रशिया-युक्रेन कुस्ती फक्त ५६" किंवा इंधन महागाई एवढ्यापुरती मर्यादित नाही..युक्रेन पट्टीचा गहूनिर्यातदार देश आहे..सूर्यफूल,सोयाबीन इ. तेल ही तो पिकवतो.. सांगायचा मुद्दा आहे..युक्रेन युद्ध धांदलीत अडकल्याने.. आंतरराष्ट्रीय बाजारात त्या जिन्नसांचा तुटवडा आहे..❤️ #farm
आपल्याकडे आत्तापासूनच खाद्यतेल महागाई जाणवत आहे ती त्यामुळेच..खाद्यतेलाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नाही..त्यास पर्याय नाही..पण, गव्हाचे तसे नाही.. सद्यस्थितीत भारत गव्हाचे चार दाणे बाळगून आहे.. शिवाय यंदाचे रब्बी उत्पादन ही येईल..तेंव्हा केंद्राने निर्यातबंदी न करता हा योग साधावा.
शेतकऱ्यांना चार पै ज्यादाचे मिळतील त्याने.. पण, केंद्राची शेतकऱ्यांप्रति असलेली भावना यापूर्वी कांदा आणि साखर निर्यातबंदीत दिसलीच आहे..अन्नसुरक्षा या सदराखाली शेतकऱ्यांचा जीव घेऊनच स्वस्त धान्य दुकानांची शृंखला चालवण्याची परंपरा यंदा तरी खंडित व्हायला हवी.
मोदींचे भक्तगण रशियाने युक्रेनची नांगी ठेचावी म्हणून देव पाण्यात घालून बसले असतीलही..पण त्या ठेचण्याने अप्रत्यक्षपणे भारत भू वर जे संकट येणार आहे..त्याची खबर या गणंग भक्तांना असण्याची सुतराम शक्यता नाही..भारतीय लोकांना परत आणणे एवढाच आपला युध्दाशी सबंध नाही..त्यांना समजायला हवं.
काल बातमी होती..महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गहू लागवडीखालील क्षेत्रात दीड लाख हेक्टरने घट झाली आहे..कांदा लागवड वाढली आहे.
केंद्र अडाणी असेल..पण, राज्यांनी तरी आपलं पाऊसमान, खाणारी तोंडे आणि जग युद्धाच्या खाईत लोटलं तर बुट्टीत भाकरी असेल का? याचा विचार करायला हवा.
काल म्हनलं तसं.. शेती आणि औद्योगिक क्षेत्रात लागणाऱ्या रसायन आणि खतांची वाट या युद्ध प्रसंगाने अगोदरच काळवंडली आहे.. या काळवंडन्याची खरी झळ आपल्याला नेमकी बसायला अजूनेक एकदोन महिने लागतील..
आपला कोविडी वकुब पाहता..आपण निवांत टाळ्या थाळ्या बडवत बसू..पण ते युद्ध दाराशी येईस्तोवरच.
विषय चेष्टेचा नाही..खाद्यान्न, खते आणि व्यापारी मार्गांची नाकेबंदी पाहता..अगोदर हे युद्ध टाळता यायला हवं आणि आपला व्यापारउदीम सरळ पार पडावा यासाठी विश्वगुरूंनी हातपाय हलवायला हवेत..अन्यथा आपली या संकटाला भिडण्याची तयारी पहाता आपण गारद होणारच नाही असं म्हणणं धारिष्ट्य ठरेल..!❤️
सांज रातीला पडक्या वाड्याच्या पल्याड भिंतीला निवाळसंग तलावाची छबी नाकासमोर ठेवत ती बसलेली असायची..तलावावरचा धुंद वाऱ्याचा झोत..अदबशीर होऊन तिच्या मोकळ्या केसांना बटेसहित कुरवाळायचा.. त्याला यायला नेहमीचा उशीर असायचा यावर तिची लालबुंद नाकाची धार शीतल वातावरणात चमकून उठायची. #म
आज त्याने त्या लेकुरवाळ्या आठवणींसहित तिथल्या दगडी सोपानावर चार गरका घेतल्या...प्रत्येक गरकेसरशी आठवणी आपला विळखा अजूनच तंग करत्या झाल्या.. त्यातून सैलावण्यासाठी त्याला अजून चार गरका घ्याव्या लागल्या.
पुढं होऊन तलावात पाय सोडून बसताना चपळ चंचल मासे धावताना दिसले..
आयुष्यातले क्षण असेच चपळ असतात..आत्ता हा क्षण माझ्या कवेत आहे म्हणेपर्यंत तो निघून गेलेला असतो.. त्या एवढ्याशा क्षणाला..क्षणाच्या आत..त्या आपुलकीच्या घटकेसहित काळजात साठवून ठेवावं लागतं..परत परत तो क्षण काळजाच्या तळात जाऊन अनुभवण्यासाठी.
डाव्याअंगाला वयोवृद्ध वड पानगळ सोसत उभाय..
१६च्या नोव्हेंबरात नोटबंदी झाली तेंव्हा काळजात एक जखम घर करून होती..नोटबंदीने त्या जखमेवरची खपली काढली..ती जखम म्हणजे त्याच ऑगस्टमध्ये वि.ग. कानिटकर या ऐतिहासिक लेखकाचं निवर्तनं.
जागतिक इतिहास त्याचं आकलन आत्ता गुगल दुनियेत क्षुल्लक..पण कानिटकर जगले तो काळ अखंड सर्व्हर डाऊनचा. #म
यंदा वाचलेलं पुस्तक 'नाझी-भस्मासुराचा उदयास्त' वि. ग. कानिटकर या कसलेल्या लेखकाचं हे पुस्तक.
हिटलर आणि त्याची नाझी संघटना दोघेही कोणत्या परिस्थितीत बळ धरते झाले.. एखादा अख्खा देशच्या देश कशा पद्धतीने सामूहिक भावनेच्या अंकित जातो..ती भावना कशा पद्धतीने नर्चर केली जाते.
हे सगळं टिपून घेण्यात लेखक निर्विवाद यशस्वी झाला आहे.
जसं दुसऱ्या महायुद्धाची बीजं पहिल्याच्या अंतात होती तसं जर्मन जनतेच्या सामूहिक अपमानित भावनेची मूळही पहिल्या महायुद्धाच्या शेवटात होती. हिटलर सारखा हे युद्ध रणांगणाच्या थेट मैदानातून अनुभवलेला माणूस सुडाने पेटने साहजिकच.
तांदळाच्या तुलनेत मक्का पिकास पाचपट कमी पाणी लागतं.. तांदळाच्या तुलनेत इतर पिकास लागणारी इनपुट कॉस्टही कमी आहे.. तरीही शेतकरी तांदळाचं उत्पादन घेतात..₹ तीनेक लाख खर्चून बोअरवेलची सोय करतात.. हे सगळं का आणि कशासाठी? तर MSP बाबत भातास आणि गव्हास असलेली कडेकोट व्यवस्था. #म#थ्रेड
अन्न सुरक्षा योजनेस अखंड पुरवठा व्हावा यासाठी फक्त गहू आणि तांदळास MSP द्यायची..त्याद्वारेच त्या दोन पिकांची सरकारी खरेदी उरकायची..आणि बाकीची पिके वाऱ्यावर उफनायची..त्याकडे पहायची सरकारची इच्छा नाही आणि जनतेला स्वतःच्या जीवाचा प्रश्न निर्माण होत नाही तोवर बघण्याचं काही कारण नाही.
देशातील शेती आणि शेतकरी यांचा इतिहास पहाता पंजाब राज्य हरितक्रांतीनंतर उत्पादनासाठी वाढीस लागले..तिथं गहू आणि तांदूळ उत्पादनासाठी जी काही निसर्गाशी प्रतारणा झाली..त्यामुळे तिथल्या शेतीचाच नाही तर माणसांच्याही जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.. कॅन्सर ट्रेन हे त्याचं उत्तम उदाहरण.
कोणाची लेक कोणाच्या घरात दिली.. कोणाचं पोरगं कुठं आहे.. त्यांचं संसारी जीवन नीट चालल का? सगळा हिशोबी ऐवज या जुन्या माणसांच्या तोंडपाठ असायचा..
एकदा दोनदा तुरळक ओळख झाल्यावरसुद्धा नंतरच्या भेटीत न विसरता 'तू आमक्याचा ल्योक न्हवं का?' अशी अदबीने विचारपूस करणारी माणसं ती.
मागे कुठंतरी एक फोटो पाहिला.. म्हाताऱ्या आयांचा घोळका बसलेला..त्याला कॅप्शन होती.. 'गावाकडचा CCTV'. फार सखोल कॅप्शन होती ती..
कोण कुठं गेला? सोबत कोण होतं? परत कधी आला? हातात काय होतं? सगळी सगळी इत्यंभूत माहिती इथं मिळणार म्हणजे मिळणार..
हा माहितीचा साठा आता लोप पावत चाललाय..
जसं टॅक्सी येणं हे टांगेवाल्यांच्या मुळावर आलं.. तसं सांप्रतकाळी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणं हे आयुर्वेदाच्या नावाने रस्त्याकडेला तंबूतुन पुड्या विकणाऱ्यांच्या मुळावर आलं.
काही भंपक स्वतःस आयुर्वेदाचार्य, योगाचार्य म्हणवून घेतात..त्यांच्यापासूनच आयुर्वेदास खरा धोका आहे. #थ्रेड#म
आयुर्वेद हा विषय भारतीयांसाठी अगदीच जीवाचा विषय..जिथं जिथं इतिहासाच्या जीवावर मर्दुमकी गाजवावी तिथं तिथं भारतीय मागे हटत नाहीत..हा इतिहास आहे.. गेल्या साताठ वर्षात तर अशा आयुर्वेदाचार्य बाबा-बुवांचे मोठेच पेव अखंड भारतवर्षात फुटले.. हरेक भगवादारी व्यक्ती राजमान्य वैदू होऊन गेला.
नैसर्गिक जीवनपद्धतीने जीवनप्रवास करणे हे मूळ आयुर्वेदाचे तत्व.. आरोग्य हे त्याच नैसर्गिक संसाधनांचा वापर करून उत्तम राखणे हा सांगावा आयुर्वेदाचाच..तो योग्य आणि मान्यच.. पण म्हणून त्या आयुर्वेदिक पद्धतीत इतिहासात कधीही वैज्ञानिक दृष्टिकोनास तिलांजली दिल्याचे ऐकिवात नाही..