२००९ हा आयुष्यातील तोपर्यंतचा अत्यंत कठीण आणि भावनिकदृष्ट्या कधीही न विसरता येणारा काळ होता.
बाबांना दोनवेळा हृदयविकाराचा झटका आणि पुढे मेंदूचे ऑपरेशन,त्याचवेळी भावाचा मोटारसायकलवरून पडून अपघात आणि पाय फ्रॅक्चर,माझ्या एका पायात #SaturdayThread#BusinessDots#मराठी#सत्यकथा १/१८
साईटवर दगड घुसल्याने पाय सुजलेला तर कंपनीत प्रचंड गोंधळ...
नवा व्यवसाय,प्रस्थापितांच्या समोर फक्त तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान एवढेच काय ते आमचे भांडवल. बरं त्यात आमची सर्व टिम १९/२२ वयोगटातली,प्रचंड मेहनती,कष्टाळू पण आम्हा सर्वांकडेच तशी बऱ्याच इतर गोष्टींची, अनुभवाची कमतरता
२/१८
होती. त्यात कौंटूबिक पातळीवर प्रचंड संकटाची मालिका.
कोणत्याही कंपनीत सेल्स जेवढे महत्वाचे तेवढेच परचेसही. मला तर सर्वच आघाड्यांवर पळावे लागायचे, आमच्याकडे त्याकाळी बरेचशे व्हेंडर नवे होते. (आज तेच आमचे ७०% हून जास्त व्हेंडर आहेत जे आता १४ वर्षापासून आम्हाला सेवा देताहेत)
३/१८
यातच एक चरणसिंह(नाव बदललेय) म्हणून माझ्या पुर्वीच्या कंपनीतील परिचितही होते.
ते आमच्यासाठी साईटवरील काही विशिष्ट काम करायचे. हिंदीवर प्रचंड पकड आणि बोलण्यात एकदम पटाईत,इंडस्ट्रीतल्या तमाम बातम्या घेऊन स्वारी हजर झाली की तीन चार तास ऊठायचीच नाही.पुढे मग माझी आई,पत्नी,मुलगी
४/१८
वडील आणि इतर सर्वांबद्दलही आस्थेने चौकशी व्हायची. चरणसिंग आले कि त्यांचे हास्यविनोद, कपाळाकडे पाहून भविष्य सांगण्याची पद्धत आणि व्यावसायीक खबरी असल्याने त्यांच्यासोबत बराच काळ जायचा. मी प्रेमाने बोलत असल्याने लोकांनाही ते आपलेच वाटायचे. मलाही रोजच्या तणावातून बदल वाटायचा.
५/१८
व्यावसायिक दृष्ट्या तसे आम्ही बऱ्यापैकी मजबूत होतो, तुफान वेगात, अचूक काम करणे हा आमचा हातखंडा पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मी पुण्यात रूबी हॅालमधेच वडीलांसोबत रहायला लागलो आणि मुंबईतील माझ्या वास्तव्यावर मर्यादा आल्या. माझा बाबा म्हणजे माझे सर्वस्व.दिवसभर नगर,कोल्हापुर,पुणे
६/१८
सातारा मुंबई कोकण करून मी रात्री बाबांसोबत झोपायचो.
कधीकधी तर दिल्ली,जयपूर,गोवा एका दिवसात विमानाने करून पुन्हा बाबांसोबत असायचो. खुप थकायचो, मनाने आणि शरिरानेही पण हे कोणालाच सांगू शकत नव्हतो. घरचे मोठे वडिलधारी दवाखान्यात आणि कंपनीत मीच वडीलधारी.कधीकधी पुर्ण मोडून जायचो
७/१८
मी आणि पत्नी एकत्र असलो की दोघेही अस्वस्थ होऊन रडायचो. ॲाफीसला जावून बसलो की घरचे टेंशन आणि घरी आलो की ॲाफीसची आठवण. सांत्वन करणारे भेटले की रडू कोसळायचे. अशात चरणसिंगही यायचे, कधी वेगवेगळ्या खड्यांच्या अंगठ्या घेऊन, कधी एखादा अंगारा घेऊन कधी वेगवेगळे ऊपवास करायला लावायचे.
८/१८
धड साधी तिशी पण पार न केलेला मी अंधारात चाचपडत होतो. ते काय सांगतील ते करायचो. वेगळाच खेळ झाला होता आयुष्याचा.
इकडे लोकांनाही ते माझे जवळचे स्नेही वाटायचे त्यामुळे साईटवर यांना भरपूर कामं मिळत होती. बरं मी दवाखाने आणि दौऱ्यात अडकल्याने फोनवरच बिल्स क्लियर करायचो. चरणसिंग
९/१८
एकामागे एक काम करत होते त्यासोबतच त्याच साईटवर डायरेक्ट कस्टमरकडून इतरही कामं मिळवायचे.आम्ही याला कधी आक्षेप घ्यायचो नाही कारण त्यात तसा आमचा काही तोटा नव्हता.
एक दिवस मी वेळ काढून मुंबई ॲाफीसला सहज येऊन बसलो आणि आमच्या फायनान्स टिमकडून मी नसताना काढलेल्या बिलांचे डिटेल्स
१०/१८
मागवले. तसे सर्व काही सुरळीत होते,सहज म्हणून चरणसिंहाचीही बिल पाहिली आणि त्यांचे रेट्स पाहून मी अक्षरश: तीन ताड ऊडालो, पुन्हापुन्हा सर्व तपासले आणि प्रचंड मोठा घोटाळ्याची जाणीव झाली.त्यांनी इकडे माझ्या भावनांना कुरवाळत दोनच्या समोर चार रूपये आणि १०० मीटरच्या जागी २०० मीटर
११/१८
करून लाखोंची मोठमोठी बील्स पास केली होती. मी ताबडतोप आमच्या खास माणसांना सर्व स्वत:हून चेक करायला लावले,आमचे काही लोक यात सामिल आहेत का ते ही पाहिले पण सुदैवाने तसे काही नव्हते. रागाने आणि विश्वासघाताने मी फुरफुरत होतो, चेहरा लालेलाल झाला होता. काय करावे काही कळत नव्हते.
१२/१८
पण एवढ्यात घरून बाबा अस्वस्थ आहेत असा फोन आला आणि मी सर्व सोडून घरी आलो.
त्या रात्री बाबा ठिक झाले,माझीही झोप झाल्याने मी शांत झालो होतो.ॲाफीसमधे जावून सर्व पुन्हा पाहिले,काय करता येईल याचे नियोजन केले, चरणसिंहाकडून पैसे वसूलीचा पुर्ण प्लान बनवला,तो पुढच्या काही महिन्यात
१३/१८
शांतपणे अंमलात आणला आणि त्याहूनही शांतपणे त्यांना कायमचा निरोपही दिला.
पुढे भविष्यात कधीही त्यांना आमच्याकडून कामं किंवा इज्जत दोन्ही मिळाली नाहीत.
या काळाने खुप धडे दिले, व्यवहारतील सुसुत्रता आणि Standardization का महत्वाचे असते हे ठळकपणे जाणवले. लोकं कोणत्याही टप्यावर
१४/१८
आपला घात करू शकतात हे कायम ध्यानात ठेवायचे.
पैशांसाठी काही लोकं कोणत्याही थराला जातात, त्यांना तुमच्या कोणत्याच गोष्टींशी काहीच देणेघेणे नसते, माणसाच्या रूपातही लांडगे आणि कोल्हे असतात ते ऊगाच म्हणत नाहीत.
ती हिंस्र श्वापदे वेळीच ओळखायची आणि त्यांचा बंदोबस्तही करायचा.
१५/१८
मित्रहो एक गोष्ट लक्षात ठेवायची- आपल्या अडचणीच्या काळात सर्वांनाच आपले प्रॅाब्लेम सांगत बसू नका,इमोशनल तर अजिबात व्हायचे नाही.काहीजण आपल्यावर हसतात तर बरेच लोकं त्यात संधी शोधतात.
त्यातही जेंव्हा तुम्ही सर्वात मोठ्या आणीबाणीसदृष्य परिस्थितीतून जात असाल तेंव्हा कधीच रागात
१६/१८
निर्णय घ्यायचे नाहीत. शांत झोप, सकस आहार, विचारपुर्वक पावले आणि ठराविक मित्र/सहकारी आपल्याला कोणत्याही संकटातून सहज बाहेर काढू शकतात.
आर्थिक किंवा मानसिक परिस्थितीचा गैरफायदा उचलायला हे असले डोमकावळे तयारच असतात, त्यांना कधीच संधी द्यायची नाही.
१७/१८
भावना आणि आर्थिक व्यवहार नेहमी वेगळे ठेवायचे. या जगात जर तुम्ही भावनाविवश झालात तर कफल्लक व्हायला वेळ लागत नाही.
यश मिळवायला खुप संघर्ष करावा लागतो पण कंगाल होण्यासाठी फक्त दुर्लक्ष झाले तरी पुरे.
वांड पोरं आपला घात करून गुपचूप ती कोंबडी एखाद दिवशी फस्त करून टाकतात. मग बसा “आम्हाला फसवले” म्हणून बोंबलत.
चौथा- कोंबडी मारून गाडीखाली टाकायची मग गाडीवाल्याला ब्लॅकमेल करून चार कोंबड्याचे पैसे आणि आपणच मारलेली पण कोंबडी लुटायची (पण हा काही सज्जनांचा पर्याय नाही.) 😉
२/९
आता अजून एक पाचवा पर्याय असतो, कोंबडी,ती अंडीही खायची नाही, कितीही इच्छा झाली, तरी खायची नाहीत. त्या कोंबडीची सर्व १५/२० अंडी जमा करायची.
पुढे कोंबडी खुराड्यात बसवायची, तीची पुर्ण काळजी घ्यायची, कोंबडी २१ दिवस ती अंडी उबवत बसणार. तोपर्यंत आपण, संपुर्ण कुटूंब वाट पहात बसणार.
३/९
माझे दोन लहानपणीचे मित्र आहेत. एक ITI करून खाजगी कंपनीत मेंटेनंन्स डिपार्टमेण्टमधे कामाला आहे आणि दुसरा इंजिनियर आहे, तोही चांगल्या कंपनीत कार्यरत आहेत.
साधेपणानं "कोर्ट मॅरेज" केलं. सासऱ्याने मात्र आनंदाने मुलीच्या लग्नाचा खर्च जो वाचला तो मुलीच्याच नावाने बॅंकेत टाकला. त्यामुळे भरपूर पैशांची बचत झाली. तसेच याच्याकडेही बऱ्यापैकी पैसे शिल्लक होते.
हा एकदम निर्व्यसनी, नवराबायकोने मिळून एका विचाराने तेव्हा गावाकडे (साधारणपणे 👇
२००२/३) च्या सुमारास त्या पैशातून बऱ्यापैकी शेतजमिन विकत घेतली.
तसेच जुन्या घराची डागडूजी करून आईवडीलांसोबतच गावीच राहिला.
पुढे शेतात मात्र यांनी खुप चांगले प्रयोग केले. हळद, ऊस, इतर नगदी पिके,त्यात बरीचशी आंतकपिके तसेच सरकारच्या योजनेतून विहीर,आता हल्ली सोलारपंपही लावलाय. 👇
फॅक्टरीत आले की संध्याकाळी सर्वांना ढाब्यावर घेऊन जायचे, पाहिजे ते घ्या म्हणायचे आणि मग अक्षरश: धुमाकुळ... आम्हालाही जणू आमच्या घरातीलच माणसासारखे वाटायचे. माझे ऋणानुबंध जास्त घट्ट होण्याचे प्रमुख कारण हे त्यांच्यासोबतच्या अशा जेवणावळीच होत्या.
यात मी सांगितलेला 👇
पदार्थाचा इतिहास, भूगोल त्यांना इतका आवडायचा की बऱ्याच वेळा मला ते बाहेरच्या राज्यात जावूनही कुठे काय खावे हे मला विचारायचे.
त्यांना कामासाठी कधीही फोन करा, कितीही किचकट प्रश्न असला तरी कायम उत्तर तयारच असायची, फिल्डवर काम केलेले असल्याने अनुभव, थर्मल इंजिनियरींगचे 👇
माझ्या लहानपणी सहसा रेडीमेड कपडे खरेदी नसायचीच,शाळेव्यतिरिक्त वर्षातून एकदा दिवाळीत आणि दुसऱ्यांदा उन्हाळ्याच्या सुट्टीत नवे शिवलेले वाढत्या अंगाचे 🤦♂️😉(ढगळे)कपडे मिळायचे.
त्यातही आईबाबा सोबत,त्यामुळे आपली आवड अशी काही फार नसायची..
१/१४
मळखाऊ, जाड, टिकायला मजबूत, स्वस्त आणि मस्त हेच क्रायटेरिया असायचे.
एकदा कपडा सिलेक्ट झाला की मग आमची स्वारी निघायची टेलरच्या दुकानात, तिथे वाढत्या अंगाची मापे 🤦♂️घेतली की बाबा टेलरला न विसरता एक वाक्य सांगायचे “चोर खिसा ठेवा बरं”... आपल्या आयुष्यात हा चोरखिसा म्हणजे २/१४
आपण जर आज आपल्या घटनेची उद्देशिका वाचली तर सहज लक्षात येईल की ज्या देशाला विचार, व्यक्तीस्वातंत्र्य, जातीव्यवस्था, विद्वेष, जन्मजात विषमता, शिक्षणाचा अभाव, बहुतांश ग्रामीण भाग याचा शेकडो वर्षांचा पाया होता, प्रभाव होता त्या देशाने ही राज्यघटना त्या काळी कशी स्वाकारली असेल. १/६
असेच एक दिवस सिनेमा पाहून स्टेशनवरून पायी चालत येत होतो. नेहमीचीच सिग्नलवर असणारी लहान मुले दिसली. उन्हाळ्याचे दिवस, त्यांच्या पायात चप्पल नाही, अंगावर धड कपडे नाहीत, भुकेने व्याकुळ. आमच्याकडे फार आशेने पाहत होती.
आम्ही सर्वच जण तसे गावखेड्यातून आल्याने बऱ्यापैकी संवेदनशील.
२/१९
सर्वांनीच त्यांना जवळ बोलावले आणि एका वडापावच्या गाडीवर त्यांना हवे तेवढे खा म्हणून सांगितले. पोरांचे चेहरे पाहण्यासारखे झाले, पोट भरल्याचा आनंद पोटापेक्षा डोळ्यातून, नाकातून चमकत होता.