हा थ्रेड काहीजणांनी इंग्रजीत वाचला असेल. पण खास आपल्या मराठी वाचकांसाठी मुद्दाम हा थ्रेड तुम्हाला समजेल अशा भाषेत मांडतो आहोत.
बाजारात एखादी अवाढव्य कंपनी असते. तिला आपला पसारा आणखी वाढवायचा असतो. त्यासाठी ती कंपनी छोट्याछोट्या कंपन्या टेकओव्हर करत जाते. #म#मराठी#एचयूएल
आपला व्यवसाय वाढवण्याची ही मार्केटमधील जुनी स्ट्रॅटेजी आहे.
नव्वदच्या दशकात हिंदुस्थान लिव्हरने (आताची एचयूएल) हीच स्ट्रॅटेजी वापरून टाटा ऑइल मिल्स कंपनी टेकओव्हर केली. #मारिको#एचयूएल
त्यामुळे टाटाचं हेअर ऑइल टाटा निहार आता हिंदुस्थान लिव्हरकडे आलं. या निमित्ताने हेअर ऑइल मार्केटमध्ये त्यांचा प्रवेश झाला.
त्यावेळी निहार ऑइलचा मार्केट शेअर होता जेमतेम ७% आणि हेअर ऑइल मार्केटचे दादा होते, पॅराशूट ऑइल. त्यांचा मार्केट शेअर होता ४८%. #निहार
हिंदुस्थान लिव्हर आता थेट मारिकोच्या पॅराशूटशी टक्कर घेणार होते. त्यांनी अतिशय आक्रमक धोरण राबवत रिटेलर्सला तब्बल ३५% डिस्काऊंट देण्यास सुरुवात केली. मारिको हाच डिस्काऊंट १०% वगैरे देत होते. लिव्हरने आपला जाहिरातींचा खर्च मारिकोच्या दुप्पट केला. #मारिको#एचयूएल
काहीही करून मारिकोला जेरीस आणायचेच असा चंग लिव्हरच्या केकी दाढीशेठ यांनी बांधला होता.
लिव्हरचा मारिकोवरील हा हल्ला इतका जोरदार होता की मार्केटमधील अनेकांनी
मारिकोचे हर्ष मारिवाला यांना आपली कंपनी लिव्हरला विकण्याचा सल्ला दिला. #म#मराठी
असे करणे कंपनीसाठी लॉंग टर्ममध्ये शहाणपणाचे ठरेल असे अनेकांनी सांगितले.
हर्षसुद्धा कच्च्या गुरुचे चेले नव्हते. ते शांत राहिले. दरम्यान बाजारात या बातमीमुळे मारिकोच्या शेअरवर परिणाम झाला. शेअर पडू लागला. लिव्हरने मारिको विकत घेतली तरच शेअर पुन्हा वाढू शकेल अशा अफवा उठू लागल्या.
एक दिवस अचानक हर्ष यांच्या घरच्या नंबरवर फोन आला.
"मी केकी दाढीशेठ बोलतोय." पलीकडून आवाज आला.
"माझ्या घरचा नंबर तुम्हाला कुठून मिळाला?" हर्ष यांनी विचारले. अर्थात दाढीशेठ त्या प्रश्नाला उत्तर देणार नव्हते.
थेट मुद्द्यावर येत दाढीशेठ म्हणाले,
"तुमची कंपनी विकलीत तर तुम्हीच काय, तुमच्या पुढच्या दोन तीन पिढ्यांचे कल्याण होईल एवढा पैसा मिळेल. आमचा कोकोनट ऑइलचा बिझनेस आहेच. त्यासोबत आमचे डिस्ट्रिब्युशन नेटवर्क प्रचंड स्ट्रॉंग आहे. पुन्हा एकदा विचार करा."
हर्ष यांनी अर्थातच नकार दिला.
केकी दाढीशेठसारखा मोठा माणूस नकार पचवेल कसा? त्यांनी हर्ष यांना धमकीच्या सुरात सांगितले,
"कंपनी विकली नाहीत तर जे आहे ते सगळे गमावून बसाल. मारिको हा इतिहास होईल. आणि हे सगळे घडताना बघायला तुम्ही जिवंत असाल हे त्याहून वाईट."
हर्ष यांना रात्रभर झोप लागली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी ते जागे झाले ते मनात निर्धार करूनच. आता काहीही झाले तरी झुकायचे नाही. एक लक्षात घ्या, हे युद्ध सुरू होताना मारिकोच्या एकूण रेव्हेन्यूपैकी ६१% रेव्हेन्यू फक्त पॅराशूटकडून येत होता.
असे असतानाही हा धोका पत्करायचा असं हर्ष यांनी ठरवलं.
याला कारणेसुद्धा तशीच होती.
१. मारिकोच हेअर ऑइल मार्केटबाबतचं ज्ञान
२. अतिशय स्ट्रॉंग डिस्ट्रिब्युशन आणि मार्केटिंग सेट अप
३. हेअर ऑइल निर्मितीच्या व्हॅल्यू चेनमध्ये इतक्या वर्षात राबवलेलेले कॉस्ट ऑप्टिमायझेशन
४. लिव्हरच्या तुलनेत छोटी कंपनी असल्याने एखादी स्ट्रॅटेजी वेगाने राबविण्याची मारिकोची क्षमता
या दरम्यान मारिकोने पॅराशूटचे पॅकिंग रिडिझाईन केले. नव्याने टीव्हीला जाहिराती दाखविण्यास सुरुवात झाली. हिंदू धर्मात नारळाचे आणि नारळाच्या तेलाचे महत्व अधोरेखित करणारी अशी ती जाहिरात होती
साहजिकच तिने लोकांच्या मनाचा ताबा घेतला. त्याला मिळालेल्या तुफान प्रतिसादाने पॅराशूटने व्हॉल्युममध्ये डबल डीजीट ग्रोथ नोंदवली. त्यांचा मार्केट शेअर वाढून ५२% वर गेला.
मारिकोने ग्रामीण भागात आपले डिस्ट्रिब्युशन आणखी भक्कम करण्यासाठी २५० सुपर डिस्ट्रिब्युटर नेमले.
एवढं केलं तरी कंपनीची सेल्स टीम असते जी खऱ्या अर्थाने फिल्डवर असते. ही टीम वरच्या लेव्हलपर्यंत मार्केटचा फीडबॅक पुरवत असते. मारिकोने थेट एक वॉर रूम उभारली. मार्केटमध्ये काय सुरू आहे? लिव्हर काय काय नवीन स्ट्रॅटेजी वापरते आहे? #पॅराशूट#निहार#मारिको#एचयूएल
हे सगळे मारीको मॅनेजमेंटपर्यंत पोहोचविण्यासाठी खास वेगळ्या टेलिफोन लाईन्स सेट अप केल्या गेल्या.
या युद्धाचे रणशिंग फुंकले जात असतानाच उदय कोटक यांनी हर्ष यांना आणखी एक मोलाचा सल्ला दिला. तो म्हणजे निरमाचे करसनभाई पटेल यांना भेटण्याचा.
करसनभाईंना सुद्धा हिंदुस्थान लिव्हरने असाच धक्का दिला होता. त्यांच्या निरमा डिटर्जंटला स्पर्धा म्हणून सर्फ बाजारात आणला होता. त्यांच्या निरमा डिटर्जंटला स्पर्धा म्हणून सर्फ बाजारात आणला होता. मात्र करसनभाईंनी लिव्हरला थेट शिंगावर घेत हा हल्ला यशस्वीपणे परतवून लावला होता.
आता हर्ष यांना त्यांनी हाच सल्ला दिला. आता माघार नाहीच!
हिंदुस्थान लिव्हरने मारिकोवर तब्बल सहा वर्षे हल्ला सुरू ठेवला. मारिको मात्र बधली नाही. अखेरीस सहा वर्षानंतर लिव्हरने या बिझनेसमध्ये आणखी पैसा लावणे थांबवले. २००२ ते २००६ दरम्यान निहार ऑईलचा मार्केट शेअर १५% वरून ८% वर आला.
एक दिवस असा उजाडला की २००५ मध्ये मारिकोने निहार ब्रँड विकत घेण्यासाठी लिव्हरला २१६ कोटींची ऑफर दिली. हर्ष यांची ही ऑफर इतर स्पर्धकांपेक्षा जास्त तर होतीच, पण ती लिव्हरच्या अपेक्षेहूनसुद्धा जास्त होती. #मारिको#एचयूएल
एक लढाई संपली होती ज्यात मारिकोने हिंदुस्थान लिव्हरसारख्या बलाढ्य कंपनीला जेरीस आणले होते.
थ्रेड आवडला तर रिट्विट करा.
पेंग्विन प्रकाशानाच्या द मेकिंग ऑफ मारिको या पुस्तकात या गोष्टीचा उल्लेख आहे. हा थ्रेड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा या एकमेव हेतूने मराठीत भाषांतर केले आहे
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आयटीसीसारखी बलाढ्य कंपनी आपल्या प्रॉडक्टसच्या पॅकेजिंगवर किती बारीक लक्ष देते याचं एक उदाहरण.
परवा फ्लाईटमध्ये आयटीसीच्या 'बी नॅचरल' ब्रँडचा ज्यूस घेतला. ज्यूस संपवल्यानंतर साहजिकच रिकाम्या बाटलीवरील डिटेल्सवर लक्ष गेलं. तेव्हा आयटीसीच्या पॅकेजिंगमागील कल्पकता लक्षात आली. #ITC
Use the alphabets from the blanks to know that B Natural is made with 100% _ _ _ _ _ N fruit, 0% concentrate.
गोष्ट तशी छोटी आणि साधी. पण आयटीसीच्या पॅकेजिंग विभागाने यातही कल्पकता पणाला लावलेली दिसते. साहजिकच ज्युसची बाटली वापरणारा माणूस ह्या रिकाम्या जागा भरून त्यातून 'इंडिया' हा शब्द तयार करणार. #म#मराठी#ITC
इतकी वर्ष तुम्ही खात असलेली किटकॅट चॉकलेट नसून वेफर आहे.
किटकॅट खाल्ली नाही असा माणूस भारतात शोधूनही तुम्हाला सापडणार नाही. 'हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट' ही त्यांची टॅगलाईन आजही अनेकांच्या ओठांवर असते. बऱ्याच जणांनी आयुष्यभराच्या आणाभाका या किटकॅटच्याच साक्षीने घेतल्या होत्या.
मात्र १९९९ मध्ये याच किटकॅट मुळे एक मोठा वाद निर्माण झाला होता. एवढा की किटकॅट बनवणार नेस्ले कंपनी थेट कोर्टात गेली होती.
त्यांनी किटकॅट हा वेफरचा प्रकार असून त्यावर फक्त चॉकलेटचं कोटिंग आहे असं सांगत किटकॅटला १०% टॅक्स ब्रॅकेटमध्ये बसवलं.
टॅक्सवाले लोकसुद्धा लेचेपेचे नव्हते. त्यांचं म्हणणं होतं, 'किटकॅट हे चॉकलेट आहे ज्याच्या आतमध्ये वेफर आहे.' त्यामुळे त्याला २०% टॅक्स लागला पाहिजे. #म#मराठी
एलआयसीला जेव्हा तोटा होतो...
अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपन्या यांची सध्याची स्थिती सगळ्यांनाच माहीत आहे. त्याबद्दल काही न बोललेलं बरं. मात्र त्यांची एक कंपनी अशी आहे की जी बुडाल्याने स्वतः अनिल अंबानी यांच्यापेक्षा दुसऱ्या एका कंपनीचा जास्त मोठा तोटा होणार आहे. #म#मराठी#एलआयसी
ती कंपनी म्हणजे रिलायन्स कॅपिटल आणि यामध्ये तोटा होणार आहे तो म्हणजे भारतातील सर्वात मोठी इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर कंपनी एलआयसीचा. कसा?
एलआयसीचा रिलायन्स कॅपिटलमध्ये २.९८% स्टेक आहे. या आकडेवारीनुसार ते रिलायन्स कॅपिटलमधील सगळ्यात मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर ठरतात. #म
स्वतः अनिल अंबानी यांच्याकडे कंपनीचा १.५१% स्टेक आहे. रिटेल इन्व्हेस्टर्सकडे कंपनीचे एकूण ५७.५३% शेअर्स आहेत.
रामकृष्ण रेड्डी चिंता यांच्याकडे कंपनीचा २.१६% स्टेक आहे तर ते डायरेक्टर असलेली कंपनी आरकेआर इन्व्हेस्टमेंटकडे १.४३% स्टेक आहे. #म#मराठी#अंबानी#रिलायन्सकॅपिटल#एलआयसी