२३ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेले अखेरचे भारतीय ठाणे पुन्हा काबीज केले आणि कारगिल युद्धात विजय मिळवला. त्यामुळेच २६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
सुमारे १६ ते १८ हजार फुटांवर साधारण ६० दिवस हे युद्ध चालले. भारताने या युद्धाला #ऑपरेशनविजय असे सांकेतिक नाव दिले होते. तर पाकिस्तानने यालाच #ऑपरेशनबद्र असे संबोधले.
काश्मीरला लडाखशी जोडणाऱ्या या एकमेव रस्त्यावर ताबा मिळविण्याचा पाकिस्तानचा उद्देश होता. तसे करण्यात पाकला यश मिळाले असले तर ती सामरिकदृष्ट्या मोठी आघाडी ठरली असती.
त्यासाठीच पाक लष्कराचे तत्कालिन प्रमुख जनरल #मुशर्रफ यांनी सुमारे ५० हजार सैनिक घुसखोरांच्या वेषात भारतीय हद्दीत धाडले.
हिवाळ्यात #कारगिल परिसर राहण्यासाठी अत्यंत प्रतिकूल होत असल्याने दोन्ही देशांचे सैनिक हिवाळ्यात खाली सुरक्षित जागी परतत. व उन्हाळ्यात पुन्हा आपल्या जागी येत. असा करार नसला तरी दोन्ही लष्करांनी ही बाब मान्य केली होती. मात्र, पाकिस्तानने त्याचा भंग केला.
कारगिलमधल्या पर्वतरांगातील मेंढपाळांना पाकिस्तानच्या घुसखोरीची सर्वप्रथम कल्पना आली. या मेंढपाळांनी लष्कराला माहिती दिली. त्यानंतर सूत्रे हलली.
सुरुवातीला पाकिस्तानने आपला याच्याशी काहीच संबंध नसल्याचा दावा केला. मात्र, हे घुसखोर नसून पाकिस्तानी सैनिकच आहेत, हे भारताने सिद्ध केले. आणि कारगिल युद्धाला तोंड फुटले.
युद्ध सुरू झाल्याची औपचारिक घोषणा झाली नाही. मात्र, मे महिन्याच्या सुरुवातीलाच हे युद्ध सुरू झाले.पाकिस्तानी सैनिक उंच शिखरांवर असल्याने त्यांना खालच्या बाजूस मारा करणे सहज शक्य होते.
तर खालच्या बाजूला असलेल्या भारतीय सैन्याला डोंगराळ भागात उंच शिळांमागे दडलेल्या पाकिस्तानी सैनिकांना टिपणे अत्यंत आव्हानात्मक होते.
उंचावर असलेले पाकिस्तानी सैनिक वरून भारतीय सैन्याची हालचाल सहज टिपू शकत होते. म्हणूनच भारतीय सैन्याने रात्री चढाई करण्याचा निर्णय घेतला.
खरेदी घोटाळ्याच्या आरोपांवरून गाजलेल्या #बोफोर्स तोफांनी कारगिल युद्धात मात्र, चांगलाच डंका वाजवला. याच तोफांमधून झालेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताचा विजय सोपा झाला.
लष्करी कारवाई पाच मे रोजीच सुरू झाली होती. मात्र, या युद्धाची व्याप्ती अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर २६ मे १९९९ रोजी केंद्र सरकारने हवाई दलाचा वापर करण्यास परवानगी दिली. त्याचवेळी सीमारेषा पार न करण्याचे बंधनही टाकण्यात आले.
हवाई दलाने या कामगिरीला #ऑपरेशनसफेदसागर असे नाव दिले. हवाई दलाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यास २१ दिवसांचा कालावधी लागला.
हा वापर आधीच केला गेला असता, तर हे युद्ध लवकर संपुष्टात आले असते, असा दावाही केला जातो.
त्यावेळी हवाई दलाकडे मर्यादित संसाधनेच होती. पाहणीसाठी (रेकी) पाठवलेल्या पहिल्या विमानावर पाकिस्तानने हल्ला केला. तरीही हे विमान सुखरूप परतले. या उड्डाणातून पाकिस्तानने केलेल्या घुसखोरीबद्दल, त्यांच्या हेलिपॅड्सबद्दल, तयारीबद्दल पुरेशी माहिती मिळाली.
दरम्यान #मिग२७ विमान नादुरुस्त होऊन त्यात आग लागली. फ्लाइट लेफ्टनंट के. नचिकेता यांनी इजेक्शन सीटच्या आधारे उडी घेतली, ते पाकिस्तानचे #युद्धकैदी बनले.
त्यांना टॉर्चर करून त्यांच्याकडून माहिती मिळविण्याचे हरप्रकारे प्रयत्न केले गेले. अखेर आठ दिवसानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
#हवाईदल सक्रिय झाल्यानंतर #मिग२३, #मिग२७ या विमानांचा तसेच #एमआय१७ या हेलिकॉप्टर्सचा वापर केला गेला. जूनच्या पहिल्या आठवड्यात #मिराज२००० ही लढाऊ विमानेही लढाईत उतरली.
#मिराज२००० मधून लेझर गाईडेड बॉंब डागता यावेत, यासाठी या विमानांचा तळ असलेल्या ग्वाल्हेर येथील टीमने केलेला तांत्रिक करामत (जुगाड) निर्णायक ठरली. हे बॉंब डागण्यासाठी वैमानिकांना विक्रमी वेळेत प्रशिक्षित केले गेले.
या काळात हवाई दलाच्या विमानांनी सुमारे साडेसहा हजार उड्डाणे केल्याचे सांगितले जाते. याच काळात हवाई दलाच्या दळणवळण विभागानेही सुमारे साडेसहा हजार टन शस्त्रसामुग्री व अन्य वस्तूंची ने-आण करत मोठा वाटा उचलला.
नौदलानेही या काळात पाकिस्तानी नौदलाची चांगलीच नाकाबंदी केली. ऑपरेशन तलवार अंतर्गत भारतीय नौदलाने कारगिल युद्ध सुरू असताना पाकिस्तानला समुद्रमार्गे कोणतीही रसद मिळणार नाही, याची दक्षता घेतली.
पश्चिम व पूर्व नौदल मुख्यालयाने अरबी समुद्रावर वर्चस्व राखल्याने पाकिस्तानी नौदलावर मोठी दहशत निर्माण झाली.
पाकिस्तानी सैन्यानी केलेली घुसखोरी मोडीत काढत आपल्या अतुलनीय शौर्य, पराक्रमाच्या बळावर भारताने २६ जुलै रोजी आपला सर्व भूभाग परत मिळवला. २६ जुलै रोजी कारगिल फत्ते झाल्याची घोषणा केली गेली.
मर्यादित भूभागातच लढले गेल्याने या युद्धाला मर्यादित युद्ध असेही म्हणतात. यातून भारतीय लष्कराला अतिउंचावरील युद्धाचा मोठा अनुभव मिळाला. मात्र, पाकिस्तानने मोठ्या प्रमाणावर केलेली घुसखोरी लक्षात न आल्याने #गुप्तचर यंत्रणेच्या मर्यादाही समोर आल्या.
या युद्धातील अतुलनीय शौर्यासाठी १८ ग्रेनेडिअर्सचे ग्रेनेडिअर योगेंद्र सिंह यादव, गोरखा रायफल्सचे लेफ्टनंट मनोजकुमार पांड्ये (मरणोत्तर), १३ जॅक रायफल्सचे कॅप्टन विक्रम बात्रा (मरणोत्तर), याच युनिटचे रायफलमन संजय कुमार यांना #परमवीरचक्र ने गौरविण्यात आले
सुमारे दोन महिने चाललेल्या या #कारगिल युद्धात भारताचे ५२७ सैनिक-अधिकारी #हुतात्मा झाले. तर सुमारे १३६० हून अधिक जायबंदी झाले
भारतमातेच्या या सुपुत्रांचे स्मरण करण्यासाठी #कारगिल येथे #युद्धस्मारक उभारण्यात आले आहे. #तोलोलिंग च्या पायथ्याशी असलेल्या या स्मारकाला भेट देऊन या वीरांना अभिवादन करायलाच हवे. #जयहिंद. #जयहिंदकीसेना.
#कारगिल युद्ध...५२ दिवस...भारतमातेचे ५२७ सुपुत्र हुतात्मा..आज त्यांच्या आणि त्यांच्यासारख्या इतरांच्या बलिदानामुळेच आपले स्वातंत्र्य अबाधित आहे. या वीरपुत्रांना शतश: नमन. #जयहिंद#जयहिंदकीसेना@adgpi@indiannavy@IAF_MCC
२१ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेले अखेरचे भारतीय ठाणे पुन्हा काबीज केले आणि #कारगिल युद्धात विजय मिळवला. त्यामुळेच २६ जुलै हा कारगिल #विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
सुमारे १६ ते १८ हजार फुटांवर साधारण ६० दिवस हे युद्ध चालले. भारताने या युद्धाला #ऑपरेशनविजय असे सांकेतिक नाव दिले होते. तर पाकिस्तानने यालाच #ऑपरेशनबद्र असे संबोधले.
गतवर्षीच्या तुलनेत निकालात १८.२० टक्के वाढ, परीक्षेसाठी राज्यभरातून १५ लाख ८४ हजार २६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,७५,१०३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी १५,०१,१०५ विद्यार्थी उत्तीर्ण
विभागीय निकालात #कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.७७ टक्के लागला. पुण्यासह #नगर व #सोलापूर जिल्ह्याचा समावेश असलेल्या #पुणे विभागाचा निकाल ९७.३४ टक्के.