा रवी हिच्या अटकेचा बराच..
गाजावाजा केला. दिशा ला बेल देण्याच्या निर्णयात न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी अनेक महत्वाची निरिक्षणे नोंदवली आहेत.
दिशा ला दिल्ली पोलिसांनी 13 तारखेला बँगलोर मधुन अटक केली होती. दंगा करण्यास प्रोत्साहन देणे(153), वैमनस्य पसरवणे(153A) आणि सेडिशन म्हणजेच देशद्रोह असे आरोप...
तिच्यावर लावण्यात आले आहेत.
दिशा रवीच्या जामीनाला विरोध करताना अतिरिक्त सॉलिसिटर (ASG) यांनी बाजू मांडली कि सदर केस हि टूलकिट बनवणाऱ्या लोकांविरुद्ध दाखल करण्यात आलेली आहे. सरकारविरुद्ध असंतोष पसरवण्याच्या उद्देशाने सदर टूलकिट बनवले व शेअर केले गेले असून त्याचा संबंध..
केंद्र सरकारने गेल्या अधिवेशनात आणलेल्या नव्या शेती कायद्यावरून सध्या गदारोळ सुरू आहे. अनेक राज्यांमधील शेतकरी करत याविरोधात आंदोलन आहेत विशेषतः पंजाब व हरियाणा ! या थ्रेड मधे कृषी कायदे आणि केंद्र व राज्यसरकार यांचे वेगवेगळ्या विषयावर...
कायदे करण्याचे अधिकार यावर चर्चा केली आहे. हे कायदे चांगले-वाईट, शेतकऱ्यांना फायद्याचे-तोट्याचे यावर इथे लिहिले नाहीये, त्यावर शेतीबद्दल अनुभव-ज्ञान असलेल्या व्यक्तीने बोलणे योग्य असेल.
केंद्र सरकारने प्रामुख्याने तीन कायदे आणले आहेत. खालील फोटोत त्यातील संक्षिप्त तरतुदी आहेत.
यातील पहिल्या कायद्यात शेतकऱ्यांना त्यांचा माल APMCच्या बाहेर देशभरात कुठेही विकण्यासंदर्भात तरतुदी आहेत. दुसऱ्या कायद्यात शेतकऱ्यांना थेट मोठ्या व्यापाऱ्यांसोबत करार करता येण्यासंदर्भत तरतूदी आहेत तर तिसरा कायदा जीवनावश्यक वस्तु याबाबत आहे.