२००६ साली कॉर्पोरेटमधे मी बऱ्यापैकी सेट झालो होतो. माझे इंटरनल-एक्सटर्नल नेटवर्कींग बरे असल्याने बऱ्याच नव्या लोकांच्या मेंटोरींगची जबाबदारीही माझ्यावर असायची.
अशातच एक तरूण विजय (नाव बदललेय) आमच्याकडे प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधे रूजू झाला.
परंतु त्याच आठवड्यात माझे एक महत्वाचे ट्रेनिंग सूरू झाले त्यामुळे मला पुण्यात यशदाला जावे लागले. तिकडून परत आलो आणि पुन्हा लगेच दिल्लीला गेलो, त्यामुळे त्याच्यासोबत म्हणावा असा संवादच होऊ शकला नाही.
साधारणपणे महिन्याभरानंतर एक दिवस तो मला कॅंटीनमधे जेवताना दिसला.
मग मी
२/१६
त्याच्यासोबतच जेवण घ्यावे आणि गप्पा माराव्या म्हणून जावून बसलो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी त्याला महिन्याभराच्या कामाचा फिडबॅक विचारला तर तो फार तणावात जाणवला.
तो म्हणाला,”मला डिपार्टमेण्ट बदलून हवेय. या कामात मला अजिबात आनंद मिळत नाही,तसेच जॉबरोलही चेंज करून हवाय.
३/१६
आणि हे होत नसेल तर माझी मुंबईतून ट्रांन्सफर करावी” अशी विनंती तो आमच्या जनरल मॅनेजरकडे आज करणार आहे.
मी तर शॉक झालो, याची तर किरानामालची यादी तयार असावी किंवा बकेट लिस्ट रेडी असावी तशीच तयारी होती. मग मी त्याच्याकडून अजून डिटेल्स जाणून घेण्याचा प्रयत्न केला, आणि तोही
४/१६
प्रामाणिकपणे सर्व सांगत गेला. शेवटी नक्की काय प्रकार झालाय ते माझ्या लक्षात आला.
तो आमच्या ज्या सहकाऱ्यासोबत महिनाभर काम करत होता. तो दिवसभर अत्यंत निगेटिव्ह कमेंट करत बसायचा, कंपनीबद्दल, मॅनेजरबद्दल सतत नाखुष असायचा. त्याला त्याचे साहेब काही बोलले की - “आपण एवढे
५/१६
प्रामाणिकपणे काम करतो तरी कंपनीला कशी आपली कदर नाही आणि इकडे जॅाब सिक्युरीटी कशी वाईट आहे, पॅालिसी योग्य नाहीत वगैरे वगैरे बाबींनी याचे डोके भंडावून सोडायचा.
बरं विजयने ज्या मॅनेजरच्या जागेवर जॅाईन केले होते तो कसा इथून गेला वगैरेच्या खोट्या सूरस कथाही याला ऐकविल्या होत्या.
६/१६
त्यामुळे एकंदरीतच विजय चा पराजय झाला होता.
या नकारात्मक वातावरणाचा इतका प्रभाव पडला की त्याने आपली ओळख निर्माण करण्याच्या शक्यता आणि चांगल्या संधींकडेही पुर्ण दुर्लक्ष केले
मी त्याचे सर्व बोलणे ऐकल्यावर शांतपणे त्याला विचारले - 'तुला या नोकरीची खरच गरज आहे का?'
७/१६
मग तो म्हणाला - हो हो! अगदीच.
मग मी पुढे विचारले -तुझा आताचा बॅास तुझ्या मागच्या बॅासपेक्षा चांगला / हुशार आहे का? त्यावरही विजय - होय म्हणाला.
विजय पुढे म्हणाला कि मागचा पुर्ण महिना मी रोज जवळजवळ १२ ते १४ तास काम करतोय पण तरीही प्रचंड तणाव आहे, कामात मजाच येत नाहीये.
८/१६
खर तर मुद्दा तो किती वेळ काम करतो हा नव्हताच तर तो सतत नकारात्मक विचार करणाऱ्यांसोबत होता.
जो आमचाच सहकारी त्याला हे इनपुट्स देत होता तो स्वत: अत्यंत टूकार आणि फक्त पाट्या टाकण्याच्या कामाचा होता, तो तिकडे फक्त काही वरच्या लोकांची चापलूसी करून नोकरी टिकवून होता आणि अशी
९/१६
नवीन लोक आली की त्यांचा “बकरा” बनवायचा हा त्याचा आवडीचा छंद होता. विजय बिचारा खेडेगावातून आलेला, एका लहान कंपनीतून थेट कॅार्पोरेटची त्याची ही पहिलीच वेळ.
मग मी अत्यंत शांतपणे विजयसोबत चर्चा केली - त्याला या सर्व राजकारणाबद्दल स्पष्ट सांगितले. त्यातील काही मुद्दे असे -
१०/१६
१. इतर काय म्हणतात याकडे अजिबात लक्ष न देता तुमच्या स्वत:च्या नाविन्यपुर्ण कल्पना राबवा.
२. तुम्हाला जे काम करायचेय त्यासाठीच्या Skill Development आणि जास्तीत जास्त ज्ञान कसे मिळेल यावर फोकस करा.
३. आपल्या आयुष्यात आपण कोणाच्या सानिध्यात राहतो, कोणाची साथसंगत करतो आणि
११/१६
कोणाला आदर्श मानतो याचा खुप मोठा परिणाम होत असतो. सुसंगती असेल तर प्रगती आणि सुख निश्चित मिळेल.
४. वेळेचे जास्तीत जास्त चांगले नियोजन करून Productive आणि Result oriented कामावर लक्ष द्यायचे.
५. जगात कुठेही गेलात तरी अशी नकारात्मक लोक भेटणारच आहेत, ते काय म्हणतात यावर
१२/१६
विश्वास ठेवला तर आयुष्यात कधीच प्रगती होऊ शकणार नाही.
पुढील आठवडाभर मी आमच्या साहेबांना विनंती करून त्याला इतर लोकांसोबत ठेवले, मी स्वत: त्याचे डेली रिपोर्टस् चेक केले. आणि पुढील काही दिवसातच विजय अत्यंत समाधानाने हसतफिरत ॲाफिसमधे रूळून गेला. पुढच्या काही महिन्यातच त्याचे
१३/१६
कंपनीकडून रिवॅार्ड व चांगल्या कामाबद्दल भरपूर कौतूकही झाले.
मंडळी, आपण चांगल्या शाळाकॅालेजात शिकतो. हातात स्मार्ट वॅाच घालतो, स्मार्टफोन वापरतो पण माणसं म्हणून स्मार्ट बनतो का?
आपल्याला अशी बेरकी लोक सहज फसवतात,भावनांशी खेळून आपल्या करीयरचा,आयुष्याचा खेळखंडोबा करतात.
१४/१६
खेडेगावातून आलेल्या आपल्या पोरापोरींना तर हे सहज डिप्रेस करतात. या अडथळ्यांना ओळखायला शिकायच.
आपली माती सुपीक आहे,हे क्षेत्र आपण सहज पादाक्रांत करू शकतो,बुद्धीचा वापर अन लवचिकता वाढायला हवी.नकारात्मकतेवर मात करून यश मिळवता यायला हवं.
खऱ्या अर्थाने स्मार्ट बनता यायला हवं.
१५/१६
कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर Hard Work हवेच पण आता त्यासोबत Smart Work ची पण तेवढीच गरज आहे. आणि त्यातही चांगल्या, वाईट माणसांची पारख हा अत्यंत महत्वाचा मुद्दा कळायला हवा.
काही दिवसांपूर्वी एका मित्राच्या घरी कौटूंबिक भेटीसाठी गेलो होतो.
त्यांचे एकत्र कुटूंब असल्याने बरीच तरूण होतकरू मुलं, मुली भेटले होते. जेवणानंतर नवीन तंत्रज्ञान, करियर, कॅार्पोरेट जॅाब तसेच नवे स्टार्टअप्स यावर चांगली चर्चा सुरू होती. #SaturdayThread#BusinessDots#मराठी
१/९
त्यांच्यातला एकजण सध्या मोठ्या ॲाटोमोबाईल कंपनीत काम करत आहे. त्याला तीनचार वर्षाचा अनुभव आहे.
मी त्याला सहज विचारले पुढील दोन-तीन वर्षात तू स्वत:ला कुठे पाहतोस? त्यावर तो ताबडतोप म्हणाला मला तिकडे फॅक्टरी हेड व्हायचेय.
त्याच्या इतक्या जलद उत्तराने मीच चपापलो, थोडा पॅाज २/९
घेऊन मी त्याला विचारले तुला एवढ्या मोठ्या फॅक्टरीचा हेड होण्यासाठी अजून काही वेगळा अनुभव, ज्ञान किंवा इतर काही स्किल लागतील का?
यावर तो म्हणाला की “ मी ॲालरेडी एक शिफ्ट चालवतो. यंदा MBA ही पुर्ण झालाय त्यामुळे अजून काय हवयं? गेल्या तीन वर्षात मला प्रोडक्शन बद्दल सर्व कळलय.”
३/९
साधारणपणे २००३ च्या गणेशोत्सवादरम्यान आमची टिम भिलाईमध्ये एका मोठ्या वायर ड्रॉ करणाऱ्या कंपनीमध्ये एका भल्यामोठ्या ॲनलिंग फरसेनच्या एनर्जी कॉंन्सरव्हेशन प्रोजेक्टवर काम करत होती.
प्रोजेक्ट डेडलाईन जवळ आलेली आणि त्यात अर्ध्याहून अधिक आपले मराठी सहकारी. भर गणेशोत्सवात ते इकडे अडकून पडल्यामुळे मला रोज सडकून टोमणे ऐकायला लागायचे.
त्यांचा कामात काही प्रॅाब्लेम नसायचा पण जेवायला एकत्र बसले की मला हैरान करून सोडायचे.
कंपनीचे मालक स्वत: या कामात लक्ष देऊन
२/२३
होते. त्यांच्याही ही गोष्ट लक्षात यायची,पण मी त्यांना याबद्दल काहीच बोलत नसे.
आम्ही सर्वांनी अत्यंत कष्टाने तो प्रोजेक्ट रेकॅार्ड वेळेत पुर्ण केलाच शिवाय त्यांना साधारणपणे वर्षाला दिड कोटी रुपयांची बचत होईल अशी नवी सिस्टीम लावून दिली.
गेल्यावर्षी एक तरूण माझ्या परिचितांच्या रेफरंन्सने भेटायला आलेला. त्यांचे काही प्रोडक्ट आम्ही घ्यावे अशी त्याची अपेक्षा होती. पण अगदी २/५ मिनिटात माझ्या लक्षात आले की यांच्या एकाही उत्पादनाचा आपल्याला काहीएक उपयोग नाही आणि त्याच्याही हे
तो मुलगा मात्र एकदम हुशार दिसत होता त्यामुळे संवाद सुरुच होता.तसे त्याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे ज्यांनी त्याला माझ्याकडे पाठविले होते ते मला गुरूसमान होते,मी या मुलाच्या वयापेक्षाही लहान असताना त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला बरीच काम मिळवून दिली
२/१५
होती.
तो मुलगा काही फार स्ट्रॉंग रेकमेंडेडही नव्हता. त्यांनी मला फक्त पाच मिनिटे भेट म्हणून सांगितलेले तरी मलाच त्या मुलात एक वेगळाच स्पार्क जाणवला होता आणि त्यामुळे मी त्याच्याशी गप्पा सूरू ठेवल्या.
मुलगा गुजराती होता पण तो माझ्याशी इंग्रजी आणि मराठीतून संवाद साधण्याचा
३/१५
‘आमच्या आईवडिलांनी आम्हाला चांगले शिक्षण व संस्कार दिले’, हे वाक्य आपण बऱ्याचदा ऐकतो,वाचतो. माझ्या किंवा मागच्या एकदोन पिढ्यातले अनुभवी लोक हे नेहमी म्हणायचे.
सृष्टीचा, मानवजातीचा हा अलिखित नियमच आहे की प्रत्येकाला वाटते माझ्या मुलाने/मुलीने खूप मोठे व्हावे, जग जिंकावे.
आपण मराठी लोक तर मुलाबाळांबाबतीत फार भावूक असतो. अगदी कोणताही त्याग करायला तयार असतो.
पण हे सर्व ते लहान असतानाच. जेव्हा
२/२१
खरच वेळ येते,तेव्हा बरेच मराठी “मध्यमवर्गीय” पालक आपल्या मुलांना वास्तवाची जाणीव करून देतात.(अंथरूण पाहून पाय पसरावे,चित्ती असू द्यावे समाधान,बाबांना बीपीचा त्रास आहे,त्यांना ‘टेन्शन’ नको वगैरे वगैरे.
ती स्वप्न जणू आपल्यासाठी नाहीतच वा मग त्यांचा मार्गच बदलायला भाग पाडतात.
३/२१
तेवढ्यात अचानक केबिनचा दरवाजा उघडून एक सहकारी आत आला आणि म्हणाला की माझा एक अत्यंत महत्वाचा व्हीडीओ कॅाल चालू आहे आणि तो बराच वेळ चालणार आहे.
आता ट्रेनी इंजिनियर पदासाठी एक मुलगा इंटरव्हूवला आलाय.
खरतर त्याला सकाळची वेळ दिली होती पण कदाचित प्रवासाचे कोणतेच साधन उपलब्ध
२/१४
न झाल्याने तो उशीरा आलाय आणि आता कोविडकाळात इतका वेळ त्याला बसवून ठेवणे योग्य नाही. तुम्हाला वेळ असेल तर त्याला भेटता का?
मी तसाही निवांतच होतो आणि बरेच दिवस असा इंटरव्हूव घेतला नव्हता, तसं माझ्यासाठीच ती संधी वाटली आणि लगेच त्या मुलाला आत पाठवून द्यायला सांगितले.
३/१४
या लेखाचे फक्त वाचन न होता त्यावर चर्चा व्हावी, त्यातल्या सूचनांवर योग्य पातळीवर विचार व्हावा,त्यासाठी तुमची मदत झाली तर मनापासून आनंद असेल.
आपण दिलेल्या प्रेम आणि आदराबद्दल मनापासून आभार! #सकाळ परिवाराचे आज विशेष आभार हा लेख सर्वदूर पोहचविण्यासाठी!
१/२३ #SundayThread#शिवमोहर
महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची समाज सुधारकांची, बुद्धीवंतांची तसेच फक्त भारतालाच काय पण जगाला नवी दिशा देणाऱ्या आणि आपल्या देशाची कित्येक आघाड्यांवर ओळख करून देणाऱ्या महामानवांची समृद्ध भूमी आहे.
त्यांच्या कर्तृत्वाची “शिवमोहर” लखलखीत पणे सर्वत्र चमकते आहे.
२/२३
बऱ्याचदा मराठी माणसं आपण औद्योगिक क्षेत्रात थोडे मागे आहोत असे सर्रास बोलतात पण मला ते अजिबात मान्य नाही.गेल्या 20/25 वर्षात खुप बदल झालाय आणि तो अत्यंत सकारात्मक आहे.
खरंतर महाराष्ट्र ही जागतिक औद्योगिक विकासाची गेल्या २५० वर्षाहून जास्त काळ परंपरा असलेली भूमी आहे.
३/२३