गांधी,जिना,सावरकर आणि आंबेडकर अशे चारही बेरिस्टरांवर पुस्तक लिहण्याचे यदुनाथ थत्ते यांनी सुरेश द्वादशीवार यांना सुचवलं होत.यदुनाथ थत्ते गेल्यानंतरही त्या सूचनेला न विसरता द्वादशीवार यांनी पूर्ण केलं. #MahatmaGandhi#म (१)
गांधी आणि त्यांचे टीकाकार मध्ये ते लिहितात .
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी भारताला स्वातंत्र्य देण्याचं आश्वासन देत असाल तरच युद्धाला सहाय्य करू अशी ताकीद इंग्रज सरकारला काँग्रेस ने दिली.त्यावेळी सावरकरांनी हिंदूंचे सैनिकीकरण करण्याची घोषणा करून भारतीय तरुणांना इंग्रज फौजेत भरती (२)
होण्याचे आवाहन केले धर्माच्या नावावर गांधींनी धर्माच्या नावावर होऊ घातलेल्या फाळणीवर विरोध करणारी भूमिका घेतली तेव्हा १९२५ पर्यंत हिंदू आणि मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्र आहेत ही सर सय्यद अहमद यांच्या पातळीवर जाऊन भूमिका घेणारे सावरकर हे हिंदूंचे राष्ट्र आहे असं म्हणत गांधींवर (३)
मात करण्याचा प्रयत्न करू लागले.जेव्हा प्रत्यक्ष फाळणी झाली तेव्हा त्यांनी आणि त्यांना मानणाऱ्या महाराष्ट्रातील त्यांच्या अनुयायांनी फाळणी च्या पापाच खापर गांधींच्या माथ्यावर फोडलं आणि तसा प्रचार केला परंतु त्यांनी किंवा त्यांच्या नेतृत्वाखालील हिंदूमहासभेने फाळणी विरुद्ध कुठे (४)
आंदोलन केले असे निदर्शनास आले नाही. तात्पर्य काय तर हिंदू महासभा काँग्रेस सोबत असताना तिच्या पंखाखाली राहिली आणि सावरकर नेतृत्व लाभता ती इंग्रज विरोधी न बनता गांधी विरोधी बनली.(५)
पुढे…
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
|| Thread
संदर्भ : छत्रपती संभाजी: एक चिकित्सा
लेखक : डॉ जयसिंगराव पवार
इथे मराठीतील दोन श्रेष्ठ साहित्यिकांचा ‘संभाजी’ सादर करीत आहोत. पहिला ‘संभाजी’ आहे महान नाटककार राम गणेश गडकरी यांच्या ‘राजसंन्यास’ या नाटकातील व दुसरा ‘संभाजी’ आहे. #मराठी (१)
दुसरे श्रेष्ठ साहित्यिक पु. भा. भावे यांच्या ‘राजमस्तकाचा आदेश’ या लेखातील. या साहित्यिकांची पुढील दोन्ही अवतरणे म्हणजे त्यांच्या साहित्यिक कलाकृतीमधील शेवटच्या क्षणी पश्चात्तापदग्ध झालेल्या संभाजीराजांची जळजळीत ‘मनोगते’ आहेत. तुळापूरच्या मोगली छावणीतील तुरुंगात असलेल्या (२)
संभाजी महाराजांना सोडविण्यासाठी आलेल्या साबाजी नावाच्या एकनिष्ठ सेवकास उद्देशून ते उद्गारतात − ‘‘गोब्राह्मणप्रतिपालक हिंदुपदपादशहा श्रीमंत छत्रपति संभाजीमहाराज! नाही‚ साबाजी‚ ही माझी किताबत नाही! संभाजी हा म्हणजे केवळ रंडीबाज छाकटा! काशीची गंगा आणि रामेश्वरचा सागर एकवटून (३)
हिंदू महासभा आणि सावरकर या दोहोंचाही गांधीजींशी आलेला संबंध आणि त्यांचं स्वरूप स्पष्टपणे समजून घेणेही तितकंच आवश्यक आहे.स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म १९८३ मधला.गांधीजीहुन १४ वर्षांनी लहान होते. #म#रिम#मराठी (१)
पण आपल्या जहाल वक्तव्यांनी आणि कृतीशील कामाने विद्यार्थी दशेत त्यांचं नाव महाराष्ट्रात सर्वत्र झालं.सशस्त्र लढ्याचे पाईक असे "रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले?" असे म्हणणारे सावरकर यांची स्वातंत्र्य लढ्यात उतरण्याचा काळ हा मवाळ चळवळीचा काळ.(२)
बॅरिस्टर बनायला इंग्लंडला गेलेले सावरकर यांनी इंडिया हाऊस एकर्थी आपल्या ताब्यात घेऊन सशस्त्र लढ्याचा अस्त्र शस्त्र खाना बनून टाकला. धिंग्रा ने वायली ची हत्या करताना वापरलेली पिस्तूल सावरकरांच्या याच शस्त्रखान्यातील. हा सशस्त्र उत्साह अगदीच गांधीजींना मान्य नव्हता.(३)
कोकणात रिफाईनरी झाली कि नक्की काय फरक पडेल परिसरात🤔..
हृदयावर दगड ठेऊन, जे चित्र उभारलं ते फार क्लेशदायी होत, अजून अस्वस्थ वाटतंय, पण हीच अस्वस्थता लढ्याला प्रेरणा देईल ,म्हणून इथे शेअर करीत आहे.. #Save_Kokan_Movement#SayNoToRefinery #म
1) परप्रांतीय वाढतील. 2) कोकणी माणूस दुय्यम स्थानावर जाईल. 3) केमिकल झोन कोकणभर पसरेल. 4) विजयदुर्ग खाडी तिचे सौंदर्य, विविधता गमावेल.
५) 16 गावातील बागायती, घरे, मंदिरे, झरे, ओढे, तलाव सर्वच भुईसपाट करून, पाइपांचे कुरूप जंजाळ पसरलेले असेल.++
6) चकचकीत इमारती उभ्या राहतील. परिसरातील दुकाने जैन- मारवाड्यांचीच असतील. शिपाई, माळी, सफाई कर्मचारी आदी वर्ग स्थानिक असेल. 7) एमप्लॉयीज च्या कोलोनीत स्थानिक कुणबी स्त्रिया भांडी, कपडे आदी घरकामाला असतील.++