#Thread
आपल्यातले खरे #हिंदू ओळखा...!!
हे असं मी का म्हणत आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याच उत्तर मी ह्या थ्रेड मध्ये देत आहे. मागे काही दिवसांपूर्वी सर्वश्रुत असलेले सद्गुरू अर्थात जग्गी वासुदेव ह्यांचा एक व्हिडिओ ट्विटर आणि
१/
इतर माध्यमांवर व्हायरल झाला.आपणही तो पाहिला असेल.ज्यात सद्गुरू कृष्ण आणि यशोदेच्या संबंधावर बोलताना दिसतात आणि त्यात त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केलेलं आपल्याला प्रथमदर्शनी दिसतं.ह्याविषयी जर पाहायला गेलं तर एक तर तो व्हिडिओ छाटून नेमका त्यातील वादग्रस्त भाग घेऊन बनवला आहे.
२/
ज्यांनी ज्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहायला असेल त्यांना ही गोष्ट लक्षात येईल की हा व्हिडिओ केवळ आणि केवळ सद्गुरूंची बदनामी करण्यासाठी बनवला आहे.मग प्रश्न येतो की सद्गुरूंची बदनामी हे लोक का करत आहेत? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सद्गुरू सध्या हिंदू मंदिरे सरकारी
३/
अधिपत्यापासून सोडवण्यासाठी देशभर आंदोलन उभा करत आहेत. मग ही त्यांची कामना यशस्वी होऊ नये म्हणून हा सगळा खटाटोप हे लोक करत आहेत. त्यांचं हे आंदोलन नेमकं कशासाठी हे जाणून घ्यायचं असल्यास आपण @malhar_pandey याचा हा थ्रेड नक्की वाचा.
यासाठी हे लोक अत्यंत नियोजित पद्धतीने काम करत आहेत. त्यासाठी आपल्याला खरा कोण आहे आणि कोण फक्त हिंदुत्वाच पांघरून घेऊन काम करतोय हे ओळखावे लागेल. सध्या सोशल मीडिया वर दोन प्रकारचे हिंदू कार्यरत आहेत. एक म्हणजे खरचं हिंदू आहेत आणि हिंदू धर्माच्या रक्षणार्थ काम करत आहेत.
५/
आणि दुसरे ते आहेत ज्यांचे आपण लिखाण त्यांच्या पोस्ट पाहिल्या तर आपल्याला वाटेल की हे हिंदुंसाठीच काम करत आहेत पण सत्य तस नसून ते हिंदूंना तोडायच काम करत आहेत. जसं की हा सद्गुरुंचा व्हिडिओ त्या एका मिनिटाच्या क्लीपमुळे कितीतरी सद्गुरुंवर विश्वास असणाऱ्या अथवा
६/
मनातून धर्म रक्षणाचे काम करणाऱ्या लोकांचा विश्वास ढळला असेल.आणि लोकं परत खोलवर जाऊन त्याचा छडा लावत नाहीत लगेच वाहवत जातात.आणि ह्या लोकांचं फावत.हे लोक हिंदू नाव लावून आपलं अकाउंट तयार करतात त्याचप्रमाणे बऱ्याच हिंदू लोकांना फॉलो करतात तसेच हिंदू पोस्टवर कॉमेंट वैगरे पण देतात.
७/
कारण जर कोणी त्यांची टाईम लाईन चे केली की तर त्यांना वाटू नये की हा माणूस हिंदू विरोधी आहे म्हणून. मग पुढे काही दिवसांनी हे लोक असच कुठलातरी अर्धवट व्हिडिओ टाकून किंवा चुकीच्या संदर्भाची पोस्ट टाकून आपल्या श्रद्धास्थानावर आघात करतात. आणि लोक ज्यावेळी ह्यांची पडताळणी करतात तर
८/
वर वर सगळ्यांना असच दिसत की हा माणूस हिंदूच आहे म्हणून मग लोकांना वाटत की हा म्हणतोय यात काहीतरी तथ्य असायला हवं झालं लोकांच्या मनात कींतू निर्माण झाला की ह्यांचं अर्धकाम यशस्वी होत. मग हे लोक ज्यांना संशय वाटतो त्यांना अजून काही गोष्टी भरवून हिंदूंना हिंदुंविरुद्ध भडकून
९/
देतात. हे तुम्हाला तुमच्या गुरुंवरून भांडायला लावतील अथवा तुमच्या श्रध्दास्थानावरून किंवा अजून कुठल्या गोष्टीतून. सतत आपल्याला लढवत ठेवायचं की मग हिंदू धर्माचा जो पाया आहे व्यापकत्वाचा तोच खिळखिळा करून टाकायचा.
त्यामुळे कुठलीही गोष्ट समोर आली की लगेच त्यावर विश्वास न ठेवता त्याची योग्य शहानिशा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेऊ नका. आपला सनातन धर्म हा व्यापक धर्म आहे इथे कोणालाही त्याचे विचार मांडायला बंधन नाहीये. हा तुम्ही दुसऱ्याच्या विचाराचा
८/
विरोध इथे करू शकतात पण बंधन लादु शकत नाही. त्यामुळे इथे अनेक लोकं एकमेकांच्या विचारांना टीका करताना दिसतात. आपण फक्त कोण टीका करतय आणि कोण कारस्थान हे जाणून मगच त्या व्यक्तींचे विचार आत्मसात करावेत ही आपल्याला विनंती.
९/
#Thread
मर्यादापुरुषोत्तम श्रीरामचंद्र - सांप्रत तरुणांसाठी आदर्शद्योतक:-
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः।।
चैत्र शुद्ध नवमीची मध्यान्हाची वेळ होती.अयोध्येत अतीव आनंदाच वातावरण होत.कारण साक्षात जगद्धर्ता महाविष्णूंचं अवतरण अयोध्येत झालं होत.
१/
संपूर्ण रघुकुल आज धन्य झाल. श्रीरामांच्या आधी होऊन गेलेल्या सकळ प्रभृतींची भगवद्भक्ती आज फळली. श्रीरामांचा अवतार झाला आणि सकळ पृथ्वी आनंदून गेली. यापुढील रामायण आपणा सर्वांना माहितीच आहे. आज माझा तो विषय नाही ये. आजचा विषय आहे की श्रीरामांचं एकंदर अवतारकार्य आपल्याला अर्थात
२/
आजच्या युवकांना कशाप्रकारे आदर्श ठरू शकतं. यात सर्वात सुरुवातीचा मुद्दा येतो की श्रीराम का आदर्श म्हणून बघायचे? तर आदर्श पुत्र,आदर्श पती, आदर्श बंधू,आदर्श राजा,आदर्श मित्र आणि आदर्श पुरुष ह्या सर्वांच ऐक्याने प्राकट्य कुठे होत असेल तर ते श्रीरामांच्या अवतारात आपल्याला होते.
३/
नामस्मरणाचे महत्व :-
आपल्या हिंदू धर्मात नामस्मरणाचे प्रचंड महत्व सांगितले आहे. केवळ भक्तिभावाने केलेल्या नामस्मरणाने अनेक लोकांचं कल्याण झालं, अनेकांची दुर्गम संकटे दूर झाली. आपल्याकडे याची खूप उदाहरणे पाहायला भेटतात. त्यात परत कली युगात नामस्मरण हे अत्यंत+
उपयुक्त आहे असं सांगण्यात येत. महाभारतात भगवान श्रीकृष्ण सांगतात की ‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि।’ अर्थात कलियुगात मी जप यज्ञात अर्थात नामस्मरणात स्थित आहे. जे फळ इतर युगात मोठे मोठे अनुष्ठान करून प्राप्त ते फळ कलियुगात केवळ श्रद्धेने केलेल्या नामस्मरणातून मिळत. सध्या ह्या कोरोणा+
वैश्विक महामारीचा प्रकोप आपण पाहतच आहोत. सगळीकडे अत्यंत उदासीन वातावरण झालं आहे. त्यामुळे साहजिकच आपले मन ही उदासीन व निराश होऊन जाते. तर यासाठी आपण सगळ्यांनी यथाशक्ती जर देवाचे नामस्मरण केले तर नक्कीच सकारात्मक वातावरणाची अनुभूती आपल्याला नक्की येईल. त्यासाठी फार काही+
-:हिंदू परिसंस्थेची (Ecosystem) आवश्यकता:-
तारीख होती १७ एप्रिल २०२०, त्यादिवशी मी सकाळी उठलो व सवयीप्रमाणे ट्विटर चाळत बसलो असता,दोन ट्रेंड्स ने माझं लक्ष वेधले एक म्हणजे पालघर आणि दुसरा म्हणजे साधू लीचींग.त्या ट्रेण्ड मधले ट्विट बघता बघता तो भयानक
१/
व्हिडिओ माझ्यासमोर आला आणि माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं, सगळ्या अंगावर शहारे आले आणि तळपायाची आग मस्तकात गेली.!तुम्हाला वेगळं सांगायला नको की तो व्हिडिओ पालघरमध्ये हत्या झालेल्या साधूंचा होता. किती भयानक आणि हृदयद्रावक होता तो व्हिडिओ.! २ अत्यंत दीन आणि करुण मुखाने इकडे तिकडे
२/
मदतीची याचना करणारे ते साधू आणि त्यांच्यावर अत्यंत क्रूर व त्वेषाने हल्ला करणारे ते नरराक्षस.! होय नरराक्षसच ते त्यांना मानव म्हणणे म्हणजे मानव जातीचा अपमान आहे. त्यात अजून एक धक्का देणारी गोष्ट कुठली होती तर ती ही की त्यातील एक साधू ज्यावेळी याचकभावाने तेथील पोलीसाकडे गेले
३/
#Thread
-:संभाजी महाराज बलिदान दिवस आणि गुढीपाडवा:-
तारीख होती ११ मार्च १६८९ आणि तिथी होती फाल्गुन वद्य अमावस्या. महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी दिवसांपैकी एक दिवस. स्वतःला आलमगीर म्हणवणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाने शक्य होईल तेवढे अमानवी अत्याचार करून धर्मवीर छत्रपती
१/
संभाजी महाराजांना मारले. इतके अमानुष अत्याचार केले त्याने की शेवटी छिंदी छिंदी झालेला संभाजी महाराजांचा देह राहिला. पण इतके अत्याचार होऊन सुद्धा संभाजी महाराज आपल्या हिंदू धर्म रक्षक ह्या बिरुदावली पासून परावृत्त झाले नाहीत. मृत्यूला आनंदाने कवटाळले पण धर्मांतरण करण्यास तयार
२/
झाले नाहीत. केवढी ती स्वधर्माविषयीची आत्मीयता.
औरंगजेब मोठा चाणाक्ष माणूस होता. त्याला माहिती होते की उद्या म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजेच मराठ्यांचा नूतन वर्षाचा पहिला दिवस. हा हिंदूंचा सन आनंदाने साजरा होऊ नये म्हणून त्याने जाणूनबुजून आधीचा दिवस निवडला.
३/
#Thread
तुकाराम महाराज - वैकुण्ठगमन की संशयित मृत्यू..?हा थ्रेड चालू करण्यापूर्वी मी माझ्या विषयी थोड सांगू इच्छितो. आमच्या दोन्ही घरात अर्थात माझ्या घरी आणि आजोळी भागवत सांगण्याची किमान ५ पिढ्यांपासून परंपरा आहे. माझे आजोबा हे खूप विद्वान आणि प्रसिद्ध भागवतकार होते.
१/
त्याचप्रमाणे माझ्या आईचे वडील हे एकनाथ महाराजांच्या परंपरेतील प्रसिद्ध भागवतकार व कीर्तनकार आहेत. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच वातावरण दोन्ही घरात अगदी ओतप्रोत भरलेलं आहे. सध्या ही परंपरा माझे काका आणि मामा उत्तमरित्या चालवत आहेत. अशा घरात वाढल्यामुळे साहजिकच
२/
अत्यंत विद्वान व थोर अध्यात्मिक विभूतींचा सहवास प्राप्त झाला त्यांना ऐकायला भेटलं.म्हणजे अगदी सध्या वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित घर म्हणजे देगलूरकरांच. त्या घरातील प पू चंद्रशेखर महाराज व प पू चैतन्य महाराज ह्यांच्यापासून ते अगदी सर्व सर्व लोकं.
३/
ज्याठिकाणी विकासाच्या,प्रगतीच्या,कामांच्या बातम्या यायला हव्यात त्याठिकाणी दररोज भ्रष्टाचार,बलात्कार,उत्पीडन,कोरोणा काळातील ढिसाळ नियोजन ह्यांच्याच बातम्यांनी गेलं वर्ष गेलं. आणि त्यात मानाचा (अपमानाचा) तुरा म्हणजे आजची बातमी की मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख
१/
ह्यांच्या विरोधात सीबीआय चौकशीचा आदेश दिला. एका विद्यमान गृहमंत्र्याविरूध्द केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी होणे ही खरचं महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आरोप पण कसले तर खंडणी वसुलीचे. ज्यावेळी महाराष्ट्र महामारीने त्रासून गेला होता. त्यावेळी ही लोकं स्वतःचे खिसे भरत होते
२/
किती प्रकरण सांगावीत अगदी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येपासून ते आजच हे प्रकरण इथपर्यंत ह्या सर्व घटनेंनी महाराष्ट्र उध्वस्त झाला. नियोजनशून्य,भावनाशून्य,आत्मस्वार्थीय अशा लोकांचा भरणा ह्या सरकारमध्ये असल्याने महाराष्ट्र आज त्राही त्राही करत आहे..!!
३/