तेलगी घोटाळा आरोप - भुजबळांचा राजीनामा
जावई जमीन प्रकरण - मनोहर जोशींचा राजीनामा
अण्णा हजारे यांचे आरोप - चार मंत्र्यांचे राजीनामे
मुंबई हल्ला प्रकरण - केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गृहमंत्री आर.आर. पाटील राजीनामा.
आता 👇
संजय राठोड व अनिल देशमुख यांचाही राजीनामा...!
एक लक्षात घ्या केवळ नैतिकता अन आरोप म्हणून हे सगळे राजीनामे झाले..

पण गम्मत बघा
बरखा पाटील प्रकरण - तत्कालीन गृहमंत्र्याचा राजीनामा नाही
कोरेगांव भिमा दंगल प्रकरण - तत्कालीन गृहमंत्र्याचा राजीनामा नाही 👇
सिडको जमिन गैरव्यवहार प्रकरण - तत्कालीन उद्योगमंत्री व मुख्यमंत्र्यांचा राजीनामा नाही
पठाणकोट हल्ला - कोणाचाही राजीनामा नाही
पुलवामा हल्ला - कोणाचाही राजीनामा नाही
मग आता सांगा नैतिकता कोणाकडे आहे... अनेक बलात्कारी आमदार खासदार असणाऱ्या भाजपकडे, 👇
तडिपारी भोगलेला इसम गृहमंत्री असलेल्या सरकारकडे , फॉर्जरीच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर असणाऱ्या माजी मुख्यमंत्र्याकडे, मुंबई बॅक घोटाळा प्रकरणी आरोपी असणाऱ्या दरेकरकडे, बोंबलणार्या दलाल गोदी मिडीयाकडे की 👇
निष्पक्ष चौकशीसाठी न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर न्यायालयाचा मान राखत राजीनामा देणाऱ्या राजकिय पक्षाकडे ???#भाबडाप्रश्न
-मनाली मंगेश गुप्ते

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with विलास नवले

विलास नवले Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @vilasnawale

3 Apr
नमस्कार...
सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो की , मी सोशलमीडिया वरुन जरासा मोठाच ब्रेक घेतला. आणि फक्त सोशलमिडिया पासुनच नव्हे तर बऱ्याच दिवसापासुन माझा मोबाइल नंबर सुद्धा बंद होता. whats app ही बंद होत. सगळंच बंद होत. त्यामुळे अनेकांना माझी काळजी लागली होती की, मी बरा आहे ? 👇
मला काही झाल तर नाही ना ?
तर,
हो , मी बरा आहे...
कंपनीची काम Work From Home सुरुच होती व सुरु आहे. मी कुठेही बाहेर फिरत नव्हतो. मला कोरोना झाला नव्हता. मी जरी कामानिम्मित फिरायला निघालो तरी योग्य ती काळजी घेत होतो व घेत असतो. 👇
मी इतके दिवस संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहूनही तुम्ही मला संपर्क यादीत कायम ठेवुन आहात. मला विसरला नाहीत. उलट न सांगता सगळंच बंद केलं म्हणून प्रेमाने खडेबोल सुनावलेत आणि तुमच्या शुभेच्छांनी तर मन भरुन आल. 👇
Read 4 tweets
9 Dec 20
भारतीय जनता पार्टीचे आज व मागच्या सहा वर्षापासुनचे मुख्य टार्गेट १७ ते २४ ची तरुण मुले-मुली आहेत. या दरम्यान या तरुणापर्यंत मोठ्या प्रमाणावर whats appच्या माध्यमातुन मुस्लीम द्वेष , काँग्रेसने काहीच केलं नाही, देश लुटला , इ. मोठ्या प्रमाणावर पसरवण्यात येत व ते यात यशस्वी होतात.👇
या तरुणांचा मेंदू भयकंर हँन्ग करुन ठेवतात त्यामुळे त्यांना विचारही करावासा वाटतं नाही की , ज्या देशात रस्ते नव्हते , मुबलक धान्य नव्हते ,शाळा, काँलेज , कंपन्या , दुरदर्शन, दळणवळण साधणे, कँम्पुटर ,वीज, दवाखाने कित्येक वाड्या वस्तीवर काहीच नव्हते ते निर्माण कसे झाले व कोणी केलं? 👇
या मुलांना विचारही करावासा वाटतं नाही की , आमचे वडील कुठे शिकले व कसे शिकले तेंव्हाची परिस्थिती कशी होती ? तेंव्हा रोजगाराची साधन काय होती ? लोकांना हाताला काम नव्हतं तर लोक कसे जगायचे ? मग हळुहळु प्रगत कशी झाली व कोणी केली ? या मुलांनाकाहीच विचार कसे करावासा वाटतं नाही.👇
Read 6 tweets
3 Sep 20
#आवडलेलं #वाचनीय
वाटा तुझ्या माझ्या : नरहर कुरुंदकर

एका उद्धवस्त उपाशी देशाचा पंतप्रधान म्हणून नेहरुंच्या पंतप्रधानकीचा जन्म झाला. लोक नेहरुंना मारखाऊ म्हणतात, पडखाऊ म्हणतात. त्यांचं राजकारण आत्मघातकी आणि शेळपट म्हणतात, पण लोक विसरतात ते हे की स्वातंत्र्य मिळालं तेव्हा +👇
या देशात रेशनिंग होती आणि माणशी ३०० ग्रॅम प्रतिदिवस अन्नच दिले जाई. ४९ साली अमेरिकेने थोडा ताण दिल्याबरोबर रेशन माणशी २२५ ग्रॅम पर्यंत खाली आलं. देशातले धान्य उत्पादन ३८ दशलक्ष टन एवढंच होतं. लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणापेक्षा जास्त अन्नधान्य वाढीचा वेग निर्माण केला नाही तर +👇
हा देशही टिकु शकत नाही, इथली लोकशाही ही टिकू शकत नाही. आणि चीनकडून होणारा अपमान तर सोडाच, पण श्रीलंकेनं एखाद्या वेळी उद्धटपणे आपला अपमान केला, तर त्याचा प्रतिकारही करणे शक्य होत नाही.पाकिस्तानच्या डरकाळ्यांच्या मागे पश्चिम पंजाबचा गहू आणि कापूस आणि आजच्या बांगलादेशमधले ताग आणि👇
Read 13 tweets
25 Jul 20
#कानबाई #खान्देश
श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं पुर्वी खानाचं राज्य होतं. 👇
त्याला तु'झ्या नावाची म्हणजे "खानबाई' साजरी करतो असं सांगुन हा हिंदुंचा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं , हा खान्देश = कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी 'कानबाई' हे नाव घेतलं असावं. असो. हा उत्सव प्रामुख्याने 👇
सोनार, शिंपी, चौधरी, माळी या समाजात साजरा होतो.
या उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर 👇
Read 9 tweets
16 Jun 20
सगळे मीडियावाले एका सुरात सांगत आहेत की "चीनने हे विसरू नये की हा 1962 चा भारत नाही, मोदींच्या नेतृत्वाखालील 2020 चा भारत आहे."

जणू काही चीन अजूनही 1962 मध्येच आहे. चीनपण 2020 मध्ये आहे बाबांनो आणि त्यांच्या लष्करी आणि आर्थिक सामर्थ्यापुढे आपण आजतरी टिकाव धरू शकत नाही. 👇
मोदीजीही त्यांना खूप चांगले माहीत आहेत. ते झोपाळ्यात झुलवतात त्यांना भारतात आले की, आणि ट्रम्पने एक धमकी दिली की लगेच तासाभरात औषधे पाठवायला परवानगी देतात.

सध्या GDP ची वाढ शून्याकडून खाली जाईल असे दिवस आहेत, बेरोजगारी उच्चांकावर आहे, करसंकलन होत नाहीये, 👇
पेट्रोलवर ऐतिहासिक टॅक्स आहे आणि तो रोज वाढतोय.... थोडक्यात आपल्या अर्थव्यवस्थेवर अरबी अश्व आरोहित झालेला आहे. दस्तुरखुद्द मीडियात लोकांच्या नोकऱ्या जात आहेत.

तेव्हा भारतीय मीडियाकर्मींनो स्वतःला थोडं आवरा. आपण आपल्या नेत्याला कितीही डोक्यावर घेऊन नाचले तरी 👇
Read 5 tweets
13 Jun 20
मला कधी कधी आश्चर्य वाटतं की आपण ज्यांना सर्वज्ञ, अभ्यासू आणि खंबीर व्यक्ती मानतो आणि म्हणून आपण त्यांना गुरूही मानतो अशी माणसंही एवढी अविचारी का होत असतील? जगात दुःखं आहेत, समस्या आहेत पण एखाद्याच्या आयुष्यापेक्षा त्या नक्कीच मोठ्या नाहीत. 👇

#म
कोणतंही दुःख किंवा समस्या ही आपल्या आयुष्याचा भाग असते, ते दुःख किंवा ती समस्या म्हणजे आपलं आयुष्य नसतं हे आता आपल्याला कळलं पाहिजे!
काही काही लोक नवराबायकोमध्ये पटत नाही म्हणून आत्महत्या करायला उठतात. मी म्हणतो 👇

#म
तुमचं पटत नाही ना, मग द्या ना सोडून. जीवन संपवण्यापेक्षा रिलेशन संपवा ना! संपवा रिलेशन आणि करा नवी सुरुवात. जगात सगळं आपल्या मानासारखंच कसं होईल? एखादा व्यवसाय, एखादी नोकरी आपल्याला लाभली नाही तर आपण ती बदलतोच की! नातेसंबंधाचंही असंच असतं. 👇

#म
Read 12 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!