लालपरी वाचवा हे बरोबर, पण लालपरीच्या गळ्यात फास अडकवला कुणी ?
By @AmarJadhao
गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या येत आहेत. आजपर्यंत तब्बल 35 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समजतंय.
देशातलं सर्वात मोठं प्रवासी वाहतूक महामंडळ असलेलं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आज तोट्यात आहे, कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत अशी परिस्थिती आहे,सरकारने महामंडळ विलीन करवून परिवहन खात्यामार्फत एसटी चालवावी असं सप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
महामंडळावर कर्जाचा बोजा मोठा आहे, कोरोनाच्या काळात वाहतुकच बंद असल्याने एसटीचं उत्पन्न थांबलं, शाळा आणि ऑफिसेस सुरू नसल्याने प्रवासी आताही कमीच आहेत. मात्र दीड वर्षे बंद राहिल्यानं एसटी ऑक्सिजन वर येईल इतकी वाईट परिस्थिती ही सततच्या अंशतः खाजगीकरणामुळे ओढावली आहे.
फडणवीस मुख्यमंत्री असताना एसटीच्या दीर्घपल्ल्यांच्या मार्गावर वातानुकूलित बसेस आणण्याचा निर्णय झाला, खाजगी वाहतुकीच्या आरामदायी बसेस एसटीला स्पर्धा निर्माण करत असल्याने हा निर्णय कागदावर चांगला वाटत असला तरी ह्या बसेस भाडेतत्वावर घेऊन त्यावर खाजगी चालक नेमण्यात आले
आणि इथून एसटीच्या दुर्दशेला सुरुवात झाली,माफक दरात एसी बस उपलब्ध असल्याने अर्थातच सामान्य नागरिकांनी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लालपरी सोडून या बसेसचा आसरा घेतला,कुठल्याही प्रवासी कंपनीला लांबपल्ल्याचे रुट्स खरे उत्पन्न मिळवून देत असतात,नेमके हेच रुट्स खाजगी गाड्यांना दिल्याने
एसटीच्या उत्पन्नात घट झाली, त्यावर कळस म्हणजे हे खाजगी चालक प्रशिक्षित नसल्याने या बसेसचे अपघात व्हायला लागले, त्यातून एसटीचीच बदनामी झाली. स्वतःचे वर्कशॉप, कोच बिल्डिंग डेपो, ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर असताना दुप्पट तिप्पट दरात खाजगी बसेस भाड्याने घेऊन
चालवण्याचा निर्णय एसटीला तोट्यात घेऊन गेला. गेल्या कित्येक वर्षांपासून एसटीला तिचे हक्काचे लॉंग रुट्स हळूहळू खाजगी बसेसला द्यायला भाग पाडलं जात आहे.
परिवहन मंडळाचं असं टप्प्याटप्प्याने खाजगीकरण करण्याचा डाव सुरू आहे, तो आधी हाणून पाडला पाहिजे. उरला प्रश्न एसटीच्या पंधरा हजार
कोटींच्या तुटीचा,तर हे पैसे उभे करायला राज्य सरकारने आता पुढाकार घेण्याशिवाय उपाय नाही, एसटीच्या नावाने कर्जरोखे उभारून फार मोठी रक्कम जमा होणार नाही, त्यापेक्षा ठिकठिकाणी मोठ्या शहरात एसटी महामंडळाच्या मालकीचे वर्कशॉप्स आहेत ते मोक्याच्या आणि विस्तीर्ण जागेवर उभे आहेत,
इतरही जागा आहेत, या जागा खुल्या लिलावाच्या मार्गाने विकून रक्कम उभी करता येईल, एसटी स्थानक सोडता एसटीची इतर यंत्रणा शहराच्या हद्दीतच असणे गरजेचे नाही.एसटीच्या स्थानकांवरील अनधिकृत जाहिराती बंद करून स्थानकांच्या भिंतीवरील प्रत्येक चौरस इंच जाहिरातीसाठी वापरता येईल,स्थानकांच्या वर
मजले काढून तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स काढता येतील.या सर्व उपायांच्या माध्यमातून एक हजार कोटींपर्यंत रक्कम उभी होईल, उरलेल्या रकमेसाठी जीएसटीच्या 18 टक्के व 28 टक्के स्लॅब वर अर्धा टक्क्यांचा किंवा एक टक्क्याचा अधिभार लावण्याशिवाय सरकारकडे दुसरा पर्याय नाही,
यातून येत्या एक वर्षात एस्टीवरील आर्थिक संकट पूर्णपणे संपेल व एसटी पुनर्जीवीत होईल, अर्थात हा अधिभार लावायला केंद्र सरकार व जीएसटी परिषद मान्यता देईल का हा मोठाच प्रश्न आहे, कारण केंद्राने अजून राज्याचे हक्काचे 22 हजार कोटीच परत दिलेले नाहीत.
शिवाय इंधनाचे दरही आधीच वाढलेले असल्याने त्यावर अधिभार लावण्याचा मार्गही बंद झालेला आहे.एसटीचे राज्य सरकारच्या परिवहन खात्यात विलीनीकरण ही किचकट प्रक्रिया असेल, एसटीची स्थापना 1950 च्या रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऍक्ट अंतर्गत झालेली आहे,
या ऍक्टच्या कलम 39 नुसार केंद्राच्या परवानगीशिवाय एसटीचं विलीनीकरण शक्य नाही, येत्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात हा प्रस्ताव मांडून पारित करून घ्यावा लागेल व नंतर केंद्राकडे पाठवावा लागेल, त्यामुळे ज्या राज्य सरकारच्या विरोधात एसटीचे कर्मचारी आंदोलन करत आहेत.
त्या सरकारच्या हातात मर्यादित पर्याय आहेत हे एसटीच्या कर्मचाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.राज्य सरकारने एसटीचं विलीनीकरण मान्य करणे मिनिटात होईल मात्र महाराष्ट्र राज्यावर असलेली केंद्राची विशेष मेहेरबानी लक्षातघेता कर्मचाऱ्यांना पुन्हा सहा महिन्यांनी आंदोलन करण्याची वेळ येऊ शकते
आज एसटीच्या खाजगिकरणाचे दुष्परिणाम दिसत आहेत, एसटीचे कर्मचारी त्यामुळे गळफास घेत आहेत हे खरं असलं तरी शासकीय मालकीच्या इतर उद्योगांचं खाजगीकरण केंद्र सरकार करत असताना एसटीच्या कर्मचाऱ्यांनीही आवाज उठवणे गरजेचं होतं, बीएसएनएल, बँक ऑफ महाराष्ट्र, IDBI सारख्या शासकीय उद्योगांचं
खाजगीकरण चर्चेत आलं तेव्हा एसटीनेही निषेधाचा साधा सूर तरी काढायला हवा होता.. भारत पेट्रोलियम सारख्या फायद्यातल्या कंपनीचं खाजगीकरण प्रस्तावित आहे मागेपुढे LIC सुद्धा जाईल.. शासकीय उपक्रमांचं खासगीकरण हाणून पाडायचं असेल सर्वांनीच एकत्र येऊन केंद्राविरुद्ध लढा द्यायची गरज आहे..
आपल्या घरापर्यंत आग यायची वाट बघायला नको.. अर्थात हे बोलण्याची आज योग्य वेळ नाही..
मामु कहानी सुनाते रह गये और लडके ने चांद चुम लिया - अमोल उदगीरकर
२०१२ मध्ये व्हिएन्नामध्ये एक जागतिक कॉन्फरन्स भरली होती. त्यात चर्चेचा विषय होता 'शाहरुख खान अँड ग्लोबल बॉलिवुड'. भारतासारख्या प्रचंड वांशिक, भाषिक आणि धार्मिक वैविध्य असणाऱ्या देशात एक अल्पसंख्य
समुदायाचा, मध्यमवर्गीय घराण्यातून आलेला मुलगा सुपरस्टार होतो आणि त्या देशाच्या धर्मनिरपेक्षतेचा चेहरा बनतो, ही फार दुर्मीळ घटना आहे. त्यावर या कॉन्फरन्समध्ये चाळीस देशांमधून आलेल्या विविध क्षेत्रांतल्या तज्ज्ञांनी चर्चा केली. असा बहुमान एखाद्या भारतीय नटाला मिळाल्याचं
दुसरं उदाहरण सापडणं अवघड आहे.आमीर खानची फिल्म चारशे करोडच्या क्लबमध्ये गेली असेल किंवा सद्यस्थितीत सलमान खान हा बहुतेक देशातला सगळ्यात मोठा स्टार असेल,पण शाहरुखबद्दल जे औत्सुक्य किंवा जिज्ञासा सर्वत्र आहे,ती त्यांच्याबद्दल नाहीये.याची कारणं शाहरुखच्या मुळांमध्ये शोधावी लागतात.
पिगासस या इस्रायली फर्मने केलेल्या फोन हेरगिरीचा वृत्तांत मराठीत #Thread
40 भारतीय पत्रकारांच्या फोन संभाषणांवर पाळत ठेवण्यात आली. अज्ञात संस्थेद्वारे "पेगासस" हे इस्त्रायली सॉफ्टवेअर वापरून हेरगिरी करण्यात आल्याचे खात्रीलायक पुरावे समोर आले आहेत.
'द हिंदू', 'हिंदुस्थान टाईम्स', 'न्युज 18', 'इंडिया टुडे', 'इंडियन एक्स्प्रेस' इत्यादी आघाडीच्या वृत्तसंस्थांच्या प्रमुख पत्रकारांच्या संभाषणांवर पाळत ठेवण्यात आली होती.
10भारतीय फोननंबरच्या करण्यात आलेल्या स्वतंत्र डिजिटल फॉरेन्सिक तपासणीमध्ये ज्यांचे नंबर संशयित यादीमध्ये होते
त्यांच्या हेरगिरीचा प्रयत्न किंवा पेगासस द्वारा हॅक यशस्वी झाल्याचे समोर आले.
पेगासस हे एन एस ओ या इस्त्रायली कंपनीचे उत्पादन असून ज्यांना सेवा पुरवली जाते त्या संस्था अगर देशांची नावे त्यांच्याकडुन गोपनीय ठेवली जातात.
केंद्राने राज्य सरकारला 10 ऑक्सिजन प्लांट बांधायला पैसे दिले होते म्हणून भाजपवाले मेसेज फिरवत आहे.याची सत्यता मात्र नेहमीप्रमाणे वेगळी आहे.
केंद्र सरकारच्या पीएम केअर्स मधून राज्यांमध्ये PSA ऑक्सिजन प्लांटस उभारण्याचा निर्णय झाला, या साठी काही निधी allocate केला.. कुणाला ?
तर राज्यांना नाही. सेंट्रल मेडिकल सप्लाय स्टोर नावाच्या केंद्रीय विभागाला.जो की आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येतो.
म्हणजे हा पैसा राज्यांना मिळणार नसून केंद्राच्याच एका विभागाला मिळणार आहे, राज्य सरकारांनी फक्त हॉस्पिटल्स ची यादी द्यायची आहे..
या 162 ऑक्सिजन प्लांटस पैकी, फक्त 33 च उभे करणे केंद्र सरकारला जमलं आहे, महाराष्ट्राला मंजूर झालेल्या 10 पैकी फक्त एकच प्लांट उभारला आहे.
हे केंद्र सरकारचे अपयश आहे
महाराष्ट्र सरकारने काय केलं? हे विचारू इच्छित असाल तर तेही स्पष्ट करतो.
महात्मा फुले - ख्रिस्तीधर्मप्रसारक ही हिंदुत्ववाद्यांची कुजबुज आणि सत्यशोधन #Thread
विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वरील विवेचनातून
एकोणिसाव्या शतकात बहुजनांच्या परिस्थितीचा अंदाज आपण बांधू शकतो.
महात्मा फुलेंच्या मतानुसार व समकालीन वाङमयानुसार बहुजनांवर झालेल्या ब्राम्हणी अत्याचाराची कल्पना येते.
वेगवेगळ्या ग्रंथाद्वारे व कुप्रथाद्वारे ब्राम्हणांनी बहुजनांना शुद्र ठरविले.
त्याप्रमाणे त्यांना वागणूक दिली. ब्रम्हवृंदाचे उच्चत्व बहुजनांना शुद्र म्हणून खपवले. सरकारी कचेरीत ब्राह्मण कर्मचाऱ्यांनी इंग्रजांना हाताशी धरून शुद्रांवर आत्यंतिक अत्याचार केले.
लग्न,मुंज,वास्तुशांत, पुजा यामध्ये शुद्रांना अक्षरशः लुटले.देवाची भीती घालून खंडणी वसूल केली गेली.
नेहरूंनी स्वत:च स्वत:ला भारतरत्न दिला असे सांगून नेहरूंवर टिका करणारे लेख पसरविण्याचे काम अनेक लोक करत आहेत.
नेहरूंचे स्वातंत्र्यलढ्यातील,संसदीय लोकशाहीच्या यशस्वी कार्यन्वयनातील व राज्यघटनेवर आधारीत जवाबदार राज्यपद्धती निर्मितीतील 👇
देशातील विविध उच्चशिक्षण संस्था,विज्ञानतंत्रज्ञान या क्षेत्रातील योगदान मोठे आहे.म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात.नेहरू भारतरत्न हा सन्मान मिळण्यास नक्कीच पात्र होते.पणतत्पुर्वीच ते जगासमोर निव्वळ भारतीय नेते म्हणून नव्हेतर सबंध आशियाचे म्हणून विख्यात झाले होते. 👇
पुढेतर जगातील दिडशे पेक्षा जास्त राष्ट्रांचे नेते बनले,त्यामुळे ते भारतरत्न होणे ही सहज स्वाभाविक बाब होती.नेहरूंनी स्वातंत्र्यलढ्यात नऊ वर्षापेक्षा जास्त कालावधी कारागृहात व्यतित केला आहे,अशी व्यक्ती राष्ट्रपतींना, मला भारतरत्न प्रदान करा,अशी मागणी करेल काय? याचा विचार जाणकार
अर्णब गोस्वामीच्या लिक झालेल्या चॅटमधील काही ठळक मुद्दे :
- पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सुमारे ५० जवान शहीद झाले. त्या हल्ल्याचा विकृत अर्णब गोस्वामीला आनंद झाला. कारण त्यामुळे 'मोदी सरकार' बहुमताने निवडून येणार होते.
▪️पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल 'एअर स्ट्राईक' होणार हे अर्नबला आधीच माहिती होते. हा तोच एअर स्ट्राईक ज्यात फक्त एक कावळा मेला. दहशतवादी यात मेल्याचे आजवर कुठलाही ठोस पुरावे नाहीत.
-भाजपसाठी जीवाचे रान करुन ट्विटरवर मोदी सरकारची चमची असलेली 'कंगणा रनौत' चवचाल आहे. ह्रितिक रोशन सोबत ती रिलेशन मध्ये होती. कंगणा मानसिकदृष्ट्या 'मनोरुग्ण / मनोविकृत' (Schizophrenic) आहे.