#कन्हैय्या_कुमार
2019 च्या लोकसभा निवडणुकी मधला माझा सर्वात आवडता उमेदवार. खर तर 2016-17 मधे मला विचारल असत तर माझ्या साठी कन्हैय्या कुमार देशद्रोही होता. कोर्टाने दिलेल्या बेल ऑर्डर मधे लिहल्या प्रामाणे कन्हैय्या माझ्या साठी एक संसर्ग जन्य आजार होता. 👇
संबित पात्रा आणि अर्णव गोस्वामी ने ओरडुन सांगितल्या प्रामाणे कन्हैय्या कुमार माझ्या साठी तुकडा तुकडा गैंग चा सदस्य होता
2016 पुर्वी कन्हैय्या कुमार या नावाला कोणीही ओळखत नव्हतं. जवाहरलाल नेहरू यूनिव्हर्सिटी ( जेएनयू ) मध्ये झालेल्या 👇
एका कार्यक्रमा मधे दिले गेलेल्या भारत विरोधी घोषणा मुळे त्याच्या वर 124 अ कलमा खाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि हे नाव देशाला माहीत झाल. सम्पुर्ण देशा मधे जेएनयू हे देशविरोधी कार्यवाही च केंद्र असल्याचं चित्र निर्माण केल गेल. 👇
या सम्पुर्ण प्रकरणा मधे कन्हैय्या कुमार सोबत उमर खालीद हे नाव आल्यामुळे देश मानस कन्हैय्या कुमार देशद्रोही आहे असा करण्यात सरकार ला सहजी यश आल. रिपब्लिक टीव्ही ने आपल्या प्राईम टाईम मधे कन्हैय्या कुमार आणि जेएनयू हे विषय एवढे तापात ठेवले की , 👇
ट्रायल साठी कोर्टात जाताना कन्हैय्या कुमार वरती दिल्ली कोर्टात हल्ला झाला. या सगळ्या मेडिया ट्रायल मधील चर्चेत जेएनयू , आणि लेफ्टिस्ट स्टूडंट च्या चारित्र्य हननाच मोठ काम केल गेल संबित पात्रा कडुन. त्याच बक्षिस म्हणुन संबित पात्राला नन्तर ONGC च डायरेक्टर पद दिल गेल आणि नंतर 👇
खासदारकीच तिकीट.
जेएनयू ची स्थापना स्वतंत्र्या नन्तर 1969 मधे करण्यात आली. या पाठीमागचा उद्देश होता साइंटिफिक सोशलिजम चा अभ्यास करणे. जेएनयू च वार्षिक बजेट आहे 200 करोड़. जवळ जवळ आठ हजार विद्यार्थी सहाशे शिक्षकांच्या मार्गदर्शना खाली शिक्षण घेतायत. 👇
जेएनयू मधे अड़ंर ग्रेज्युएट , पोस्ट ग्रेज्युएट , डॉक्टरेट करणारी मुल आहेत. निर्मला सीताराम , सीताराम येच्युरी , अमिताभ राजन ( माझी गृह सचिव ) यांसारखे दिग्गज हे जेएनयू चे माजी विद्यार्थी आहेत. 👇
कन्हैय्या कुमार सोबत चर्चेत आलेल्या जेएनयूची देखील नन्तर बदनामी करण्यात आली. जेएनयू मधे कंडोम सापडले , जेनएयू मधे बियर च्या बाटल्या सापडल्या सारख्या बातम्या ब्रेकिंग न्यूज होवू लागल्या. परंतु या सगळ्या प्रकारा नंतर ही जेएनयू आणि जेएनयू मधील विद्यार्थी स्थीर राहीले. 👇
टीव्ही चैनल वरील चर्चेत बऱ्याच वेळा त्यांच्या वरती वैयक्तिक टिका करत त्यांना चर्चा सोडुन देवुन निघुन जाण्यास भाग पाडल. परंतु हळु हळु सगळेच यातुन सावरले आणि सरकार विरुद्ध ठाम उभे राहिले
नक्की काय घोषणा लावल्या गेल्या होत्या जेएनयू मध्ये . 👇
लाल सलाम जिंदाबाद. खर तर ही घोषणा आता नक्षली समजली जाते. पण लाल चा अर्थ होतो क्रांती , क्रांती ला सलाम , यालाच उर्दू मधे इंकलाब जिंदाबाद म्हणतात. ही घोषणा होती भगतसिंगांची " इंकलाब जिंदाबाद , साम्राज्य वाद मुर्दाबाद " 👇
दुसरी घोषणा होती " हम लेके रहेंगे आजादी " खर तर ही अर्धी घोषणा देशा समोर आली.
हम लेके रहेंगे आजादी
भुखमरी से आजादी
मनुवाद से आजादी
आरएसएस से आजादी
शोषण से भी आजादी
अत्याचार से आजादी
हम लेके रहेंगे आजादी
जो तुम ना दोगे आजादी
हम छीन के लेंगे आजादी
👇
या सगळ्या घोषणा चा अर्थच मिडिया आणि सरकार कडुन बदलवला गेला. विद्यार्थ्यांना देश से आजादी नको होती , देश में आजादी हवी होती. सगळ चित्र देश से आजादी रंगवल गेल आणि राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. 👇
तिसरी घोषणा होती , " अफजल गुरु हम शर्मिंदा है , तेरे कातिल जिंदा है " आणि भारत तेरे टुकड़े होंगे , इंशाअल्ला , इंशाअल्ला , जेएनयू चा स्टूडंट कॉन्सिल अध्यक्ष म्हणून कन्हैय्या कायम सांगत आलाय ही घोषणा जेएनयू मधे दिलीच गेली नाही. ज्या क्लिप्स येतायत त्या मोड़ तोड़ करुण येतायत. 👇
दिल्ली पोलिसांनी ही जेएनयू मध्ये अश्या घोषणा दिल्या गेल्या नसल्याच आपल्या दाखल केलेल्या चार्ज सीट मधे मान्य केलय .
मग प्रश्न राहतो कन्हैय्या ला टार्गेट का करण्यात आल ? कारण कन्हैय्या जेएनयू मधे एबीव्हीपी ला हारवून स्टूडंट कॉन्सिल चा अध्यक्ष झाला होता. 👇
कारण बिहार सारख्या मागास राज्यातुन आलेल्या , इंग्रजी वर प्रभुत्व नसलेल्या कन्हैय्या कुमार ने एबीव्हीपी ला हारवने ही गोष्ट बीजेपीच्या जिव्हारी लागली होती. अत्यंत गरीब कुटुंबातील एक सामान्य मुलगा सगळ्या सिस्टीम ला चैलेंज देत होता. 👇
स्मृती इराणी शिक्षण मंत्री झाल्या वर सरकारी फंडेड यूनिव्हर्सिटी ची ग्रैंड कमी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आणि तिथे कन्हैय्या विरुद्ध सरकार थिनगी पडली
जो कार्यक्रम जेएनयू कैम्पस मध्ये झालता , ज्यात या देशविरोधी घोषणा देण्यात आल्या त्या कार्यक्रमाला कन्हैय्या उपस्थितच नव्हता. 👇
त्या कार्यक्रमाचा तो आयोजक नव्हता , त्या कार्यक्रमाला परमिशन देण्याची किंवा नाकरन्याचे अधिकार त्याच्या कड़े नव्हते. सिस्टीम विरुद्ध उभा आहे म्हणुन कन्हैय्या ला सिस्टीम कडुन दाबन्याच्या प्रयत्न केला गेला आणि दुप्पट आत्मविश्वासाने तो उफाळुन आला. 👇
अत्यंत गरीब घरातील , अत्यंत नम्र , अत्यंत अभ्यासु कन्हैय्या कुमार स्वतःच्या मर्जिने नव्हे तर सिस्टीम च्या रेट्यने राजकारण करतोय , निवडणूक लढवतोय. तो जिंकलेला आणि संसदेत सिस्टीम ला नडलेला बघण्यास मी उत्सुक आहे. 🙏
आवडलेली पोस्ट 👇
फार वर्षापूर्वी एक जहाज बुडालं होतं ज्याचं नाव होतं “Titanic”..ते जहाज बुडण्याचं कारण देखील साधारणंच होतं “Casual Approch” म्हणजेच "कुठलीही गोष्ट सहज घेणं."
असं म्हणतात ते जहाज जेव्हा प्रवास करण्यासाठी सज्ज झालं तेव्हा 👇
हवामान खात्याने त्या जहाज कंपनीच्या Management ला Ice Burg (बर्फाच्या पर्वतरांगा) समुद्रात असण्याची शक्यता सांगितली होती. तरी देखील ते जहाज 2000 प्रवाशांना घेऊन समुद्रात निघालं होतं. त्या जहाजात आपातकालिन बोटी देखील खूप कमी ठेवल्या गेल्या होत्या. कारण काय तर त्याची गरजंच नाही. 👇
Titanic जहाज कधी बुडणारंच नाही..ईथेही Casual Approch दिसला.
त्या जहाजाच्या कॅप्टनला विचारलं असता त्याला 25 वर्षाचा अनुभव असून कुठलाही Ice Burg त्याचं काहीच वाकडं करू शकतं नाही. असं कॅप्टनचं म्हणनं होतं.इथेही तोच Casual Approch राहिला. 👇
तेलगी घोटाळा आरोप - भुजबळांचा राजीनामा
जावई जमीन प्रकरण - मनोहर जोशींचा राजीनामा
अण्णा हजारे यांचे आरोप - चार मंत्र्यांचे राजीनामे
मुंबई हल्ला प्रकरण - केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गृहमंत्री आर.आर. पाटील राजीनामा.
आता 👇
संजय राठोड व अनिल देशमुख यांचाही राजीनामा...!
एक लक्षात घ्या केवळ नैतिकता अन आरोप म्हणून हे सगळे राजीनामे झाले..
पण गम्मत बघा
बरखा पाटील प्रकरण - तत्कालीन गृहमंत्र्याचा राजीनामा नाही
कोरेगांव भिमा दंगल प्रकरण - तत्कालीन गृहमंत्र्याचा राजीनामा नाही 👇
सिडको जमिन गैरव्यवहार प्रकरण - तत्कालीन उद्योगमंत्री व मुख्यमंत्र्यांचा राजीनामा नाही
पठाणकोट हल्ला - कोणाचाही राजीनामा नाही
पुलवामा हल्ला - कोणाचाही राजीनामा नाही
मग आता सांगा नैतिकता कोणाकडे आहे... अनेक बलात्कारी आमदार खासदार असणाऱ्या भाजपकडे, 👇
नमस्कार...
सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो की , मी सोशलमीडिया वरुन जरासा मोठाच ब्रेक घेतला. आणि फक्त सोशलमिडिया पासुनच नव्हे तर बऱ्याच दिवसापासुन माझा मोबाइल नंबर सुद्धा बंद होता. whats app ही बंद होत. सगळंच बंद होत. त्यामुळे अनेकांना माझी काळजी लागली होती की, मी बरा आहे ? 👇
मला काही झाल तर नाही ना ?
तर,
हो , मी बरा आहे...
कंपनीची काम Work From Home सुरुच होती व सुरु आहे. मी कुठेही बाहेर फिरत नव्हतो. मला कोरोना झाला नव्हता. मी जरी कामानिम्मित फिरायला निघालो तरी योग्य ती काळजी घेत होतो व घेत असतो. 👇
मी इतके दिवस संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहूनही तुम्ही मला संपर्क यादीत कायम ठेवुन आहात. मला विसरला नाहीत. उलट न सांगता सगळंच बंद केलं म्हणून प्रेमाने खडेबोल सुनावलेत आणि तुमच्या शुभेच्छांनी तर मन भरुन आल. 👇
भारतीय जनता पार्टीचे आज व मागच्या सहा वर्षापासुनचे मुख्य टार्गेट १७ ते २४ ची तरुण मुले-मुली आहेत. या दरम्यान या तरुणापर्यंत मोठ्या प्रमाणावर whats appच्या माध्यमातुन मुस्लीम द्वेष , काँग्रेसने काहीच केलं नाही, देश लुटला , इ. मोठ्या प्रमाणावर पसरवण्यात येत व ते यात यशस्वी होतात.👇
या तरुणांचा मेंदू भयकंर हँन्ग करुन ठेवतात त्यामुळे त्यांना विचारही करावासा वाटतं नाही की , ज्या देशात रस्ते नव्हते , मुबलक धान्य नव्हते ,शाळा, काँलेज , कंपन्या , दुरदर्शन, दळणवळण साधणे, कँम्पुटर ,वीज, दवाखाने कित्येक वाड्या वस्तीवर काहीच नव्हते ते निर्माण कसे झाले व कोणी केलं? 👇
या मुलांना विचारही करावासा वाटतं नाही की , आमचे वडील कुठे शिकले व कसे शिकले तेंव्हाची परिस्थिती कशी होती ? तेंव्हा रोजगाराची साधन काय होती ? लोकांना हाताला काम नव्हतं तर लोक कसे जगायचे ? मग हळुहळु प्रगत कशी झाली व कोणी केली ? या मुलांनाकाहीच विचार कसे करावासा वाटतं नाही.👇
एका उद्धवस्त उपाशी देशाचा पंतप्रधान म्हणून नेहरुंच्या पंतप्रधानकीचा जन्म झाला. लोक नेहरुंना मारखाऊ म्हणतात, पडखाऊ म्हणतात. त्यांचं राजकारण आत्मघातकी आणि शेळपट म्हणतात, पण लोक विसरतात ते हे की स्वातंत्र्य मिळालं तेव्हा +👇
या देशात रेशनिंग होती आणि माणशी ३०० ग्रॅम प्रतिदिवस अन्नच दिले जाई. ४९ साली अमेरिकेने थोडा ताण दिल्याबरोबर रेशन माणशी २२५ ग्रॅम पर्यंत खाली आलं. देशातले धान्य उत्पादन ३८ दशलक्ष टन एवढंच होतं. लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणापेक्षा जास्त अन्नधान्य वाढीचा वेग निर्माण केला नाही तर +👇
हा देशही टिकु शकत नाही, इथली लोकशाही ही टिकू शकत नाही. आणि चीनकडून होणारा अपमान तर सोडाच, पण श्रीलंकेनं एखाद्या वेळी उद्धटपणे आपला अपमान केला, तर त्याचा प्रतिकारही करणे शक्य होत नाही.पाकिस्तानच्या डरकाळ्यांच्या मागे पश्चिम पंजाबचा गहू आणि कापूस आणि आजच्या बांगलादेशमधले ताग आणि👇
#कानबाई#खान्देश
श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं पुर्वी खानाचं राज्य होतं. 👇
त्याला तु'झ्या नावाची म्हणजे "खानबाई' साजरी करतो असं सांगुन हा हिंदुंचा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं , हा खान्देश = कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी 'कानबाई' हे नाव घेतलं असावं. असो. हा उत्सव प्रामुख्याने 👇
सोनार, शिंपी, चौधरी, माळी या समाजात साजरा होतो.
या उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर 👇