मामु कहानी सुनाते रह गये और लडके ने चांद चुम लिया - अमोल उदगीरकर
२०१२ मध्ये व्हिएन्नामध्ये एक जागतिक कॉन्फरन्स भरली होती. त्यात चर्चेचा विषय होता 'शाहरुख खान अँड ग्लोबल बॉलिवुड'. भारतासारख्या प्रचंड वांशिक, भाषिक आणि धार्मिक वैविध्य असणाऱ्या देशात एक अल्पसंख्य
समुदायाचा, मध्यमवर्गीय घराण्यातून आलेला मुलगा सुपरस्टार होतो आणि त्या देशाच्या धर्मनिरपेक्षतेचा चेहरा बनतो, ही फार दुर्मीळ घटना आहे. त्यावर या कॉन्फरन्समध्ये चाळीस देशांमधून आलेल्या विविध क्षेत्रांतल्या तज्ज्ञांनी चर्चा केली. असा बहुमान एखाद्या भारतीय नटाला मिळाल्याचं
दुसरं उदाहरण सापडणं अवघड आहे.आमीर खानची फिल्म चारशे करोडच्या क्लबमध्ये गेली असेल किंवा सद्यस्थितीत सलमान खान हा बहुतेक देशातला सगळ्यात मोठा स्टार असेल,पण शाहरुखबद्दल जे औत्सुक्य किंवा जिज्ञासा सर्वत्र आहे,ती त्यांच्याबद्दल नाहीये.याची कारणं शाहरुखच्या मुळांमध्ये शोधावी लागतात.
सलमान आणि आमीर हे मुंबईतच मोठ्या फिल्मी घराण्यात सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले. शाहरुख हा खऱ्या अर्थानं 'आउटसाइडर' आहे. दिल्लीतल्या एका मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेल्या शाहरुखला कुठलीही फिल्मी पार्श्वभूमी नव्हती. आजूबाजूच्या लोकांचा विरोध आणि उपदेश बाजूला सारून हा पोरगा
स्वप्ननगरीत आला आणि सगळ्यात मोठा स्टार बनला हे कुठल्याही परिकथेपेक्षा कमी नाही.त्याला 'ब्लॅक फ्रायडे'मधला एक डायलॉग खूप फिट बसतो- ‘मामु कहानी सुनाते रह गये और लडके ने चांद चुम लिया.’शाहरुख नावाचा धूमकेतू जेव्हा उदयाला येत होता,तेव्हा आमीर आणि सलमान अगोदरच पदार्पण करून स्टार बनले
जागतिकीकरण आपल्या घरात आलं होतं. संगणकाचा चंचुप्रवेश झाला होता. राम जन्मभूमी आंदोलन ऐन भरात होतं आणि हिंदू-मुस्लिम यांच्यातली दरी रुंदावत चालली होती. एकूणच आपलं अति मर्यादित जग बदलायला लागलं होतं. बर्लिनची भिंत पडली होती, सोव्हिएत रशियाचं विघटन झालं होतं.
सध्या देशातलं एकूणच वातावरण धार्मिक केंद्रीकरणाकडे झुकत आहे. शाहरुख या केंद्रीकरणाच्या कचाट्यात सापडला आहे. मला स्वतःला शाहरुख नट म्हणून कधी आवडतो, कधी आवडत नाही. पण त्याने शून्यातून जग उभं केलं आहे त्याबद्दल आदर वाटतो.
त्याचं 'वानखेडे'वरचं बेबंद वर्तन बघून त्याला शिव्याही घालाव्याशा वाटल्या होत्या. पण कसाही असला तरी तो देशद्रोही नाही, याची मला खात्री आहे. त्याला त्याच्या धर्मावरून कायमच 'धर्मपरीक्षा' द्यावा लागल्या आहेत. एकदा एका 'क्रिकेट सामन्यात' तो पाकिस्तानी ड्रेसिंग रूममध्ये गेला,
तेव्हा गदारोळ उडाला होता. त्याच्या आयपीएल टीमने पाकिस्तानी खेळाडूंना संधी दिली, तेव्हा काही वशिष्ट वर्तुळात बरीच कुजबुज झाली होती- 'बघा गेला की नाही शेवटी जातीवर?' बाकीच्या अनेक संघांनीही पाकिस्तानी खेळाडूंना घेतलं होतं, मात्र त्याच्या मालकांचं नाव 'खान' नव्हतं!
माय नेम इज खान' आला तेव्हाही ‘बघा, बघा’चे सूर पुन्हा उमटले. ‘मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईल’ हे त्यानं कधीही न केलेलं विधान बिनदिक्कत त्याच्या नावावर खपवलं गेलं. हे समजून न घेता अनेक अर्धवट लोक ‘कधी जाणार पाकिस्तानात?’, असं अजूनही त्याला डिवचत असतात.
तो मोठा सुपरस्टार आहे. बाहेरून दाखवत नसेल, पण त्याला या सगळ्याचं वाईट वाटत नसेल काय? ज्याचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते, त्याला निव्वळ त्याच्या विशिष्ट आडनावामुळे ‘पाकिस्तानात चालता हो’ असं लोक सांगतात. आयुष्यात काहीही चमकदार न केलेली माणसं आणि 'आम्ही कर भरतो'
ही देशभक्तीची व्याख्या असणारे लोक आपल्या जातीची, धर्माची, राष्ट्रवादाची 'कलेक्टिव्ह' जबाबदारी एखादा कलाकार, साहित्यिक किंवा खेळाडूवर का टाकत असावीत? आम्हाला आवडेल ते, पटेल तेच बोलावं अशा भाबड्या अपेक्षांचं काय करायचं?
शाहरुख काही मर्यादा पुरुषोत्तम नाही. त्याच्यात अनेक दुर्गुण आहेत. पण ते आपल्यात नाहीयेत का? त्याच्या चुकांची शिक्षा म्हणजे डायरेक्ट 'देशनिकाला'? पण देशातले लाखो-करोडो लोक त्याच्यावर प्रेम करतात. त्याच्या छोट्या चुका पोटात घेतात. आपला देश सहिष्णू आहे (अजून तरी )
हीच बाब अधोरेखित करतात, पण शंकेचे काळे ढग जमा होत आहेत हेच खरं. 'चक दे इंडिया'मधला एक प्रसंग. महिला टीमच्या कोच पदासाठी मुलाखत देऊन कबीर खान त्याच्या मित्रासोबत बाहेर पडतो. त्याचा मित्र त्याच्या भूतकाळाचा संदर्भ देऊन म्हणतो, "एक गलती तो सबको माफ होती है यार." त्यावर केविलवाणेपणा
आणि उपरोधिकपणा यांचं मिश्रण असणारं हसू चेहऱ्यावर आणून तो फक्त म्हणतो, "सबको?" आणि आपली पुराणी स्कूटर घेऊन ध्यानचंदच्या पुतळ्यासमोरून निघून जातो. पडद्यावर तो प्रसंग वठवताना त्याला फारसा त्रास झाला नसावा. या सीनची रंगीत तालीम तो रोजच करत असतो!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
पिगासस या इस्रायली फर्मने केलेल्या फोन हेरगिरीचा वृत्तांत मराठीत #Thread
40 भारतीय पत्रकारांच्या फोन संभाषणांवर पाळत ठेवण्यात आली. अज्ञात संस्थेद्वारे "पेगासस" हे इस्त्रायली सॉफ्टवेअर वापरून हेरगिरी करण्यात आल्याचे खात्रीलायक पुरावे समोर आले आहेत.
'द हिंदू', 'हिंदुस्थान टाईम्स', 'न्युज 18', 'इंडिया टुडे', 'इंडियन एक्स्प्रेस' इत्यादी आघाडीच्या वृत्तसंस्थांच्या प्रमुख पत्रकारांच्या संभाषणांवर पाळत ठेवण्यात आली होती.
10भारतीय फोननंबरच्या करण्यात आलेल्या स्वतंत्र डिजिटल फॉरेन्सिक तपासणीमध्ये ज्यांचे नंबर संशयित यादीमध्ये होते
त्यांच्या हेरगिरीचा प्रयत्न किंवा पेगासस द्वारा हॅक यशस्वी झाल्याचे समोर आले.
पेगासस हे एन एस ओ या इस्त्रायली कंपनीचे उत्पादन असून ज्यांना सेवा पुरवली जाते त्या संस्था अगर देशांची नावे त्यांच्याकडुन गोपनीय ठेवली जातात.
केंद्राने राज्य सरकारला 10 ऑक्सिजन प्लांट बांधायला पैसे दिले होते म्हणून भाजपवाले मेसेज फिरवत आहे.याची सत्यता मात्र नेहमीप्रमाणे वेगळी आहे.
केंद्र सरकारच्या पीएम केअर्स मधून राज्यांमध्ये PSA ऑक्सिजन प्लांटस उभारण्याचा निर्णय झाला, या साठी काही निधी allocate केला.. कुणाला ?
तर राज्यांना नाही. सेंट्रल मेडिकल सप्लाय स्टोर नावाच्या केंद्रीय विभागाला.जो की आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येतो.
म्हणजे हा पैसा राज्यांना मिळणार नसून केंद्राच्याच एका विभागाला मिळणार आहे, राज्य सरकारांनी फक्त हॉस्पिटल्स ची यादी द्यायची आहे..
या 162 ऑक्सिजन प्लांटस पैकी, फक्त 33 च उभे करणे केंद्र सरकारला जमलं आहे, महाराष्ट्राला मंजूर झालेल्या 10 पैकी फक्त एकच प्लांट उभारला आहे.
हे केंद्र सरकारचे अपयश आहे
महाराष्ट्र सरकारने काय केलं? हे विचारू इच्छित असाल तर तेही स्पष्ट करतो.
महात्मा फुले - ख्रिस्तीधर्मप्रसारक ही हिंदुत्ववाद्यांची कुजबुज आणि सत्यशोधन #Thread
विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वरील विवेचनातून
एकोणिसाव्या शतकात बहुजनांच्या परिस्थितीचा अंदाज आपण बांधू शकतो.
महात्मा फुलेंच्या मतानुसार व समकालीन वाङमयानुसार बहुजनांवर झालेल्या ब्राम्हणी अत्याचाराची कल्पना येते.
वेगवेगळ्या ग्रंथाद्वारे व कुप्रथाद्वारे ब्राम्हणांनी बहुजनांना शुद्र ठरविले.
त्याप्रमाणे त्यांना वागणूक दिली. ब्रम्हवृंदाचे उच्चत्व बहुजनांना शुद्र म्हणून खपवले. सरकारी कचेरीत ब्राह्मण कर्मचाऱ्यांनी इंग्रजांना हाताशी धरून शुद्रांवर आत्यंतिक अत्याचार केले.
लग्न,मुंज,वास्तुशांत, पुजा यामध्ये शुद्रांना अक्षरशः लुटले.देवाची भीती घालून खंडणी वसूल केली गेली.
नेहरूंनी स्वत:च स्वत:ला भारतरत्न दिला असे सांगून नेहरूंवर टिका करणारे लेख पसरविण्याचे काम अनेक लोक करत आहेत.
नेहरूंचे स्वातंत्र्यलढ्यातील,संसदीय लोकशाहीच्या यशस्वी कार्यन्वयनातील व राज्यघटनेवर आधारीत जवाबदार राज्यपद्धती निर्मितीतील 👇
देशातील विविध उच्चशिक्षण संस्था,विज्ञानतंत्रज्ञान या क्षेत्रातील योगदान मोठे आहे.म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात.नेहरू भारतरत्न हा सन्मान मिळण्यास नक्कीच पात्र होते.पणतत्पुर्वीच ते जगासमोर निव्वळ भारतीय नेते म्हणून नव्हेतर सबंध आशियाचे म्हणून विख्यात झाले होते. 👇
पुढेतर जगातील दिडशे पेक्षा जास्त राष्ट्रांचे नेते बनले,त्यामुळे ते भारतरत्न होणे ही सहज स्वाभाविक बाब होती.नेहरूंनी स्वातंत्र्यलढ्यात नऊ वर्षापेक्षा जास्त कालावधी कारागृहात व्यतित केला आहे,अशी व्यक्ती राष्ट्रपतींना, मला भारतरत्न प्रदान करा,अशी मागणी करेल काय? याचा विचार जाणकार
अर्णब गोस्वामीच्या लिक झालेल्या चॅटमधील काही ठळक मुद्दे :
- पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सुमारे ५० जवान शहीद झाले. त्या हल्ल्याचा विकृत अर्णब गोस्वामीला आनंद झाला. कारण त्यामुळे 'मोदी सरकार' बहुमताने निवडून येणार होते.
▪️पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल 'एअर स्ट्राईक' होणार हे अर्नबला आधीच माहिती होते. हा तोच एअर स्ट्राईक ज्यात फक्त एक कावळा मेला. दहशतवादी यात मेल्याचे आजवर कुठलाही ठोस पुरावे नाहीत.
-भाजपसाठी जीवाचे रान करुन ट्विटरवर मोदी सरकारची चमची असलेली 'कंगणा रनौत' चवचाल आहे. ह्रितिक रोशन सोबत ती रिलेशन मध्ये होती. कंगणा मानसिकदृष्ट्या 'मनोरुग्ण / मनोविकृत' (Schizophrenic) आहे.
◆20 डिसेंबर 2019 ते 8 जानेवारी 2020 मधे इंडिया टुडेचा एक ओपिनियन पोल येतो त्यात नरेंद्र मोदींची लोकप्रियता प्रचंड घसरलेली दिसते.
◆2017 मधे 65% लोकप्रियता असलेल्या मोदींची लोकप्रियता जानेवारी 2020 मधे 46% वर येते.
◆2017 मधे 10% लोकप्रियता असणाऱ्या राहुल गांधीची लोकप्रियता -
20 जानेवारी 2020 च्या सर्वेमधे 34% पर्यंत येऊन पोहचते.
◆म्हणजे मोदी आणि राहुल गांधीच्या लोकप्रियतेमधे फक्त 12% चा फरक शिल्लक राहतो.
◆निवडणुकीच्या चार महीने आधी हा अंदाज होता म्हणजे निवडणूक जवळ येता-येता,मोदींची लोकप्रियता अजुन कमी होण्याची शक्यता होती.
◆त्याच पोल मधे बीजेपीला- 237 तर कांग्रेस आणि मित्र पक्षांना-166 जागा मिळतील असा अंदाज होता.
◆म्हणजे एकटया बीजेपीला एकहाथी सत्ता मिळणार नाही असा त्या सर्वेचा स्पष्ट अंदाज होता.
◆लोकसभेच्या आधी झालेल्या मध्यप्रदेश,राजस्थान,
छस्तीसगढ़च्या निवडणुकांचा अचूक अंदाज इंडिया टुडेच्या