त्यांना साथ देणारे नकली पत्रकार, सुट्टीवरील न्यायव्यवस्था आणि नाकर्ते प्रशासन याला जेवढे कारणीभूत आहेत तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त आपली “बेशिस्त” जनता याला कारणीभूत आहे. (या प्रत्येकात अगदी काही अपवाद आहेत, त्यांची मी क्षमा मागतो)
पण वस्तुस्थिती ही आहे की प्रत्येक
२/१२
क्षेत्रात, ऊद्योग असो, खाजगी वा सरकारी नोकरी असो वा घरगुती वा लघु ऊद्योग असो आपल्याला नियम आणि कायदे वाकवायची, मोडायची भितीच वाटत नाही, आणिबाणीच्या, महामारीच्या काळातही कोणी कायद्याला किंमत देईना.
एकंदर अघळपघळपणा आणि “चलता है” ॲटिट्यूड आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनलाय.
३/१२
पत्रकार, पोलिस आणि न्यायव्यवस्था ही याच मुळे तर भ्रष्ट होत चाललीये.
आजच्या एकविसाव्या शतकातही आपल्या देशाचा विज्ञानापेक्षा इतिहास आणि इतर नको त्या गोष्टींवरचा विश्वास दृढ होत चाललाय. तार्कीक आणि सांख्यिकीचे गणित जाणणारे जगभरातील तत्वज्ञ, आरोग्यविषयक शास्त्रज्ञ महामारीच्या
४/१२
दुसऱ्या लाटेबद्दल बोलत असताना आपल्याकडे ॲाक्टोबरपासूनच सर्व सूरळीत झाल्याच्या थाटात कार्यक्रम सुरू झाले.
सर्वात मोठा विनोद म्हणजे यात राजकारण्यापेक्षा शिकले सवरले लोक बेफाम होऊन सगळीकडे सहकुटुंब फिरत होते. मग यात बिनडोक राजकारणी कसे मागे राहतील तेही हिरहिरीने सामिल झाले.
५/१२
लस, औषधे, आरोग्य व्यवस्थेची उभारणी, डॅाक्टर, नर्सेस, इतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न, सोईसुविधा सर्वांचा विसर पडला. आणि वर्षभरानंतर एका भयंकर दुस्वप्नाच्या आगडोंबात हा देश बुडाला.
माझ्या मते कोरोना रोगापेक्षा पेक्षा जास्त बळी हे आपली एकंदर व्यवस्था गहाळ राहिल्याने, दुसऱ्या लाटेची
६/१२
कोणतीही पुर्वतयारी न केल्याने आणि नियोजनशुन्य कारभारामुळे पडलेत. सर्वाधिक निरपराध जीवांच्या मृत्यूचे कारण हे ही अव्यवस्थेतच आहे.
निवडणुका, लग्नसमांरभ, जत्रा, विविध कार्यक्रम यातील बेशिस्त आणि कायदे मोडण्याच्या उपजत स्वभावामुळेही कित्येक निरपराध, निष्पांपांचा यात जीव गेलाय.
७/१२
या कोरोना व्हायरसपेक्षा आपल्यातील हे दुर्गुण आपल्या देशाला, राज्याला आणि कुटुंबाला जास्त धोकादायक आहेत...
जगभरातील शास्त्रज्ञ ओरडून सांगत असताना आपले देश अन राज्य पातळीवरील सर्वोच्च नेतेच जर विना मास्कचे फिरत असतील तर आपली जनता कशाला कायदे मानेल?
या भयंकर महामारीतून
८/१२
आपल्या देशाला आणि राज्याला काय शिकायचे असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करणे, स्वत:ची आणि कुटूंबाची सुरक्षा आणि कामाची शिस्तबद्ध पद्धत!
मला वैयक्तिकरित्या वाटते की ही महामारी सरकार पेक्षा आपण सर्वांनी मिळून ओढवून घेतलीये.... खर तर
९/१२
हे एक कटू सत्य आहे की - “We are getting what we all deserve!”
लायकीप्रमाणे हा कोरोना आपल्या देशाला छळतोय. मंडळी, आपण स्वत:च आपल्यासोबत इतर सर्वांनाच स्मशानाकडे ढकलतोय....
निदान आता तरी जागे होऊ, शिस्त, कायदे, नियम पाळू.... इतरांनाही ते पाळायला लावू....
१०/१२
कोरोनाला टाळण्याचा सध्या तरी दुसरा कोणताच उपाय नाही.
चला, मास्क घाला, सॅनिटायझर वापरा, लवकरात लवकर लस घेण्यासाठी प्रयत्न करा, राजकारणी काहीही म्हणो, जात, धर्म, विसरून एकमेकांना मदत करा!
११/१२
मग ठरल्याप्रमाणे लस्सी घेतली,अजून काही पार्सल घेतले आणि एकदम खुशीत गाडीकडे आलो. कार चालू केली आणि निघणार एवढ्यात काचेवर टकटक झाली, मी एकदम दचकलो, बाहेर पाहिले तर वयस्कर काका मला काच खाली घ्यायला सांगत होते, मी काच खाली घेऊन त्यांना “काय झालं?” असं विचारणार एवढ्यात त्यांनीच
२/१२
“टायर पंक्चर झालाय,तो पहा म्हणून मला हाताने टायरकडे बोट दाखवले. मी ताबडतोप गाडीतून उतरलो आणि कपाळावरच हात मारला, टायर पुर्णच फ्लॅट/ अगदी सपाट.
मला घामच फुटला,गाडी चालवायला तर येत होती पण ही पंक्चरची भानगड नवीच होती.
माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि घाम पाहून, काकांनी विचारले
३/१२
परेशभाई (नाव बदललेय),माझ्यापेक्षा १०/१२ वर्षांनी मोठे. माझा परिचय झाला साधारणपणे १७/१८ वर्षांपूर्वी, त्यांच्या काही हिटींग प्रोसेसमधे त्यांना नवे बदल करायचे होते म्हणून कंपनीने मला एनर्जी ॲाडीट करण्यासाठी त्यांच्याकडे पाठविले. #SaturdayThread#आर्थिकसाक्षरता#सत्यकथा#मराठी १/१८
त्यांचा स्वभाव अत्यंत बोलका आणि हरहुन्नरी. नॅानटेक्निकल असले तरी प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने लक्ष देणार.
परेशभाईंचा मुंबईतील सुखवस्तू गुजराती कुटूंबात जन्म, हायस्कूलपासून शिक्षण करतच वडीलांच्या किरानामालाच्या दुकानात धंदा करायला शिकले. पुढे नियामाप्रमाणे बी.कॅाम केलं आणि
२/१८
एखाद दोन वर्षात स्वत:चा फॅब्रिकेशनचा छोटासा गाळा घेऊन काम सूरू केलं.व्यवसाय वाढविताना मोठ्या कंपन्यासोबत ज्या ओळखी झाल्या त्याचा पुरेपुर वापर करत त्यांचे व्हेंडर झाले. समाजाकडून बिनव्याजी आर्थिक मदत घेतली. वडिलांचे दुकानही सुरूच होते आणि त्यामुळे इकडे चांगला जम बसविला.
३/१८
माझ्या आयुष्यातील कॅार्पोरेट करियर मधील तो सुवर्णकाळ होता. भारलेले, झपाटलेले दिवस. वयाच्या अत्यंत कमी टप्प्यात २४/२५ व्या वर्षीच मला थरमॅक्ससारख्या प्रतिथयश,संपुर्णपणे भारतीय मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर पदाची संधी मिळाली होती. सतत #SaturdayThread#BusinessDots#मराठी#सत्यकथा १/१८
काम,नवीन शिकण्याची आस त्यामुळे सतत दौरे आणि मिटींगा चालू असायच्या.
त्या काळात मी बॉयलर्स आणि औष्णिक ऊर्जा विभागात आंतरराष्ट्रीय सल्लागार (जे बऱ्याच कारखान्यांना इंजिनियरींग सर्विसेस देतात) हे डिपार्टमेंट पहायचो. औष्णिक तंत्रज्ञान आणि इंधनाचे ज्वलन हा माझा आवडीचा विषय त्यात
२/१८
वायुरूप इंधनाची भारतातील जवळजवळ प्रत्येक केस माझ्या नजरेखालून जायचीच.
एक दिवस संध्याकाळी घरी जायच्या तयारीत असताना मोबाईल वाजला आणि पलीकडून ऊद्या सकाळी १० वाजता दिल्लीत मिटींगसाठी हजर व्हा असा निरोप मिळाला.
ही अत्यंत प्रतिष्ठेच्या कंपनीसाठीची किक ॲाफ मिटींग होती आणि जर
३/१८
२००९ हा आयुष्यातील तोपर्यंतचा अत्यंत कठीण आणि भावनिकदृष्ट्या कधीही न विसरता येणारा काळ होता.
बाबांना दोनवेळा हृदयविकाराचा झटका आणि पुढे मेंदूचे ऑपरेशन,त्याचवेळी भावाचा मोटारसायकलवरून पडून अपघात आणि पाय फ्रॅक्चर,माझ्या एका पायात #SaturdayThread#BusinessDots#मराठी#सत्यकथा १/१८
साईटवर दगड घुसल्याने पाय सुजलेला तर कंपनीत प्रचंड गोंधळ...
नवा व्यवसाय,प्रस्थापितांच्या समोर फक्त तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान एवढेच काय ते आमचे भांडवल. बरं त्यात आमची सर्व टिम १९/२२ वयोगटातली,प्रचंड मेहनती,कष्टाळू पण आम्हा सर्वांकडेच तशी बऱ्याच इतर गोष्टींची, अनुभवाची कमतरता
२/१८
होती. त्यात कौंटूबिक पातळीवर प्रचंड संकटाची मालिका.
कोणत्याही कंपनीत सेल्स जेवढे महत्वाचे तेवढेच परचेसही. मला तर सर्वच आघाड्यांवर पळावे लागायचे, आमच्याकडे त्याकाळी बरेचशे व्हेंडर नवे होते. (आज तेच आमचे ७०% हून जास्त व्हेंडर आहेत जे आता १४ वर्षापासून आम्हाला सेवा देताहेत)
३/१८
वांड पोरं आपला घात करून गुपचूप ती कोंबडी एखाद दिवशी फस्त करून टाकतात. मग बसा “आम्हाला फसवले” म्हणून बोंबलत.
चौथा- कोंबडी मारून गाडीखाली टाकायची मग गाडीवाल्याला ब्लॅकमेल करून चार कोंबड्याचे पैसे आणि आपणच मारलेली पण कोंबडी लुटायची (पण हा काही सज्जनांचा पर्याय नाही.) 😉
२/९
आता अजून एक पाचवा पर्याय असतो, कोंबडी,ती अंडीही खायची नाही, कितीही इच्छा झाली, तरी खायची नाहीत. त्या कोंबडीची सर्व १५/२० अंडी जमा करायची.
पुढे कोंबडी खुराड्यात बसवायची, तीची पुर्ण काळजी घ्यायची, कोंबडी २१ दिवस ती अंडी उबवत बसणार. तोपर्यंत आपण, संपुर्ण कुटूंब वाट पहात बसणार.
३/९
माझे दोन लहानपणीचे मित्र आहेत. एक ITI करून खाजगी कंपनीत मेंटेनंन्स डिपार्टमेण्टमधे कामाला आहे आणि दुसरा इंजिनियर आहे, तोही चांगल्या कंपनीत कार्यरत आहेत.
साधेपणानं "कोर्ट मॅरेज" केलं. सासऱ्याने मात्र आनंदाने मुलीच्या लग्नाचा खर्च जो वाचला तो मुलीच्याच नावाने बॅंकेत टाकला. त्यामुळे भरपूर पैशांची बचत झाली. तसेच याच्याकडेही बऱ्यापैकी पैसे शिल्लक होते.
हा एकदम निर्व्यसनी, नवराबायकोने मिळून एका विचाराने तेव्हा गावाकडे (साधारणपणे 👇
२००२/३) च्या सुमारास त्या पैशातून बऱ्यापैकी शेतजमिन विकत घेतली.
तसेच जुन्या घराची डागडूजी करून आईवडीलांसोबतच गावीच राहिला.
पुढे शेतात मात्र यांनी खुप चांगले प्रयोग केले. हळद, ऊस, इतर नगदी पिके,त्यात बरीचशी आंतकपिके तसेच सरकारच्या योजनेतून विहीर,आता हल्ली सोलारपंपही लावलाय. 👇