आयपीएलच्या पार्श्वभूमीवर रिलायन्सने एक मोठा डाव टाकला आहे. यंदाची आयपीएल रिलायन्सच्या जिओ सिनेमा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर संपूर्णपणे मोफत दाखवण्यात येणार आहे. आयपीएलच्या टीव्ही प्रसारणाचे हक्क स्टारकडे आहेत. #म#मराठी#IPL2023#IPLonJioCinema
मात्र स्टारच्या जास्तीत जास्त युजर्सला आपल्याकडे वळवण्यासाठी रिलायन्सने आता मोठी खेळी केली आहे.
आपल्या हाताशी असलेल्या तीन मोठ्या केबल नेटवर्क कंपन्या वापरून रिलायन्स जवळपास १ कोटी ७० लाख युजर्सला आयपीएल पाहण्यापासून वंचित ठेवू शकते. #म#मराठी#IPL2023#IPLonJioCinema
भारतामध्ये एकूण १४ कोटी टीव्ही केबलवर चालतात. या १४ कोटींपैकी १ कोटी ७० लाख टीव्हींवर खालील तीन कंपन्यांचे कनेक्शन्स आहेत.
जी टी पी एल हाथवे - ८० लाख
हाथवे केबल अँड डेटाकॉम लिमिटेड - ४७ लाख
डेन नेटवर्क लिमिटेड - ४० लाख #म#मराठी#IPL2023#IPLonJioCinema
गमतीची बाब म्हणजे डेन आणि हाथवे या दोन्ही कंपन्यांमध्ये रिलायन्स मेजॉरिटी स्टेकहोल्डर आहे. जी टी पी एल मध्ये रिलायन्सचा २८% इनडायरेक्ट स्टेक आहे. म्हणजे अप्रत्यक्षपणे या १ कोटी ७० लाख ग्राहकांना रिलायन्स केबल सेवा पुरवत आहे.#म#मराठी#IPL2023#IPLonJioCinema
त्यामुळे साहजिकच या ग्राहकांना त्यांच्या बेस पॅकेजमध्ये कोणते चॅनेल्स दिसतील? हे ठरवण्याचा अधिकार आता रिलायन्सकडे आहे. स्टार स्पोर्ट्सच्या एकूण २२ वेगवेगळ्या चॅनेल्सवर यंदा आयपीएलचे प्रसारण होणार आहे. #म#मराठी#IPL2023#IPLonJioCinema
मात्र रिलायन्सने आपल्या तीन केबल ऑपरेटर कंपन्यांना हाताशी धरून हे चॅनेल्स त्यांच्या बेस पॅकेजमधून काढून टाकले आहेत.
म्हणजे एक एप्रिलपासून या तीन कंपन्यांच्या ग्राहकांना जर आयपीएल बघायची असेल तर त्यांच्याकडे तीन पर्याय आहेत. #म#मराठी#IPL2023#IPLonJioCinema
१. बेस पॅकेजहून अधिक महाग पॅकेज घेणे
२. स्टार स्पोर्ट्स चॅनेल वेगळे विकत घ्यावे लागेल
३. आपला डिश ऑपरेटर बदलावा लागेल जे आणखी महाग ठरू शकते
हे सगळं रिलायन्सने आयपीएल सुरू होण्याच्या फक्त सात दिवस अगोदर केलेले आहे. #म#मराठी#IPL2023#IPLonJioCinema
म्हणजे जर स्टार स्पोर्ट्स मॅनेजमेंटला या तीन केबल कंपन्यांशी चर्चा करायची म्हटली तरी त्यांच्याकडे फक्त सात दिवस हातात आहेत. शिवाय स्टार स्पोर्ट्स मॅनेजमेंटला आता या तीन केबल ऑपरेटर कंपन्यांना त्यांना हव्या तशा टर्म अँड कंडिशन्स पुरवाव्या लागतील.#म#मराठी#IPL2023#IPLonJioCinema
याशिवाय स्टार स्पोर्ट्सवर जे जाहिरातदार करोडो रुपये खर्च करून जाहिराती दाखवणार आहेत त्यांना देखील मनवण्याची मोठी जबाबदारी स्टार स्पोर्ट्स मॅनेजमेंटकडे आलेली आहे.कारण जर हवी तशी व्ह्यूअरशिप मिळाली नाही #म#मराठी#IPL2023#IPLonJioCinema
तर हे जाहिरातदार स्टार स्पोर्ट्सकडे आपले कॉन्ट्रॅक्ट आणखी कमी किमतीला मिळावे म्हणून निगोसिएशन करू शकतात.
थोडक्यात काय तर रिलायन्सने ऐन मोक्यावर डाव टाकत स्टार स्पोर्ट्स मॅनेजमेंटला खिंडीत गाठले आहे.
कंपनीने आपल्या इक्विटी कॅपिटल वर किती रिटर्न्स जनरेट केलेत? हे आपल्याला रिटर्न ऑन इक्विटी हा रेशो सांगतो. मात्र या रेशोमध्ये कंपनीने डेट म्हणून घेतलेले कॅपिटल विचारात घेतले जात नाही. #म#मराठी
रिटर्न ऑन कॅपिटल एम्पलॉइड या रेशो मध्ये मात्र कंपनीचे डेट विचारात घेतले जाते आणि म्हणूनच हा रेशो कंपनीच्या रिटर्न्सबद्दल अधिक व्यापक चित्र स्पष्ट करतो. #म#मराठी
कंपनीने प्रत्येकी १ रुपया कॅपिटलवर किती प्रॉफिट जनरेट केला आहे?हे आपल्याला रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड हा रेशो सांगतो.
आजच्या तारखेला नेस्ले इंडिया कंपनीचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड १५२.६१% आहे.म्हणजेच दर १०० रुपये कॅपिटल मागे कंपनीने १५२.६१ रुपयाचा प्रॉफिट जनरेट केलेला आहे. #म
थ्रेडः
भूतानमध्ये भारतीयांना ड्युटी फ्री सोनं खरेदी करता येणार आहे. भारतात सध्या सोनं ५७ हजारांच्या आसपास आहे तर भुतानमध्ये ४० हजारांच्या आसपास. #म#मराठी#gold 1/n
परंतू यासाठी भूतान सरकारने दोन अटी ठेवल्या आहेत. पहिली अट म्हणजे भारतीयांना भूतानमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट फी अर्थात एसडीएफ द्यावी लागणार आहे. जी १२०० रुपये असेल. #म#मराठी#gold 2/n
दुसरी अट म्हणजे तुम्हाला भूतान सरकारच्या टुरिझम डिपार्टमेंटने सर्टिफाय केलेल्या हॅाटेलमध्ये एक रात्र राहावे लागेल. #म#मराठी#gold 3/n
म्युच्युअल फंडामध्ये आपण जे पैसे गुंतवतो त्यातील काही पैसे या फंडांकडून त्यांचा मार्केटिंग, रिसर्च, कमिशन यासाठी होणारा खर्च भरून काढण्यासाठी वापरले जातात. #म#मराठी#mutualfund#MutualFundsSahiHai
त्यासाठी प्रत्येक फंड आपला एक्सपेन्स रेशो जाहीर करत असतो. म्युच्युअल फंडाच्या स्कीमनुसार एक्सपेन्स रेशो कमी जास्त होतो. या एक्सपेन्स रेशोमध्ये बदल करण्याचे अधिकार म्युच्युअल फंडाकडे असतात. #म#मराठी
मात्र आता सेबीने याबाबत पाऊल उचलण्याचे ठरवल्याचे दिसते. सेबीने सुचवलेला प्रस्ताव मान्य झाला तर म्युच्युअल फंडांना प्रत्येक कॅटेगरी मधील सगळ्या स्कीमला सारखाच एक्सप्रेस रेशो ठेवावा लागेल. #म#मराठी
म्युच्युअल फंड की स्टॉक - गुंतवणूक नक्की कशात करावी?
बऱ्याच नवीन गुंतवणूकदारांचा स्टॉक विकत घ्यावेत? की म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी? याबाबत गोंधळ उडताना दिसतो. या थ्रेड मधून आपण दोन्हीही पर्यायांची थोडक्यात तुलना करणार आहोत. #Thread#StockMarket#MutualFunds#म#मराठी
थेट कंपन्यांच्या स्टॉकमध्ये केलेली गुंतवणूक लॉंग टर्ममध्ये मोठा कॉर्पस निर्माण करू शकते. मात्र बरेच गुंतवणूकदार मार्केटमध्ये शॉर्ट टर्म साठी येणाऱ्या बदलांमुळे भावनिक होऊन खालील चुका करताना दिसतात - #Thread#StockMarket#MutualFunds#म#मराठी
१. स्टॉकच्या किमतीत शॉर्ट टर्ममध्ये होणारे चढउतार पाहून खरेदी विक्री करणे.
२. भावनिक होऊन गुंतवणूक करणे किंवा गुंतवणूक काढून घेणे.
३. थोड्या स्टॉक्समध्ये खूप जास्त गुंतवणूक करून डायव्हर्सिफिकेशन न करणे.
४. गुंतवणूक करताना स्टॉकबाबत कोणतीही माहिती न घेणे,रिसर्च न करणे.#Thread#म
इन्कम टॅक्स साठी तुम्हाला नवी प्रणाली योग्य की जुनी? ठरवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या कॅल्क्युलेटरचा वापर करून
माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सबाबत महत्वाची घोषणा केली. ७ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला टॅक्स भरावा लागणार #मराठी#incometax
नाही ही ती घोषणा होती. मात्र यासाठी नवीन टॅक्सप्रणालीचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. यानंतर अनेकांना आपण जुन्या टॅक्स प्रणालीचा वापर करावा की नव्या? असा प्रश्न पडलेला दिसला.#म#मराठी#incometax
म्हणूनच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने तुम्हाला मदत म्हणून त्यांच्या वेबसाईटवर ऑफिशियल कॅल्क्युलेटर उपलब्ध करून दिलेले आहेत. यामुळे टॅक्सचे कॅल्क्युलेशन करणे आणि दोन्हीही टॅक्स प्रणालींपैकी कुठे कमी टॅक्स भरावा लागतो हे समजणे सोपे जाईल. #म#मराठी#incometax
२४ जानेवारीला हिंडेनबर्गने #AdaniGroup च्या विरोधात एक रिसर्च रिपोर्ट पब्लिश केला आणि या ग्रुपमधील स्टॉक्सच्या प्राईज धडाधड कोसळल्या. हा रिपोर्ट पब्लिश होऊन आता एक महिना उलटून गेला आहे. या एका महिन्यात घडलेल्या घडामोडींचा थोडक्यात गोषवारा. #Thread#HindenburgReport#म#मराठी 1/n
२४ जानेवारीला या अमेरिकन कंपनीने आपला रिसर्च रिपोर्ट पब्लिश करत अदानी ग्रुप दहा वर्षांपासून 'स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाऊंटिंग फ्रॉड' करत असल्याचा दावा केला. #LIC ची #AdaniGroup मध्ये ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक असल्यामुळे तेही यात ओढले गेले. #Thread#HindenburgReport
2/n
२६ जानेवारीपर्यंत अदानी ग्रुपमधील कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात विकले गेले आणि ब्लूमबर्गनुसार त्यांनी १०० बिलियन डॉलरहून अधिक मार्केट व्हॅल्यू गमावली. त्यानंतरदेखील अदानी ग्रुपची संपत्ती घटतच राहिली आणि त्यांचा FPO फक्त १ टक्के सबस्क्राईब झाला. #Thread#HindenburgReport
3/n