माझ्या आयुष्यातील कॅार्पोरेट करियर मधील तो सुवर्णकाळ होता. भारलेले, झपाटलेले दिवस. वयाच्या अत्यंत कमी टप्प्यात २४/२५ व्या वर्षीच मला थरमॅक्ससारख्या प्रतिथयश,संपुर्णपणे भारतीय मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर पदाची संधी मिळाली होती. सतत #SaturdayThread#BusinessDots#मराठी#सत्यकथा १/१८
काम,नवीन शिकण्याची आस त्यामुळे सतत दौरे आणि मिटींगा चालू असायच्या.
त्या काळात मी बॉयलर्स आणि औष्णिक ऊर्जा विभागात आंतरराष्ट्रीय सल्लागार (जे बऱ्याच कारखान्यांना इंजिनियरींग सर्विसेस देतात) हे डिपार्टमेंट पहायचो. औष्णिक तंत्रज्ञान आणि इंधनाचे ज्वलन हा माझा आवडीचा विषय त्यात
२/१८
वायुरूप इंधनाची भारतातील जवळजवळ प्रत्येक केस माझ्या नजरेखालून जायचीच.
एक दिवस संध्याकाळी घरी जायच्या तयारीत असताना मोबाईल वाजला आणि पलीकडून ऊद्या सकाळी १० वाजता दिल्लीत मिटींगसाठी हजर व्हा असा निरोप मिळाला.
ही अत्यंत प्रतिष्ठेच्या कंपनीसाठीची किक ॲाफ मिटींग होती आणि जर
३/१८
आमची टेक्निकल चर्चा चांगली झाली तर काही कोटींची ॲार्डर नक्की कंपनीला मिळणार होती.
मी लगेच आमच्या ट्रॅव्हल डेस्कशी संपर्क करून दुसऱ्या दिवशीचे सकाळच्या विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी फोन केला,पाच मिनिटात त्यांचे ऊत्तर आले सर्व विमाने फुल आहेत आणि कोणतेही तिकीट अगदी आज रात्री
४/१८
ते उद्या दुपारपर्यंत शिल्लक नाही.मी पुन्हा दिल्लीला फोन लावून मिटींग पुढे जावू शकते का म्हणून विचारले पण त्यांनी त्यास नकार दिला.
काय करावे काही कळेना,मग आमच्या जनरल मॅनेजर साहेबांना हा प्रॅाब्लेम सांगितला, त्यांनाही माहिती होते की हा अत्यंत प्रतिष्ठेचा प्रोजेक्ट आहे आणि
५/१८
मला वैयक्तिकरित्या तिकडे हजर असणे फार गरजेचे होते. त्यांनी मात्र चुटकीसरशी “तू ताबडतोप बिझनेस क्लासचे तिकीट पहा आणि असेल तर लगेच बुक करून जा” असे सांगून प्रश्न निकाली काढला.
मी लगेच आमच्या लोकांना तशा सुचना दिल्या, अप्रुव्हल्स मिळाली आणि बुकींगही झाले.
मी पहाटेच वेळेआधीच
६/१८
विमानतळावर पोहचलो,बिझनेस क्लास तिकिट असल्याने सर्वात प्रथम आदरपुर्वक आम्हाला विमानात प्रवेश मिळाला.
मी स्थानापन्न झालो आणि नेहमीप्रमाणे पुस्तक काढून वाचायला लागणार एवढ्यात माझ्या समोर थरमॅक्सच्या चेअरपर्सन अनु आगा आल्या. क्षणभर बावरलोच, बरं मला वाटले त्या इथेच बसतील पण त्या
७/१८
सरळ चालत मागे इकॅानॅामी क्लासच्या सिटवर गेल्या आणि शांतपणे बसल्या.
माझ्या जीवाची घालमेल सूरू होती,बरं त्या इतक्या मोठ्या कंपनीच्या मालक, त्या इकॅानॅामीने आणि मी बिझनेस क्लासने हे माझ्या मनाला खुप बोचत होते,पण लोकांची रिघ लागलेली होती मला त्यांच्यापर्यंत पोहचता येत नव्हते.
८/१८
थोड्याच वेळात विमानाने टेकॲाफ घेतला, सिटबेल्ट काढण्याचा संकेत मिळाला तसा मी ताबडतोप जागेवरून उठलो आणि अनु मॅडम जिथे बसल्या होत्या तिकडे गेलो. त्या शांतपणे पुस्तक वाचत होत्या, मला मात्र अत्यंत अपराधीपणाची भावना होतीच. मी नम्रपणे माझी ओळख सांगितली, ( तेंव्हा कंपनीचे आयकार्ड
९/१८
गळ्यात सतत असायचे त्यामुळे त्यांनाही हा आपलाच एम्लॅाई आहे हे लगेच कळाले)
आणि मी काही महत्त्वाच्या प्रोजेक्ट मिटींगसाठी दिल्लीला चाललोय आणि इकॅाननॅामीचे तिकीट नसल्याने बिझनेस क्लासने चाललोय हे सांगितले. पुढे काय, कसे असे पाच दहा मिनिटे बोलल्यावर मी मुद्द्याचे बोललो -
१०/१८
“मॅडम माझी तुम्हाला विनंती आहे कृपया तुम्ही बिझनेस क्लासच्या जागेवर बसा मी तुमच्या जागेवर इथे इकॅानॅामीमधे शिफ्ट होतो.” माझे बोलणे ऐकून त्यांनी स्मितहास्य केले आणि अत्यंत नम्रपणे म्हणाल्या - “अरे मी माझ्या खाजगी कामासाठी दिल्लीला चाललीये आणि मला याची चांगली सवय आहे, तू
११/१८
कंपनीच्या कामासाठी आणि तेही अत्यंत गरजेचे आहे म्हणून चाललायेस, उलट तू तिथेच बसून शांतपणे मिटींगची तयारी कर आणि Win the Game” मी वारंवार आग्रह करूनही शेवटी त्यांनी त्याला प्रेमाने नकारच दिला आणि मला “Win the Game” आशिर्वाद देत माझ्या जागेवर परत पाठवले.
ऊतरताना मी मुद्दाम
१२/१८
त्या येईपर्यंत थांबलो,त्यांनी ही अतिशय आदबीने चौकशी केली आणि हसतमुखाने मला निरोप दिला.
पुढे दिल्लीत मिटींग अत्यंत चांगली पार पडली, थरमॅक्सला जवळपास १०० कोटीची ॲार्डरही मिळाली. मी मुद्दाम न विसरता त्याचा ईमेल आमच्या जनरल मॅनेजर साहेबांतर्फे त्यांना पोहचविला आणि त्यांनीही
१३/१८
मनापासून माझे अभिनंदन केले.
मला मात्र त्या अभिनंदनाशिवायही त्या मिटींगने न विसरता येणारी आठवण आणि जगातल्या सर्वोतम विद्यापीठातही जे मुल्य आणि साधेपणाचे ज्ञान मिळाले नसते ते शिकविले.
नोकरी असो की व्यवसाय पैसे आहेत,संपत्ती आहे म्हणून थाट करणे,फक्त सवलती लाटणे किंवा वारेमाप
१४/१८
खर्च करत राहणे यापेक्षा खरी गरज काय आहे हे ओळखून आयुष्यात मार्गक्रमण करत राहणे हा महत्वाचा मंत्र मला मिळाला.
तेंव्हा जवळपास चार हजार कोटींचा टर्नओव्हर असणाऱ्या महाकाय आंतरराष्ट्रीय कंपनीची मालकीन इतकी डाउन टू अर्थ!
खाजगी आणि ॲाफीशियल काम यातील मुल्य जपत इतक्या साधेपणानं
१५/१८
जगणं आणि मी वारंवार विनंती करूनही त्याला आदरपुर्वक नकार देणं हे अत्यंत ऊच्चकोटीचे संस्कार होते. आजही हा प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर आला की आपोआप त्यांच्यात मला माझा गुरु दिसतो आणि मी त्यांना अंतःकरणातून प्रणाम करतो. हे शिकायला मिळालं यासारखं दुसर भाग्य नाही.
१६/१८
आज आमच्या ऊद्योगात जे काही यश आहे त्यात या संस्कारांचा,शिक्षणाचा आणि मुल्यांचा खुप मोठा वाटा आहे हे मात्र नक्की!
आयुष्यात ही निरिक्षणं, अनुभव आणि त्यानंतरची अनुभूती हि आपल्या आयुष्याला दिशा देते.
प्रत्येकाकडून जे जे चांगलं ते शिकत जायच, ते ताबडतोप अंमलात आणायचं आणि पुढे
१७/१८
जायचे. हेच बदल शेवटी आपले आयुष्य बदलतात, सुखकर करतात.
हल्ली अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याच्या काळात ही मुल्ये आपल्या जगण्याला खरा आकार,शांतता अन हमखास समाधान देतील.
२००९ हा आयुष्यातील तोपर्यंतचा अत्यंत कठीण आणि भावनिकदृष्ट्या कधीही न विसरता येणारा काळ होता.
बाबांना दोनवेळा हृदयविकाराचा झटका आणि पुढे मेंदूचे ऑपरेशन,त्याचवेळी भावाचा मोटारसायकलवरून पडून अपघात आणि पाय फ्रॅक्चर,माझ्या एका पायात #SaturdayThread#BusinessDots#मराठी#सत्यकथा १/१८
साईटवर दगड घुसल्याने पाय सुजलेला तर कंपनीत प्रचंड गोंधळ...
नवा व्यवसाय,प्रस्थापितांच्या समोर फक्त तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान एवढेच काय ते आमचे भांडवल. बरं त्यात आमची सर्व टिम १९/२२ वयोगटातली,प्रचंड मेहनती,कष्टाळू पण आम्हा सर्वांकडेच तशी बऱ्याच इतर गोष्टींची, अनुभवाची कमतरता
२/१८
होती. त्यात कौंटूबिक पातळीवर प्रचंड संकटाची मालिका.
कोणत्याही कंपनीत सेल्स जेवढे महत्वाचे तेवढेच परचेसही. मला तर सर्वच आघाड्यांवर पळावे लागायचे, आमच्याकडे त्याकाळी बरेचशे व्हेंडर नवे होते. (आज तेच आमचे ७०% हून जास्त व्हेंडर आहेत जे आता १४ वर्षापासून आम्हाला सेवा देताहेत)
३/१८
वांड पोरं आपला घात करून गुपचूप ती कोंबडी एखाद दिवशी फस्त करून टाकतात. मग बसा “आम्हाला फसवले” म्हणून बोंबलत.
चौथा- कोंबडी मारून गाडीखाली टाकायची मग गाडीवाल्याला ब्लॅकमेल करून चार कोंबड्याचे पैसे आणि आपणच मारलेली पण कोंबडी लुटायची (पण हा काही सज्जनांचा पर्याय नाही.) 😉
२/९
आता अजून एक पाचवा पर्याय असतो, कोंबडी,ती अंडीही खायची नाही, कितीही इच्छा झाली, तरी खायची नाहीत. त्या कोंबडीची सर्व १५/२० अंडी जमा करायची.
पुढे कोंबडी खुराड्यात बसवायची, तीची पुर्ण काळजी घ्यायची, कोंबडी २१ दिवस ती अंडी उबवत बसणार. तोपर्यंत आपण, संपुर्ण कुटूंब वाट पहात बसणार.
३/९
माझे दोन लहानपणीचे मित्र आहेत. एक ITI करून खाजगी कंपनीत मेंटेनंन्स डिपार्टमेण्टमधे कामाला आहे आणि दुसरा इंजिनियर आहे, तोही चांगल्या कंपनीत कार्यरत आहेत.
साधेपणानं "कोर्ट मॅरेज" केलं. सासऱ्याने मात्र आनंदाने मुलीच्या लग्नाचा खर्च जो वाचला तो मुलीच्याच नावाने बॅंकेत टाकला. त्यामुळे भरपूर पैशांची बचत झाली. तसेच याच्याकडेही बऱ्यापैकी पैसे शिल्लक होते.
हा एकदम निर्व्यसनी, नवराबायकोने मिळून एका विचाराने तेव्हा गावाकडे (साधारणपणे 👇
२००२/३) च्या सुमारास त्या पैशातून बऱ्यापैकी शेतजमिन विकत घेतली.
तसेच जुन्या घराची डागडूजी करून आईवडीलांसोबतच गावीच राहिला.
पुढे शेतात मात्र यांनी खुप चांगले प्रयोग केले. हळद, ऊस, इतर नगदी पिके,त्यात बरीचशी आंतकपिके तसेच सरकारच्या योजनेतून विहीर,आता हल्ली सोलारपंपही लावलाय. 👇
फॅक्टरीत आले की संध्याकाळी सर्वांना ढाब्यावर घेऊन जायचे, पाहिजे ते घ्या म्हणायचे आणि मग अक्षरश: धुमाकुळ... आम्हालाही जणू आमच्या घरातीलच माणसासारखे वाटायचे. माझे ऋणानुबंध जास्त घट्ट होण्याचे प्रमुख कारण हे त्यांच्यासोबतच्या अशा जेवणावळीच होत्या.
यात मी सांगितलेला 👇
पदार्थाचा इतिहास, भूगोल त्यांना इतका आवडायचा की बऱ्याच वेळा मला ते बाहेरच्या राज्यात जावूनही कुठे काय खावे हे मला विचारायचे.
त्यांना कामासाठी कधीही फोन करा, कितीही किचकट प्रश्न असला तरी कायम उत्तर तयारच असायची, फिल्डवर काम केलेले असल्याने अनुभव, थर्मल इंजिनियरींगचे 👇
माझ्या लहानपणी सहसा रेडीमेड कपडे खरेदी नसायचीच,शाळेव्यतिरिक्त वर्षातून एकदा दिवाळीत आणि दुसऱ्यांदा उन्हाळ्याच्या सुट्टीत नवे शिवलेले वाढत्या अंगाचे 🤦♂️😉(ढगळे)कपडे मिळायचे.
त्यातही आईबाबा सोबत,त्यामुळे आपली आवड अशी काही फार नसायची..
१/१४
मळखाऊ, जाड, टिकायला मजबूत, स्वस्त आणि मस्त हेच क्रायटेरिया असायचे.
एकदा कपडा सिलेक्ट झाला की मग आमची स्वारी निघायची टेलरच्या दुकानात, तिथे वाढत्या अंगाची मापे 🤦♂️घेतली की बाबा टेलरला न विसरता एक वाक्य सांगायचे “चोर खिसा ठेवा बरं”... आपल्या आयुष्यात हा चोरखिसा म्हणजे २/१४
आपण जर आज आपल्या घटनेची उद्देशिका वाचली तर सहज लक्षात येईल की ज्या देशाला विचार, व्यक्तीस्वातंत्र्य, जातीव्यवस्था, विद्वेष, जन्मजात विषमता, शिक्षणाचा अभाव, बहुतांश ग्रामीण भाग याचा शेकडो वर्षांचा पाया होता, प्रभाव होता त्या देशाने ही राज्यघटना त्या काळी कशी स्वाकारली असेल. १/६