हिंदू महासभा आणि सावरकर या दोहोंचाही गांधीजींशी आलेला संबंध आणि त्यांचं स्वरूप स्पष्टपणे समजून घेणेही तितकंच आवश्यक आहे.स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म १९८३ मधला.गांधीजीहुन १४ वर्षांनी लहान होते. #म#रिम#मराठी (१)
पण आपल्या जहाल वक्तव्यांनी आणि कृतीशील कामाने विद्यार्थी दशेत त्यांचं नाव महाराष्ट्रात सर्वत्र झालं.सशस्त्र लढ्याचे पाईक असे "रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले?" असे म्हणणारे सावरकर यांची स्वातंत्र्य लढ्यात उतरण्याचा काळ हा मवाळ चळवळीचा काळ.(२)
बॅरिस्टर बनायला इंग्लंडला गेलेले सावरकर यांनी इंडिया हाऊस एकर्थी आपल्या ताब्यात घेऊन सशस्त्र लढ्याचा अस्त्र शस्त्र खाना बनून टाकला. धिंग्रा ने वायली ची हत्या करताना वापरलेली पिस्तूल सावरकरांच्या याच शस्त्रखान्यातील. हा सशस्त्र उत्साह अगदीच गांधीजींना मान्य नव्हता.(३)
हरमन कालेनबाग यांना लिहिलेल्या पत्रात गांधीजी म्हणतात,"या हिंसाचाराला घाबरून इंग्रजांनी उद्या भारत सोडलाच तर त्यावर कोण राज्य करेल? पिस्तुलधारी, खुनी की रक्ताची चटक घेतलेले. खुनी माणसे भारताला काहीही देऊ शकणार नाहीत. मग ते खुनी गोरे असोत किंवा काळे. (४)
शस्त्रावर स्वराज्य मिळेल असा आजवर एकही नेता किंवा माणूस मला निदर्शनास नाही.
एका विजयादशमी च्या सभेत प्रमुख वक्ता म्हणून सावरकर आणि त्याच सभेचे अध्यक्ष म्हणून गांधीजी उपस्थित राहणार होते, ही त्यांची पहिली भेट.वेळेच्या आधी सावरकर त्यांच्या रोजच्या टापटीप पोशाखात (५)
सभा स्थानी दिमाखात येऊन उभे राहिले पण सभेची वेळ जशी जवळ आली तशे सभेचे अध्यक्ष कुठे दिसत नव्हते.सगळ्यांची धावाधाव झाली.
कुठे होते गांधीजी? गांधीजी त्यावेळी सभेच्या नंतर होणाऱ्या भोजनाची तयारी करणाऱ्या आचार्यांसोबत स्वयंपाक घरात भाज्या चिरून देत होते. (६)
दोन बेरिस्टरांच्या वागण्यातले हे अंतर उपस्थित लोकांना अचंबित करणारे होते.याच सभेत दोघांच्या झालेल्या भाषणात दोघेही राम भक्त होते हे समजले, फरक इतकाच की सावरकर बली चा, रावणाचा वध करणारा धनुर्धारी राम तर (७)
गांधी यांनी प्रजाहितदक्ष, लक्ष्मण मार्फत रावणाकडून समजून घेतलेला राज धर्म मानणारा ,वडील आज्ञाधारी राम अशी व्याख्या केली होती.
१३ मार्च १९१० ला लंडन व्हिक्टोरिया स्टेशन वर ब्रिटिश पोलिसांनी सावरकरांना अटक केली आणि चालवलेल्या दोन्ही खटल्यात त्याना जन्मठेपच ठोठावली. (८)
तशी दोन्ही जन्मठेप मिळून १९६० ला सुटका झाली असती पण इंग्रजांनी ६ जाने १९२४ ला अनेक अटी लादून सशर्त सुटका केली. अनेक अर्ज विनंत्या, सुटकेचे अर्ज सोबत राजकारणात भाग न घेण्याच्या अट मान्य करून सावरकर जीवघेण्या अंदमानातून बाहेर आले.त्यापासून १३ वर्ष ते रत्नागिरीत स्थानबद्ध होते. (९)
महाराष्ट्राबाहेर सावरकरांना झालेल्या त्रासाचा मागमूस कोणाला नव्हता आणि अशा दशेत "कोणतीही" संघटना त्यांच्यासाठी उभी नव्हती.
सावरकर अंदमानात बंदीस्त होते त्यावेळी गांधीजी आफ्रिकेत होते.ते १९१५ मध्ये भारतात परतले.काँगेस मध्ये सक्रिय होताच गांधीजींनी सावरकरांची सुटका करण्यासाठी (१०)
काँग्रेस ला भाग पाडले.सावरकरांना अंदमानात दिली जाणारी अमानुष वागणूक आणि नियमितपणे इंग्रज सरकार समोर सावरकरांचे चालू असणारे विनंती अर्ज हे त्यामागील कारण होते.अंदमानात गेल्या गेल्या पहिल्या ६ महिन्यातच सावरकरांनी अर्ज केला होता आणि तो फेटाळण्यात सुद्धा आला होता. (११)
या अर्जात "सरकार विरोधी कार्यवाही न करण्याचे" आश्वासन स्पष्टपणे नमूद आहे.लेखक सुरेश द्वादशीवार म्हणतात की सावरकर अंदमान सुटकेचे गांधीजींचे प्रयत्न महाराष्ट्रातील सावरकर भक्त कुठेही नमूद करत नाहीत. (१२)
१९१७ च्या काँग्रेस मुंबई प्रादेशिक अधिवेशनात गांधींनी सावरकर सुटकेचा ठराव सर्व लोकप्रतिनिधी संमतीने मंजूर केला.त्यानंतर च्या काकीनाडा मधील अधिवेशनात देखील त्यांनी तो ठराव आग्रहपूर्वक संमत करून घेतला होता.(१३)
महाराष्ट्रातील लेखक विचारवंतांनी गांधीजींच्या ह्या प्रयत्नांची दखल घेतली नाही हे इथे लेखक नमूद करतात.
रत्नागिरीत स्थानबद्ध असताना गांधीजी कस्तुरबा सहित सावरकर यांकडे गेले. औपचारिक चर्चा संवाद झाल्यावर गांधींनी सावरकरांना सौ सावरकरांना बाहेर बोलवा अशी विनंती केली. (१४)
सावरकरांनी याच कारण विचारताच गांधी म्हणाले, " देशासाठी अनिवार कष्ट उपसलेल्या देशभक्ताच्या पत्नीच्या वाट्याला कोणत्या यातना येतात हे दाखवायला मी कस्तुरबा ला सोबत आणलय. तिला सौ सावरकरांना भेटायची इच्छा आहे."(१५)
थोडक्यात लेखक द्वादशीवार इथे नमूद करतात की गांधी आणि सावरकर यामध्ये प्रवृत्ती भेद होता.
संदर्भ: गांधी आणि त्यांचे टीकाकार.
लेखक : सुरेश द्वादशीवार #सत्यशोधक (१६)
गांधी,जिना,सावरकर आणि आंबेडकर अशे चारही बेरिस्टरांवर पुस्तक लिहण्याचे यदुनाथ थत्ते यांनी सुरेश द्वादशीवार यांना सुचवलं होत.यदुनाथ थत्ते गेल्यानंतरही त्या सूचनेला न विसरता द्वादशीवार यांनी पूर्ण केलं. #MahatmaGandhi#म (१)
गांधी आणि त्यांचे टीकाकार मध्ये ते लिहितात .
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी भारताला स्वातंत्र्य देण्याचं आश्वासन देत असाल तरच युद्धाला सहाय्य करू अशी ताकीद इंग्रज सरकारला काँग्रेस ने दिली.त्यावेळी सावरकरांनी हिंदूंचे सैनिकीकरण करण्याची घोषणा करून भारतीय तरुणांना इंग्रज फौजेत भरती (२)
होण्याचे आवाहन केले धर्माच्या नावावर गांधींनी धर्माच्या नावावर होऊ घातलेल्या फाळणीवर विरोध करणारी भूमिका घेतली तेव्हा १९२५ पर्यंत हिंदू आणि मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्र आहेत ही सर सय्यद अहमद यांच्या पातळीवर जाऊन भूमिका घेणारे सावरकर हे हिंदूंचे राष्ट्र आहे असं म्हणत गांधींवर (३)
कोकणात रिफाईनरी झाली कि नक्की काय फरक पडेल परिसरात🤔..
हृदयावर दगड ठेऊन, जे चित्र उभारलं ते फार क्लेशदायी होत, अजून अस्वस्थ वाटतंय, पण हीच अस्वस्थता लढ्याला प्रेरणा देईल ,म्हणून इथे शेअर करीत आहे.. #Save_Kokan_Movement#SayNoToRefinery #म
1) परप्रांतीय वाढतील. 2) कोकणी माणूस दुय्यम स्थानावर जाईल. 3) केमिकल झोन कोकणभर पसरेल. 4) विजयदुर्ग खाडी तिचे सौंदर्य, विविधता गमावेल.
५) 16 गावातील बागायती, घरे, मंदिरे, झरे, ओढे, तलाव सर्वच भुईसपाट करून, पाइपांचे कुरूप जंजाळ पसरलेले असेल.++
6) चकचकीत इमारती उभ्या राहतील. परिसरातील दुकाने जैन- मारवाड्यांचीच असतील. शिपाई, माळी, सफाई कर्मचारी आदी वर्ग स्थानिक असेल. 7) एमप्लॉयीज च्या कोलोनीत स्थानिक कुणबी स्त्रिया भांडी, कपडे आदी घरकामाला असतील.++