Discover and read the best of Twitter Threads about #महात्मा_फुले

Most recents (5)

भाजप सत्तेत असूनही असाच पुचाटपणा करत राहणार आहे का? नेत्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर स्कॅनर लावून त्यातील निवडक भाग काढून "अपमान अपमान" करत गदारोळ करण्याचा डाव शिवसेना-राष्ट्रवादी प्रणित मीडिया व त्यांची एकूणच इकोसिस्टीम यशस्वी करत असल्याचं दिसतं. १/१३
१. #चंद्रकांत_पाटील यांनी भीक शब्द वापरायला नको होता. वर्गणी शब्द योग्य झाला असता. पण बोलण्याच्या ओघात एखाद वेळी पटकन एखादा शब्द निसटतो. त्यांचं संपूर्ण भाषण ऐकल्यास #महात्मा_फुले यांचा अपमान करण्याचा त्यांचा हेतू अगदीच नव्हता हे स्पष्ट होतं. २/१३
२. #प्रसाद_लाड यांनी रायगड आणि शिवनेरी यात गोंधळ केला यात मूर्खपणा दिसतो. अपमान नाही.

३. #भगतसिंग_कोशियारी यांनी उत्साहाच्या भरात पूर्वीच्या काळचे आदर्श आणि सांप्रत काळचे आदर्श असा फरक केला. त्यात एवढी आदळ आपट करण्यासारखं अजिबात काही नाही. ३/१३
Read 13 tweets
सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतिबा फुले.

मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसुन तो गुणाने श्रेष्ठ ठरतो. ईश्वर एक असुन तो सर्वव्यापी निर्विकार, निर्गुण व सत्यरूप आहे. सर्व मनुष्य व मनुष्येत्तर प्राणी त्याची लेकरे आहेत. हा वास्तव विचार सन १८व्या शतकात निर्भीडपणे मांडून सामाजिक,
शैक्षणिक, सांस्कृतिक गुलामगिरीतुन समस्त मानवाला बाहेर काढण्याचं काम करणारे आणि सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. महात्मा ज्योतीराव फुले यांचा जन्म शेतकरी, भाजीपाला व फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव आणि चिमणाबाई यांच्या पोटी ता.
११ एप्रिल १८२७ रोजी झाला. त्या दिवशी जोतिबाची यात्रा होती म्हणून गोविंदराव आणि चिमणाबाई यांनी तेजस्वी आणि ओजस्वी असलेल्या पुत्राचे नाव जोतिबा असे ठेवले. काही लोकांच्या जीवनात जन्मापासूनच अडचणी आणि संकटे दार ठोठावतच असतात. जोतिबांच्या बाबतीतही असेच काही घडले होते. त्यांच्या आई
Read 25 tweets
स्त्रीयांची गुलामगिरी नष्ट करणारे महात्मा ज्योतिबा फुले.

महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ समाज सुधारकच नव्हते तर ते खऱ्या अर्थाने नवसमाज निर्मितीचे सांस्कृतिक पुरुष होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थावादी समाजव्यवस्था नाकारलीच नाही तर नवसमाज निर्मितीसाठी Image
आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी नवीन समतामूलक समाजव्यवस्था निर्माण करण्याचे प्रारूप भारतीय समाज व्यवस्थेसमोर मांडले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी या परिवर्तनवादी लढाईमध्ये स्त्रियांना केवळ सामावून घेतले नाही
तर त्यांना या लढ्याचे शिलेदार बनविले. त्यामुळे आज भारताच्या सर्व क्षेत्रात महीला आघाडीवर दिसत आहेत. यामागे महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्त्री विषयक कार्य, तत्वज्ञान, प्रेरणा आहे. सदर लेखात ज्योतिबा फुले यांनी स्रियांसंबंधी केलेल्या कार्याचा व भूमिकेचा थोडक्यात आढावा घेण्याचा मानस
Read 33 tweets
शेतकऱ्याचा असूड - महात्मा ज्योतिराव फुले

भारतातील परंपरागत समाज संस्थेच्या विरुद्ध बंड करणारे पहिले बंडखोर, भारतीय स्त्री-शिक्षणाचे जनक, स्त्री-स्वातंत्र्याचे आणि हक्काचे उद्गाते, शेतकरी-कामकऱ्यांची चळवळ उभारणारे पहिले पुढारी म्हणून ज्योतिराव गोविंदराव फुले हे ख्यातीप्राप्त Image
आहेत. महात्मा फुले हे गौतम बुद्ध, संत कबीर, संत तुकाराम आणि लोकराजा शिवाजी यांची परंपरा जोपासणारे विवेकवादी होते. समाजसुधारणा, स्त्रीदास्य विमोचन, सर्वांना शिक्षणाचा हक्क याविषयी ते आग्रही होते. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, हे त्यांनी 'तृतीय रत्न' या नाटकातून दाखवून दिले आहे
शिक्षणानेच मनुष्य विवेकशील व संवेदनशील बनतो. शिक्षणाअभावी माणूस मानवी हक्क, प्रतिष्ठा, दर्जा ह्यांना पारखा होतो. समाजसुधारणेचा परीघ व्यापक होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, याची त्यांना जाणीव होती. अशिक्षितपणामुळे शेतकरी, कामकरी यांचे जीवन शोचनीय झाले आहे. अज्ञान, अंधश्रद्धा,
Read 13 tweets
गुलामगिरी ⛓

१८७३ साली म. फुले यांनी 'गुलामगिरी' हे जहाल व ब्राह्मणी व्यवस्थेला नेस्तनाबूत करणारे पुस्तक लिहिले. ब्राह्मणी गुलामिच्या विध्वंसनाला प्रारंभ झाला. बहुजनांच्या स्वातंत्र्य
लढ्यातील एक महान ग्रंथ म्हणजे 'गुलामगिरी' होय. अत्यंत पुराव्यानिशी व चिकित्सक
पद्धतीने फुल्यांनी या देशातील बहुजनांचा इतिहास मांडला आहे. वैदिक ब्राह्मणी ग्रंथातून मांडलेली त्यांची संस्कृती नाकारत असताना आपला इतिहास शोधण्याचा प्रयत्न सर्व प्रथम यात झालेला आहे. पुराणे म्हणजे भाकड कथा हे जरी खरे असले तरी त्यात बहुजनांचा इतिहास दडलेला आहे. तो मांडण्यासाठी
फुल्यांची दृष्टी घेऊन कार्य करावे लागेल. अलिकडे 'गुलामगिरी' या मांडणीच्या पद्धतीचा अत्यंत योग्य विकास डॉ. आ. ह. साळुंखे यांनी करून 'बळीवंश' हा ग्रंथ सिद्ध केला आहे. महात्मा फुल्यांचा इतिहास लेखनाचा हा अत्यंत योग्य व वास्तववादी अविष्कार आहे. बहुजनांच्या इतिहासाची पुनर्मांडणीच
Read 19 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!