सणाच्या पहाटेचा पहिला प्रहर..आदल्या दिवशी रात्री १२ वाजेस्तोवर का जागलेली असेना ती.. त्यादिवशी पहाटे ३ च्याटोलला तिनं उठावं..डाळ शिजत घालावी..लगबगीनं पोळ्यांसाठी कणिक मळून ठेवावी आणि पाटा-वरवंटा घेऊन डाळीचं पुरण वाटावं..सणासुदीला आईचा बेत असतो पुरणपोळीचा. #खाद्यसंस्कृती#थ्रेड#म
समाजाला जशी संस्कृती असते..तशी ती खाद्यपदार्थांनाही असते.. पण या दोन्ही संस्कृतींचा भार स्त्रियांच्या खांद्यावर असतो.. बाकी पुरुष नुसते बडेजाव मारण्यातच पुढं असतात..बहुतांश वेळा.
पाट्यावरच्या कणकेला वरवंट्याचे घाव घालणारी आई..प्रत्येक घावाला तिनं प्रेम ओतावं..त्याचीच चव आम्हाला.
लोहाराचा भाता चालावा तशी चूल धगधगावी..त्या धगित तापलेल्या तव्यावर पुरण भरून लाटलेली पोळी पडावी..अखंड दुरडी भरस्तोवर तिनं पोळ्यांचा रतीब घालावा..पोराबाळांना चांगल्या दोनरोज पुरतील एवढ्या पोळ्या तिनं दिवस उगवायला बनवाव्यात.
तांबडं फुटायला तिनं येळवणीच्या आमटीला फोडणी दिलेली असते.
पुरणात गूळ किती घालायचा..डाळीला पाणी किती ठेवायचं..मीठ किती?..कणिक किती आणि कशी मळायची..सगळं सगळं झोपेतही ऍक्युरेट करणारी ती सुगरण..जणू पंचपक्वान बनवण्यासाठीच ती जन्माला आली.
आईनं बनवलेली पुरणपोळी आणि सोबतीला असलेली तिच्याच हातची येळवणीची आमटी. अन्न हे पूर्णब्रह्म याचीच ती साक्ष.
उन्हाळभर राबून बनवलेल्या सांडगे, कुरुड्या, पापड, भातुड्या..यांचं तळण बनवून तिनं रचलेली शिग पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटावं.. आमचा हात त्या पदार्थाकडे जायला..आई दुरूनच ओरडायची. 'लांब हो..अगोदर मला नैवेद्य काढायचा आहे..'
देव असो की नसो..आई बोलली ना देवाला नमस्कार कर..विषय संपायचा.
अन्न बनवताना स्त्री त्यात प्रेम, माया ओतत असते.. म्हणून ते अन्न खाद्यसंस्कृती या नावाखाली अजरामर होऊ जातं..हौसेने वेगवेगळे पदार्थ बनवून कुटूंबाला खाऊ घालणारी प्रत्येक सुगरण या संस्कृतीची पाईक आहे..त्यांना त्यांचा मान द्यायला हवा.
कोणत्या वेळी काय, कसं बनवायचं यात त्या गुरू असतात.
जन्म बाईचा खूप घाईचा... सकाळी सकाळी न्याहरीची गडबड असावी.. आईनं गरम गरम भाकरीसाठी चुलीवर तवा लावावा.. निम्मी भूक तिथंच संपावी.. लाकडी काठवटीत तिची कणकेवर पडणारी थाप..सोबतीला वाजणारी काकणांची किणकिण.. तेलचटणी सोबत संगीतमय न्याहरी आजही आम्हाला मिळावी.. याउपर भाग्य ते काय असावे?
सणांचा सण दिवाळी म्हणजे प्रत्येक सुगरण स्त्रीसाठी कुंभमेळाच..दरवर्षी भरणारा.
सामानाची जमवाजमव करण्यापासून ते फराळ भरून यजमानांच्या पुढ्यात ठेवलेल्या प्लेटपर्यंत..प्रत्येक सुगरण पदर खोचून उभी असते..दिवाळीच्या फराळाला चव येते ते या परिश्रमाचं चीज.
चिवडा, लाडू, चकली..आणि आईचं प्रेम.
श्रीमंतीत माजू नये आणि गरिबीत लाजू नये.. ही म्हण खाद्यसंस्कृतीत शब्दशः पहायला मिळते.. आपल्या महाराष्ट्राच्या अन्नात तर नक्कीच.. सर्दगरीब ते गर्भश्रीमंत इथं प्रत्येकजण अन्नाची बूज राखण्यासाठी तेवढंच कष्टाने संस्कार पाळतो.. ही इथल्या सामाजिक संस्कृतीची देण. आपण सगळेच त्याचे पाईक..
अल्पोपहार पासून ते पंचपक्वान थाळी पर्यंत आणि शिळ्या तुकड्यापासून ते तेराव्याच्या जेवनापर्यंत.. इथं अन्न हे पूर्णब्रह्मच असतंय.. त्याबाबत कधी तडजोड इथल्या मातीने केली नाही.
रस्त्यावर मिळणारा वडापाव इथं लाखमोलाचाच असतो.. कोणासाठी तो चैन असला तरी अनेकांसाठी भूक असतो.
तहानलेल्याला पाणी आणि भुकेलेल्याला अन्न देणं.. हे या महाराष्ट्राचं कर्मकर्तव्य.. ते तो इमानेइतबारे पार पाडत आहे.. या भूमीचीच देण ती.
एक तीळ असला तरी तो सात जणांत वाटून खावा.. हे आहेत इथले संस्कार.
उद्या #महाराष्ट्रदिन आहे..महाराष्ट्र हे काय फक्त राज्य नाही..ते संस्कार आहेत, संस्कृती आहे.. महाराष्ट्र एक जगण्याची रीत आहे..जगण्याची एक कला आहे..ती जीवनकला उत्तरोत्तर बहरत जावो या सदिच्छा..जय महाराष्ट्र..!❤️
घटना साधारणपणे २०१७ ची..
पुण्यात होतो.शेती विषयक एक कार्यशाळा अटेंड करायचा बेत होता.विषय होता 'शेतीचा अर्थ'.
त्याच दिवशी केंद्र सरकारचे मुख्य अर्थसल्लागार सुब्रमण्यम झंझावाती अस काही बोलले.ते म्हणाले 'शेतकऱ्यांना आता प्राप्तिकराच्या जाळ्यात घ्यायला हवं.' #महाराष्ट्रदिन#म#थ्रेड
बराच खल झाला तेंव्हा या विषयावर.. बरीच टीका झेलावी लागली सुब्रमण्यमनां.
१९२५ साली कर परिषदेत मागणी होती शेतकऱ्यांना कर लावा अशी.. आज आणिएक ४ वर्षांनी शंभरी होईल त्या मागणीची.. आज २१ सालीही निर्णय नाहीय त्यावर..शेती खरंतर भारतीयांना जिव्हाळ्याचा विषय..अलीकडे तर खूपच sympathy.
म्हणजे गेल्या शंभर एक वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहिलं..पण शेतकऱ्यांचं उत्पन्न काही करपात्र करता आलं नाही आपल्याला..म्हणायला फक्त शेती ही काळी आई आणि शेतकरी बळीराजा आहे..गेल्या शतकभरात जी काही वाताहत त्या आईची आणि लेकरांची झालीय ती शब्दात सांगायची सोय नाही.
शेती राज्यसूचीत येते.
एवढी महान संतसाहित्य परंपरा, ब्रिटिशकालीन समाजसुधारकांचा वारसा आणि महापुरुषांची अखंड फौज वारसरूपी पाठीशी असताना.. आज आपल्याला एका श्वासाच्या ऑक्सिजनसाठी तडफडावं लागत असेल तर त्या परंपरेचे खरे वारस आपण आहोत का..?
येत्या चार दिवसात महाराष्ट्र दिन आहे..
रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग। अंतर्बाह्य जग आणि मन॥
इति संत शिरोमणी जगद्गुरू श्री संत तुकोबाराय.
महाराष्ट्रसमाज आणि एकूणच भारतवर्षात गेली सताठशे वर्ष जी काही सामाजिक कूस बदल घडली. त्यात सिंहाचा वाटा हा संत साहित्यास जातो.
जवळपास १३व्या शतकाच्या उत्तरार्धापासून हा समाज एका अंदाधुंदीस सामोरा गेला, आजही जातोच आहे.त्यातून मार्ग दाखवण्याचे काम संत साहित्य इमानेइतबारे करत आहे.अगदी आजही.
संत साहित्याचा आवाका भला थोरला आहे. त्यातील प्राणप्रिय असणाऱ्या जगद्गुरू श्री संत तुकोबारायांविषयी सुरवातीला चार शब्द.
"अश्मयुग काही दगड संपले म्हणून संपले नाही. पण तेल मात्र तेलयुगाचा अंत व्हायच्या अगोदर संपेल." हे गाजलेलं वाक्य त्यांचं.
एखाद्या व्यक्तीचं असामान्यत्व काळच अबाधित राखतो.
आत्ता फेब्रुवारीच्या २३ व्या दिवशी त्यांनी आपला निरोप घेतला.
बरोबर,ते आहेत शेख अहमद झाकी यामानी..!❤️ #थ्रेड#म
प्रत्येक कार्यप्रवण हाताच्या भाग्यरेषेचा इतिहास हा जळमटांनी व्यापलेलाच असतो.
झाकी जन्मले १९३० ला..मक्का, सौदी अरेबियात जन्माला आलेलं लेकरू ते..वडील हसन यामानी धार्मिक गुरू..आई साहित्यप्रेमी..सगळीकडं तांडे करून बोंबलत फिरणारे अरब..गरिबी पाचवीला पुजलेली..त्यावेळी देश ही ओळख न्हवती.
तरीही झाकीच्या पालकांनी त्याला शिकायला परदेशी पाठवलं..इजिप्तच्या कैरोत. तिथं ५१ ला लॉ केला. पुढं ५५ ला लॉ मास्टरकी मिळवली न्यूयॉर्कमध्ये.. ५६ ला Harvard लॉ स्कुलमधून ग्रॅज्युएट झाले..त्यानंतरच त्यांचं कार्यकर्तृत्व असं काही झळाळलं की, ६९ ला जपान, Osmania university भारताने ७५ ला.
आम्ही हमीभावात ऐतिहासिक वाढ केली..असे पंतप्रधान म्हणत आहेत..आपण थेट आकडेवारी पहाणारच आहोत..त्याअगोदर त्यांच्या बोलण्याची पार्श्वभूमी पाहू.
APMC सुधारणा, MSP आणि कंत्राटी शेतीची सुरक्षितता यांचा नवीन कायद्यात समावेश या मागण्यांसाठी जवळपास ९० दिवस शेतकरी आंदोलन सुरू आहे. #थ्रेड#म
या पार्श्वभूमीवर केंद्रीय नेते जिथं जागा मिळेल तिथे नवीन कायद्याच्या समर्थनार्थ भाषण ठोकत आहेत. जवळपास चर्चेच्या १०+ फेऱ्या होऊनही तोडगा नाही..तरीही आम्ही सकारात्मक चर्चेस तयार आहोत असंही सांगत आहेत.
पंतप्रधान म्हणतात ती ऐतिहासिक वाढ याचा अर्थ इतिहासात प्रथमच झालेली वाढ असा आहे.
आता आपण तुलनात्मक इतिहास पाहू.
UPA सरकारच्या २ऱ्या कालखंडात हमीभावाची सरासरी वाढ ११.२८% होती. तर आत्ताच्या NDA च्या पहिल्या कालखंडात ती ४.९१% आहे.
पिकाबाबत बोलायचं तर UPA मध्ये सर्वात कमी वाढ कापूस पिकास ६.१५% होती तर जास्तीत जास्त वाढ भुईमुगाची १४.४१% होती.
गेल्या वर्षभरातील ही unemployment आकडेवारी.
निव्वळ कृषी क्षेत्रात कार्यरत असणारं मनुष्यबळ हे सिजनल बेरोजगारी म्हणून गणलेलं असतं.खरंतर ते बेरोजगारच असतात.
ही आकडेवारी ज्यांनी आपल्याला दाखवायला हवी आणि सरकारला धारेवर धरायला हवे..तेच आज वाजंत्र्याच्या भूमिकेत आहेत. #modi_job_do#म
Disguised unemployment शेतीत खूप दिसते.म्हणजे एखादं शेती उत्पादन घेताना २ व्यक्ती पुरेशा असतात तिथं त्याच कार्यात ४ व्यक्ती गुंतल्या असतील तर २ व्यक्ती या बेरोजगारच म्हणायला हव्यात.
डिसेंबर महिन्यात शेतीकाम कमी असत म्हणून कागदोपत्री बेरोजगारी जास्त दिसते असं कोणी मंत्री म्हणाले.
पण खरंतर शेतीसारख्या क्षेत्रात कार्यात्मक मनुष्यबळ सामावण्याची क्षमताच तुटपुंजी आहे.कारण त्या क्षेत्रातून येणारं उत्पन्न त्यावर निर्भर असणाऱ्या मनुष्यबळास उदरनिर्वाह देऊ शकत नाही.
लॉकडाऊन काळात प्रायमरी सेक्टर जरी वाढते दिसलं तरी वस्तुस्थितीत फार काही फरक दिसला नाही तो त्यामुळेच.
इतिहासात आत्ममग्न होणारा समाज आणि अण्णाभाऊ साठेंच्या 'स्मशानातील सोनं' मधील भीमा यांच्यात फार काही सकस आणि तुलनात्मक फरक नसतो.
आला दिवस ढकलणं एवढीच काय ती त्यांची इतिकर्तव्यता असते.
भीमा मेलेल्या मढ्यावर गुजराण करायचा..आणि आजचा समाज मेलेली मढी उकरून.
'गर्जा महाराष्ट्र माझा' म्हणताना आज महाराष्ट्रवासीयांच्या पोलादी छात्या अभिमानाने थरारत नाहीत.
'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र..' असं म्हणण्याचीही सोय आता राहिली नाही.
कारण पहिल्यात पहिल्यासारखी छाताडं राहिली नाहीत आणि दुसऱ्यात तख्त.
छत्रपती शिवाजी महाराज यांच कार्यकर्तृत्व काय? तेच आज पर्यंत आपण उगाळत बसलो..त्यावर पुस्तके, नाटकं, चित्रपट..गेलाबाजार डीजे डॉल्बीवर गाणी बडवतच आपण लहानाचे मोठे झालो.. त्यामुळं आबासाहेबांची जीवन पद्धती सांगणे हे काही या थ्रेडचं प्रयोजन नाही.
प्रयोजन आहे. आत्ता आणि पुढं काय? हे.