#महत्वाचे

एक मराठी माणुस या policies मध्ये अडकत चालला आहे त्याला आर्थिक साक्षर करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे

वेळात वेळ काढून हा संपूर्ण #Thread नक्की वाचा .

#आर्थिक_साक्षर

#Thread
2) पहिले मोनिका हलान यांनी लिहिलेला हा Thread बघा English मधून आहे . खाली मी मराठी मधून Explain करण्याचा प्रयत्न करत आहे .

3) एक मध्यमवर्गीय माणुस आयुष्यभर पैसे कमावून पण तो मध्यमवर्गीय का राहतो ?

कारण तो गरज नसलेल्या अनेक वर्ष विविध प्रकारच्या Policies खरेदी करत राहतो जसे - Money Back , Endowment , Life Insurance जिथे या सगळ्या पॉलिसिंचा 20 वर्षेचा CAGR 5-6% आहे
4) ( CAGR म्हणजे 20 वर्षाच्या कालावधीमध्ये या पोंलिसी ने प्रत्येक वर्षी किती % परतावा दिला ) आणि महागाईचा दर ( Inflation Rate ) जवळपास 7-8% आहे .म्हणजे महागाई दरा पेक्षा या सर्व पॉलिसी कमी परतावा देत असल्यामुळे तुमची संपत्ती निर्माण नाही होऊ शकत.
5) तसेच मध्ये पैसे काढले तर 40 ते 50% रक्कम लॉस मध्ये घ्यावी लागते . 80% Policies तर मार्च मध्ये टॅक्स Saving च्या नावाखाली विकल्या जात आहेत आणि आपणही Tax Save करायचं म्हणून खरेदी करत आहोत पण सत्य परिस्थिती वेगळी आहे .
6) आपण पाहूया कि , _खरच ULIP, Money Back , Endowment plan या विविध प्रकारच्या पोलीसी ची गरज एखाद्या मध्यमवर्गीय माणसाला आहे का ? उत्तर #नाही ._
7) #Poor_Life_Cover :- वरील कोणत्याहि Policies पूर्ण life insurance cover देत नाही कारण यामध्ये Insurance + Investment दोन्हीचे मिश्रण असल्यामुळे नाही Proper इन्सुरंस भेटत आहे नाही योग्य ठिकाणी गुंतवणूक होत आहे. Adequate इन्सुरंस म्हणजे जर एखाद्याचा वर्षाचा पगार हा ५ लाख असेल
8) तर त्याला वर्षाच्या पगाराच्या १५ ते २० पट insurance ची गरज असते उदाहरण - ५ लाख वर्षाचा पगार x १५ पट = ७५ लाख पण या Policies मध्ये असणारे insurance चे cover 1 लाखापासून ते ५ लाखापर्यंत असते जे कि त्याच्या Family साठी खुपच कमी आहे.
9) #Poor_Return – वरील सर्व Policies चा मागील २० वर्षचा IRR (Internal Rate of Return ) जर काढला तर तो ५ ते ६ % पेक्षा जास्त नाहीये म्हणजे या Policies ने प्रत्येक वर्षी ६% पेक्षा परतावा नाही दिलेला जो कि महागाईपेक्षा कमी आहे .
10) जिथे गुंतवणुकीचे चांगले पर्याय आहेत तिथे आपण पोहचत नाही कारण एक तर आर्थिक शिक्षणाचा अभाव किंवा दुसरे मुद्दाम आल्याला सत्य परिस्थिची जाणीव न करून अश्या policies मध्ये अडकवले जाते.
11) #Built_Like_Trap– या Policies अश्या असतात कि जर एखाद्या ने यामध्ये गुंतवणूक चालू केलीतर मध्ये तुम्ही बंद नाही करू शकत आणि जर तुम्ही बंद करताय तर खुप मोठा LOSS सहन करावा लागतो जसे :- एखाद्या व्यक्तीला 1 वर्षाने policy बंद करायची असल्यास त्याला १००% LOSS म्हणजे शून्य रुपया
12) भेटेल ,ऐकले तर नवल आहे पण सत्य आहे . पुढे ५ वर्षाने जरी त्याला बंद करायची असेल तर भरलेल्या रकमेच्या ५०% रक्कम त्याला भेटते उदाहरण :- ५ वर्षात 1 लाख भरले असेल तर ५ वर्षाने ५०००० रुपये भेटतील. काही Policies अश्या आहेत कि १०-१५ वर्ष पैसे भरूनही loss मध्ये
13) किंवा जेवढे भरले तेवढे पैसे भेटत आहेत . तर अश्याप्रकारच्या Policies तुमच्यासाठी आहेत कि त्यांच्यासाठी एकदा विचार करायला हवे आणि आपले कोणते ध्येय या Policies पूर्ण करत आहेत एकदा बघायला हवे .
14) सारांश पहिला आपण या सर्व Policies चा तर या Policies विक्रेता ( एखादा घरातला काका,मामा किवा मित्रच असतो ) , कंपनी, Shareholder यांच्यासाठी आहेत तुमच्यासाठी loss-making मशीन आहे . थोडेसे आर्थिक शिक्षण घेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घ्या किवा एखादा चांगला आर्थिक सल्लागार निवडा .
15) #Conclution : -

वरील सर्व Policies वर असणारा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे insurance घेताना only Pure Vanila #Term_Insurance घ्या आणि गुंतवणूक करताना एखादा चांगला आर्थिक सल्लागार निवडून विविध ठिकाणी आपले आर्थिक ध्येय ठरवून मग त्यानुसार गुंतवणूक करा .
16) जसे – 🟦PPF, NPS, GOLD, Real Estate, Mutual Fund , Debt Fund, Stocks 🟦_

अशा करतो तुम्हाला थोडेतरी insurance policies बद्दल समजले असेल .

धन्यवाद 🙏

अधिक लोकांपर्यंत #Retweet करून पोहचवा .
17) #Disclaimer - वरील माहिती ही आर्थिक शिक्षण देण्याच्या हेतूने दिलेली आहे तसेच इथे आम्ही वैयक्तिक अनुभव मांडत आहोत ज्यांच्याशी सहमत आणि असहमत असू शकता. तरी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्या.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with गुंतवणुकीतून आर्थिक स्वातंत्र्य

गुंतवणुकीतून आर्थिक स्वातंत्र्य Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @arthfreedom

25 Aug
✅ मध्यमवर्गीयांसाठी #INSURANCE + #RETURN अशी विमा योजना खरच फायदेशीर आहे का ? आणि एक मध्यमवर्गीय माणूस आयुष्यभर पैसे कमवून पण श्रीमंत का होत नाही त्याचे उत्तर 👇

मस्त एक चहा घ्या आणि वाचा #Thread थोडा मोठा आहे

#Thread
2) खूप लोक विचारात होते की लाइफ insurance कोणता घेतला पाहिजे आणि का त्या सर्वांसाठी हा खूप महत्वाचा #Thread

जर मध्यमवर्गीय वर्गाने Insurance ( विमा योजना ) मध्ये गुंतवणूक करण्याऐवजी वेगळा(Seprate) जीवन विमा(Term Insurance) घेऊन उर्वरित रक्कम चांगल्या गुंतवणुकीच्या
3)पर्यायामध्ये गुंतवली तर त्याला कसा फायदा होऊ शकतो ते आपण पाहू .

एका चांगल्या नावाजलेल्या Insurance कंपनी कडून Mr. Kiran यांना काल एक फोन आला . त्यामध्ये एक चांगला व्यक्ती जो कि Senior Sales Manager आहे तो किरण यांना insurance बद्दल माहिती देत होता तसा तो बोलताना खुप अनुभवी
Read 20 tweets
22 Aug
#Financial_Freedom_Steps

मध्यमवर्गीयांना #आर्थिक_स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग अतिशय सोप्या भाषेत –👇

✅1) जर तुमचे लग्न झाले असेल आणि तुमच्यावर कोणी अवलंबून (Dependent) असेल 👨‍👩‍👧‍👧- ( पत्नी , मुले , आई -वडील ) तर पहिले Pure #टर्म_इन्शुरस खरेदी करा बाकीचे सर्व नंतर

#Thread Image
✅ 2) कंपनी सोडून एखादा Private हेल्थ इन्शुरस घ्या जो की कधी Hospital Emergency आली तर तुमची कित्येक वर्षाची savings वाचवेन . पुढे सविस्तर Health Insurance बद्दल एक Thread पोस्ट करेन.
✅3) 6 महीने ते 9 महिन्याचा खर्च येवढा #आपत्कालीन_निधि ( Emergency Fund ) बनवा . उदाहरण समझा एखाद्या व्यक्तीचा महिन्याचा पगार 50000 आहे तर त्याच्याकडे 50000 x 6 महीने = 3 लाखाचा आपत्कालीन निधि असलाच हवा जो तो Job loss किवा घरात एखादी आर्थिक अडचण आली तर कमी येईन.
Read 8 tweets
17 Aug
मध्यमवर्गीय कुटुंबाचे #आर्थिक_नियोजन कसे असते?

मी पाहिलेले काही #अनुभव मी इथे सांगत आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण, पती व पत्नी आपले आर्थिक जीवन सुधारावे म्हणून खूप प्रयत्न करतात. उच्च शिक्षण घेऊन 3, 5 वर्षात चांगल्या मोठ्या पगारची नोकरीही मिळवतात
1)
#Thread
2) पण, तरीही त्यांना आर्थिक स्वातंत्र्य ( #Financial_Freedom ) प्राप्त नाही करता येत. अगोदरच त्यांच्या लग्नात खूप खर्च झालेला असतो. खर्च येवढा असतो की , तो जर कोठे गुंतवला असता तर काही वर्षात त्यांना कॅश मध्ये स्वता:साठी घर घेता आले असते.
3) जेवढा पगार जास्त तेवढी त्यांची जीवनशैली ( #Lifestyle ) उच्च असते. जेव्हा खर्चाची वेळ येते तेव्हा ते सगळे केलेली मेहनत विसरून आयुष्य जगायला सुरवात करतात आणि काही काळाने म्हणजे लग्नाच्या एक दोन वर्षांनंतर नंतर एक हप्त्यावर
Read 11 tweets
15 Aug
#आर्थिक_स्वातंत्र्य म्हणजे काय ?

खर्‍या अर्थाने जीवनाला आनंद देणारा मार्ग म्हणजे ‘’आर्थिक स्वातंत्र्य’’ आज आपण पाहू ‘’आर्थिक स्वातंत्र्य’’ म्हणजे काय इंग्लिश मध्ये त्याला #Financial_Freedom असे म्हणतात.

#Thread

1)
2) आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे अगदी सोप्या भाषेत मनासारखे आयुष्य जगणे. कोणावरही पैश्यासाठी अवलंबून न राहता आनंदाने आयुष्य जगणे होय. वाटेल तेव्हा खायचे , वाटेल तेव्हा बाहेर फिरायला जायचे, कुटुंबासाठी फक्त रविवारी वेळ न देता दररोज वेळ देणे,
3) तुमचे राहिलेले स्वप्न पूर्ण करणे, 9 ते 5 चे जेल सोडून आपल्या ईच्छा पूर्ण करणे ,तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देणे आणि अजून बरेच काही म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य होय. तुम्ही कल्पना पण नाही करू शकत की आर्थिक स्वातंत्र्यअनुभवण्याचा आनंद काय असतो.
Read 18 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(