PaisaPani Profile picture
Feb 28 10 tweets 12 min read
म्युच्युअल फंड की स्टॉक - गुंतवणूक नक्की कशात करावी?
बऱ्याच नवीन गुंतवणूकदारांचा स्टॉक विकत घ्यावेत? की म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी? याबाबत गोंधळ उडताना दिसतो. या थ्रेड मधून आपण दोन्हीही पर्यायांची थोडक्यात तुलना करणार आहोत. #Thread #StockMarket #MutualFunds #म #मराठी Image
थेट कंपन्यांच्या स्टॉकमध्ये केलेली गुंतवणूक लॉंग टर्ममध्ये मोठा कॉर्पस निर्माण करू शकते. मात्र बरेच गुंतवणूकदार मार्केटमध्ये शॉर्ट टर्म साठी येणाऱ्या बदलांमुळे भावनिक होऊन खालील चुका करताना दिसतात - #Thread #StockMarket #MutualFunds #म #मराठी Image
१. स्टॉकच्या किमतीत शॉर्ट टर्ममध्ये होणारे चढउतार पाहून खरेदी विक्री करणे.
२. भावनिक होऊन गुंतवणूक करणे किंवा गुंतवणूक काढून घेणे.
३. थोड्या स्टॉक्समध्ये खूप जास्त गुंतवणूक करून डायव्हर्सिफिकेशन न करणे.
४. गुंतवणूक करताना स्टॉकबाबत कोणतीही माहिती न घेणे,रिसर्च न करणे.#Thread #म Image
स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे आणि मोठे रिटर्न्स मिळवणे हे बऱ्याच जणांना मार्केटकडे आकर्षित करू शकते. मात्र निफ्टी 500 मध्ये असलेल्या कंपन्यांचा 31 डिसेंबर 2022 पर्यंतचा गेल्या पाच वर्षाचा रिटर्न पाहिला तर काहीसे वेगळे चित्र दिसते. #Thread #StockMarket #MutualFunds #म #मराठी
या इंडेक्समध्ये असलेल्या 402 कंपन्यांपैकी 95 कंपन्यांनी 20% पेक्षा जास्त रिटर्न्स दिलेले आहेत. मात्र जवळपास 110 कंपन्यांनी निगेटिव्ह रिटर्न्स दिलेले आहेत. तर 115 कंपन्यांनी 0 ते 10 टक्के आणि 82 कंपन्यांनी 10 ते 20 टक्के रिटर्न्स दिलेले आहेत.#Thread #StockMarket #MutualFunds
या आकडेवारीकडे पाहिले तर एक गोष्ट लक्षात येईल की स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणे दिसायला सोपे असले तरी त्यातून रिटर्न्स मिळवणे तितकेसे सोपे नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःचा रिसर्च करावा लागतो.
#Thread #StockMarket #MutualFunds #म #मराठी Image
तसेच कंपन्यांची माहिती काढावी लागते आणि जिथे तुम्हाला खरोखर खात्री असेल अशाच ठिकाणी गुंतवणूक करणे योग्य ठरते. हे करूनही तुम्ही केलेली गुंतवणूक पुरेसे रिटर्न्स देईलच याची खात्री मात्र कोणीही देऊ शकत नाही. #Thread #StockMarket #MutualFunds #म #मराठी Image
या उलट तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केलीत तर हेच काम काहीसे सोपे देखील होते. म्युच्युअल फंडाकडे फंड मॅनेजर, त्याच्या हाताखाली असलेले रिसर्च ॲनालिस्ट सेक्टर ॲनालिस्ट हे लोक प्रोफेशनली काम करून गुंतवणुकीचा निर्णय घेत असतात. #Thread #StockMarket #MutualFunds #म #मराठी Image
असे असले तरी म्युच्युअल फंड हेदेखील स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे त्यातही रिस्क असतेच. हा थ्रेड वाचून तुम्ही तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी की म्युच्युअल फंडात याचा निर्णय घेऊ शकता. #Thread #StockMarket #MutualFunds #म #मराठी Image
पैसापाणीचा व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल आताच जॉईन करा.
🎙व्हॉट्सॲप- chat.whatsapp.com/JqOKOXDyeGV7Ka…
🎙युट्यूबला सबस्क्राईब करा- youtube.com/@PaisaPani/?su…
🎙टेलीग्राम- t.me/paisapani

#म #मराठी

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with PaisaPani

PaisaPani Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PaisaPani

Mar 2
थ्रेडः
भूतानमध्ये भारतीयांना ड्युटी फ्री सोनं खरेदी करता येणार आहे. भारतात सध्या सोनं ५७ हजारांच्या आसपास आहे तर भुतानमध्ये ४० हजारांच्या आसपास. #म #मराठी #gold
1/n Image
परंतू यासाठी भूतान सरकारने दोन अटी ठेवल्या आहेत. पहिली अट म्हणजे भारतीयांना भूतानमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट फी अर्थात एसडीएफ द्यावी लागणार आहे. जी १२०० रुपये असेल.
#म #मराठी #gold
2/n Image
दुसरी अट म्हणजे तुम्हाला भूतान सरकारच्या टुरिझम डिपार्टमेंटने सर्टिफाय केलेल्या हॅाटेलमध्ये एक रात्र राहावे लागेल. #म #मराठी #gold
3/n Image
Read 5 tweets
Mar 1
म्युच्युअल फंडांच्या एक्सपेन्स रेशोवर सेबीची नजर

म्युच्युअल फंडामध्ये आपण जे पैसे गुंतवतो त्यातील काही पैसे या फंडांकडून त्यांचा मार्केटिंग, रिसर्च, कमिशन यासाठी होणारा खर्च भरून काढण्यासाठी वापरले जातात. #म #मराठी #mutualfund #MutualFundsSahiHai Image
त्यासाठी प्रत्येक फंड आपला एक्सपेन्स रेशो जाहीर करत असतो. म्युच्युअल फंडाच्या स्कीमनुसार एक्सपेन्स रेशो कमी जास्त होतो. या एक्सपेन्स रेशोमध्ये बदल करण्याचे अधिकार म्युच्युअल फंडाकडे असतात. #म #मराठी Image
मात्र आता सेबीने याबाबत पाऊल उचलण्याचे ठरवल्याचे दिसते. सेबीने सुचवलेला प्रस्ताव मान्य झाला तर म्युच्युअल फंडांना प्रत्येक कॅटेगरी मधील सगळ्या स्कीमला सारखाच एक्सप्रेस रेशो ठेवावा लागेल. #म #मराठी Image
Read 7 tweets
Feb 27
इन्कम टॅक्स साठी तुम्हाला नवी प्रणाली योग्य की जुनी? ठरवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या कॅल्क्युलेटरचा वापर करून
माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सबाबत महत्वाची घोषणा केली. ७ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला टॅक्स भरावा लागणार #मराठी #incometax Image
नाही ही ती घोषणा होती. मात्र यासाठी नवीन टॅक्सप्रणालीचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. यानंतर अनेकांना आपण जुन्या टॅक्स प्रणालीचा वापर करावा की नव्या? असा प्रश्न पडलेला दिसला.#म #मराठी #incometax Image
म्हणूनच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने तुम्हाला मदत म्हणून त्यांच्या वेबसाईटवर ऑफिशियल कॅल्क्युलेटर उपलब्ध करून दिलेले आहेत. यामुळे टॅक्सचे कॅल्क्युलेशन करणे आणि दोन्हीही टॅक्स प्रणालींपैकी कुठे कमी टॅक्स भरावा लागतो हे समजणे सोपे जाईल.
#म #मराठी #incometax Image
Read 6 tweets
Feb 25
२४ जानेवारीला हिंडेनबर्गने #AdaniGroup च्या विरोधात एक रिसर्च रिपोर्ट पब्लिश केला आणि या ग्रुपमधील स्टॉक्सच्या प्राईज धडाधड कोसळल्या. हा रिपोर्ट पब्लिश होऊन आता एक महिना उलटून गेला आहे. या एका महिन्यात घडलेल्या घडामोडींचा थोडक्यात गोषवारा. #Thread #HindenburgReport #म #मराठी
1/n
२४ जानेवारीला या अमेरिकन कंपनीने आपला रिसर्च रिपोर्ट पब्लिश करत अदानी ग्रुप दहा वर्षांपासून 'स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाऊंटिंग फ्रॉड' करत असल्याचा दावा केला. #LIC ची #AdaniGroup मध्ये ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक असल्यामुळे तेही यात ओढले गेले. #Thread #HindenburgReport
2/n
२६ जानेवारीपर्यंत अदानी ग्रुपमधील कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात विकले गेले आणि ब्लूमबर्गनुसार त्यांनी १०० बिलियन डॉलरहून अधिक मार्केट व्हॅल्यू गमावली. त्यानंतरदेखील अदानी ग्रुपची संपत्ती घटतच राहिली आणि त्यांचा FPO फक्त १ टक्के सबस्क्राईब झाला. #Thread #HindenburgReport
3/n
Read 11 tweets
Feb 23
फ्लेक्सीकॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय?
फ्लेक्सीकॅप फंड ही एक ओपन एंडेड डायनामिक इक्विटी स्कीम असते. ही स्कीम आपली गुंतवणूक लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप स्टॉक्स मध्ये करते.  #म #मराठी Image
सेबीच्या नियमानुसार या फंडांना आपली कमीत कमी ६५% टक्के गुंतवणूक ही इक्विटी आणि इक्विटी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट मध्ये करणे बंधनकारक असते. भारतामध्ये सध्या एकूण 33 फ्लेक्सीकॅप स्कीम्स आहेत.#म #मराठी Image
या फंडामध्ये गुंतवणुकीचे फायदे काय?
फ्लेक्सीकॅप फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे फंड मॅनेजरला गुंतवणूक करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असते. लार्ज कॅप, मिडकॅप किंवा स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक कशी विभागावी? #म #मराठी Image
Read 9 tweets
Feb 19
'मन' आणि 'नियमांत' ट्रेडरचा मित्र 'नियम' असले पाहिजेत. थ्रेड...

जेव्हा एखादा ट्रेडर सकाळी १ लाख रुपये लॉस करतो व परत सायंकाळी ते रिकव्हर करतो, तेव्हा तो १०० टक्के आनंदी होतो. टेक्नीकली त्याने त्या दिवशी शुन्य रुपये कमावलेले असतात. #म #मराठी #Thread
1/n
जेव्हा एखादा ट्रेडर सकाळी १ लाख रुपये प्रॉफिट कमावतो व त्याच दुपारी १ लाख रुपये लॉस करतो तेव्हा मात्र तो २५० टक्के दु:खी होतो. टेक्नीकली त्याने या दिवशीही शुन्य रुपये कमावलेले असतात. #म #मराठी #Thread
2/n
थोडक्यात काय तर प्रॉफिट व लॉस जरी सेम असला तरी माणूस प्रॉफिटच्या वेळी जेवढा आनंदी होतो, त्याच्या कित्येक पट जास्त दु:खी तो लॉस झाल्यावर होतो. #म #मराठी #Thread
3/n
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(