म्युच्युअल फंडामध्ये आपण जे पैसे गुंतवतो त्यातील काही पैसे या फंडांकडून त्यांचा मार्केटिंग, रिसर्च, कमिशन यासाठी होणारा खर्च भरून काढण्यासाठी वापरले जातात. #म#मराठी#mutualfund#MutualFundsSahiHai
त्यासाठी प्रत्येक फंड आपला एक्सपेन्स रेशो जाहीर करत असतो. म्युच्युअल फंडाच्या स्कीमनुसार एक्सपेन्स रेशो कमी जास्त होतो. या एक्सपेन्स रेशोमध्ये बदल करण्याचे अधिकार म्युच्युअल फंडाकडे असतात. #म#मराठी
मात्र आता सेबीने याबाबत पाऊल उचलण्याचे ठरवल्याचे दिसते. सेबीने सुचवलेला प्रस्ताव मान्य झाला तर म्युच्युअल फंडांना प्रत्येक कॅटेगरी मधील सगळ्या स्कीमला सारखाच एक्सप्रेस रेशो ठेवावा लागेल. #म#मराठी
म्हणजेच जर म्युच्युअल फंडाच्या एकूण दहा स्कीम इक्विटीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या असतील तर त्या प्रत्येक स्कीमला सारखाच एक्सपेन्स रेशो लागू राहील. #म#मराठी
यामुळे ग्राहकांचा फायदा कसा होऊ शकेल?
बऱ्याचदा म्युच्युअल फंड विकणारे एजंट ज्या स्कीमचा एक्सपेन्स रेशो जास्त आहे त्या स्कीम मध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला देता. कारण त्यामध्ये त्यांना मिळणारे कमिशन जास्त असते. #म#मराठी
मात्र आता हा एक्सपेन्स रेशो सगळ्या स्कीम मध्ये सारखाच राहिल्याने त्याचा ग्राहकांना तोटा होणार नाही.
सेबीने याआधी सप्टेंबर २०१८ मध्ये एक्सपेन्स रेशोची रचना बदलली होती. #म#मराठी
पैसापाणीचा व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल आताच जॉईन करा.
थ्रेडः
भूतानमध्ये भारतीयांना ड्युटी फ्री सोनं खरेदी करता येणार आहे. भारतात सध्या सोनं ५७ हजारांच्या आसपास आहे तर भुतानमध्ये ४० हजारांच्या आसपास. #म#मराठी#gold 1/n
परंतू यासाठी भूतान सरकारने दोन अटी ठेवल्या आहेत. पहिली अट म्हणजे भारतीयांना भूतानमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट फी अर्थात एसडीएफ द्यावी लागणार आहे. जी १२०० रुपये असेल. #म#मराठी#gold 2/n
दुसरी अट म्हणजे तुम्हाला भूतान सरकारच्या टुरिझम डिपार्टमेंटने सर्टिफाय केलेल्या हॅाटेलमध्ये एक रात्र राहावे लागेल. #म#मराठी#gold 3/n
म्युच्युअल फंड की स्टॉक - गुंतवणूक नक्की कशात करावी?
बऱ्याच नवीन गुंतवणूकदारांचा स्टॉक विकत घ्यावेत? की म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी? याबाबत गोंधळ उडताना दिसतो. या थ्रेड मधून आपण दोन्हीही पर्यायांची थोडक्यात तुलना करणार आहोत. #Thread#StockMarket#MutualFunds#म#मराठी
थेट कंपन्यांच्या स्टॉकमध्ये केलेली गुंतवणूक लॉंग टर्ममध्ये मोठा कॉर्पस निर्माण करू शकते. मात्र बरेच गुंतवणूकदार मार्केटमध्ये शॉर्ट टर्म साठी येणाऱ्या बदलांमुळे भावनिक होऊन खालील चुका करताना दिसतात - #Thread#StockMarket#MutualFunds#म#मराठी
१. स्टॉकच्या किमतीत शॉर्ट टर्ममध्ये होणारे चढउतार पाहून खरेदी विक्री करणे.
२. भावनिक होऊन गुंतवणूक करणे किंवा गुंतवणूक काढून घेणे.
३. थोड्या स्टॉक्समध्ये खूप जास्त गुंतवणूक करून डायव्हर्सिफिकेशन न करणे.
४. गुंतवणूक करताना स्टॉकबाबत कोणतीही माहिती न घेणे,रिसर्च न करणे.#Thread#म
इन्कम टॅक्स साठी तुम्हाला नवी प्रणाली योग्य की जुनी? ठरवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या कॅल्क्युलेटरचा वापर करून
माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सबाबत महत्वाची घोषणा केली. ७ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला टॅक्स भरावा लागणार #मराठी#incometax
नाही ही ती घोषणा होती. मात्र यासाठी नवीन टॅक्सप्रणालीचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. यानंतर अनेकांना आपण जुन्या टॅक्स प्रणालीचा वापर करावा की नव्या? असा प्रश्न पडलेला दिसला.#म#मराठी#incometax
म्हणूनच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने तुम्हाला मदत म्हणून त्यांच्या वेबसाईटवर ऑफिशियल कॅल्क्युलेटर उपलब्ध करून दिलेले आहेत. यामुळे टॅक्सचे कॅल्क्युलेशन करणे आणि दोन्हीही टॅक्स प्रणालींपैकी कुठे कमी टॅक्स भरावा लागतो हे समजणे सोपे जाईल. #म#मराठी#incometax
२४ जानेवारीला हिंडेनबर्गने #AdaniGroup च्या विरोधात एक रिसर्च रिपोर्ट पब्लिश केला आणि या ग्रुपमधील स्टॉक्सच्या प्राईज धडाधड कोसळल्या. हा रिपोर्ट पब्लिश होऊन आता एक महिना उलटून गेला आहे. या एका महिन्यात घडलेल्या घडामोडींचा थोडक्यात गोषवारा. #Thread#HindenburgReport#म#मराठी 1/n
२४ जानेवारीला या अमेरिकन कंपनीने आपला रिसर्च रिपोर्ट पब्लिश करत अदानी ग्रुप दहा वर्षांपासून 'स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाऊंटिंग फ्रॉड' करत असल्याचा दावा केला. #LIC ची #AdaniGroup मध्ये ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक असल्यामुळे तेही यात ओढले गेले. #Thread#HindenburgReport
2/n
२६ जानेवारीपर्यंत अदानी ग्रुपमधील कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात विकले गेले आणि ब्लूमबर्गनुसार त्यांनी १०० बिलियन डॉलरहून अधिक मार्केट व्हॅल्यू गमावली. त्यानंतरदेखील अदानी ग्रुपची संपत्ती घटतच राहिली आणि त्यांचा FPO फक्त १ टक्के सबस्क्राईब झाला. #Thread#HindenburgReport
3/n
फ्लेक्सीकॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय?
फ्लेक्सीकॅप फंड ही एक ओपन एंडेड डायनामिक इक्विटी स्कीम असते. ही स्कीम आपली गुंतवणूक लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप स्टॉक्स मध्ये करते. #म#मराठी
सेबीच्या नियमानुसार या फंडांना आपली कमीत कमी ६५% टक्के गुंतवणूक ही इक्विटी आणि इक्विटी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट मध्ये करणे बंधनकारक असते. भारतामध्ये सध्या एकूण 33 फ्लेक्सीकॅप स्कीम्स आहेत.#म#मराठी
या फंडामध्ये गुंतवणुकीचे फायदे काय?
फ्लेक्सीकॅप फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे फंड मॅनेजरला गुंतवणूक करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असते. लार्ज कॅप, मिडकॅप किंवा स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक कशी विभागावी? #म#मराठी
'मन' आणि 'नियमांत' ट्रेडरचा मित्र 'नियम' असले पाहिजेत. थ्रेड...
जेव्हा एखादा ट्रेडर सकाळी १ लाख रुपये लॉस करतो व परत सायंकाळी ते रिकव्हर करतो, तेव्हा तो १०० टक्के आनंदी होतो. टेक्नीकली त्याने त्या दिवशी शुन्य रुपये कमावलेले असतात. #म#मराठी#Thread
1/n
जेव्हा एखादा ट्रेडर सकाळी १ लाख रुपये प्रॉफिट कमावतो व त्याच दुपारी १ लाख रुपये लॉस करतो तेव्हा मात्र तो २५० टक्के दु:खी होतो. टेक्नीकली त्याने या दिवशीही शुन्य रुपये कमावलेले असतात. #म#मराठी#Thread
2/n
थोडक्यात काय तर प्रॉफिट व लॉस जरी सेम असला तरी माणूस प्रॉफिटच्या वेळी जेवढा आनंदी होतो, त्याच्या कित्येक पट जास्त दु:खी तो लॉस झाल्यावर होतो. #म#मराठी#Thread
3/n