काही महिने पुण्यात राहण्याचा योग आला. खरंच पदरी थोडंतरी 'पुण्य' असल्याशिवाय 'पुण्यनगरीत' प्रवेश मिळत नाही. हे वाक्य म्हणजे पुणेकरांबद्दल पुढं जे काही बोलणार आहे त्याआधी त्यांना खुश करण्याचा 'असफल' प्रयत्न आहे.
असफल एवढ्यासाठीच की पुणेकरांना तुमच्या स्तुती किंवा टीकेनं फरक पडत नाही. म्हणजे शुद्ध मराठीत चाटु लोकांना पुणेकर भाव देत नाहीत. उर्वरीत महाराष्ट्रातल्या लोकांनी पुणेकरांवर कितीही विनोद करावेत पण पुणेकरांना राग येत नाही. कारण ते बाजारातून जाणाऱ्या त्या निर्विकार हत्तीप्रमाणे आहेत
ज्याला भुंकणाऱ्या कुत्र्यांकडं लक्ष देण्यात रस नाही. याचा अर्थ त्यांना अजिबात राग येत नाही असं नाही. कारण एकदा एका पुणेकरानं 'तुम्ही सांगली, सातारा, कोल्हापूरचे लोक! तुम्हाला जर एवढाच प्रॉब्लेम आहे पुण्याचा तर इथं नोकरीसाठी का येता?' असा चारचौघात माझा उद्धार केला होता.
मग मला सुद्धा पुण्याची हवा लागली असल्यानं 'सहकार नगर मध्ये राहणारा तू! तू कसला पुणेकर?' असा मी सुद्धा पलटवार केला. त्याचं काय आहे की 'माज हा पुण्याच्या हवेतच आहे'. फक्त एक श्वास घ्या पुणेरी attitute काय असतो ते समजेल. असो पण पेठेत न राहणारे, तसेच 'ण' आणि 'न' मध्ये गल्लत करणारे
लोक म्हणजे पुणेकर नव्हेच.
माझ्या मते खरे पुणेकर हे फक्त निर्विकारच नाहीत तर ते कर्मयोगी सुद्धा आहेत. हो जसं एखादा मुंबईकर रोज निष्काम कर्मयोग्यासारखा लोकल पकडतो अगदी तसंच पुणेकर दुपारी १ ते ४ दुकानाची दारं न चुकता बंद करतात. एवढी consistency तर चंद्र-सुर्यांपाशी सुद्धा नाही.
पुणेकरांच्या या कृतीचे संदर्भ अगदी थेट शिवकालीन इतिहासात सापडतात.त्या हिरकणी बुरुजाच्या गोष्टीतल्या हिरकणीनं एका द्वारपाळाला रायगडाचे दरवाजे उघडायला सांगितल्यावर त्यानं तिला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की गडाचे दरवाजे एकदा बंद झाले की प्रत्यक्ष महाराजांनी सांगितलं तरी उघडणं शक्य
नाही. तो बहुतेक पुण्याचाच असावा.
गेली १५ वर्षं मी दुचाकी चालवतोय, पण पुण्यात पहिल्या दिवशी जेव्हा गाडी ठोकली तेव्हा समजलं की १५ वर्षं आपण वाया घालवली. खरंच जर तुम्ही पुण्यात आणि कोकणात गाडी चालवू शकला तर तुम्ही दुचाकीनं अगदी मंगळवारीला सुद्धा जाऊ शकता.
अहो माझा अमेरिकेत राहणारा एक मराठी मित्र तर बोलला होता की जर आपल्या Driving Licence चा नंबर MH12 नं सुरू होत असेल तर अमेरिकेत पोलीस अडवत नाहीत म्हणे. वेगळा International Driving Licence काढत बसायची गरज नाही.
पुण्यात दुचाकी चालवताना आपण पेशवेकालीन वातावरणात असल्यासारखं वाटतं ते पुणे हे ऐतिहासिक शहर आहे म्हणून नव्हे तर इथल्या रस्त्यातल्या खड्ड्यांमुळं तुम्ही दुचाकीची नाही तर घोड्याची सवारी करत आहात असं वाटतं म्हणून.
असो मी आपला पुण्याच्या बालवाडीत कूर्मगतीनं गाडी चालवायचे धडे गिरवत होतो आणि पुण्यात असल्यामुळं आपोआपच काहीतरी चिंतन व्हायचं.
मघाशी मी शिवकालीन इतिहासातील पुणेकरांचा संदर्भ दिला. अगदी त्रेतायुगाचा विचार केल्यास आपल्याला समजेल की हनुमान हा पुण्याचाच होता. कारण...
'मनासी टाकिलें मागे गतीसी तुळणा नसे।
अणुपासोनी ब्राह्मण्डा एवढा होत जातं असे।'
असं समर्थांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि पुण्याच्या भरगच्च ट्राफिक मध्ये गाडी चालवणाऱ्यांच्या गतीची तुळणा आम्ही पामरांनी काय करावी ? आमच्या 'मनासी टाकिलें मागेच'!आणि 'ब्रह्माण्ड रुपापासून अणुएवढं'
होऊन काही मायक्रो सेंटीमीटर मधून bike काढणे हे पुणेकरांनाच जमतं हो.
म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात 'येथे पाहिजे जातीचे। येरा गबाळाचे काय काम।'
ते जातिवंत लोक म्हणजे पुणेकरच हे एक येरा गबाळा तुम्हाला सांगतोय.
असो तेव्हा सांगायचा मुद्दा हा की सूक्ष्म रूप धारण करून सांद्री (किंवा खोपचा) मधून पसार होणे हे केवळ पुणेकरच करू शकतात. आणि म्हणूनच मारुती हा पुण्याचाच आहे. राम नाम घेऊन असलं काही होत नसतं.
'उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू' या गाण्यातील इंच इंच लढवू या शब्दांचा अर्थ पुणेकरांशिवाय दुसऱ्या कुणालाही समजत नाही अजून. कारण गाडी चालवताना आजूबाजूला एक इंचभर सुद्धा जागा सोडणे हे पुणेरी बाण्यात नाहीच मुळी! पुण्यात असा एखादा फूटभर जागा सोडलेला गाडीस्वार दिसलाच एखादा तर
तो पुण्याचा नाहीच आहे. अश्या लोकांना पुण्यात 'इंचभर' पण किंमत नाही. तेव्हा पुण्यात तुम्हाला किंमत मागून मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला इंच इंच लढावं लागेल.
काही दिवसांपूर्वी मी "मांड्या आणि गल्ल्या दाखवत फिरणाऱ्या" असा उल्लेख "अतिप्रगत" हिंदू महिलांबद्दल केला. त्यावर मला "तू ठरवणार काय, मुलींनी कुठले कपडे घालायचे?" असा प्रश्न "प्रगत" हिंदुत्ववादी लोकांनी केला. त्यांना स्कर्ट किंवा फ्रॉक मध्ये भारतमाता चालेल काय?
एम. एफ. हुसेन च चित्र सुद्धा अश्याना मान्य आहे काय? भारतमाता म्हणजे आपल्या देशातलं स्त्री तत्व आहे. त्याची अब्रू वेशीला टांगल्यासारखं प्रदर्शन तुम्हाला मान्य नसेल तर भारतीय स्त्रिया दोन पोरांच्या आया झाल्या तरी लहानपणीचेच कपडे घालून फिरणार असतील तर माझी काहीही हरकत नाही.
मुळात आजचा पाश्चात्य स्त्री पोशाख हा जास्तीत जास्त पुरुषांना आकर्षित करेल असाच बनवला जातो आणि तोच त्यांचा मानस आहे. स्त्रीला वस्तू समजू नका म्हणणारे सुद्धा यालाच बळी पडत आहेत.
अरब लोक याहून मोठ्या डायनिंग टेबल एवढ्या थाळीत बिर्याणी भात पसरून मध्ये उंट किंवा आणखी कुठल्यातरी अभक्ष्य प्रकारच्या तंगड्या ठेऊन धा-बारा जण त्यावर तुटून पडतात म्हणे. नशीब त्या ताटात स्वतः च्या तंगड्या घालत नाहीत.
काय एक एक संस्कृती (?). जपान मध्ये सार्वजनिक ठिकाणी गरम पाण्याच्या हौदात नैसर्गिक कपड्यात धा बारा जण पुरुष बायका जाऊन बसायची पद्धत आहे म्हणे.
असो.
तर अशी पनीर-काजू ची मंदी खाल्ल्यावर मेंदू मध्ये मंदी आलेली आहे.
#विधवा_प्रथा_बंदी
काही ठिकाणी #विधवा_प्रथा बंद करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव केले. ते पाहून #महाराष्ट्र शासनानं परिपत्रक काढलंय. शासकीय परिपत्रकात वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे सांगितलं आहे, पण सध्या "नाव बदलायला कशाला पाहिजे #संभाजीनगर च आहे ते, मी सांगतोय ना!"
असा शासनाचा #वैज्ञानिक#दृष्टिकोन आहे. हे सगळं पाहून मला काही प्रश्न पडले. आपल्या परिचित लोकांमध्ये कुणीही विधवा स्त्रीचा #विधवा म्हणून अपमान केला आहे काय किंवा ऐकिवात आहे काय? माझ्यातरी माहितीत असं प्रकरण अजूनतरी नाही. उलट वयस्कर विधवा स्त्रियांकडं आपला समाज आदरानंच पाहतो.
आता तरुण वयात विधवा होणाऱ्या स्त्रियांबद्दल. मुळात आजकाल लग्न करणाऱ्या किती मुली #मंगळसूत्र घालतात, #कुंकू लावतात, #बांगड्या घालतात? अश्या घटनांमुळं विवाहित स्त्रियांनी कुंकू लावावे की नको हा वैचारिक #गोंधळ जन्माला घातला आहे. म्हणजे एकीकडे न घालणे म्हणजे पुरोगामीत्व