१०/१२ वर्षापुर्वीची गोष्ट. तो जवळपास माझ्याच वयाचा, एकाच बिल्डिंगमधे आम्ही राहायचो. येताजाता लिफ्ट मधे भेटायचा. प्रचंड श्रीमंत,स्टायलिश,एकदा घातलेले कपडे,घड्याळ वा गॅागल पुन्हा कधीच दिसायचे नाहीत.

एकदा फेसबुकवर मित्राच्या फ्रेंडलिस्ट

#SaturdayThread #आर्थिकसाक्षरता #मराठी
१/१६
मधे तो दिसला, अगदी सहजपणे मी त्याला फ्रेंडरिक्वेस्ट पाठवली. काही मिनिटात त्याने ती ॲक्सेप्टही केली.

त्या दिवशी मला वेळ नव्हता,एके दिवशी पुण्याहून परत येत असताना मी त्याची फेसबुकवॅाल चाळली… काय फोटो होते त्याचे. अवाक् करणारे, BMW/Merc, सारख्या देशी विदेशी कार, पंचतारांकीत
२/१६
हॅाटेल्समधील पार्ट्यांचे फोटो, एखाद्या हिरोलाही लाजवतील असे एकापेक्षा एक इव्हेंटमधील फोटो. थोड्यावेळासाठी का होईना पण मला फार असुया निर्माण झाली….. पण उत्सुकता मात्र जागी झाली की हे सगळं इतक्या कमी वयात याने कसे काय कमावले असेल.

समाजमाध्यमं त्यावेळी फारच बाल्यावस्थेत होती
३/१६
आणि माणसंही पिसाळल्यासारखी करायची, अगदी खडानखडा माहिती द्यायची त्यावर….(हल्ली फेसबुक किंवा इंन्टाबद्दल जास्त माहिती नाही)
त्यामुळे मला लगेच कळाले की तो एका मल्टी लेवल मार्केंटीग कंपनीत (MLM) मोठ्या पदावर काम करतो.

भारी राहतो, मोठमोठ्या लोकांशी ऊठबस आहे आणि गडगंज पैसेवाला
४/१६
दिसतोय.

पुढेही तो अधूनमधून भेटायचा.मला समहाऊ तो फारचं रॉयल वाटायचा, त्याचं राहणीमान, एकंदर बोलण्याची, सतत हायफाय लोकं सोबत असल्याचे फोटो पाहून मला अचंबित व्हायला व्हायचे.

दर आठवड्याला नवी हॅाटेल्स,भारी गाड्या, पार्ट्यांचे फोटो आणि काय काय. सगळी चंगळ आणि आनंदीआनंद दिसायचा
५/१६
फेसबुकमुळे त्याची वित्तंबातमी कळायची.

पण काही दिवसातच मला फेसबुकचा वीट आला, बरीच कारण होती (कधीतरी त्यावरचा जूना लेख इकडे टाकेन) आणि मी ते माध्यम सोडून दिले. कामानिमीत्ताने राहण्याची जागाही बदलली त्यामुळे तसा त्यांच्यासोबतचा संपर्कही.

आता पार्ट टू - दोन तीन वर्षांपूर्वी
६/१६
तो मला अचानक दिसला, रिक्षातून उतरला होता, कपडे एकदम साधे , पायात सॅंडल, मान खाली घालून घाईत कुठेतरी चाललेला…

मी त्याला लगेच ओळखले, मी हाक मारली. त्याला काही वेळ लागला ओळखायला पण तो माझ्याकडे पाहून कसनूसा हसला…आणि तडक पुढे निघून गेला. मला जरा विचीत्रच वाटले. पण शंकेची पाल
७/१६
चुकचुकली म्हणून त्याच्याच मित्राचा फोन लावला.

मित्राला त्याच्याबदद्ल झालेला किस्सा सांगितला आणि मग त्याने जे सांगितले ते असे - “ तो MLM करत असताना खुप पैसे कमवायचा, कंपनीचीही मोठी भरभराट झाली , याला पण प्रचंड पैसे मिळायचे पण हा छानछौकी करत राहीला… ज्या घरात तो रहायचा ते
८/१६
ते पण भाड्याचे होते. गाड्या सर्व लोन काढलेल्या वा कंपनीतील इतर सहकाऱ्यांच्या असायच्या…

कपडे, दारूपार्ट्या, दिखावा आणि उच्च जीवनमान दाखविण्यासाठी बऱ्याच जणांकडून MLM कंपनीसाठी आलेले पैसे स्वत:च्याच चैनीसाठी उडवले, त्यात पुढे ती कंपनीच बुडाली…. याच्या गाड्यांचे हप्ते थकले,
९/१६
ॲाफीसचं /घराचं भाडं थकलं आणि लोकांनी, नातेवाईकांनी ज्यांनी ज्यांनी याच्या विश्वासावर पैसे लावले होते ते सर्व याला शोधताहेत. हा आता सतत घर बदलत पळतोय, बायको कधीच सोडून गेलीये आणि हा पुर्ण दारूच्या आहारी गेलाय.”

“जे होतं नव्हतं ते सगळं गेलं…वर कर्जबाजारी होऊन बसलाय, कदाचित
१०/१६
त्याला तर हे पण लक्षात नसेल की नक्की कोणाकोणाला तो पैसे देणे लागतेय…. दारूपायी आता काहीही करायला तयार होतो.”

अगदी जमीनजुमला विकून कफल्लक झालेल्या गावकडच्या गुंठामंत्र्यांपेक्षा वाईट अवस्था झालीये त्याची. फक्त तोंड लपवत पळणेच काय ते बाकी आहे.

मला, हा मोठा धक्का होता.
११/१६
मंडळी, आपण पैसे कमावणं जेवढं गरजेचं आहे त्यापेक्षा जास्त आपण त्या पैशाच काय करतो, पैसे असताना नक्की कसे वागतो त्यावर आपण किती दिवस श्रीमंत राहणार हे ठरत असते.

ही बुद्धीमत्ता, हे संस्कार आपल्याला शाळेत, कॅालेजात मिळत नसतात, बरं, हे शिकणे ही पण काही साधी गोष्ट नाही…
१२/१६
सर्वशक्तीमान वा खुप हुशार असलेल्या लोकांनाही सत्ता आणि पैसा मिळाल्यानंतर यावर कंट्रोल राहत नाही.

पैसा दाखविण्याच्या नादात, असा भरमसाठ खर्च होतो की कधी तो हातातून निसटतो ते कळत पण नाही. पैसा वस्तूंमधून, गाड्यातून, फेसबुक, इंन्स्टा किंवा इतर कोणत्या फोटोतून नाही तर आपल्या
१३/१६
कृतीतून आणि योग्य गुंतवणुकीतून वाढायला हवा.

कोणी कंप्युटरवर हुशार असतो, कोणी ऑटोमोबाइल्स मधे बाप असतो, कोणी चित्रकार, कलाकार, चांगला पत्रकार तर कोणी संशोधक, उद्योजक वा राजकारणी, आपआपल्या क्षेत्रात आपण कितीही हुशार असलो तरी पैशांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कळायला हवी.
१४/१६
पैशापाण्याची ही गोष्ट तशी आयुष्यातील साधी वाटणारी पण आपल्याकडे पैशांचा प्रवाह सूरू असताना त्या काळात पैशाची बचत करायला शिकणे हे अत्यंत महाकर्मकठीण काम.

ही बचत म्हणजे वाहत्या नदीवर धरण बांधण्यासारखेच,याचे अनंत फायदे आणि उपयोग!

या धरणातल्या पाण्यावर पुढे आपल्याला गुंतवणुक
१५/१६
करायची असते.

पण त्याआधी काही पैशापाण्याच्या गोष्टी शिकायला हव्यात. आर्थिक साक्षरतेसोबत आपण पैसे हाताळतानाच्या बेसिक बाबी पाळायला हव्यात.

आपण पैसा जपला तरच पैसा आपल्याला जपतो. हे कायम ध्यानात ठेवा.

यावर पुन्हा कधीतरी!

धन्यवाद 🙏
#SaturdayThread #आर्थिकसाक्षरता #मराठी
१६/१६

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Prafulla Wankhede 🇮🇳

Prafulla Wankhede 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @wankhedeprafull

3 Jul
मागच्या महिन्यात लॅाकडाऊन असताना पुण्याहून एका चांगल्या कंपनीत कामाला असलेल्या मित्राचा फोन आला. त्याचे Work From Home सूरू होते पण त्याचा एकंदर सूर त्रासलेला आणि नाराजीचा होता.

कंपनीला, HR ला धडाधड शिव्या घालत होता. कारण विचारले तर -
#SaturdayThread #BusinessDots #मराठी
१/१४
म्हणे - “लॅाकडाऊन लागला की गावी सांगलीला जायचे ठरले होते पण काल कंपनीने नियम काढलाय की पुणे सोडून जायचे नाही, जर रिपोर्टिंग लोकेशन बदलले तर ती सुट्टी म्हणून मोजली जाईल आणि ॲक्शन पण घेऊ शकतात. वैताग आलाय राव या फालतू पॅालिसिजचा.”

त्याचा त्रागा पाहून मी त्याला म्हटले -
२/१४
“तुला माहिती आहे का तू खरं तर किती नशीबवान आहेस?”

माझ्या नशीबवान शब्दाने तर तो एकदम चवताळलाच, त्याला वाटले मी त्याची मस्करी करतोय, एकदम तारस्वरात तो म्हणे - “नशीबवान? का राव विनाकारण खपली काढतोय, तिकडे समीर, सचिन गावी कसली धमाल करताहेत, इतर कित्येक नातेवाईक धमाल करताहेत
३/१४
Read 14 tweets
26 Jun
वयाच्या २३व्या वर्षी मी पहिला व्यवसाय सूरू केला होता. अत्यंत वाईट पद्धतीने त्यात अपयश आल्याने पहिले प्रेमाने विकत घेतलेले घर माझ्या नावावर व्हायच्या आतच विकावे लागले होते.

कर्जबाजारीपणा अन कफल्लक होणे काय? हे नको त्या वयात फार क्रूरपणे
#SaturdayThread #BusinessDots #मराठी
१/१२
अंगावर आले होते.

अत्यंत तणावपुर्ण परिस्थितीत मी रात्री १२-१ च्या दरम्यान पुण्याहून मुंबईला आलो होतो.

त्यावेळेस मी कांदिवलीत रहायचो. बसने दादरला उतरायच्या ऐवजी चूकून सायनलाच उतरलो,खाली आलो चूक लक्षात आली आणि मग कांदिवलीला जाण्यासाठी रिक्षा पकडली.

रिक्षात बसलो आणि एका लेबर
२/१२
कॅान्ट्रॅक्टरचा पैशांच्या तगाद्यासाठी फोन आला. मी फोन उचलला तसा तो तिकडून भयंकर सूरू झाला….

तो अद्वातद्वा बोलत होता,मी त्याला इकडून “आजच घर विकलेय,तूम्हाला आठवड्याभरात पैसे मिळतील म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडून,ओरडून सांगत होतो पण तो काही ऐकायला तयार नव्हता. मी बराच वेळ
३/१२
Read 12 tweets
19 Jun
२००६ साली कॉर्पोरेटमधे मी बऱ्यापैकी सेट झालो होतो. माझे इंटरनल-एक्सटर्नल नेटवर्कींग बरे असल्याने बऱ्याच नव्या लोकांच्या मेंटोरींगची जबाबदारीही माझ्यावर असायची.

अशातच एक तरूण विजय (नाव बदललेय) आमच्याकडे प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधे रूजू झाला.

#SaturdayThread #BusinessDots #मराठी
१/१६
परंतु त्याच आठवड्यात माझे एक महत्वाचे ट्रेनिंग सूरू झाले त्यामुळे मला पुण्यात यशदाला जावे लागले. तिकडून परत आलो आणि पुन्हा लगेच दिल्लीला गेलो, त्यामुळे त्याच्यासोबत म्हणावा असा संवादच होऊ शकला नाही.

साधारणपणे महिन्याभरानंतर एक दिवस तो मला कॅंटीनमधे जेवताना दिसला.
मग मी
२/१६
त्याच्यासोबतच जेवण घ्यावे आणि गप्पा माराव्या म्हणून जावून बसलो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी त्याला महिन्याभराच्या कामाचा फिडबॅक विचारला तर तो फार तणावात जाणवला.

तो म्हणाला,”मला डिपार्टमेण्ट बदलून हवेय. या कामात मला अजिबात आनंद मिळत नाही,तसेच जॉबरोलही चेंज करून हवाय.
३/१६
Read 16 tweets
12 Jun
काही दिवसांपूर्वी एका मित्राच्या घरी कौटूंबिक भेटीसाठी गेलो होतो.

त्यांचे एकत्र कुटूंब असल्याने बरीच तरूण होतकरू मुलं, मुली भेटले होते. जेवणानंतर नवीन तंत्रज्ञान, करियर, कॅार्पोरेट जॅाब तसेच नवे स्टार्टअप्स यावर चांगली चर्चा सुरू होती.
#SaturdayThread #BusinessDots #मराठी
१/९
त्यांच्यातला एकजण सध्या मोठ्या ॲाटोमोबाईल कंपनीत काम करत आहे. त्याला तीनचार वर्षाचा अनुभव आहे.

मी त्याला सहज विचारले पुढील दोन-तीन वर्षात तू स्वत:ला कुठे पाहतोस? त्यावर तो ताबडतोप म्हणाला मला तिकडे फॅक्टरी हेड व्हायचेय.

त्याच्या इतक्या जलद उत्तराने मीच चपापलो, थोडा पॅाज २/९
घेऊन मी त्याला विचारले तुला एवढ्या मोठ्या फॅक्टरीचा हेड होण्यासाठी अजून काही वेगळा अनुभव, ज्ञान किंवा इतर काही स्किल लागतील का?

यावर तो म्हणाला की “ मी ॲालरेडी एक शिफ्ट चालवतो. यंदा MBA ही पुर्ण झालाय त्यामुळे अजून काय हवयं? गेल्या तीन वर्षात मला प्रोडक्शन बद्दल सर्व कळलय.”
३/९
Read 9 tweets
29 May
साधारणपणे २००३ च्या गणेशोत्सवादरम्यान आमची टिम भिलाईमध्ये एका मोठ्या वायर ड्रॉ करणाऱ्या कंपनीमध्ये एका भल्यामोठ्या ॲनलिंग फरसेनच्या एनर्जी कॉंन्सरव्हेशन प्रोजेक्टवर काम करत होती.

मी प्रोजेक्ट लिड करत होतो. माझ्याकडे ८/१० माणसांची टिम.
#SaturdayThread #आर्थिकसाक्षरता #मराठी
१/२३
प्रोजेक्ट डेडलाईन जवळ आलेली आणि त्यात अर्ध्याहून अधिक आपले मराठी सहकारी. भर गणेशोत्सवात ते इकडे अडकून पडल्यामुळे मला रोज सडकून टोमणे ऐकायला लागायचे.

त्यांचा कामात काही प्रॅाब्लेम नसायचा पण जेवायला एकत्र बसले की मला हैरान करून सोडायचे.

कंपनीचे मालक स्वत: या कामात लक्ष देऊन
२/२३
होते. त्यांच्याही ही गोष्ट लक्षात यायची,पण मी त्यांना याबद्दल काहीच बोलत नसे.
आम्ही सर्वांनी अत्यंत कष्टाने तो प्रोजेक्ट रेकॅार्ड वेळेत पुर्ण केलाच शिवाय त्यांना साधारणपणे वर्षाला दिड कोटी रुपयांची बचत होईल अशी नवी सिस्टीम लावून दिली.

निरोपाच्या दिवशी साहेब खुप आनंदी होते.
३/२३
Read 23 tweets
22 May
गेल्यावर्षी एक तरूण माझ्या परिचितांच्या रेफरंन्सने भेटायला आलेला. त्यांचे काही प्रोडक्ट आम्ही घ्यावे अशी त्याची अपेक्षा होती. पण अगदी २/५ मिनिटात माझ्या लक्षात आले की यांच्या एकाही उत्पादनाचा आपल्याला काहीएक उपयोग नाही आणि त्याच्याही हे

#SaturdayThread #BusinessDots #मराठी
१/१५
मी लक्षात आणून दिले.

तो मुलगा मात्र एकदम हुशार दिसत होता त्यामुळे संवाद सुरुच होता.तसे त्याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे ज्यांनी त्याला माझ्याकडे पाठविले होते ते मला गुरूसमान होते,मी या मुलाच्या वयापेक्षाही लहान असताना त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला बरीच काम मिळवून दिली
२/१५
होती.

तो मुलगा काही फार स्ट्रॉंग रेकमेंडेडही नव्हता. त्यांनी मला फक्त पाच मिनिटे भेट म्हणून सांगितलेले तरी मलाच त्या मुलात एक वेगळाच स्पार्क जाणवला होता आणि त्यामुळे मी त्याच्याशी गप्पा सूरू ठेवल्या.

मुलगा गुजराती होता पण तो माझ्याशी इंग्रजी आणि मराठीतून संवाद साधण्याचा
३/१५
Read 15 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(