वयाच्या २३व्या वर्षी मी पहिला व्यवसाय सूरू केला होता. अत्यंत वाईट पद्धतीने त्यात अपयश आल्याने पहिले प्रेमाने विकत घेतलेले घर माझ्या नावावर व्हायच्या आतच विकावे लागले होते.
अत्यंत तणावपुर्ण परिस्थितीत मी रात्री १२-१ च्या दरम्यान पुण्याहून मुंबईला आलो होतो.
त्यावेळेस मी कांदिवलीत रहायचो. बसने दादरला उतरायच्या ऐवजी चूकून सायनलाच उतरलो,खाली आलो चूक लक्षात आली आणि मग कांदिवलीला जाण्यासाठी रिक्षा पकडली.
रिक्षात बसलो आणि एका लेबर
२/१२
कॅान्ट्रॅक्टरचा पैशांच्या तगाद्यासाठी फोन आला. मी फोन उचलला तसा तो तिकडून भयंकर सूरू झाला….
तो अद्वातद्वा बोलत होता,मी त्याला इकडून “आजच घर विकलेय,तूम्हाला आठवड्याभरात पैसे मिळतील म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडून,ओरडून सांगत होतो पण तो काही ऐकायला तयार नव्हता. मी बराच वेळ
३/१२
समजावून सांगितल्यावर आणाभाका घेतल्यावर, त्याने कसातरी फोन ठेवला. तो दारू पिऊन होता त्यामुळे त्याची भाषा जास्तच रफ होती.
रिक्षा अंधेरीच्या जवळपास आली होती. माझे डोळे पाण्याने डबडबले होते…..
घरी हे सर्व सांगू शकत नव्हतो, व्यवसाय सुरू करायचा निर्णय माझा होता… आता तो चुकला.
४/१२
तरी माझाच होता. काही समजत नव्हते…. डोकं घट्ट पकडून मी रडत होतो …
एवढ्यात “ बेटा - ठिक तो हो?” मी या आवाजाने दचकलो , इकडेतिकडे पाहिले तो आवाज रिक्षावाल्या काकांचा होता. मी हुंदका आवरला आणि “हो” म्हटलं….
पण रडू काही आवरेना … काकांनी मग एक टपरी पाहून रिक्षा थांबवली.
५/१२
माझ्या खांद्यावर हात ठेऊन मला रिक्षातून खाली उतरवले.
समोर अंडाबुर्जीची गाडी होती, त्यांनीच ॲार्डर केली, मला एक प्रश्नही विचारला नाही, भरपूर खाऊ घातले. मी पण अधाशासारखं खाल्लं, काही प्रश्न नाही काही ऊत्तर नाही, मी पैसे देऊ करायला गेलो तर बिल त्या रिक्षावाल्या काकांनीच पेड
६/१२
केले. सकाळपासून भूकेलो होतो, या काकांनी फोनवर बोलताना ते ऐकले आणि इकडे गाडी थांबवली होती.
मला ही पोटात चारघास गेल्याने बरे वाटत होते, मी त्या काकांना काही सांगणार इतक्यात तेच म्हणाले “ हमें बहोत आगे जाना है, ऐसे हादसे तो होते रहेंगे, रूकना नही कभी…… चलो बैठो रिक्षा में”
७/१२
मला काही बोलूच दिले नाही, मी ही यांत्रिकपणे पुन्हा रिक्षात बसलो. त्यांच वाक्य मात्र डोक्यात कोरलं गेलं, तणाव थोडासा कमी झाला होता.
कांदिवलीला बिल्डींगच्या खाली मी रिक्षातून उतरलो.
रिक्षावाल्याकाकांना मनापासून हात जोडले , किती पैसे झाले विचारले आणि खिशाकडे हात टाकला,तोपर्यंत
८/१२
रिक्षावाल्या काकांचा हात माझ्या डोक्यावर होता….. आशिर्वाद देत म्हणाले - “हमे बहोत आगे जाना है…… कभी रूकना नही….हिंम्मत रखो….आगे बढो!” बरचं काही ते बोलत होते….माझे डोळे पुन्हा अश्रुंनी डबडबले, तेवढ्यात काकांचा हात खाली आला, रिक्षाच्या स्टार्टरचा दांडा वर उचलला गेला, मी
९/१२
“ओ काका पैसे घ्या,पैसे घ्या” म्हणून आवाज देत होतो पण तोपर्यंत रिक्षा भूरर्कन कुठच्या कुठे निघून गेली होती.
माझ्यावर मोठं कर्ज ठेऊन आयुष्याची एक मोठी शिकवण देऊन तो कर्मयोगी मुंबईतल्या माणूसकीचं रोपटं माझ्या मनात लावून निघून गेला होता.
आजही मी तो रिक्षावालाकाका शोधत असतो.
१०/१२
तसा तो आपल्या प्रत्येकातच असतो.
जीवनात प्रत्येकालाच काहीतरी विलक्षण करण्याची संधी असते पण ती साधतां यायला हवी.
अगदी छोटी छोटी कृत्ये हे जग सुंदर बनविण्यासाठी पुरेसे आहेत. माणुसकीचं बीज रूजायला, जगायला, वाढायला पाहिजे.
मुंबईची, महाराष्ट्राची ही संस्कृती टिकायला पाहिजे.
११/१२
या शहराची माणूसकीची बाजू प्रचंड सकारात्मक आहे….गरीब, कष्टकरी, मजूर यांच्या घामाने ती फार सुपीक झालाये.
मुंबईत शिकण्यासारखे खुप काही आहेच आणि मानवसेवेचेही वेगळेच विश्व आहेत.
शेवटी माणूसकी वाढायला हवी, माणूसपण जपायला हवं!
१२/१२
२००६ साली कॉर्पोरेटमधे मी बऱ्यापैकी सेट झालो होतो. माझे इंटरनल-एक्सटर्नल नेटवर्कींग बरे असल्याने बऱ्याच नव्या लोकांच्या मेंटोरींगची जबाबदारीही माझ्यावर असायची.
अशातच एक तरूण विजय (नाव बदललेय) आमच्याकडे प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधे रूजू झाला.
परंतु त्याच आठवड्यात माझे एक महत्वाचे ट्रेनिंग सूरू झाले त्यामुळे मला पुण्यात यशदाला जावे लागले. तिकडून परत आलो आणि पुन्हा लगेच दिल्लीला गेलो, त्यामुळे त्याच्यासोबत म्हणावा असा संवादच होऊ शकला नाही.
साधारणपणे महिन्याभरानंतर एक दिवस तो मला कॅंटीनमधे जेवताना दिसला.
मग मी
२/१६
त्याच्यासोबतच जेवण घ्यावे आणि गप्पा माराव्या म्हणून जावून बसलो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी त्याला महिन्याभराच्या कामाचा फिडबॅक विचारला तर तो फार तणावात जाणवला.
तो म्हणाला,”मला डिपार्टमेण्ट बदलून हवेय. या कामात मला अजिबात आनंद मिळत नाही,तसेच जॉबरोलही चेंज करून हवाय.
३/१६
काही दिवसांपूर्वी एका मित्राच्या घरी कौटूंबिक भेटीसाठी गेलो होतो.
त्यांचे एकत्र कुटूंब असल्याने बरीच तरूण होतकरू मुलं, मुली भेटले होते. जेवणानंतर नवीन तंत्रज्ञान, करियर, कॅार्पोरेट जॅाब तसेच नवे स्टार्टअप्स यावर चांगली चर्चा सुरू होती. #SaturdayThread#BusinessDots#मराठी
१/९
त्यांच्यातला एकजण सध्या मोठ्या ॲाटोमोबाईल कंपनीत काम करत आहे. त्याला तीनचार वर्षाचा अनुभव आहे.
मी त्याला सहज विचारले पुढील दोन-तीन वर्षात तू स्वत:ला कुठे पाहतोस? त्यावर तो ताबडतोप म्हणाला मला तिकडे फॅक्टरी हेड व्हायचेय.
त्याच्या इतक्या जलद उत्तराने मीच चपापलो, थोडा पॅाज २/९
घेऊन मी त्याला विचारले तुला एवढ्या मोठ्या फॅक्टरीचा हेड होण्यासाठी अजून काही वेगळा अनुभव, ज्ञान किंवा इतर काही स्किल लागतील का?
यावर तो म्हणाला की “ मी ॲालरेडी एक शिफ्ट चालवतो. यंदा MBA ही पुर्ण झालाय त्यामुळे अजून काय हवयं? गेल्या तीन वर्षात मला प्रोडक्शन बद्दल सर्व कळलय.”
३/९
साधारणपणे २००३ च्या गणेशोत्सवादरम्यान आमची टिम भिलाईमध्ये एका मोठ्या वायर ड्रॉ करणाऱ्या कंपनीमध्ये एका भल्यामोठ्या ॲनलिंग फरसेनच्या एनर्जी कॉंन्सरव्हेशन प्रोजेक्टवर काम करत होती.
प्रोजेक्ट डेडलाईन जवळ आलेली आणि त्यात अर्ध्याहून अधिक आपले मराठी सहकारी. भर गणेशोत्सवात ते इकडे अडकून पडल्यामुळे मला रोज सडकून टोमणे ऐकायला लागायचे.
त्यांचा कामात काही प्रॅाब्लेम नसायचा पण जेवायला एकत्र बसले की मला हैरान करून सोडायचे.
कंपनीचे मालक स्वत: या कामात लक्ष देऊन
२/२३
होते. त्यांच्याही ही गोष्ट लक्षात यायची,पण मी त्यांना याबद्दल काहीच बोलत नसे.
आम्ही सर्वांनी अत्यंत कष्टाने तो प्रोजेक्ट रेकॅार्ड वेळेत पुर्ण केलाच शिवाय त्यांना साधारणपणे वर्षाला दिड कोटी रुपयांची बचत होईल अशी नवी सिस्टीम लावून दिली.
गेल्यावर्षी एक तरूण माझ्या परिचितांच्या रेफरंन्सने भेटायला आलेला. त्यांचे काही प्रोडक्ट आम्ही घ्यावे अशी त्याची अपेक्षा होती. पण अगदी २/५ मिनिटात माझ्या लक्षात आले की यांच्या एकाही उत्पादनाचा आपल्याला काहीएक उपयोग नाही आणि त्याच्याही हे
तो मुलगा मात्र एकदम हुशार दिसत होता त्यामुळे संवाद सुरुच होता.तसे त्याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे ज्यांनी त्याला माझ्याकडे पाठविले होते ते मला गुरूसमान होते,मी या मुलाच्या वयापेक्षाही लहान असताना त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला बरीच काम मिळवून दिली
२/१५
होती.
तो मुलगा काही फार स्ट्रॉंग रेकमेंडेडही नव्हता. त्यांनी मला फक्त पाच मिनिटे भेट म्हणून सांगितलेले तरी मलाच त्या मुलात एक वेगळाच स्पार्क जाणवला होता आणि त्यामुळे मी त्याच्याशी गप्पा सूरू ठेवल्या.
मुलगा गुजराती होता पण तो माझ्याशी इंग्रजी आणि मराठीतून संवाद साधण्याचा
३/१५
‘आमच्या आईवडिलांनी आम्हाला चांगले शिक्षण व संस्कार दिले’, हे वाक्य आपण बऱ्याचदा ऐकतो,वाचतो. माझ्या किंवा मागच्या एकदोन पिढ्यातले अनुभवी लोक हे नेहमी म्हणायचे.
सृष्टीचा, मानवजातीचा हा अलिखित नियमच आहे की प्रत्येकाला वाटते माझ्या मुलाने/मुलीने खूप मोठे व्हावे, जग जिंकावे.
आपण मराठी लोक तर मुलाबाळांबाबतीत फार भावूक असतो. अगदी कोणताही त्याग करायला तयार असतो.
पण हे सर्व ते लहान असतानाच. जेव्हा
२/२१
खरच वेळ येते,तेव्हा बरेच मराठी “मध्यमवर्गीय” पालक आपल्या मुलांना वास्तवाची जाणीव करून देतात.(अंथरूण पाहून पाय पसरावे,चित्ती असू द्यावे समाधान,बाबांना बीपीचा त्रास आहे,त्यांना ‘टेन्शन’ नको वगैरे वगैरे.
ती स्वप्न जणू आपल्यासाठी नाहीतच वा मग त्यांचा मार्गच बदलायला भाग पाडतात.
३/२१
तेवढ्यात अचानक केबिनचा दरवाजा उघडून एक सहकारी आत आला आणि म्हणाला की माझा एक अत्यंत महत्वाचा व्हीडीओ कॅाल चालू आहे आणि तो बराच वेळ चालणार आहे.
आता ट्रेनी इंजिनियर पदासाठी एक मुलगा इंटरव्हूवला आलाय.
खरतर त्याला सकाळची वेळ दिली होती पण कदाचित प्रवासाचे कोणतेच साधन उपलब्ध
२/१४
न झाल्याने तो उशीरा आलाय आणि आता कोविडकाळात इतका वेळ त्याला बसवून ठेवणे योग्य नाही. तुम्हाला वेळ असेल तर त्याला भेटता का?
मी तसाही निवांतच होतो आणि बरेच दिवस असा इंटरव्हूव घेतला नव्हता, तसं माझ्यासाठीच ती संधी वाटली आणि लगेच त्या मुलाला आत पाठवून द्यायला सांगितले.
३/१४