#Thread
गेल्या वर्षी माझे बाबा कोरोनामुळे आयसीयुत होते तेंव्हा सहा रेमडेसीवीर इंजेक्शन्स मी ३३ हजाराला घेतले होते. म्हणजे साधारण साडेपाच हजाराला एक (एमारपीनुसार). त्याचसुमारास आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी एका प्रेसमध्ये हेच इंजेक्शन २२००-२३०० मध्ये उपलब्ध होईल असे सांगितले होते. +
पण तसा शासनादेश काढला नव्हता..

(आत्ता मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्येच शासनाने तसा आदेश काढला होता असं कळालं. पण त्याच्या अंमलबजावणीत खोडा घातला गेला...)

आमच्याकडे पैसे होते म्हणून मागचा पुढचा कसलाही विचार नं करता ते इंजेक्शन्स घेतले होते. पण नुसती ह्या इंजेक्शनची +
चौकशी करताना इतरांच्या चेहऱ्यावरचे रंग कसे उडत होते, हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे.

नंतर बऱ्याच कंपन्यांनी ह्या इंजेक्शनचे उत्पादन सुरू केल्याने किंमत महिन्याभरात कमी झाली.. शासनाचे योगदान शून्य..

आता तेच (बहुतेक) इंजेक्शन बारा/तेराशे मध्ये मिळेल असे सुतोवाच्य +
करण्यात आले आहे. नुसते फुस्के फवारे सोडून किमती कमी होणार नाहीयेत. तसे आदेश सोडावे लागतात. तेंव्हाचं अंमलबजावणी होते.

शासनातील लोकांनी खायचे धंदे सोडावेत. लोकं टाचा घासून मरायलेत.नेत्यांना जर कारभार चालवायची अक्कल नसेल सरळ पदभार सोडावा. आणि हो ते किल्लारीत पवारांनी किती आणि कसे+
दिवे लावले हे बोलून आत्ताच्या विस्तवावर पाणी नाहीये फिरवलं जाणार. पवारांसकट सगळे उघडे पडलेले आहेत इथं.. हेच वास्तव..

जिल्ह्यात काळाबाजार कुठे आणि कसा चालतो ह्याची इत्थंभूत माहिती प्रशासनाला असते. हफ्ताखोरीचे धंदे बंद करा. आणि माणूस आहात ह्याची जरा लाज वाटू द्या.. +
सगळं फेडावं लागतंय, चक्रवाढ व्याजासहित..

ह्या इंजेक्शनच्या विषयात अजून एक मोठा इश्यू आहे त्याबद्दल पुढच्या पोस्टमध्ये बोलेन, त्याकडे फारसं कोणाचं लक्ष नाहिये गेलं अजून..
- चेतन दीक्षित

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Chetan Dixit

Chetan Dixit Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @mechetandixit

8 Apr
#Thread
थरथरणारे हात आणि बाहेर पडायला आसुसलेले डोळ्यातले पाणी साक्षीला ठेवून हे लिहीत आहे

कोरोनासारखी महामारी काय उच्छाद माजवत आहे, हे राज्यातला प्रत्येक नागरिक असहाय्य मनःस्थितीत पाहत आहे, ऐकत आहे. घर सोडून जे कोणी परगावी आहेत त्यांच्या डोळ्यासमोर सतत त्यांच्या घरच्यांची(1/13)
काळजी दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढत चाललीये. किती दिवस राज्यशासनाच्या नावानं खडे फोडायचे?शिव्या द्यायच्या? त्यालाही ना नाही पण त्याने काही फरक पडताना दिसत नाही. इनबॉक्समध्ये येऊन काही जण बेडसाठी वा रेमडेसिविरसाठी चौकशी करतो. तसे माझे संपर्क खूप कमी तरी पंधरा वीस फोन होतात.(2/13)
हे वास्तव किती ज्वलंत आहे, ह्याचा क्षणोक्षणी प्रत्यय येतोय.
वैकुंठभूमीवर रांगा लागल्यात. एकानं व्हॉट्सपवर एक विडिओ पाठवलाय कोणत्यातरी गावातला जिथे केवळ ऍम्ब्युलन्समुळे चक्का जाम झालाय. नरक ह्यापेक्षा काय वेगळा असतो? बार्शीत एक जण रेमडेसीवीर चौपट/पाचपट किमतीत (3/13)
Read 13 tweets
6 Apr
हे भयंकर अस्वस्थ करणारं आहे.. 😢😢😢

पोलिसांनी संपूर्ण कुटूंबाला मारहाण केल्याचा अपमान सहन न झालेल्या भाजीविक्रेत्याने आत्महत्या केली.

त्याचा लहान मुलगा रडत रडत ही व्यथा कॅमेरॅपुढे सांगतोय. "लाॅकडाऊन मधे कशाला गाडी लावायची?" म्हणत ह्या पाशवी कृत्याचे समर्थन +
करणारे "घरकोंबडे" असतीलही पण प्रत्येक वेळी अशा कृत्यांचे समर्थन होऊ शकत नाही.

काही महिन्यांपूर्वी आंबेगावला एका दांपत्याने पोलिसांनी स्वतःच्या घरी जाण्यास अडवणूक केली म्हणून पोलिसांच्या समोरच विषप्राशन केले. दोघांपैकी एक दगावले त्यावेळी सुद्धा,"एवढ्यासाठी कोणी आत्महत्या +
करतो का?" म्हणून हिणवणारे कमी नव्हते पण पोलिसांनी कुठल्या पातळीवर जाऊन त्यांचा अपमान केला असेल याचा साधा विचारही कोणी करत नाही.

"पोलिसांनी काठ्यांना तेल लावून ठेवा" सांगणारे गृहमंत्र्यांनी त्याची मदत सुद्धा जाहिर करायला हवी होती. सामान्य जनतेच्या पाठी आणि ढुंगणं काय ह्या +
Read 11 tweets
20 Mar
#महत्वाची_थ्रेड

थ्रेड मोठी आहे पण मस्ट आहे..

वेळ घेऊन वाचा, वाचाच..

परमबीर सिंगांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याला नेमकं काय पत्र लिहिलंय? आणि त्यात कोणत्या जिलेटिनच्या कांड्या फोडल्या?

१. माझ्याकडून आणि माझ्या कार्यालयाकडून एटीएस आणि एनआयएला जे काही सहाय्य करायचं होतं +(1/18)
ते वेळोवेळी केलं गेलं आहे.
२. अनिल देशमुखांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत माझ्या कार्यालयाकडून काही चुका, ज्या अक्षम्य अश्या म्हणवल्या गेल्या, झाल्या त्यामुळे माझी बदली झाली आणि ही बदली केवळ प्रशासकीय बदली नव्हती असेही सांगितले.. +(2/18)
३. मार्चच्या मध्यात अँटिलिया प्रकरणासंबंधी आपल्या एका वर्षावरील बैठकीत मी आपल्याला बऱ्याच चुका आणि गैरव्यवहारासंबंधी माहिती दिली होती. तशीच कल्पना मी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर ज्येष्ठ मंत्र्यांनासुद्धा दिली होती. +(3/18)
Read 18 tweets
4 Mar
#थ्रेड 👇
केरळातील एकुलता एक भाजपा आमदार, ओ. राजगोपाल

कट्टर भाजपेयी कसा असावा ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ओलांचेरी राजगोपाल. केरळसारख्या कट्टर डाव्या राज्यात भाजपाच्या स्थापनेपासून किल्ला लढवणे, स्वप्नातसुद्धा आणणे जिथे शक्य नव्हते, तिथे राजगोपालांची कहाणी प्रेरणादायक आहे..+
अश्या कार्यकर्त्यांचा पक्षाने उचित गौरव केलाच. अगदी पक्षाच्या उपाध्यक्षापर्यंत त्यांची निवड केली गेली. राज्यसभेत पाठवले गेले. पण त्यांच्या निवडणूक लढवण्याचा इतिहास जर आपण पाहिला तर तो अचंबित करणारा आहे.. तिथल्या राजकारणाचा "लालभडक" रंग पाहता..+
१९८९ ला मंजेरीतून लोकसभा लढले, हरले. दोन वर्षांनी तिरुअनंतपुरम मधून लढले, परत हरले. नंतर राज्यसभेवर पाठवलं गेलं. १९९९ मध्ये परत तिरुअनंतपुरममधून लढले, पुन्हा हरले पण आता त्यांना लक्षवेधी मते मिळाली होती. ती म्हणजे १,५८,२२१. आधीच्या भाजपाच्या उमेदवाराला तिथूनच ९४,३०३ आणि ७४,९०९ +
Read 9 tweets
3 Mar
#Thread
अरे काय एवढा खुशीत चाललाय?
- हो काका, आजच परीक्षा झाली. 

कसे गेले पेपर?
- उत्कृष्टच..

अभ्यास खूप केला असशील.. 
- मला अभ्यासाची गरज नसते. मी जन्मजात सर्वज्ञ असतो.. 

किती वाजता पेपर होता?
- १२ वाजता.. 

तीन तासाचा पेपर असतो नं पण?
- मग?
अरे अजून दोन वाजत आहेत. आणि तू बाहेर?
- आलोय.

पूर्ण पेपर लिहिला नाहीस?
- मी कधीच कुठलाच पेपर पूर्ण लिहीत नाही..

अरे बापरे.. पण का?
- हे बघा. एक तर पुस्तक शंभर दीडशे पानांचं असतं, कमीतकमी. त्यावर प्रश्न शंभर निघू शकतात. हे असले शंभर प्रश्न अभ्यास करून केवळ दहा ते पंधरा
प्रश्न येतात. ह्याला काही अर्थ नसतो. मी सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. पण केवळ तीन तासांच्या मर्यादेचा विचार करता जे प्रश्न विचारले नाहीत पण अभ्यासक्रमात आहेत त्या प्रश्नांवर अन्याय होऊ नये म्हणून मी प्रश्नपत्रिकेतल्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायच्या भानगडीत पडत नाही.
Read 5 tweets
2 Feb
"इफ यु डाय इन पॉलिटिक्स.."

गेल्या आठवड्यात नागपुरात देवेंद्र फडणवीसांची "ऑफ द रेकॉर्ड" मुलाखत झाली. हेतुपुरस्सर (कदाचित) त्या मुलाखतीचे थेट प्रक्षेपण देवेंद्रजींच्याच पेजवरून करण्यात आलं. लगेच ती लिंक हटवण्यातसुद्धा आली. आणि ह्याचा जो काही अपेक्षित परिणाम हवा होता, (१/१६)
तो साधला गेला. त्या मुलाखतीत देवेंद्रजी ह्यांनी एक गौप्यस्फोट केला, जिथे ते म्हणाले होते की ८० तासाचं सरकार हे शरद पवारांच्या सहकार्याने बनले होते. अगदी सर्व खातेवाटप, पालकमंत्री सुद्धा ठरवून झाले होते. पण ऐनवेळी पवारांनी कच खाल्ली. शरद पवारांचा स्पष्ट उल्लेख हा ह्याचसाठी (२/१६)
महत्वाचं कारण एवढं तथाकथित बंड करूनही अजितदादांच्या पोर्टफोलिओत कसलीही तडजोड केली गेली नव्हती. खुद्द राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांनी त्या ऐंशी तासात अजितदादांवर मजबूत तोंडसुखसुद्धा घेतलं होतं. अजितदादा शांतपणे एवढंच म्हणत होते, सगळं सुरळीत होईल. कारण खरी वस्तुस्थिती फार (३/१६)
Read 16 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!