मग ठरल्याप्रमाणे लस्सी घेतली,अजून काही पार्सल घेतले आणि एकदम खुशीत गाडीकडे आलो. कार चालू केली आणि निघणार एवढ्यात काचेवर टकटक झाली, मी एकदम दचकलो, बाहेर पाहिले तर वयस्कर काका मला काच खाली घ्यायला सांगत होते, मी काच खाली घेऊन त्यांना “काय झालं?” असं विचारणार एवढ्यात त्यांनीच
२/१२
“टायर पंक्चर झालाय,तो पहा म्हणून मला हाताने टायरकडे बोट दाखवले. मी ताबडतोप गाडीतून उतरलो आणि कपाळावरच हात मारला, टायर पुर्णच फ्लॅट/ अगदी सपाट.
मला घामच फुटला,गाडी चालवायला तर येत होती पण ही पंक्चरची भानगड नवीच होती.
माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि घाम पाहून, काकांनी विचारले
३/१२
काय रे, पहिलीच वेळ का? नवीन चालवायला शिकलाय का? मी हो म्हटले आणि खरी काय ती परिस्थिती सांगितली, बोलता बोलता माझी नजर इकडे तिकडे शोध घेत होती की आजूबाजूला कुठे पंक्चरचे दुकान आहे का? काकांच्या लक्षात हे आले आणि ते म्हणाले, काही मिळणार नाही इथे पंक्चर काढायचे दुकान, तीन
४/१२
किलोमीटरवर पंप आहे तिकडे जायला लागेल, मी इथलाच आहे, मॅार्निंग वॅाकला गेलो होतो , जाताना दुध नेतो म्हणून इथे आलोय. मी म्हटले पण तिकडे जावू कसा? चालत?
तर ते काका हसले आणि म्हणाले अरे वेड्या, स्टेपनी लाव आणि जा, तिकडे पंक्चर देतील काढून... मी थोडं ओशाळून म्हटलं - पण मला ते
५/१२
चाक बदलायचे कसे तेच येत नाही ना काका! 🤦♂️
काका,तसे सज्जन वाटत होते, ते हसले आणि म्हणाले- कसली रे तुमची पिढी, चल मी मदत करतो तुला, रात्रीची वेळ/आणिबाणी असती तर काय केले असतेस? असे म्हणत अजूनही बरेच टोमणे मारत राहिले पण मग अगदी सर्व काही मला सांगत तसेच अगदी प्रात्यक्षिक दाखवत
६/१२
१५/२० मिनीटांत चाक बदली करून दिले. मी बारकाईने ते सर्व पाहत त्यांना मदतही करत होतो. मी त्यांना मनापासून धन्यवाद म्हणत मनोभावे हात जोडत गाडीत बसणार एवढ्यात काकांनी पुन्हा हाक मारली, अन टायरकडे बोलावले, टायरकडे बोट दाखवत मला म्हणाले, हा टायर जर पुन्हा लगेच पंक्चर झाला तर
७/१२
तुला जमेल माझ्याशिवाय काढायला? मी म्हटले, हो जमेल की!
काका वस्ताद होते, म्हणे “दाखव बरं माझ्याशिवाय काढून” आता माझी पंचाईत, बर काकांनी काही ओळख पाळख नसताना इतकी मदत केलेली, मलाही रविवारमुळे मोकळाच वेळ होता, म्हटले चला पाहूया.
मग काय पुन्हा मी एकट्यानेच प्रयत्न सूरू केले.
८/१२
यावेळी मला अर्ध्यातासाहून अधिक वेळ लागला पण तोच टायर मी स्वत: बाहेर काढून पुन्हा लावू शकलो.
थोडा दमलो, कपडे पुर्ण मळले पण त्या काकांच्या कृपेने आयुष्यातला मोठा धडा घेतला.
काका तर एकदम आनंदाने मला पाहत होते, ते म्हणाले - आता तू गाडी चालवायला खरा तयार होशील.
९/१२
गाडी चालवायला येणे जितके गरजेचे तितकेच ही कामं स्वत:ला करता येणे हे आत्यंतिक महत्वाचे.
तसं हे किती साधं उदाहरण आहे ना,पण नीट विचार केला तर लक्षात येईल की यश आणि अपयशाची नक्की कारण हि याच्या मुळाशी आहेत. बऱ्याचदा आपण एखादी गोष्ट सर्व बाजूंचा विचार न करता आपल्याला सगळं कळतय
१०/१२
आपण आता पुर्ण तयार झालोय या अविर्भावात राहतो, खरं अज्ञान या दिडशहाणेपणात आहे, मग कधीतरी रात्रीच्या अंधारात आपला गेम होतो आणि आपण मात्र इतरांना दोष देत राहतो.
प्रत्येक गोष्टीत वैयक्तिक आकलनशक्ती किंवा उपजत बुद्धीमत्ता पुरेशी पडतेच असे नाही त्याकामी एखाद्या अनुभवी आणि तज्ञ
११/१२
मार्गदर्शकाची भूमिका ही नक्कीच उपयोगी पडते.
Shadowing आणि Reverse Shadowing ही तत्व खरं तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा हमखास मार्ग आहे.
नव्या गोष्टी शिकताना कधीच अर्ध्या हळकूंडात पिवळे होऊ नये.
परेशभाई (नाव बदललेय),माझ्यापेक्षा १०/१२ वर्षांनी मोठे. माझा परिचय झाला साधारणपणे १७/१८ वर्षांपूर्वी, त्यांच्या काही हिटींग प्रोसेसमधे त्यांना नवे बदल करायचे होते म्हणून कंपनीने मला एनर्जी ॲाडीट करण्यासाठी त्यांच्याकडे पाठविले. #SaturdayThread#आर्थिकसाक्षरता#सत्यकथा#मराठी १/१८
त्यांचा स्वभाव अत्यंत बोलका आणि हरहुन्नरी. नॅानटेक्निकल असले तरी प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने लक्ष देणार.
परेशभाईंचा मुंबईतील सुखवस्तू गुजराती कुटूंबात जन्म, हायस्कूलपासून शिक्षण करतच वडीलांच्या किरानामालाच्या दुकानात धंदा करायला शिकले. पुढे नियामाप्रमाणे बी.कॅाम केलं आणि
२/१८
एखाद दोन वर्षात स्वत:चा फॅब्रिकेशनचा छोटासा गाळा घेऊन काम सूरू केलं.व्यवसाय वाढविताना मोठ्या कंपन्यासोबत ज्या ओळखी झाल्या त्याचा पुरेपुर वापर करत त्यांचे व्हेंडर झाले. समाजाकडून बिनव्याजी आर्थिक मदत घेतली. वडिलांचे दुकानही सुरूच होते आणि त्यामुळे इकडे चांगला जम बसविला.
३/१८
माझ्या आयुष्यातील कॅार्पोरेट करियर मधील तो सुवर्णकाळ होता. भारलेले, झपाटलेले दिवस. वयाच्या अत्यंत कमी टप्प्यात २४/२५ व्या वर्षीच मला थरमॅक्ससारख्या प्रतिथयश,संपुर्णपणे भारतीय मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर पदाची संधी मिळाली होती. सतत #SaturdayThread#BusinessDots#मराठी#सत्यकथा १/१८
काम,नवीन शिकण्याची आस त्यामुळे सतत दौरे आणि मिटींगा चालू असायच्या.
त्या काळात मी बॉयलर्स आणि औष्णिक ऊर्जा विभागात आंतरराष्ट्रीय सल्लागार (जे बऱ्याच कारखान्यांना इंजिनियरींग सर्विसेस देतात) हे डिपार्टमेंट पहायचो. औष्णिक तंत्रज्ञान आणि इंधनाचे ज्वलन हा माझा आवडीचा विषय त्यात
२/१८
वायुरूप इंधनाची भारतातील जवळजवळ प्रत्येक केस माझ्या नजरेखालून जायचीच.
एक दिवस संध्याकाळी घरी जायच्या तयारीत असताना मोबाईल वाजला आणि पलीकडून ऊद्या सकाळी १० वाजता दिल्लीत मिटींगसाठी हजर व्हा असा निरोप मिळाला.
ही अत्यंत प्रतिष्ठेच्या कंपनीसाठीची किक ॲाफ मिटींग होती आणि जर
३/१८
२००९ हा आयुष्यातील तोपर्यंतचा अत्यंत कठीण आणि भावनिकदृष्ट्या कधीही न विसरता येणारा काळ होता.
बाबांना दोनवेळा हृदयविकाराचा झटका आणि पुढे मेंदूचे ऑपरेशन,त्याचवेळी भावाचा मोटारसायकलवरून पडून अपघात आणि पाय फ्रॅक्चर,माझ्या एका पायात #SaturdayThread#BusinessDots#मराठी#सत्यकथा १/१८
साईटवर दगड घुसल्याने पाय सुजलेला तर कंपनीत प्रचंड गोंधळ...
नवा व्यवसाय,प्रस्थापितांच्या समोर फक्त तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान एवढेच काय ते आमचे भांडवल. बरं त्यात आमची सर्व टिम १९/२२ वयोगटातली,प्रचंड मेहनती,कष्टाळू पण आम्हा सर्वांकडेच तशी बऱ्याच इतर गोष्टींची, अनुभवाची कमतरता
२/१८
होती. त्यात कौंटूबिक पातळीवर प्रचंड संकटाची मालिका.
कोणत्याही कंपनीत सेल्स जेवढे महत्वाचे तेवढेच परचेसही. मला तर सर्वच आघाड्यांवर पळावे लागायचे, आमच्याकडे त्याकाळी बरेचशे व्हेंडर नवे होते. (आज तेच आमचे ७०% हून जास्त व्हेंडर आहेत जे आता १४ वर्षापासून आम्हाला सेवा देताहेत)
३/१८
वांड पोरं आपला घात करून गुपचूप ती कोंबडी एखाद दिवशी फस्त करून टाकतात. मग बसा “आम्हाला फसवले” म्हणून बोंबलत.
चौथा- कोंबडी मारून गाडीखाली टाकायची मग गाडीवाल्याला ब्लॅकमेल करून चार कोंबड्याचे पैसे आणि आपणच मारलेली पण कोंबडी लुटायची (पण हा काही सज्जनांचा पर्याय नाही.) 😉
२/९
आता अजून एक पाचवा पर्याय असतो, कोंबडी,ती अंडीही खायची नाही, कितीही इच्छा झाली, तरी खायची नाहीत. त्या कोंबडीची सर्व १५/२० अंडी जमा करायची.
पुढे कोंबडी खुराड्यात बसवायची, तीची पुर्ण काळजी घ्यायची, कोंबडी २१ दिवस ती अंडी उबवत बसणार. तोपर्यंत आपण, संपुर्ण कुटूंब वाट पहात बसणार.
३/९
माझे दोन लहानपणीचे मित्र आहेत. एक ITI करून खाजगी कंपनीत मेंटेनंन्स डिपार्टमेण्टमधे कामाला आहे आणि दुसरा इंजिनियर आहे, तोही चांगल्या कंपनीत कार्यरत आहेत.
साधेपणानं "कोर्ट मॅरेज" केलं. सासऱ्याने मात्र आनंदाने मुलीच्या लग्नाचा खर्च जो वाचला तो मुलीच्याच नावाने बॅंकेत टाकला. त्यामुळे भरपूर पैशांची बचत झाली. तसेच याच्याकडेही बऱ्यापैकी पैसे शिल्लक होते.
हा एकदम निर्व्यसनी, नवराबायकोने मिळून एका विचाराने तेव्हा गावाकडे (साधारणपणे 👇
२००२/३) च्या सुमारास त्या पैशातून बऱ्यापैकी शेतजमिन विकत घेतली.
तसेच जुन्या घराची डागडूजी करून आईवडीलांसोबतच गावीच राहिला.
पुढे शेतात मात्र यांनी खुप चांगले प्रयोग केले. हळद, ऊस, इतर नगदी पिके,त्यात बरीचशी आंतकपिके तसेच सरकारच्या योजनेतून विहीर,आता हल्ली सोलारपंपही लावलाय. 👇
फॅक्टरीत आले की संध्याकाळी सर्वांना ढाब्यावर घेऊन जायचे, पाहिजे ते घ्या म्हणायचे आणि मग अक्षरश: धुमाकुळ... आम्हालाही जणू आमच्या घरातीलच माणसासारखे वाटायचे. माझे ऋणानुबंध जास्त घट्ट होण्याचे प्रमुख कारण हे त्यांच्यासोबतच्या अशा जेवणावळीच होत्या.
यात मी सांगितलेला 👇
पदार्थाचा इतिहास, भूगोल त्यांना इतका आवडायचा की बऱ्याच वेळा मला ते बाहेरच्या राज्यात जावूनही कुठे काय खावे हे मला विचारायचे.
त्यांना कामासाठी कधीही फोन करा, कितीही किचकट प्रश्न असला तरी कायम उत्तर तयारच असायची, फिल्डवर काम केलेले असल्याने अनुभव, थर्मल इंजिनियरींगचे 👇